Author: Admin

  • congress news : लोकनेते माजी राज्यमंत्री स्व. वामनरावजी गड्डमवार यांचे फोटो अनावरण

    congress news : लोकनेते माजी राज्यमंत्री स्व. वामनरावजी गड्डमवार यांचे फोटो अनावरण

    congress news तुमसे अच्छी तुम्हारी यादे, तुम चले गये लेकीन यादे रह गयी संतोषसिंह रावत, लोकनेते माजी राज्यमंत्री स्व. वामनरावजी गड्डमवार यांचे फोटो अनावरण प्रसंगी वक्तव्य

    Congress news (गुरू गुरनुले) मुल – चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस नेते, माजी राज्यमंत्री तथा लोकनेते स्व.वामनरावजी गड्डमवार साहेब यांनी सर्वांच्या सहकार्याने मूल येथे काँग्रेस पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काँग्रेस भवनाची निर्मिती केली. स्व.वामनरावजी गड्डमवार हेच मूल येथील काँग्रेस भवनाचे शिल्पकार होते. म्हणून दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी स्व.वामनरावजी गड्डमवार साहेब यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कांग्रेस कमिटी कार्यालय मुल येथे स्व. वामनरावजी गड्डमवार साहेबांच्या फोटोचे अनावरण काँग्रेस नेते, सी डी.सी सी. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे शुभ हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.

    राजकीय पुढाऱ्यांनी केली डॉक्टरांची शिकार?

    Congress news गड्डमवार साहेबांना त्यांच्या सैनिकानीच सेनापती केले, नंतर राजा केले. हा इतिहास आहे.परंतु सैनिकांच्या आपसी मतभेदांमुळे सेनापती व राजा निरुत्तर होते म्हणून संघटन मजबूत करीत असताना मतभेद टाळा असा सल्ला आपल्या सैनिकाला रावत यांनी दिला. उपस्थित सर्वांनीच स्व. वामनराव गड्डमवार यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला माला व पुष्प वाहून अभिवादन केले. यानिमित्त राजू पाटील मारकवार यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर ओबीसी सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी,दशरथ वाकुडकर,कांग्रेस जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर,व सभापती राकेश रत्नावार यांनीही गड्डमवार साहेबांच्या राजकीय कर्तबगारीचा इतिहास सर्वांसमोर ठेवला.

    अवश्य वाचा : डॉक्टरांची बदली रद्द करण्यासाठी नागरिक उतरले रस्त्यावर

    कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजेंद्र कन्नमवार, संचालक किशोर घडसे, सोसायटी सभापती पुरुषोत्तम भूरसे,माजी प्राचार्य बंडू गुरनुले, विवेक मुत्यलवार, डॉ.पद्माकर लेंनगुरे, अतुल गोवर्धन,युवक अध्यक्ष पवन नीलमवार,प्रशांत उराडे, व्यंकटेश पुल्लकवार,संदीप मोहबे,गंगाधर घुगरे,महिला शहर अध्यक्षा नलिनी आडपवार, माजी नगर सेविका लीना फुलझेले, सचिव शामला बेलसरे, ऊपाध्यक्ष समता बनसोड,सीमा भसारकर मनोज आदी कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी केले तर आभार शहर अध्यक्ष सुनील शेरकी यांनी मानले.

  • Doctor transfer : डॉक्टरसाठी शेकडो नागरिकांनी काढला निषेध मोर्चा

    Doctor transfer : डॉक्टरसाठी शेकडो नागरिकांनी काढला निषेध मोर्चा

    doctor transfer गडचांदूर येथील डॉक्टर प्रवीण येरमे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी त्यांची अचानक बदली झाल्याने नागरिकांनी याविरोधात निषेध मोर्चा काढला.

    Doctor transfer गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण येरमे यांची कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी बदली केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे, सामाजिक कार्याची जाणं ठेवणारे व प्रत्येक रुग्णाच्या मदतीला नेहमी तत्पर असणाऱ्या डॉक्टरांची अचानक बदली का केली म्हणून स्थानिक एससी, एसटी व ओबीसी बांधवांनी निषेध मोर्चा काढला.

