oyo hotel चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेले oyo हॉटेल पुन्हा चर्चेत आले असून त्याचे कारणही तसेच आहे, मात्र यावर चौकशी होणार का? हा सध्यातरी संशोधनाचा विषय आहे.
Oyo hotel वर्ष 2012 मध्ये Oyo चे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी कमी किमतीत व कमी वेळेत लोकांना हॉटेल बुक करण्यात यावे यासाठी oravel stays च्या नावाने स्टार्ट अप सुरू केला होता, 2013 मध्ये अग्रवाल यांनी स्टार्टअप चे नाव oyo ठेवले आणि या ओयो ने जगात एकच धुमाकूळ घातला. Oyo चा अर्थ म्हणजेच on your own असा आहे.
सुरुवातीला बजेट हॉटेलचा यामध्ये समावेश होता, हळूहळू ओयो ने जगात पाय पसरवीत तब्बल 80 देशात व्यवसाय सुरू केला असून त्यांनी 10 लाख खोल्या भाडेतत्वावर घेतल्या आहे. आज प्रत्येक पर्यटन स्थळ देशात ओयो चे काम धडाक्यात सुरू आहे, मात्र याबाबत चंद्रपूर जिल्ह्यात चौकशी करण्याची मागणी का झाली आहे, यावर आपण माहिती जाणून घेऊ या.
Oyo hotels in chandrapur बल्लारपूर शहरात अल्पवयीन मुलीसोबत मुलाने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, त्याबाबत पोलिसात तक्रार झाली, मुलाला अटक झाली मात्र मुलीने दुसऱ्या दिवशी आत्महत्या करीत आपले आयुष्य संपविले, आता आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की यामध्ये ओयो चा काय दोष? दोष आहे, कारण या हॉटेल मध्ये अल्पवयीन मुलींना प्रवेश नाही, कोणत्याही मुलांसोबत या हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलींना प्रवेश नाकारण्यात येतो मग बल्लारपूर मधील त्या ओयो मध्ये परवानगी त्यांना कशी देण्यात आली?
ओयो रूम बुक करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर होतो, आपल्याला आधारकार्ड व इतर प्रक्रिया पूर्ण केल्यावर रूम बुक होते, मात्र काही ओयो हॉटेल धारक हे नियम पायदळी तुडवीत पैसे कमविण्याच्या नादात अल्पवयीन मुलींना प्रवेश देण्याचे काम करतात, चंद्रपुर शहरात तर झाडी-झुडपात ओयो हॉटेल सुरू आहे, शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय च्या मागे जंगल भागात ओयो सुरू आहे? ती परवानगी त्यांना कशी मिळाली? त्यावर कारवाई का नाही? कारण त्याठिकाणी असे अनेक प्रकार झाल्याची चर्चा सुरू आहे? ओयो च्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी सुद्धा अनेक अल्पवयीन मुलींना बघितलं असल्याची माहिती दिली आहे.
Oyo hotel बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक, यासह मनसे ने सुद्धा ओयो हॉटेलची चौकशी करण्याची मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे, चंद्रपूर जिल्ह्यात झपाट्याने ओयो ची वाढ होत आहे, ओयो नी जर नियमानुसार कार्य केले तर कुणीही त्याच्यावर नाव बोटं ठेवणार नाही मात्र अल्पवयीन मुलींना प्रवेश दिल्यास ओयो धारक मोठ्या अडचणीमध्ये येऊ शकतो हे निश्चित.
ओयो हॉटेल: ओयो चंद्रपूर जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करत आहे का? ऑनलाइन प्रणाली वापरून ओयो रूम्स ऑनलाइन बुक करता येतात, जिथे आधार कार्ड आणि इतर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर रूम बुक केली जाते. मात्र, काही ओयो हॉटेल मालक योग्य पडताळणी न करता बेकायदेशीरपणे अल्पवयीन मुलींना प्रवेश देऊन या यंत्रणेचा गैरफायदा घेत असून अशा घटना चंद्रपूर शहरात विशेषत: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया मागील जंगल परिसराजवळ घडत असल्याचा संशय आहेत. त्यांनी यासाठी परवानगी कशी मिळवली आणि कारवाई का झाली नाही? ओयो जवळील रहिवाशांच्या देखील अशा घटना लक्षात आल्या आहेत ज्यात अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.
babupeth railway मागील अनेक वर्षांपासून बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर काम पूर्णत्वास येत असून आता यामध्ये नवी अडचण समोर आली आहे.
babupeth railway आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम गतीने पुढे जात आहे. आता यात रेल्वे विभाग, महानगरपालिका, महावितरण कंपनी, एमएमआरडी, आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्व विभागांनी उत्तम काम सुरू केले आहे. मात्र आता या सर्व विभागांनी आपसात समन्वय साधून उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करावीत,” असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले.
