Author: Admin

  • Chandrapur Mp Pratibha Dhanorkar : चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी निधी द्या – खासदार प्रतिभा धानोरकर

    Chandrapur Mp Pratibha Dhanorkar : चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी निधी द्या – खासदार प्रतिभा धानोरकर

    Chandrapur Mp Pratibha dhanorkar
    चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्राच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून काम करायला सुरुवात केली असून केंद्रातून क्षेत्राच्या विकासासाठी निधी आणण्याकरीता त्यांनी रस्ते मार्ग आणि महामार्ग मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/mukhyamantri-ladki-bahin-yojana-maharashtra-government/

    चंद्रपूर लोकसभा क्षेत्र हे बहुतांश आदिवासी बहुल असून ग्रामीण भागाचा जास्त समावेश असणाऱ्या या लोकसभा क्षेत्रात रस्त्यांचा विकास व्हावा यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज दिल्ली येथे मा.श्री. नितिनजी गडकरी यांची भेट घेऊन रस्ते आणि महामार्ग संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली. यात प्रामुख्याने वरोरा-चिमुर प्रलंबित महामार्ग तात्काळ पुर्ण व्हावा याकरीता आपल्याकडून प्रयत्न केले जावे अशी विनंती देखील केली.

    Chandrapur Mp Pratibha dhanorkar तसेच चंद्रपूर जिल्हातील भद्रावती तालुक्यातील कोंढा-माजरी-पाटाळा-मणगांव-थोराणा-वरोरा-मोहबाळा या कामांकरीता 70 कोटी रुपये त्यासोबतच भद्रावती तालुक्यातील माजरी-पळसगांव-नंदोरी-भटाळी-चोरा-चंदनखेडा या रस्त्याकरीता 40 कोटी रुपये, वरोरा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 371 ते पिंपळगांव(सिंगरु) ते तुमगांव वाही या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाकरीता 50 कोटी रुपये, भद्रावती तालुक्यातील सुमठाणा-तेलवासा-जुनाळा रस्त्याचे रुंदीकरणासह बांधकाम करण्याकरीता 75 कोटी रुपये तसेच राजुरा तालुक्यातील वरुर-विरुर धानोरा-आर्वी रस्त्याकरीता 46 कोटी रुपये तसेच सास्ती-कोलगांव-कढोली-चढी-निरली-धिंडसी-मार्डा या रस्त्याकरीता 13 कोटी रुपयांची मागणी करुन निधी उपलब्ध करुण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून करण्यात आली.
    यासंदर्भात मा.श्री. नितीनजी गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वरोरा-चिमुर रस्त्याचे काम तात्काळ पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या. त्यासोबत वरील कामांकरीता निधी लवकरच उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देखील दिले.
  • Maharashtra Prevention Of Defacement Of Property Act : नवशक्ती विरोधात चंद्रपूर मनपाची पोलिसात तक्रार

    Maharashtra Prevention Of Defacement Of Property Act : नवशक्ती विरोधात चंद्रपूर मनपाची पोलिसात तक्रार

    Maharashtra Prevention Of Defacement Of Property Act शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या नवशक्ती आयुर्वेदीक दवाखानाविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. १ कार्यालयाद्वारे शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील 2 विधानसभेवर राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाने केला दावा, जागा न मिळाल्यास सामूहिक राजीनामे देणार

    शहरातील जटपुरा गेट तसेच छोटा बाजार चौक रोड परिसरातील भिंतींवर,विविध शासकीय व खाजगी परिसरात नवशक्ती आयुर्वेदीक दवाखान्याची  जाहिरात करणारे स्टीकर्स,भिंतीपत्रके मनपाकडुन पूर्वपरवानगी न घेता लावले असल्याचे सहायक आयुक्त यांना २६ जुन रोजी पाहणीदरम्यान आढळुन आले.

    Maharashtra Prevention Of Defacement Of Property Act संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले असता अद्याप पावेतो भिंतीपत्रके न काढल्याने नवशक्ती आयुर्वेदीक दवाखाना यांच्यावर महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत कलम ३ नुसार फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा अश्या आशयाची तक्रार करण्यात आली आहे. जाहिरात करण्यास अश्या प्रकारचा अवलंब केल्याने शासकीय निधीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तसेच शहर सुशोभीकरणाच्या कामातही बाधा निर्माण होते.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/chandrapur-news-udta-chandrapur/

    भिंतीपत्रके,पोस्टर्स,बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरण होते किंबहुना वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखुन दिलेल्या सुचनांनुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार, परवानगीशिवाय पॅम्प्लेट्स, बॅनर्स, होर्डिंग्ज,कापडी फलक लावणा-यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे.