    निषेध मोर्चा

    ही बदली राजकीय उद्देशातून करण्यात आल्याचा निषेधार्थ गडचांदूर शहरात आदिवासी समाजाकडून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात कोरपना, जिवती या तालुक्यातील मोठ्या संख्येने आदिवासी समाजतील पुरुष, महिला ,तरुण, लहान मुले सहभागी झाले होते. डॉ. प्रवीण येरमे यांची बदली तत्काळ रद्द करा अशी यावेळी मोर्चा द्वारे मागणी करण्यात आली.
    एखाद्या अधिकाऱ्याच्या बदली विरोधात मोर्चा निघण्याची पहिली वेळ असल्यामुळे हा मोर्चा गडचांदुर शहरात लक्षवेधी ठरला होता.

    अवश्य वाचा : ओयो बाबत चंद्रपूर मनसे आक्रमक, सर्व ओयो हॉटेल्सची चौकशी करा

    कोण आहे डॉक्टर प्रवीण येरमे?

    संघर्षमय जीवनाचा प्रवास करीत MBBS, MD पदवी घेऊन वैद्यकीय सेवेत रुजू झालेले प्रवीण येरमे यांना सामाजिक कार्याची चांगलीच जाण आहे, ज्या आदिवासी क्षेत्रात शासनाच्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी अनेकजण नकार देतात त्या भागात डॉ येरमे स्वतः पोहचत त्यांनी वैद्यकीय सेवा दिली, अतिदुर्गम आदिवासी व दलित मागास समाजात डॉ येरमे यांनी आपल्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम केले आहे, वैद्यकीय सेवेचे महत्व व शिक्षणाचे काय महत्व आहे हे पटवून देण्याचे काम डॉ येरमे यांनी केले आहे, मात्र त्यांची अचानक पणे बदली करीत प्रशासनाने कुठेतरी राजकीय दबावाला बळी पडत वैद्यकीय सेवेपासून मागासलेल्या समाजाला पोरकं करण्याचे काम केले आहे.

  • Oyo rooms : चंद्रपूर जिल्ह्यातील oyo बाबत मनसे आक्रमक

    Oyo rooms : चंद्रपूर जिल्ह्यातील oyo बाबत मनसे आक्रमक

    oyo rooms चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ओयो व खाजगी हॉटेलमध्ये अल्पवयीन मुला-मुलींना प्रवेश बंद करा

    Oyo rooms महिलांवर आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराने राज्यच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला असुन महिला सुरक्षतेचा खुप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे बदलापूरच्या थरारक प्रसंगानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुर, नागभीड येथील महिलांवर झालेल्या घ्रृण कृत्यानी संपूर्ण जिल्ह्यातील महिला भयभीत झाले असून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या आया बहिनींना सुरक्षीत जीवण कधी येणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अल्पवयीन मुलीला चॉकलेट खाऊ अशा प्रकारचे आमीश दाखवून राक्षसी वृत्तीचे मानवजातीचे जणावर त्यांच्यावर बळजबरी करतात या प्रकारावर आळा घालण्यासाठी महिला व अल्पवयीन मुलीच्या सुरक्षतेसाठी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

    अवश्य वाचा : शहराच्या मध्यभागी जेव्हा बिबट येतो

    नुकत्याच झालेल्या घटना या ओयो हॉटेल मध्ये घडल्या असुन यावर वेळीच ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे, आपण आपल्या स्तरावर जिल्ह्यातील सर्व ओयो हॉटेल्सची चौकशी करून अल्पवयीन मूलामुलींना प्रवेश बंदि करावी अन्यथा मनसेकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार असुन याला सर्वस्वी संबंधीत प्रशासन जबाबदार असेल.