Babupeth railway चंद्रपूर महानगरपालिका कार्यालयात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकारी यांना सदर निर्देश दिले. बैठकीला महानगरपालिका आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, शहर अभियंता विजय बोरिकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश तांडले, उपविभागीय अभियंता अंबुले, शाखा अभियंता जावडे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वसंत हेडाऊ, सहायक अभियंता साहिल टाके आदी उपस्थित होते.
आमदार किशोर जोरगेवार यांनी 5 कोटी 90 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गती आली आहे. सर्व संबंधित विभाग उत्तम काम करत असून पुलाची रंगरंगोटी, लाईट पोलची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामेही जलद पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या.
अडचण काय?
बागला चौकात असलेली मनपाची एलईडी स्क्रीन, झाडे, आणि लाईन पोलमुळे अडचण निर्माण होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर, सदर इलेक्ट्रिक पोल चार दिवसात हटविण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, मनपाची एलईडी स्क्रीन तात्काळ हटविण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या. पुलाच्या दोन्ही बाजूंना सुंदर सौंदर्यीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. “सर्व विभागांनी समन्वय साधून काम केल्यास हे काम नियोजित वेळेत आपण पूर्ण करू,” असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले.
bhumi putra brigade शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भूमिपुत्र ब्रिगेडतर्फे 13 सप्टेंबर रोजी मूल येथे भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे.
Bhumi putra brigade – वाघांच्या सतत हल्ल्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचा रोज जीव जाऊ लागलेला आहे आणि याच्यावर आळा घालण्यामध्ये वनविभाग आणि प्रशासन सपशेल अपयशी ठरलेला आहे. शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या सोयी असोत किंवा पिक विमा योजनेचा उडालेला फज्जा असो सरकार त्याच्यामध्ये सुद्धा सपशेल अपयशी ठरलेला आहे.
गुराढोरांना चराईचे क्षेत्र उपलब्ध करून देण्याचा विषय असो सरकार बिलकुल गंभीर असल्याचा दिसत नाही, 1927 च्या वन कायद्यानुसार वने संरक्षित करण्यात आली आणि त्यापूर्वी जो सुसंवाद मनुष्य प्राणी आणि वन्यप्राणी आणि वनसंपदेमध्ये होता, तो कमी झाला कारण त्याआधी वन्यप्राणी आणि मनुष्य प्राणी यांच्यामध्ये एक सुसंवाद होता आणि माणसाचा सुद्धा मुक्त वावर जंगलांमध्ये होता पण ज्या प्रकारे आज वन्यजीव मनुष्य प्राणी संघर्ष दिसतो आणि मनुष्य जीविताची हानी होताना दिसते ती होत नव्हती.
Bhumi putra brigade 1988 च्या वननीतीनुसार पर्यावरणीय समतोल साधनाच्या दृष्टीने 33 टक्के क्षेत्र हे वनांनी व्यापलेले पाहिजे, पण आज आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रातील 70 टक्के वने ही चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये आहेत आणि त्यामुळे इथे वन्य प्राण्यांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आणि वन्य प्राण्यांचा वावर आणि वन्यजीव मनुष्य प्राणी संघर्ष मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे वास्तविक शासनाने आणि वनविभागाने महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा वनांचे क्षेत्र वाढवून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 33 टक्के वनक्षेत्र निर्माण करायला हवी होती आणि त्या प्रमाणामध्ये गुराढोरांसाठी चराई क्षेत्र सुद्धा निर्माण करायला हवे होते पण तसे न करता वनविभागाच्या नियोजन शून्य भोंगळ कारभारामुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा येथील जमिनींमध्ये वने निर्माण न करता कार्पोरेटच्या घशामध्ये त्या जागा देण्याचा सपाटा वनविभागाने लावलेला आहे या चुकीच्या वननीतीमुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील जंगलालगत राहणाऱ्या ग्रामीण भागातील माणसांचा वनातील वावर जो अधि मुक्त होता त्याच्यावर बंधने आली आहेत.