  • Ncp Sharad pawar : चंद्रपूर जिल्ह्यातील या 2 विधानसभेवर राष्ट्रवादी कांग्रेसचा दावा

    Ncp Sharad pawar : चंद्रपूर जिल्ह्यातील या 2 विधानसभेवर राष्ट्रवादी कांग्रेसचा दावा

    Ncp Sharad Pawar वर्ष २०२४ ला महाराष्ट्रात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातून “बल्लारपूर विधानसभेसह”, चंद्रपूर किंवा चिमूर पैकी एक अश्या दोन जागा महाआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या(शरदचंद्र पवार) वाट्यात घ्याव्या अशी एकमुखी मागणी,जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते,तालुका अध्यक्ष,विधानसभा अध्यक्ष,यांनी पक्ष निरीक्षक श्री.दिलीप पनकुले यांच्या समक्ष मांडली.

    अवश्य वाचा : उडता चंद्रपूर होऊ देऊ नका – महेश मेंढे

    बैठकीत जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी बल्लारपूर सह चंद्रपूर किंवा चिमूर अश्या दोन जागा २०२४ च्या निवडणुकीत पक्षाला मिळण्यासंदर्भात विदर्भाचे पक्षाचे नेते आ.अनिलबाबु देशमुख आणि प्रदेश अध्यक्ष आ.जयंतराव पाटील,आणि पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे केलेली आहे.

     

    Ncp Sharad Pawar पक्षनिरीक्षक पनकुले यांनी सुद्धा यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींकडे कळवाव्या,आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक आ.अनिल देशमुख, यांच्यासोबत आणि मुंबईला प्रांताध्यक्ष आ.जयंतराव पाटील,आणि देशाचे नेते,पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत लावण्याची विनंती केली. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल, युवक जिल्हाध्यक्ष सुमित समर्थ, महीला जिल्हाध्यक्ष सौ.बेबीताई उईके,ज्येष्ठ नेते प्रदेश, पक्षाचे सरचिटणीस हिराचंद बोरकुटे,चंद्रपूर शहर कार्याध्यक्ष सुधाकर कातकर,राजुरा विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे,राजुरा तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद,जिल्हा उपाध्यक्ष योगराज कुथे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र वरघने,जिल्हा सचिव ऋषी हेपट, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप ढाले, प्रदेश सरचिटणीस शरद जीवतोडे,जिवती तालुका अध्यक्ष कैलाश राठोड, इत्यादी पदाधिकाऱ्यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेत बल्लारपूर विधानसभेची जागा मागील ३५-४० वर्षांपासून काँग्रेस पक्ष लढत आहे आणि पराभूत होत आहे, त्यामुळे “बल्लारपूरची” जागा यंदा राष्ट्रवादीच्या कोट्यात घेण्यासंदर्भात भूमिका घेत,चंद्रपूर जिल्ह्यात २०२४ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार लढलेच पाहिजे अश्या भावना पक्ष निरिक्षकांसमोर व्यक्त करतांना,जर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाच्या वाट्याला जागा सुटल्या नाही,तर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होवून त्याचा परिणाम जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आपापल्या पदांचे सामूहिक राजीनामे देण्याची भूमिका घेतील अशी ठोस भूमिका मांडली.आणि त्याचा परिणाम जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीवर सुद्धा होईल.

    अवश्य वाचा : लाडक्या बहिणीला मिळणार वर्षाला 12 हजार

    Ncp Sharad Pawar याप्रसंगी पक्ष निरीक्षक दिलीप पनकुले यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या तीव्र भावना पक्ष श्रेष्ठींपर्यंत पोहोचवून विधानसभा उमेदवारीच्या संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यावर सतत झालेला अन्याय, हा येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दूर करण्यासंदर्भात पक्ष श्रेष्ठींना भूमिका घेण्यास भाग पाडू,आणि लवकरच विदर्भाचे पक्ष प्रमुख आमदार अनिल देशमुख यांच्यासोबत तसेच मुंबईला जयंतराव पाटील,आणि मा.श्री.शरद पवार साहेबांसोबत जिल्ह्यातील पक्षाच्या शिष्टमंडळाची बैठक लावण्याचे आश्वासन दिले.