    चंद्रपुरात बिबट्या

    या निवेदनावर अतिरिक्त पोलीस अधिक्षक जनबंधू मॅडम यांनी सकारात्मक उत्तर देत सांगितले की आम्ही लवकरात लवकर ही मोहीम सुरू करू अणि कठोर कारवाई करू अशे आश्वासनं दिले, या आशयाचे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष राहूल बालमवार यांच्या मार्गदर्शनात मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगूलवार आणि मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे ,माजी जिल्हा अध्यक्ष सुनिता ताई गायकवाड ,माजी नगरसेविका सिमाताई रामेडवार, जिल्हा सचिव अर्चना आमटे, बल्लापुर तालुका अध्यक्ष कल्पना ताई पोतर्लावार, अजय अल्लेवार, मंगेश धोटे, विशाल मत्ते, निक्की यादव, अवधुत मेश्राम, उज्वल तेलतुमडे, शुभम वांढरे यांनी पोलीस अधिक्षकांना दिले असुन निवेदन देणार्या शिष्टमंडळात मनसेचे पदाधिकारी तथा मनसैनिक उपस्थीत होते.

  • Mahila Bachat Gat : महिला बचत गटाचे संघटन मजबूत झाल्याने सावकारी मक्तेदारी बंद झाली – संतोषसिंह रावत

    Mahila Bachat Gat : महिला बचत गटाचे संघटन मजबूत झाल्याने सावकारी मक्तेदारी बंद झाली – संतोषसिंह रावत

    Mahila bachat gat (गुरू गुरनुले)मुल – महिला बचत गटाची निर्मिती झाल्यानेच सावकारी मक्तेदारी बंद झाली व महिला महिला सक्षम आत्मनिर्भर होऊन एकत्र संघटित झाल्या याचा बँकेला अभिमान आहे.परंतु आपल्याच भागात एका आढवड्यात पाच व्यक्तीला वाघाने हल्ला करुन ठार केले. असं किती दिवस चालणार यासाठी बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेऊन वनविभागा समोर आंदोलन करावे व शासनाला जागे करावे असे आव्हान उपस्थित दोन हजार महिलांना व शेतकरी बांधवांना बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी केले.

    अवश्य वाचा : अंगणवाडी सेविकांना महाराष्ट्र सरकारने दिले फसवे आश्वासन, चंद्रपुरात जेल भरो आंदोलन


    Mahila bachat gat ९२ कोटी नफा प्राप्त करून महाराष्ट्रात ५ व्या विदर्भात २ ऱ्या स्थानावर असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नांदगाव येथे आयोजित महिला बचत गट व शेतकरी मेळावाच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना बोलत होते. तसेच नोटाबंदी कशी फसवी झाली याचाही खरपूस समाचार घेतला.बँकेच्या नफ्यातून संचालक मंडळाच्या सहकार्यानेच राजीव गांधी स्वावलंबन योजना,कॅन्सर,दुर्धर आजार,विजपडून मृत्यू,वाघाने ठार झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत,साप चावल्याने मदत अशा शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना सुरु केल्याने यात आपलाच मोठा वाटा व सहकार्य आहे.याबद्दल सर्वांना धन्यवाद देत आभार मानले. याप्रसंगी बचत गटाचे महत्व महिलांची भूमिका यावर संचालिका प्रा. प्रभाताई वासाडे यांनी मार्गदर्शन केले.तर संचालिका नंदाताई अल्लुरवार यांनी सहकारी बँकेची निर्मितीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी झाली.असे विस्तृत विचार व्यक्त केले.