Bhumi putra brigade कारण वाघांच्या आणि वन्यजीवांच्या संख्येमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि पर्यावरणीय समतोल आज बिघडलेला आहे आणि त्यांना गुराढोरांना चारण्यासाठी सुद्धा आता चराई क्षेत्र राहिलेली नाहीत याचा परिणाम म्हणजे आज रोज एक बातमी येते की वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला आणि मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातील लोकांची जीवित हानी होत आहे.
Bhumi putra brigade केवळ वनामध्ये वावरतानाच नाही तर आज वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येऊन आणि गावामध्ये येऊन मनुष्य प्राण्यांवर हल्ले करू लागलेले आहेत हे वनविभागाचे सपशेल अपयश आहे कारण वन्यजीवांचं कुठलंही नियोजन वन विभाग करताना दिसत नाही आणि नागरिकांच्या जीवाची वनविभागाला जरासुद्धा काळजी नाही, दुचाकी वाहनांना सुरक्षेसाठी हेल्मेटची सक्ती करणारे सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट देऊ शकत नसेल तर सरकारने नादारी घोषित करावी.
Bhumi putra brigade गडचिरोली जिल्ह्यात तर सागवणाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केल्यामुळे तिथे सागवानाच्या सावलीखाली चारा निर्माण होत नाही आणि म्हणून तिथलं वन्यजीव संपदा आणि वन्यप्राणी संपलेले आहेत आणि त्याचं खापर उलट वनविभाग आदिवासी बांधवांवर फोडते आहे असं असतं तर चंद्रपूर जिल्ह्यातीलही आदिवासी राहतात आणि तिथलं वन्यजीव संपदा सुद्धा संपली असती स्वतःच्या नियोजन शून्य कारभाराचे आणि अपयशाचे खापर आदिवासी बांधवांवर फोडण्याचं काम वन विभाग करत आहे वन्यजीव प्राण्यांचे नियोजन करताना एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची संख्या वाढल्यावर वनविभागाने कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी केलेला नाही.
Bhumi putra brigade वाघांना कॉलर आयडी लावून त्यांचा संचार ट्रॅक करण्यात यावा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गावात लगत येणाऱ्या वाघांची माहिती गावकऱ्यांना सायरन अलर्ट द्वारे देण्यात यावी जंगलांना सोलर फेंसिंग लावणे हा अतिशय निंदनीय आणि निर्दयी प्रकार आहे, सोलर फेंसिंग लावण्यावर आमच्या गोमातेने चारा करण्यासाठी कुठे जायचे मग सरकारने आमचा गोमातेला आणि प्रत्येक पाळीव प्राण्याला चारा उपलब्ध करून द्यावा, लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपयांच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या सरकारला गोमातेची यत्किंचितही काळजी नाही, गोमातेच्या नावावर हे भाजपा सरकार केवळ मात्र राजकारण करत आलेला आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्या किंवा जखमी झालेल्या नागरिकांना मोबदल्या देण्याचे धोरण सुद्धा अमानवीय आहे मृतांना केवळ दहा लाख रुपये देऊन पंधरा लाख रुपये फिक्स डिपॉझिट मध्ये टाकणे म्हणजे मुळात त्या कुटुंबाला त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणापासून आणि प्रगती पासून वंचित करण्याचे धोरण आहे त्यातला अर्धा पैसा जखमींच्या उपचारांमध्येच संपून जातो. गंभीर जखमी झालेल्या युवा मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या परिवारातील व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी वनविभागात देण्यात यावी, वन विभागाच्या नीती आणि नुसार असं दिसते की वनविभागाला माणसांची काळजी कमी आणि जंगलातील शापदांची काळजी जास्ती आहे.