     

    Ncp Sharad Pawar बैठकीला जिल्ह्यातील पॅरेंटचे,महीला,युवक,चे सर्व तालुका/शहर/विधानसभा अध्यक्ष,जिल्ह्यातील विविध राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व संघटनांचे जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री.मुनाज शेख,प्रदेश चिटणीस श्री.डी.के.आरिकर,सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.महादेवराव पिदुरकर,श्री.जयंत टेमुर्डे,सेवादल जिल्हाध्यक्ष माणिकराव लोणकर,व्यापार व उद्योग विभागाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत अग्रवाल,VJNT सेलचे जिल्हाध्यक्ष रवी नेचपेलवार, ज्येष्ठ नागरिक विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहास बहादे,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक बुजाडे,वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष पंकज जगताप,श्री.सुनील मैंद,माजी नगरसेवक राजेंद्र आखरे, सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष नितीन पिंपळशेंडे, ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.देव कन्नाके,आसिफ सय्यद,कैलाश राठोड,बादल उराडे,राजू काब्रा,दिलीप पिट्टलवार,प्रा. किसनराव वासाडे,अविनाश ढेंगळे,बंडू भोंगाडे,नगाजी निंबाळकर,सौ.पूजा शेरकी,सौ.वंदना आवळे,सौ.सरस्वती गावंडे,सौ. मलेश्र्वरी,सौ.निता गेडाम,सौ माया सातपुते, सौ.घरडेताई,चंद्रपूर शहर युवक अध्यक्ष श्री.कलाकार मल्लारप,महीला शहर अध्यक्ष शिल्पताई कांबळे, अल्पसंख्यांक विभागाचे शहर अध्यक्ष बब्बुभाई ईसा,राहुल देवतळे,हिराजी पावडे,बबलू शेख, वसंत कुळमेथे, डॉ.रमेश वऱ्हाटे,वासुदेव सौंदरकर, रफिक निजामी,प्रवीण कोल्हे,शेरीकुमार,कुणाल गायकवाड, डॉ.आनंद अडबाले,अशोक मारगोनवार,शरद मानकर, विक्रांत मोहूर्ले,भगवान पगाडे,सुधाकर रोहनकर, जगन्नाथ सुत्रपवार,मारोती झाडे,दशरथ मिठ्ठावार, अरुण सहारे, यासह जिल्ह्यातील आणि चंद्रपूर शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे संचालन युवक कार्याध्यक्ष श्री.संजय ठाकूर यांनी आणि आभार प्रदर्शन सुधाकर कातकर यांनी केले.

  • Chandrapur news : उडता चंद्रपूरची वाटचाल थांबवा – कांग्रेस नेते महेश मेंढे

    Chandrapur news : उडता चंद्रपूरची वाटचाल थांबवा – कांग्रेस नेते महेश मेंढे

    Chandrapur news चंद्रपूर जिल्हा तसेच चंद्रपूर महानगरातील वाढत्या अंमली पदार्थ तस्करीला,  प्रभावी उपाययोजनांच्या माध्यमातून अंकुश घालण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी जागतिक ड्रग डे च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांना काँग्रेस नेते महेश मेंढे यांचे निवेदनाच्या माध्यमातून  केली.

    अवश्य वाचा : शिवसेना ठाकरे गटात आता हम दो हमारे तीन, जिल्हाप्रमुखानी केलं बंड

    जिल्हयात तसेच चंद्रपूर महानगरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अंमली पदार्थाच्या तस्करीकडे तद्वतच या अंमली पदार्थाच्या अवैध खरेदी आणि विकीच्या प्रकाराकडे आणि अल्पवयीन मुलांपासून तर शाळकरी महाविद्यालयीन युवकांपर्यंत या पदार्थाचे सेवन करण्याची प्रवृत्ती वाढल्याच्या गंभीर प्रकाराकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण दारूबंदी लागू झाल्यानंतर पोलीस विभागाने अवैध दारूच्या खरेदीविकीला प्रतिबंध घालण्यासार्टी अनेक उपाययोजना अंमलात आणलेल्या होत्या. जिल्ह्यातील अनेक शहरी भागात गांजा, अफू, चरस एम.डी यासारखे अंमली पदार्थाच्या तस्करीला मोठ्या प्रमाणात ऊत आलेला आहे.

    अवश्य वाचा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे?