    जेलभरो आंदोलन

    Mahila bachat gat ज्येष्ठ संचालक डॉ.ललित मो यांनीही संतोष भाऊ रावत यांच्या कारकीर्दीत अनेक विकासात्मक योजना राबऊन बँक प्रगती करीत असल्याचे सांगितले. सरपंच हिमानी वाकुडकर, दशरथ वाकुडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख माजी संचालक विनायक बुग्गावार ,राजू पाटील मारकवार, सोसायटी अध्यक्ष घनश्याम येनुरकर,गणेश खोब्रागडे,संचालक सुमित आरेकर,गुरु गुरनुले, प्रकाश आंबटकर,मा उपसभापती दशरथ वाकुडकर, अध्यक्ष अनिल मुंगेलवार, प्रदीप कामडे, उषा शेरकी,अनिल निकेसर, विकास सीडाम,यांचेसह सहकारी सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शंकर बोडे, प्रास्ताविक सहा व्यवस्थापक मंगल बुरांडे,यांनी केले. मेळाव्याच्या आयोजनासाठी वि.अ.प्रशांत तोटावार, राज दर्वे,हेमराज सोमलकर,अधिकारी विनोद पाझरे,व्यवस्थापक राहुल साळवे,निरीक्षक हेमंत भोपये, यांचेसह आजी माजी अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

  • Anganwadi sevika : सरकारचे आश्वासन फसवे, चंद्रपुरात जेलभरो आंदोलन

    Anganwadi sevika : सरकारचे आश्वासन फसवे, चंद्रपुरात जेलभरो आंदोलन

    Anganwadi sevika महाराष्ट्र सरकारचे दिलेले आश्वासन फसवे निघाल्याने आज चंद्रपुरात हजारो अंगणवाडी सेविकानी जेलभरो आंदोलन केले.


    Anganwadi sevika चंद्रपूर शहरात आज अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलनाने प्रशासन हादरून गेलं, चंद्रपूर जिल्हा परिषद समोर हजारो अंगणवाडी सेविकानी चक्का जाम करीत जेलभरो आंदोलनात सहभाग घेतला.

    शासनाच्या योजना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविल्या जात आहे मात्र त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम महाराष्ट्र सरकार द्वारे केल्या जात आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात आला बिबट्या, उडाली खळबळ

    मानधनात वाढ, पेन्शन सुरू करावी, ग्रॅच्युईटी देण्यात यावी अश्या अनेक मागण्या घेऊन आज अंगणवाडी सेविकानी मोर्चा काढत जेलभरो आंदोलन केलं, या आंदोलनात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
    सदर आंदोलनाचे नेतृत्व सिटू कामगार नेते रमेशचंद्र दहिवडे यांनी केले, यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे उपस्थित होते.

    जेलभरो आंदोलन


    रमेशचंद्र दहिवडे म्हणाले की 25 जानेवारीला महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांना पेन्शन, मानधनात वाढ व ग्रॅच्युईटी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आज 8 महिने लोटल्यावर सुद्धा आश्वासनाची पूर्तता झाली नाही,त्यावेळी अंगणवाडी सेविका यांनी 52 दिवस आंदोलन केले होते. आजचं जेल भरो आंदोलन इथं थांबणार नाही, यापुढे आम्ही गावागावात जाऊन सरकारच्या फसवेगिरी बाबत जागृती करणार.

    खासदार प्रतिभा धानोरकर ह्या म्हणाल्या की आज अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आपल्या हक्कासाठी भांडावे लागत आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे, मी आमदार असताना याबाबत अनेकदा पाठपुरावा केला, आता खासदार झाल्यावर यापुढेही आम्ही अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार.

    आयोजित जेलभरो आंदोलनात हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

  • Mundan Andolan : चंद्रपुरातील युवकांनी महायुती सरकार विरोधात केले मुंडन

    Mundan Andolan : चंद्रपुरातील युवकांनी महायुती सरकार विरोधात केले मुंडन

    mundan andolan सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर 8 महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, यामुळे राज्यातील शिवप्रेमींनी आपला संताप व्यक्त केला.

    अवश्य वाचा : चंद्रपूर शहरात आला बिबट्या

    Mundan andolan महायुती सरकारने कमिशन खोरीच्या नादात भ्रष्टाचार करीत पुतळा उभारला, असा आरोप राज्यातून विविध स्तरातून सरकारवर झाला, राज्यात सरकार विरुद्ध अनेक राजकीय, सामाजिक व शिव प्रेमींनी आंदोलन पुकारले, 4 सप्टेंबर रोजी चंद्रपुरातील शिव प्रेमी जनतेने भव्य निषेध मोर्चा काढला.