सरकारचे पीक विमा धोरण हे विमा कंपन्यांचे पोट भरण्यासाठी निर्माण केलेले आहे ही शंका नाही तर खात्रीच सरकारच्या धोरणावरून पटते, पीक विम्याच्या ऑनलाइन नोंदणी करण्याचे धोरण आखून विम्याच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात आहे काय, सरकारने शेतकऱ्यांना अँड्रॉइड मोबाईल दिलेला आहे? गावामध्ये मोबाईल चार्ज करण्यासाठी वीज सुद्धा उपलब्ध नसते गावा गावामध्ये सेतू केंद्र नसल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन दोन-दोन दिवस आपले काम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सेतू केंद्राच्या रांगेमध्ये उभे राहावे लागत आहे आणि तिथे सुद्धा लिंक न भेटणे ओटीपी न येणे अशा समस्यांचा त्यांना सामना करावा लागत आहे, अशा परिस्थितीमध्ये सरकारने ऑनलाइन रजिस्ट्रेशन ची जबाबदारी ही कृषी विभागाकडे द्यावी आणि शेतकऱ्यांनी केवळ एक फॉर्म भरून तिथे सादर करावा आणि बाकीची पूर्ण कारवाई ही कृषी विभागाने करून द्यावी.
शेतकऱ्याच्या सिंचनाच्या सोयीच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकार उदासीन आहे त्यांना सिंचन विहिरी उपलब्ध करून देणे सोलर पंप उपलब्ध करून देणे असे कुठल्याही ठोस पाऊल सरकार उचलताना दिसत नाही, फवारणीसाठी शेतकऱ्यांना हेल्मेट उपलब्ध करून देणे, मानपट्टा उपलब्ध करून देणे, ब्लूटूथ स्पीकर देणे, असे कुठलेही पाऊल वनविभाग उचलताना दिसत नाही, या सर्व समस्यांना घेऊन भूमिपुत्र ब्रिगेडतर्फे मुल येथे 13 सप्टेंबर ला भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती आज भूमिपुत्र ब्रिगेडच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे, या मोर्च्यात शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भूमिपुत्र ब्रिगेडच्या डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी केले आहे.
candle march देशात व राज्यात होणाऱ्या महिला अत्याचार विरोधात बल्लारपूर शहरात नागरिकांनी कँडल मार्च काढत आरोपीना फाशीची मागणी केली आहे.
Candle march बल्लारपूर – महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधामध्ये 6 सप्टेंबर रोजी बल्लारपुरामध्ये समस्त बल्लारपूर वासीयांतर्फे आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. देशामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये झालेल्या लक्षणीय वाढीमुळे देशातील महिला आणि मुली अत्यंत असुरक्षित झालेले आहेत दिवस असो वा रात्र असो वा रस्ता मंदिर असो वा ऑफिस आज महिला स्वतःला कुठेही सुरक्षित आहोत असं म्हणू शकत नाही आणि ही महिला सुरक्षितता केंद्रामध्ये आलेल्या बीजेपी आणि मोदी सरकारच्या महिला विरोधी धोरणांमुळे आहे कारण दिल्ली पासून कलकत्ता पर्यंत आणि बदलापूर पासून बल्लारपूर पर्यंत ज्या पुरुषवादी मानसिकतेतून महिला आणि मुलींवर अत्याचार होत आहेत त्याला वेळोवेळी पाठ राखण करण्याचे काम हे देशातील केंद्र सरकार करत आहे.
जगामध्ये आमचं नाव रोशन करणाऱ्या महिला पैलवानाच शोषणच जेव्हा एक केंद्रीय मंत्री करतो आणि प्रधानमंत्री त्याची पाठराखण करतात देशातील सामान्य महिला सुरक्षित कशा राहू शकतात हे सरकार महिला विरोधी आहे हे बिलकीसबानो प्रकरणातील घृणीत आरोपींना 15 ऑगस्ट च्या दिवशी मोकळं करून या सरकारने दाखवून दिलेल आहे हातरस येथील पीडितेवर झालेल्या अत्याचारानंतर तिला जाळून टाकण्याचे घृणीत काम या मोदी सरकारने केलेल आहे.