    Chandrapur news पोलीसांनी अनेक ठिकाणी धाडी घालून अंमली पदार्थ जप्त केला असला तरी अजुनही राजरोसपणे अंमली पदार्थाची विकी मोठ्या प्रमाणात होत असून हा प्रश्न चिंतेचा बनलेला आहे. या प्रश्नी गांभीर्य याचे वाटते की, या तस्करांच्या जाळ्यात युवावर्ग मोठ्या प्रमाणात अडकुन अंमली पदार्थाचे सेवन करीत आहे. परिस्थिती हाताबाहेर जावू लागली असल्याने पोलीस विभागाने या प्रश्नाला अत्यंत गांभीर्याने घ्यावे, गेल्या दीड-दोन वर्षांपासून अंमली पदार्थमुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. महिला व मुलींची छेड काढण्याचे प्रकार सर्रासपणे होत आहे. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या भीतीमुळे या घटनांची तकार करण्याचे धाडस संबंधित मुलींचे पालक करीत नसल्याने हा प्रकार वाढलेला आहे.

    आपण चंद्रपूर जिल्हा तसेच चंद्रपूर महानगरातील वाढत्या अंमली पदार्थ तस्करीला,  प्रभावी उपाययोजनांच्या माध्यमातून अंकुश घालण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती आहे.

    बाबा आमटे यांच्या आनंदवनात हत्या

    Chandrapur news आपण या प्रश्नी योग्य सहकार्य करावे. आपल्या या समाजाभिमुख व राष्ट्राभिमुख कार्याला काँग्रेस पक्षाचा  माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. अशाप्रकारे निवेदनाच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षकांना अमली पदार्थाच्या उच्चाटनासाठी विनंती करण्यात आली. यावेळेस अश्विनी ताई खोब्रागडे, मोहम्मद इरफान शेख, मोहम्मद कादर शेख, प्रकाश देशभ्रतार, रोशन रामटेके , मेश्राम आदी उपस्थित होते.

  • Shiv Sena Thackeray group : चंद्रपूर जिल्हा शिवसेनेत 3 तिघाडा, पदाधिकारी निघाले राजीनामा द्यायला

    Shiv Sena Thackeray group : चंद्रपूर जिल्हा शिवसेनेत 3 तिघाडा, पदाधिकारी निघाले राजीनामा द्यायला

    Shiv Sena Thackeray group 27 जूनला सामना मुखपत्रातून चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रातील जिल्हाप्रमुखाच्या नियुक्ता जाहीर करण्यात आल्या.

    यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात 2 जिल्हाप्रमुख होते मात्र आता 3 जिल्हाप्रमुख यांची नियुक्ती करण्यात आल्याने 2 जिल्हाप्रमुखानी या विरोधात बंड करीत स्वतः व 100 पदाधिकारी यांचे राजीनामे सोबत घेत थेट मुंबईला रवाना झाले.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील या आमदाराच्या कृतीने भारावले शिक्षक

    राज्यात 2 महिन्यानंतर विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे त्यापूर्वी ठाकरे गटातील या नियुक्ती ने चंद्रपुरात खळबळ उडाली आहे.

     

    Shiv Sena Thackeray group जिल्ह्यातील 6 विधानसभेतील वरोरा, चिमूर व ब्रह्मपुरी ची जबाबदारी मुकेश जीवतोडे व चंद्रपूर, बल्लारपूर व राजुऱ्याची जबाबदारी संदीप गिर्हे यांच्यावर आहे, आता नव्या नियुक्ती मध्ये चंद्रपूर व वरोरा विधानसभेची जबाबदारी रवींद्र शिंदे कडे देण्यात आली असून चिमूर-ब्रह्मपुरी मुकेश जीवतोडे व बल्लारपूर व राजुरा विधानसभा संदीप गिर्हे यांच्याकडे आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल बाबत महत्वाची माहिती 

    याबाबत संदीप गिर्हे यांनी सांगितले की आज सकाळी सदर प्रकार आम्हाला कळला असता आम्ही याबाबत पूर्व विदर्भ सम्पर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव व सम्पर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्याशी संपर्क साधत याबाबत विचारणा केली मात्र त्यांनी सांगितले की सदर नियुक्ती आम्हाला विश्वासात न घेता करण्यात आली आहे याबाबत आम्ही पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

     

    Shiv Sena Thackeray group गिर्हे म्हणाले की आमचं असं काय चुकलं, आम्ही अनेक वर्षांपासून शिवसैनिक म्हणून काम करीत आहो, कार्यकर्ता ते जिल्हाप्रमुख अशी जबाबदारी आज पाळत आहो, मात्र सदर नियुक्ती ही अन्यायकारक आहे याबाबत आम्ही आमचे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविणार आहो.