    मुंडन आंदोलन

    उर्जानगर-दुर्गापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने महायुती सरकार विरोधात युवकांनी मुंडन आंदोलन करीत निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेत जे कुणी दोषी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी याकरिता आम्ही युवकांनी आज मुंडन आंदोलन केले अशी प्रतिक्रिया दिली.

    यावेळी सदिंप बिसेन , सागर धनकसार, नामन पवार, धिरज दुर्योधन, नागेश कडुकर,अंकित वाघमारे मनोज मगांम, राजा शेख,स्वपनिल खांडेकर अमोल दुर्योधन,पीयुष चादेंकर, मनोज इटकर,व असख्य शिवभक्त उपस्थित होते.

  • leopard in city : चंद्रपूर शहराच्या मध्यभागी बिबट्याचे आगमन

    leopard in city : चंद्रपूर शहराच्या मध्यभागी बिबट्याचे आगमन

    leopard in city चंद्रपूर जिल्हा हा चारही बाजूने वन सौंदर्याने नटलेला आहे, या भागात अनेक वन्यप्राण्यांचा वावर आहे, अश्यात काही वन्यप्राणी अनेकदा रस्त्यावर तर काही गावात वावरताना आढळून येतात.


    Leopard in city 5 सप्टेंबर ला पहाटेच्या सुमारास शहरात अचानक बिबट्या शिरला, त्या बिबट्याचा मागे कुत्रे लागल्याने त्याने पळ काढत थेट बिनबा गेट जवळील बोबडे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या झुडपात आश्रय घेतला सदर बाब नागरिकांना कळताच याबाबत त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली, सध्या वनविभाग बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करीत आहे.

    शहरातील बिनबा गेट परिसरात बिबट शिरल्याची घटना समोर आली आहे. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार ऑन द स्पॉट दाखल झाले असून, सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. येथे जमलेली गर्दी पाहता, सुरक्षा वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या असून, बिबटला जेरबंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी विभागीय एसीएफ आदेश शेणगे, वन अधिकारी प्रशांत खाडे, वन अधिकारी नायगमकर यांच्यासह पोलिस विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात 19 सप्टेंबर पर्यंत कलम 36 लागू


    Leopard in city पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिनबा गेट लगत असलेल्या झाडी-झुडपांमध्ये बिबट वावरत असल्याचे काही नागरिकांना दिसले. याची माहिती लगेच वन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिस विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सोबतच याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांना पोहोचताच ते मुंबईहून थेट घटनास्थळी पोहोचले. सध्या बिबटला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. रेस्क्यू पथकही येथे दाखल झाले आहे. येथे होत असलेली नागरिकांची गर्दी पाहता दंगा नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. या सर्व कार्यवाहीवर आमदार किशोर जोरगेवार स्वतः लक्ष ठेवून असून, त्यांच्या वतीने प्रशासनाला योग्य सूचना करण्यात येत आहेत.

    शहरात बिबट्या


    त्यांनी दूरध्वनीवरून पोलिस अधीक्षकांशीही संपर्क साधत पोलीस विभाग यासंदर्भात अनेक सूचना केल्या आहेत. येथे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात यावा, काही भाग प्रतिबंधित करण्यात यावा, अशी सूचना यावेळी त्यांनी पोलिस अधीक्षकांना केली आहे. तसेच तहसीलदार आणि वन विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्यांशीही ते सतत संपर्कात आहेत. नागरिकांना कोणतीही हानी न होता नियोजनबद्ध पद्धतीने बिबटला जेरबंद करण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत असून, आपण स्वतः येथे उभे राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

  • Section 36 : 19 सप्टेंबर पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    Section 36 : 19 सप्टेंबर पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    Section 36 जिल्ह्यात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरुवात होत असून 16 सप्टेंबर रोजी ईद-ए- मिलाद निमित्त मुस्लिम समाजतर्फे मिरवणूक कार्यक्रम, 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून 19 सप्टेंबर पर्यंत सार्वजनिक गणेश मुर्तीचे विर्सजन करण्यात येणार आहे.