Candle march या देशांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न आज निर्माण झालेला आहे नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये शेकडो पोलिसांना तैनात करून महिलांना असुरक्षित वातावरणामध्ये ठेवल्या जात आहे ओयो सारख्या हॉटेल वाल्यांना अशा कुकर्मामधे सामील होण्यासाठी सरकारकडूनच प्रोत्साहन मिळत आहे की काय असं बल्लारपूरच्या घृणीत घटनेवरून दिसून येत आहे हॉटेल वाल्यांना काही निती नियम आहेत की नाही आणि सरकार म्हणून प्रशासनाचे काही नियंत्रण या सगळ्या व्यवस्थेवर आहे की नाही असा प्रश्न आज निर्माण झालेला आहे आणि म्हणून आज बल्लारपूरच्या महिलांना आणि समस्त बंधू-भगिनींना या सर्व अत्याचाराच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून निदर्शने करावी लागत आहेत.
Candle march आज महिलांचा हा कॅन्डल आणि मशाल मार्च तीन एक्का गेट बल्लारपूर वरून निघाला आणि बल्लारपूर शहराच्या मुख्य रस्त्यावरून रेल्वे स्टेशन चौकातून वापस येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदना करीत या मोर्चाचा समारोप करण्यात आला यावेळी समाजसेविका डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी बल्लारपूरकरांना महिला आणि एकूणच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत शपथ दिली या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात बल्लारपुरातील महिला पुरुष, युवक-युवती यांनी भाग घेतला यात प्रामुख्याने विवेक खुटेमाटे, ताहेर हुसैन, रोजिदा ताजुद्दीन, विजय मुसळे करुणा शेगांवकर, अनीश खान, साजिद शेख, आनंदराव अंगलवार, सतीश मालेकर, श्रीकांत सुंदरगिरी, अजय शाह, शिवबच्चन राजभर, मुकद्दर खान, शाहीद शेख , मोहित शेख, अलविना शेख, adv रोहिणी , करुणा शेगांवकर, अब्दुल आबिद, शकील खान, पूजा महुर्ले, तंजीला सैयद, संजीदा बाजी, एलेस नातर्गी, बशीर खान, आबिद खान, दीपक बनोत, यासिर खान शाहिद खान, समीर शेख, अनिल कलवाला, अंजू भाई , लता नागौसे, शबीर शेख यांच्याशिवाय शेकडो बल्लारपूरकरांनी रॅलीमध्ये भाग घेतला.
Ganesh utsav 2024 चंद्रपुरातील स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले असून आज जोरगेवार कुटुंबाने सहपरिवार गणरायाची पूजा केली.
Ganesh utsav 2024 दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. सकाळी ११ वाजता विधीवत पूजा आणि मंत्रोच्चारांच्या साथीत गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. हे गणेशोत्सवाचे ९४ वे वर्ष असून, जोरगेवार कुटुंबीयांची दुसरी पिढी ही परंपरा उत्साहाने पुढे नेत आहे.
जोरगेवार कुटुंबीयांनी गणेशोत्सवाची महती मनाच्या गाभार्यात समृद्ध धार्मिकतेने आणि भावपूर्ण श्रद्धेने जोपासली आहे. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. त्यांच्या या उत्सवाला ९४ वर्षांची परंपरा असून, स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते हा उत्सव सहकुटुंब साजरा करत आहेत.
गणेशोत्सवाच्या या मंगलमय प्रसंगी, जोरगेवार कुटुंबीयांनी गणरायाची आरती केली आणि गणेशोत्सवाची सुरुवात केली. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कुटुंबाचे आणि समाजाचे कल्याण होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. जोरगेवार कुटुंबीयांची गणेशोत्सवाची ही परंपरा श्रद्धा, भक्ती आणि समाजाभिमुखतेचा अनोखा संगम आहे. गणपतीच्या या आगमनाने त्यांच्या निवासस्थानी भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असून, कुटुंबीयांसह नागरिकांनी सहर्ष गणरायाचे दर्शन घेतले.
गणेशोत्सवाच्या या पारंपरिक सोहळ्याचे ९४ वे वर्ष साजरे करण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल जोरगेवार कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. गणरायाच्या आशीर्वादाने आगामी वर्ष नागरिकांसाठी सुख, समृद्धी, आणि आरोग्यदायी जावो, अशी प्रार्थना त्यांनी गणरायापुढे केली आहे.
Mukhyamantri Yojana Doot मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन
Mukhyamantri Yojana Doot चंद्रपूर : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.
या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.