     

    नवे जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्याशी सम्पर्क केला असता ते म्हणाले आज पक्षाला संघटन बांधणीची गरज आहे, सध्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते, यासाठी आधी आपल्याला पक्ष संघटनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे, पक्षाने जी जबाबदारी दिली ती एक कार्यकर्ता म्हणून मी पार पाळणार आहो. कोरोना काळात आम्ही नागरिकांची सेवा केली, सहकार क्षेत्र असो की कृषी उत्पन्न बाजार समिती अश्या अनेक निवडणुका आम्ही एकहाती जिंकल्या, त्यामुळे आम्ही पक्षाला याबाबत आमचं काम दाखविले आहे.

  • Chandrapur cancer care foundation : चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलबाबत महत्वाची माहिती

    Chandrapur cancer care foundation : चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलबाबत महत्वाची माहिती

    Chandrapur cancer care foundation चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात 100 बेडच्या कॅन्सर रुग्णालयाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून, यासाठी चंद्रपूर कॅन्सर फाउंडेशन या संस्थेला मुद्रांक शुल्क माफ कारण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत घेतला आहे.

    महत्वाचे : चंद्रपुरात पर्यावरण युक्त डेमो हाऊस ची निर्मिती

    या निर्णयामुळे रुग्णालयाच्या निर्मिती कार्याला गती प्राप्त होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने टाटा हॉस्पिटल च्या सहकार्याने भव्य कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूर येथे होऊ घातले आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयाबद्दल ना. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे आभार मानले आहेत.

     

    Chandrapur cancer care foundation चंद्रपूर जिल्ह्यातील व लगतच्या आदिवासीबहुल क्षेत्रातील कर्क रुग्णांवर सहज उपचार करता येईल असे विशेष रुग्णालय चंद्रपूरला व्हावे अशी ना. मुनगंटीवार यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरु होता.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/mukhyamantri-ladki-bahin-yojana-maharashtra-government/

    राज्य शासन, जिल्हा खनीज प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून खासगी भागीदारी तत्वावर 100 खाटांचे कर्करोग रुग्णालय चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन च्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावात त्यांनी रुग्णालयासाठी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली 10 एकर जमीन 30 वर्षांसाठी प्रति वर्ष एक रुपया  नाममात्र दराने भुईभाड्याने प्रदान केलेल्या जागेच्या करारनाम्यास   मुद्रांक शुल्क भरण्यापासून सूट देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती.

    Chandrapur cancer care foundation 26 जून रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या  विनंतीचा अतिशय संवेदनशीलतेने विचार करून, मंत्रिमंडळाने  हा विषय चर्चेला घेतला आणि कर्करोगाने ग्रस्त गरीब, मध्यमावर्गीय नागरिकांसाठी शंभर खाटांच्या या रुग्णालय निर्मितीसंदर्भात निर्णय घेत मुद्रांक शुल्क माफ करण्याच्या निर्णयास मंजुरी प्रदान केली. सदर रुग्णालयाच्या जमिनीचे बाजार मूल्य मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी 15 कोटी 62 लक्ष 14 हजार 200  रुपये निश्चित केले असून, या बाजार मूल्याच्या एकूण 90% प्रमाणे 14 कोटी 5 लक्ष 92 हजार 800 रुपये या रकमेवर 5% दराने 70 लक्ष, 29 हजार 640 रुपये एवढा मुद्रांक शुल्क आजच्या मंत्रिमंडळ निर्णयामुळे माफ होणार आहे.
    चंद्रपूर या आदिवासीबहुल जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तींना आरोग्यविषयक  सर्व अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या या दृष्टीने सातत्याने ना. मुनगंटीवार यांचा प्रयत्न राहिला आहे. या संदर्भात ना मुनगंटीवार म्हणाले कि,  ज्या ज्या वेळी मी चंद्रपूर जिल्ह्यातील विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडले आहेत, त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी गांभीर्याने विचार करून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
    लोकहिताच्या कामासाठी राज्य सरकार सातत्याने पुढाकार घेत असून  चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्माण कार्यासाठी व कर्करोग रुग्णालय निर्मितीसाठी  आजचा निर्णय अतिशय महत्वाचा आहे.
  • Compassionate employment : या आमदाराच्या कृतीने भारावले शिक्षक