    Section 36 या दहा दिवसांत विविध धार्मिक सण /उत्सव कार्यक्रम होत असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने तसेच सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला  बाधा पोहचु नये, यासाठी  4 ते 19 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कलम 36 चे पोटकलम अ ते फ लागू आहे.

    अवश्य वाचा : ताडोबा रिसॉर्ट च्या नावाने 41 लाखांची फसवणूक

    Section 36 या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविणे बाबत, सभेचे आयोजन व मिरवणुक काढण्याबबात, मिरवणूकीचे मार्ग निश्चित करण्याबाबत, लाऊडस्पिकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. यात अ) मिरवणुक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांचे वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार,  आ) मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पुजा स्थानाचे जवळ लोकांचे वागणुकीचे निर्बंध घालण्याचे अधिकार, इ) मिरवणुकीस बाधा होणार नाही, याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा स्थानाच्या जवळ  लोकांचे वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, ई) सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे  इत्यादिचे निर्बंध घालण्याचे अधिकार, उ)   रस्ते व इतर सर्व  सार्वजनिक ठिकाणी    सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, ऊ) सार्वजनिक  ठिकाणी/ रस्त्यावर लाउडस्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार ऋ) कलम 33,  35,  37, ते 40, 42, 43, व 45 मुंबई  पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सुचना देण्याचे अधिकार.

    मशाल रॅली

    सदर आदेश लागू असताना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजविणे, लाऊडस्पिकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घेण्यात यावी. सर्व बाबतीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशात नमूद आहे.  

  • chitra nagari : नागपुरात 100 हेक्टरवर होणार भव्य चित्रनगरी

    chitra nagari : नागपुरात 100 हेक्टरवर होणार भव्य चित्रनगरी

    chitra nagari चित्रपट निर्मितीचा पाया मराठी चित्रपटांनी रचलेला असून आशयसंपन्न मराठी चित्रपटांची पंरपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे.

    Chitra nagari ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी  मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी चित्रपट धोरण तयार करण्यात यावे, त्यासाठीची  समिती गठीत करुन या कामास गती  देण्याच्या सूचना देत नागपूर येथे १०० हेक्टर भव्य चित्रानगरी निर्माण करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिल्या.

    सावधान : ताडोबा रिसॉर्ट च्या नावाने अनेकांची फसवणूक

    मराठी चित्रपट अनुदानासंदर्भात  मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी संबंधितांना विविध महत्वाचे निर्णय घेतले. यावेळी  विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, चित्रनगरी मुबंईच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील,  यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता संघटनेचे , पदाधिकारी, इतर संबंधित उपस्थित होते.


            नागपूर साठी गुड न्यूज!

     Chitra nagari विविध पायाभूत सुविधा आणि अनेक महत्त्वपूर्ण बाबींसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या वैभवात आता भर पडणार आहे; अनेक प्रतीथयश साहित्यकार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते देणाऱ्या विदर्भाच्या भूमीत चित्रनगरी व्हावी असा मनोदय नाव मुनगंटीवार यांनी आज व्यक्त केला.  मराठी चित्रपटांच्या अधिक दर्जेदार निर्मितीसाठी पूरक वातावरण आणि  संधीची उपलब्धता वाढवण्याचा सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न असून त्यादृष्टीने मुबंई आणि कोल्हापूर प्रमाणे नागपूर येथे फिल्मसिटी निर्माण करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही सुरु करण्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत सूचित केले.