Ayodhya Ram mandir ‘ब्रम्हपूरीचा महाराजा गणेश मंडळाच्या वतीने यंदा गणेशोत्सवात भाविकांना होणार “अयोध्येच्या राम मंदिराचे” दर्शन, गणेशोत्सवात सुप्रसिद्ध गायक सलमान अली, इशीता विश्वकर्मा, सिनेअभिनेत्री उर्मिला कोठारे यांची राहणार उपस्थिती
Ayodhya ram mandir आता अगदी काही दिवसांतच गणपती बाप्पा चे आगमन होणार असून सर्वत्र धामधूम असणार आहे. अशातच संपूर्ण विदर्भात शिक्षणाची पंढरी म्हणून प्रख्यात असलेल्या ब्रम्हपूरी शहरातील गणेशोत्सव देखील तितकाच लोकप्रिय आहे. या शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला मोठी परंपरा लाभली असून गणेशोत्सवात मोठा सामाजिक सलोखा देखील बघायला मिळतो.
Ayodhya ram mandir या परंपरेला कायम ठेवत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरीचा महाराजा गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून मागील वर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ब्रम्हपूरीचा महाराजा या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी देखील मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार असुन यावर्षी या मंडळाच्या वतीने अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात येणार असून भाविकांना अयोध्येच्या राम मंदिराचे साक्षात दर्शन होणार आहे. मागील वर्षी या मंडळाच्या वतीने केदारनाथ मंदिराचा देखावा उभारण्यात आला होता. सोबतच गणेशोत्सवात विविध प्रकारचे सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार असून रुपेरी पडद्यावरील कलाकारांची देखील यानिमित्ताने गणेशोत्सवात हजेरी लागणार आहे. हे मात्र विशेष.
Ayodhya ram mandir मंडळाच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी सायं. ६ वा. गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. आरोग्य व रक्तदान शिबीर, रात्री ८ वा. ‘गांधी कभी मरते नही’ महानाट्य, १३ सप्टेंबर रोजी दु.१ वा. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, सायं.७ वा. दादा-दादी टॅलेंट शो असुन यावेळी सिनेअभिनेत्री उर्मिला कोठारे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. डान्स महासंग्राम, १४ सप्टेंबर रोजी दु. १२ वा. कला क्षेत्रातील कलावंतांचा सत्कार, रात्री ८ वा. ‘रामायण’ महानाट्य, १५ सप्टेंबर रोजी सायं. ६ वा. हाऊजी खेळ, १५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. ‘भुक’ नाटक, १६ सप्टेंबर रोजी दु.१२ वा. प्रश्नमंजुषा स्पर्धा, सायं.४ वा. वादविवाद स्पर्धा, रात्री ८ वा. होम मिनिस्टर, १७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. इंडियन आयडॉल विजेता, सुप्रसिद्ध गायक सलमान अली व सारेगामापा विजेती इशीता विश्वकर्मा यांचा लाईव्ह सिंगीग शो व रात्री ११ वा. गोपालकाला राहील. तर १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वा. पासून ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा चे मिरवणुक व त्यानंतर विसर्जन होणार आहे.
अयोध्येचा राममंदिर विशेष आकर्षण
यंदा ब्रम्हपुरीचा महाराजा गणेश उत्सव मंडळाच्या वतीने अयोध्येचा राम मंदीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली असून या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी आल्यानंतर अयोध्येच्या मंदीराचे साक्षात दर्शन होणार आहे. मंदीरात १५ फुट उंच गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सोबतच याठिकाणी मिनी बाजार(मेला) यामध्ये विविधांगी झुले, पाळणे, राहणार असुन सांस्कृतिक, सामाजिक, जनजागृतीपर कार्यक्रमांची मोठी मेजवानी भेटणार आहे. त्यामुळे दररोज विदर्भातील विविध जिल्ह्यांतुन हजारोंच्या संख्येने भाविक याठिकाणी उपस्थिती दर्शविणार असल्याचे सांगितले जात आहे.
mahavitaran office धास्ती : भूषण फुसे यांचे जिवतीत आक्रमक “तोडफोड” स्टाईल आंदोलन मुख्यालयी हजर नसणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिली तंबी
Mahavitaran office जिवती – शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रहार संघटना आक्रमक आंदोलना करिता प्रसिद्ध आहे तसेच राजुरा विधानसभा क्षेत्रात सुद्धा सामाजिक कार्यकर्ता भूषण मधुकरराव फुसे हे सुद्धा अभिनव आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची आंदोलने प्रामुख्याने मागासवर्गीय, अपंग, रुग्ण, विधवा, लहान व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी असतात. अभिनव आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधून घेण्याबरोबरच प्रसंगी कायदा हातात घेऊनही त्यांनी आंदोलने केली आहेत. सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भूषण फुसे नेहमी आक्रमक असतात.