    Compassionate employment : या आमदाराच्या कृतीने भारावले शिक्षक

    Compassionate employment चंद्रपूर : शाळेत कार्यरत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पाल्यास अनुकंपा तत्वावर नोकरी दिल्या जाते. मात्र, शाळेकडून प्रस्ताव पाठवून देखील शिक्षण विभागाकडून दप्तर दिरंगाई केली जाते. यावर चाप बसविण्याचे काम आमदार सुधाकर अडबाले यांच्याकडून सुरू आहे. याचा आज प्रत्यय आला आणि आज पार पडलेल्या सभेत २ अनुकंपा धारकांच्या नियुक्तीस “ऑन द स्पॉट” मान्यतेचे पत्र देण्यात आले. यासह मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक पदांस मान्यता देण्यात आल्या. मागील वर्षी झालेल्या सभेत देखील प्रलंबित प्रकरणे रात्री ९ वाजतेपर्यंत निकाली काढण्यात आली होती. यामुळे “ऑन द स्पॉट” मान्यतेची पुनरावृत्ती झाल्याने शिक्षकांकडून आमदार सुधाकर अडबाले यांचे कौतुक करण्यात येत आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात पर्यावरण युक्त डेमो हाऊस ची निर्मिती

    Compassionate employment ‘समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा’ या वि.मा.शि. संघाच्या उपक्रमाअंतर्गत दिनांक २६ जून २०२४ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्‍या निवारणार्थ आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.), पे युनिट अधीक्षक (प्राथ./माध्य.), सर्व गटशिक्षणाधिकारी, लेखाधिकारी यांच्यासोबत समस्या निवारण सभा मा. सा. कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद येथे घेतली. ही सभा दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंत तब्बल नऊ तास चालली.

    राज्यातील महिलांना मिळणार दरवर्षी 12 हजार रुपये

    Compassionate employment माध्यमिक विभागातील वरिष्ठ / निवड श्रेणी प्रकरणे, सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते, वैद्यकीय देयके, जीपीएफ प्रलंबित तीन वर्षांच्या पावत्या पुढील सहा महिन्यात ऑफलाईन देण्यात याव्या, एनपीएस पावत्‍या, पदोन्नती प्रकरणे, पेंशन प्रकरणे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १४ जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार मयत झालेल्‍या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना पेंशन मिळण्याबाबत कार्यवाही करावी, अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ उन्नयन करणे, अनुकंपा प्रकरणे व इतर १०० च्यावर सामूहिक व वैयक्तिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. आमदार सुधाकर अडबाले यांनी दिलेल्या सभेच्या विषयपत्रातील बहुतांश प्रलंबित प्रकरणे सभेत निकाली काढण्यात आली. उर्वरित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना आमदार अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना दिल्या. देवता सुकारे व अर्जूनकर यांना अनुकंपा तत्वावर मान्यता देण्यात आली. याबद्दल त्यांनी आमदार अडबाले यांचे आभार मानले.

     

    यानंतर प्राथमिक विभागातील सेवानिवृत्त / कार्यरत शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यात आली. वरिष्ठ / निवड श्रेणी प्रकरणे, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची पदोन्नती प्रकरणे, संगणक वसुली न करणे, प्रलंबित गटविमा प्रकरणे व इतर सामूहिक व वैयक्तिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रलंबित समस्या निकाली काढण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना दिले.

     

    Compassionate employment यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पवार, शिक्षणाधिकारी (माध्य.) निखिता ठाकरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गायकवाड, पे युनिट अधीक्षक वडेट्टीवार, लक्ष्मणराव धोबे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, महानगर अध्यक्ष जयंत टोंगे, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, जिल्हा उपाध्यक्ष सुनील शेरकी, नामदेव ठेंगणे, गडचिरोली जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, मारोतराव अतकरे, ढोरे, वर्धलवार, मिलमिले, अनिल कंटीवार, नाकाडे, सतीश मेश्राम, मनोज वासाडे, किंदरले, नितीन जीवतोडे, संध्या गोहोकार, डॉ. विजय हेलवटे, भालचंद्र धांडे, शरद डांगे, दीपक धोपटे, निलेश बेलखेडे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर, हरीश ससनकर, सुरेश गिलोरकर, डॉ. अलका ठाकरे, राजू लांजेकर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे सुनील दुधे, विपीन धाबेकर, दुष्यंत निमकर व विमाशी संघाचे सदस्य, जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • make a home from plastic waste : चंद्रपुरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पर्यावरण मुक्त ‘डेमो  हाऊस’

    make a home from plastic waste : चंद्रपुरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पर्यावरण मुक्त ‘डेमो हाऊस’

    make a home from plastic waste प्लास्टिक कचरापासून एखादे घर बनू शकते, यावर सहजासहजी कोणी विश्वास ठेवणार नाही. मात्र खरच सिंगल युज प्लास्टीक पासून आपण आपल्या भविष्यातील घर बनवू शकतो, हे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने अभिनव उपक्रमातून दाखवून दिले आहे. विसापूर येथील श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पर्यावरणमुक्त डेमो हाऊसची निर्मिती करण्यात आली आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/mukhyamantri-ladki-bahin-yojana-maharashtra-government/

    आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या सभोवतालच्या प्रदूषणाची चर्चा करतांना प्लास्टीक कचरा व्यवस्थापन ही एक प्रमुख समस्या आहे. विविध संशोधन अभ्यासानुसार, प्लास्टीकचे विघटन हेाण्यासाठी 20 ते 500 वर्षे लागतात व ते दीर्घ काळापर्यंत वातावरणात राहते. ज्यामुळे केवळ मानवांसाठीच नाही तर पर्यावरणालाही धोका आहे. या संपूर्ण बाबीचा विचार करतांना जिल्हा परिषद चंद्रपूर व रॅग आय अपसायकलिंग कंपनी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण डेमो हाऊस बांधकाम अंतर्गत भविष्यातील घर बांधले गेले आहे.

    अवश्य वाचा : बल्लारपूर विधानसभेत माळी समाजाचा उमेदवार हवा

    make a home from plastic waste पर्यावरणयुक्त असे डेमो हाऊसची संकल्पना चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांचे वतीने करण्यात आली आहे. त्याकरिता वन विभागाकडून बॉटनिकल गार्डन मध्ये 625 चौरस फुट जागा उपलब्ध करून देण्यात आली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर व डॉ. बालमुकुंद पालीवाल यांचे रॅग आय अपसायकलिंग कंपनी  यांचे संयुक्त विद्यमाने डेमो हाऊस तयार करणात आले आहे.

     

    make a home from plastic waste 19 फुट उंच व 10 फुट बाजुच्या भिंतीसह 625 चौरस फुट क्षेत्रफळावर बांधकाम करण्यात आले असून, १३ टन सिंगल – युज फेकून दिलेले प्लास्टिक अपसायकल करून सदरचे बांधकाम करण्यात आले आहे. भिंतीपासून छतापर्यंतची संपूर्ण रचना सर्व प्रकारच्या अपसायकल प्लास्टिक सामग्रीचा वापर करून तयार केली आहे. अपसायकलींग केलेल्या प्लास्टिक तंतुपासुन बनविलेले उच्च- गुणवत्तेचे इन्सुलेशन साहित्य इष्टतम तापमान नियमन राखते, घरातील वातावरण गरम –थंड करण्यासाठी ऊर्जेचा वापर कमी करते. अपसायकलींग केलेल्या प्लास्टिकचा वापर करून, मोठया प्रमाणात प्लास्टिक कचरा लँडफिलमध्ये जाण्यापासून किंवा नैसर्गिक वातावरणास प्रदूषित करण्यापासून प्रतिबंधित करते.

    महत्त्वाचे : मी कुणालाही धमकी दिली नाही – प्रकाश पाटील मारकवार

    make a home from plastic waste ग्रामीण भागामध्ये बांधकाम करण्यात येणारे घरकुले, वरील नमुद केल्यानुसार सिंगल –युल- प्लास्टिक पासून केल्यास ग्रामीण भागात प्रदुषण होणार नाही व गांव पर्यावरणयुक्त राहण्यास मदत होईल. ग्रामीण भागात गोळा होणारा वेस्ट प्लास्टिक, बचत गटामार्फत संकलित  करून संस्थेला आणून दिल्यास, या वेस्ट प्लास्टिक पासून  विविध प्रकारच्या वस्तु तयार करून देण्यात  येईल, असे डॉ. पालीवाल सांगितले आहे.

    यासर्व बाबीचा विचार करतांना आपणास पर्यावरण संतुलन ठेवणे आवश्यक असल्याने, भविष्यात घरे बांधकाम करतांना सिंगल- युज -प्लास्टिक पासून घरे बांधकाम करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. सुभाष पवार यांनी केले आहे.

  • Press Conference : माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न – प्रकाश पाटील मारकवार

    Press Conference : माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न – प्रकाश पाटील मारकवार

    Press conference सत्ताधारी शासनाला प्रश्न विचारत सामान्यांना न्याय देण्याचं काम हे पत्रकार बांधवांचे असते, मात्र आज पत्रकार राजकीय नेत्यांच्या पायाशी लोटांगण घालताना दिसत आहे, आमदार, खासदार, मंत्री व राजकीय नेते यांच्या पायथ्याशी आज अनेक पत्रकार आश्रय घेताना दिसून येतात.

    महत्त्वाचे : राज्यातील महिलांना मिळणार दरवर्षी 12 हजार रुपये 

    असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात घडला आहे. आगामी विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने वृत्तपत्रात इच्छुक उमेदवार बाबत वृत्त प्रकाशीत होत आहे.