    वीज ग्राहकांसाठी अभय योजना

    तसेच अनुदानाास पात्र ठरलेल्या चित्रपटात महिला दिग्दर्शिका असलेल्या चित्रपटाला अतिरिक्त पाच लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय ही यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या मराठी चित्रपटांना विना परिक्षण  दुप्पट अनुदान देण्यात येईल. तसेच अनुदानासाठी चित्रपटांचे श्रेणीकरण अ, ब, “क” या तीन गटात करण्यात यावे, त्यासाठी श्रेणीकरण समिती गठीत करण्याच्या सूचनाही मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.
      कोवीड काळातील चित्रपटांच्या बाबतीत स्वतंत्रपणे विचार करुन निर्णय घेतला जाईल,असे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी यावेळी सांगितले.

  • Tadoba Resorts : ताडोबा येथे रिसॉर्टच्या नावाने अनेकांची फसवणूक

    Tadoba Resorts : ताडोबा येथे रिसॉर्टच्या नावाने अनेकांची फसवणूक

    Tadoba resorts ताडोबा येथे रिसॉर्ट च्या नावाने मोठ्या प्रमाणात अनेकांची फसवणूक झाली असून सदर प्रकरणातील आरोपी भरत धोटे हे पसार झाले आहे.

    Tadoba resorts ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणा-या पर्यटकांना रिसोर्ट प्रमाणे कुटी तयार करून देण्याच्या नावावर गुंतवणुकदारांकडून पैसे घेऊन प्रत्यक्ष कोणतेही बांधकाम न करणा-या भरत नानाजी धोटे (वय 38) रा. तुकूम, चंद्रपूर याने 41 लक्ष 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूरकडून करण्यात येत आहे. सदर आरोपी गुन्हा दाखल झाल्याच्या दिनांकापासून फरार असून कोणत्याही नागरिकाला याबाबत माहिती असल्यास किंवा आरोपी आढळून आल्यास त्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला द्यावी, असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.

    अवश्य वाचा : अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या

    Tadoba resorts याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलिस स्टेशन दुर्गापूर, जिल्हा चंद्रपूर येथे सर्व पिडीत अन्यायग्रस्त फिर्यादी तर्फे अशोक पांडुरंग भटवलकर, रा.म्हॉडा कॉलनी, दाताळा, चंद्रपूर यांच्या लेखी रिपोर्ट वरून आरोपी भरत नानाजी धोटे,  रा. तुकुम, चंद्रपूर यांनी भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्स या नावाने खाजगी कंपनी स्थापन करून अभिकर्ते नियुक्त केले. त्यांच्या मार्फतीने मौजा पद्मापूर, अजयपूर, देवाडा, तळोधी  (नाईक), बोर्डा, किटाळी येथे कुट्यांचे  बांधकाम करण्याबाबत युनिव्हर्स ॲग्रो टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करारनामा केला. ताडोबा राष्ट्रीय वन उद्यान येथे  फिरण्यास येणाऱ्या लोकांना रिसोर्टप्रमाणे कुटी किरायाणे देऊन येणारे प्रतिमहिना मासिक उत्पन्न 7083 रुपये देण्याचे प्रलोभन देऊन प्रत्येक गुंतवणुकदारांकडून 2 लक्ष 50 हजार रुपये घेतले. मात्र प्रत्यक्षात  कुटीचे बांधकाम न करता गुंतवणूकदारांची एकुण 41 लक्ष 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणुक केली. याबाबत  फिर्यादीच्या तक्रारीवरुन सदर गुन्हा नोंद असुन गुन्हयाचा  तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत आहे.

    शिवप्रेमींचा संताप

    सदर  गुन्हयातील आरोपी भरत नानाजी धोटे हा गुन्हा दाखल झाल्याच्या तारखेपासून फरार आहे. तरी सदर आरोपीचा शोध घेण्याकरीता तसेच नमुद आरोपी का कोणास आढळल्यास पोलीस नियंत्रण कक्ष, चंद्रपूर 07172- 273258, 07172-264702 या क्रमांकावर तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर  चिकनकर (मो. नं. 9359258365) या क्रमांकावर माहिती देण्यात यावी, असे आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधिक्षक कार्यालय, चंद्रपूर यांनी कळविले आहे.