Mahavitaran office भूषण फुसे यांच्या आंदोलनाची चांगलीच धास्ती जिवती तालुक्यातील मुख्यालयी नसणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आली असून यापुढे सर्वसामान्य गोरगरिबांची कामे वेळेवर न केल्यास थोबाडच रंगविण असा आक्रमक इशाराही फुसे यांनी दिला आहे. जिवती तालुक्यात सरकारी अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहत नाही परिणामी नागरिकांची कामे खोळंबतात हि नेहमीच बोंब असताना सुद्धा प्रशासनातर्फे अश्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनवर कोणतीही कारवाई होत नाही.
दि. ५ सप्टेंबर ला सामाजिक कार्यकर्ता भूषण मधुकरराव फुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन जिवतीत होते. एक दिवस अगोदर दि. ४ सप्टेंबर ला जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन कार्यक्रमाचा आढावा घेण्याकरिता भूषण फुसे जिवतीत गेले होते. फुसे जिवतीत आल्याने परिसरातील शेतकरी, महिलावर्ग व सर्वसाधारण नागरिक कार्यलयात आले आणि त्यांनी जिवती तालुक्यातील समस्या सांगितल्या अशीच महावितरणची एक समस्या सोडविण्याकरिता भूषण फुसे हे महावितरण कार्यलयात गेले असताना त्यांनाही तेथील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत होते. भूषण फुसे यांनी टेबल ठोकत आक्रमक पावित्रा दाखविला यात फुसे यांच्या हातून संगणकाचा स्टॅंड व कुर्सी तुटली यात महावितरणचे एक हजार रुपयाचे नुकसान झाले. महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रवीण देवतळे यांनी पोलिसांत याविषयी तक्रार नोंदविली आहे.
सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी सांगितले कि प्रशासनाने सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश तात्काळ द्यावे व त्याची अंमलबजावणी करावी. यापुढे मुख्यालयी नसणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना विरुद्ध आक्रमक आंदोलन उभे करू परिणामी आंदोलनात तोडफोड झाल्यास त्याची सर्वस्वी जिम्मेदारी प्रशासनावर येईल असा इशारा दिला आहे.
Pik vima शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही, सदर रक्कम तात्काळ मिळावी यासाठी पुढचे पाऊल काय असणार आहे, याबाबत डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती.
pik vima वीरई ग्राम पंचायत येथे शेतकऱ्यांनी पीक विम्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे तातडीने एक बैठक बोलावली. त्या बैठकीत डॉ अभिलाषा गावतुरे या उपस्थित होत्या. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त भागाची नोंदणी करून सुद्धा बरेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा ची रक्कम जमा झाली नाही हा गोरगरीब शेतकऱ्यावर अन्याय आहे. त्यांचा अन्याय दुर करण्यासाठी व इतर अन्यायग्रस्त शेतकऱ्यानां न्याय मिळवून देण्यासाठी व तसेच ही माहिती सर्व सामान्य शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवीत गोरगरीब शेतकऱ्यांना पीक विमा ची रक्कम मिळावी यासाठी यापुढील भूमिका काय राहील यासाठी ही बैठक घेण्यात आली.