    मात्र हे करताना एकाची बाजू कमजोर तर जवळच्या नेत्याला ताकदवर व प्रशंसा करीत त्यालाच तिकीट मिळायला हवं असे वृत्त प्रकाशित करण्यात आले, मात्र सदर वृत्त हे चुकीचे आहे याकरिता त्या पत्रकाराला मी सांगितले मात्र दोन दिवसांनी माझ्या विरोधात अनेक निवेदने देण्यात आली हा प्रकार म्हणजे माझी प्रतिमा मलिन करण्याचा होता असा आरोप कांग्रेस नेते प्रकाश पाटील मारकवार यांनी 26 जून रोजी सायंकाळी 4.30 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

    हे ही वाचा : पत्रकार संजय पडोळे यांना धमकी

    Press conference ते म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर येथून मी कांग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागत आहो, यासाठी मी तयारी सुद्धा केली आहे, पण माझ्या व्यतिरिक्त इतरांनी सुद्धा कांग्रेस पक्षातून उमेदवारी मागितली आहे.

    अश्यात मूल चे पत्रकार संजय पडोळे यांनी माझ्या विरोधात चुकीचे वृत्त प्रकाशीत केले व सदर प्रकार हा 2 ते 3 वेळा करण्यात आला.

    नुकतेच त्यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून हवसे नवसे उमेदवार बाबत वृत्त प्रकाशित केले मात्र त्या वृत्तात एका कंत्राटदार असलेल्या इच्छुक उमेदवार बाबत त्याची प्रशंसा केली तर दुसऱ्या बाजूने इतर उमेदवार किती कच्चे आहे असे चित्र निर्माण करण्यात आले होते.
    याबाबत प्रकाश पाटील यांनी पत्रकार संजय पडोळे यांना विचारणा केली, मी त्यांना कसलीही धमकी दिली नाही मात्र 2 दिवसांनी माझ्याविरोधात चुकीचे निवेदने देत माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार या लोकांनी सुरू केला.

     

    Press conference पत्रकार संजय पडोळे यांनी चांगलं काम करावं त्यासाठी माझ्या शुभेच्छा राहणार मात्र काही कारण नसताना माझ्याविषयी असे चुकीचे काही लिहू नये, यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहो अशी प्रतिक्रिया कांग्रेस नेते प्रकाश पाटील मारकवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • Mukhyamantri Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांना वर्षाला मिळणार 12 हजार रुपये

    Mukhyamantri Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांना वर्षाला मिळणार 12 हजार रुपये

    Mukhyamantri ladki bahin yojana लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सावध झालेल्या राज्यातील महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

    लोकसभा निवडणुकीत 45 प्लस चा नारा देणाऱ्या महायुतीला निकालात जोरदार फटका बसला, विशेष म्हणजे निकालात भाजप, सेना व राष्ट्रवादी कांग्रेसला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

    अवश्य वाचा : पेपरफुटी कायदा म्हणजे काय?

    Mukhyamantri ladki bahin yojana काही महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहे, त्यासाठी महायुती सरकारने तयारी सुरू केली आहे.

    महत्त्वाचे : धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये

    त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात गरीब महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबवण्याच्या हालचाली सुरू आहेत. याअंतर्गत गरीब महिलांना दरमहा १२०० ते १५०० रुपये दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर वार्षिक १५ ते २० हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

     

    योजना काय?

    • महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतानाच गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी योजना.

     

    • पहिल्या टप्प्यात दारिद्र्यरेषेखालील ९० ते ९५ लाख महिलांना महिन्याला १२०० ते १५०० रुपये.

     

    • दारिद्रयरेषेखालील २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिला, तसेच विधवा, परितक्त्या, घटस्फोटितांना लाभ. रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा.

     

    Mukhyamantri ladki bahin yojana आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. त्यासाठी समाजातील विविध घटकांसाठी नव्या आकर्षक योजना आणण्याची तयारी सुरू आहे. विशेषतः महिला आणि तरुणांच्या मतपेढीवर डोळा ठेवून त्यांना खूश करण्यासाठी दोन मोठ्या योजनांची आखणी सुरू आहे. राज्यातील महिलांची मने आणि मते जिंकण्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबविण्याचे नियोजन आहे. या योजनेबाबत माहिती घेण्यासाठी सरकारने अधिकाऱ्यांचे एक पथक अलीकडेच मध्य प्रदेशला पाठविले होते.