डॉ गावतुरे यांनी यावर गांभीर्याने विचार करून तातडीने संबंधित विभागाला संपर्क करण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेऊ असे त्या म्हणाल्या. या सभेत शेतकरी बांधव न्याय मिळवून देण्यासाठी सरपंच शांताबाई गेडाम,काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक वाढई,काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष विक्रमजी मोहरले, नेताजी सोनुले ,नंदकिशोर वाढई,उत्तम गणवीर, शशिकांत जेंगठे, सुरज गिरडकर, सुखदेवजी वाढई, भुजंग आगळे, रमेश वाढई, बंडू निकोडे ,मोरेश्वर गोंगले ,पुरुषोत्तम गोंगले, सुरेश सोनुले ,सुरेश माहुर्ले, सदाशिव वसाके, संतोष गुडलावार, नंदकिशोर वाढई, प्रशांत जेंगठे, नवनाथ जेंगठे व सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
chandrapur crime news चंद्रपूर जिल्हा वर्ष 2024 पासून गुन्हेगारी क्षेत्रात मोठा झाला, यावर्षी खुनाच्या घटना, गोळीबार अश्या विविध घटनेमुळे जिल्हा प्रकाश झोतात आला आता पुन्हा ते सत्र तसेच सुरूच आहे.
chandrapur crime news चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नागरी गावात मोठा गुन्हा घडण्याच्या तयारीस असलेली बाब उघडकीस आली आहे, 1 सप्टेंबर ला नागरी गावातील 30 वर्षीय महिला नेहमीप्रमाणे घरी घरकाम करीत होती, सकाळी 11.30 वाजता एक इसम ज्याच्या हातात सत्तुर व चाकू होता त्याने घरचा दरवाजा उघडा असा आरडाओरडा केला, त्यानंतर तो घाणेरड्या शब्दात शिवीगाळ करू लागला, महिला घाबरली, तो इसम म्हणाला की दार उघड आज तुझ्या पतीचा मर्डर करतो, जर तू आडवी आली तर तुला#$%#^ अश्लील शब्दात शिवीगाळ केली.
आरडाओरडा ऐकू आल्यावर शेजाऱ्यांनी त्याठिकाणी गर्दी केली, काहींनी त्या इसमाला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऐकण्याचा मनस्थिती मध्ये नव्हता, त्याने महिलेच्या घरातील दरवाजा लाता व दगडाने दार तोडत आत प्रवेश केला, त्याने महिलेच्या गळ्याला सत्तुर लावला, महिलेने आरडाओरडा करीत तिथून पळ काढला, या सर्व प्रकरणाची वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
Chandrapur crime news 36 वर्षीय शंकर रमेश हिवरकर असे त्या आरोपीचे नाव आहे, याबाबत 6 सप्टेंबर रोजी श्रमिक पत्रकार संघात पीडित महिलेने पत्रकार परिषद घेत माहिती दिली. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक केली मात्र 2 दिवसांनी आरोपी हिवरकर पोलीस कोठडी मधून बाहेर आल्यावर पुन्हा त्याने पीडित महिलेचे घर गाठत त्यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली, 4 सप्टेंबर ला पीडित महिलेने वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली मात्र यंदा पोलिसांनी कारवाई केली नाही असा आरोप पीडित महिलेने पत्रकार परिषदेत आरोप केला.
Chandrapur crime news सदर प्रकरणाबाबत नागरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम मोहीम समिती अध्यक्ष विनोद वाटमोडे यांना याबाबत तक्रार केली, सदर आरोपी हिवरकर हा गावात अवैध दारूविक्री चे काम करतो. विशेष बाब म्हणजे 4 सप्टेंबर ला आरोपी शंकर हिवरकर हा पोलीस कोठडीतून बाहेर आल्यावर पीडित महिलेला पुन्हा शिवीगाळ करीत मी आता बाहेर आलो, पोलीस माझे काही बिघडवू शकत नाही, त्यांना मी पैसे दिले आहे, तुझा व तुझ्या पतीचा मर्डर केल्यावर मी जेल मध्ये जाणार अशी धमकी त्याने दिली.
महिला सुरक्षेबाबत जिल्ह्यातील सामाजिक संघटना पुढाकार घेत आहे, पोलीस अधीक्षक असे गुन्हे न घडावे यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे, मात्र काही अधिकाऱ्यांमुळे असे गुन्हे घडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे, नागरी येथील पीडित महिला आज दहशती मध्ये आहे, पती कामानिमित्त बाहेर जातात त्यावेळी महिला आपल्या 2 लहान मुलीसोबत घरी एकटी असते.
पोलीस आता पुन्हा काही मोठी घटना व्हायची वाट बघत आहे का? असा प्रश्न यावेळी निर्माण झाला आहे. आता पोलीस याबाबत काय कठोर पाऊल उचलतात हे येणारी वेळ सांगणार.