Author: Admin

  • Save the Constitution : मायावी कांग्रेसपासून सावध रहा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Save the Constitution : मायावी कांग्रेसपासून सावध रहा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Save the Constitution काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली तरच देशात सुख, शांती, समृद्धी नांदू शकते. कारण काँग्रेस सत्तेसाठी जगते तर भाजप राष्ट्रहितासाठी काम करते. त्यामुळे राष्ट्रहित साधायचे असेल, तर काँग्रेसला दूर ठेवावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    Save the Constitution राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या संदर्भात भाष्य केले. त्या विरोधात चंद्रपूर येथे भाजप जिल्हा व महानगरतर्फे ‘संविधान बचाओ, काँग्रेस हटाओ’ आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे,भाजपा पदाधिकारी,महिला मोर्चा पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    महत्त्वाचे : कंत्राटी कामगारांना मिळणार अल्प दरात घर – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

     ना.मुनगंटीवार म्हणाले, ‘काँग्रेस आणि राहुल गांधी हेच देशाचे आणि संविधानाचे खरे शत्रू आहेत. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने कधीही सन्मान दिला नाही. काँग्रेसनेच डॉ. आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत केले. राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत भाष्य केले आहे. त्यावरून त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असल्याचे सिद्ध होते. देशाला, संविधानाला आणि आरक्षणाला वाचवायचे असेल तर खऱ्या अर्थाने काँग्रेसला हटविले पाहिजे,’ असेही ते म्हणाले.

     या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा दिल्या. काँग्रेसला ओबीसी समाजातील व्यक्ती पंतप्रधान झाल्याचे बघवत नाही. त्यांचा खरा चेहरा अमेरिकेत गेल्यानंतर समोर आला. देशाच्या विरोधात राहुल गांधी परदेशात बोलतात ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले. (Save the Constitution)

    महाराष्ट्र राज्यात सौर ऊर्जा मोहीम यशस्वी


    काँग्रेसने फक्त त्यांच्या लोकांचा सन्मान केला. त्यांना तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायचा नव्हता. आणि आता तर भारतरत्न बाबासाहेबांनी दिलेली आरक्षण व्यवस्थाही त्यांना नको आहे. असे असतानाही लोकसभा निवडणुकीत ते जनतेसोबत खोटं बोलले. आता तर त्यांना काय हवे आहे, हे राहुल यांनी आपल्याच तोंडून सांगितले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.  

    ‘मायावी काँग्रेसपासून सावध रहा’
    काँग्रेसचे लोक अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी, बहुजनांना मानत नाही. त्यामुळे या मायावी काँग्रेसपासून सावध राहण्याची गरज आहे. हे देशातील खरे रावण आहेत. याच काँग्रेसने बाबासाहेबांना ईशान्य मुंबईतून पराभूत केला.जगातील सर्वांत शिक्षित असलेल्या बाबासाहेबांना काँग्रेसने छळले. कारण आपल्यापेक्षा दलित समाज मोठा होईल, याची भीती काँग्रेसला होती, अशी टीका ना. श्री. मुनगंटीवार यांनी केली.

  • Mhada House : कंत्राटी कामगारांना मिळणार अल्प दरात घरं – सुधीर मुनगंटीवार

    Mhada House : कंत्राटी कामगारांना मिळणार अल्प दरात घरं – सुधीर मुनगंटीवार

    Mhada House कामगार हा औद्योगिक क्षेत्रातील कणा असून त्यांचे प्रश्न सोडविणे हे आपले कर्तव्य आहे. महानिर्मिती मधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19 टक्के वाढ मिळाल्याने कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. मात्र, कंत्राटी कामगारांच्या मागण्या बाकी आहे. त्या उर्वरित मागण्या भविष्यात सर्वशक्तीनिशी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच चंद्रपूरच्या म्हाडामध्ये कंत्राटी कामगारांना अल्पदरात घरे उपलब्ध करून देणार असल्याचे ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

    Mhada house महाराष्ट्र राज्य महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आयोजित विजयी जल्लोष सभेत ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी, महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष भाई भालाधरे, संयोजक नचिकेत मोरे, कार्याध्यक्ष बंडू हजारे,महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, भाजपा महामंत्री ब्रिजभुषण पाझारे,भाजपा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, गणेश सपकाळे, सतीश तायडे, शंकर गडाख, प्रमोद कोलारकर, अमोल मेश्राम, वामन मराठे, वामन बुटले तसेच कंत्राटी कामगार संघटनेचे पदाधिकारी, तसेच मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. (Mhada House)

    अवश्य वाचा : वडेट्टीवार यांनी केले त्या शेतकरी कुटुंबाचे सांत्वन

    कंत्राटी कामगारांनी आंदोलनाच्या यशानंतर मला निमंत्रित केले असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी सर्व संघटनांनी मिळून एकतेचा नारा दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत सह्याद्री येथे बैठक पार पडली. सर्व संघटनांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संयमी भूमिका घेत योग्य पद्धतीने मांडल्या.

    70 वर्षीय नागरिकांना मिळणार आयुष्यमान योजनेचा लाभ


    Mhada house सर्व संघटनेचे नेते एक विचाराने मागण्यांच्या संदर्भात तर्कसंगतीने विचार मांडत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांच्या निर्णयाबाबत सकारात्मक भूमिका घेतली. आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 19 टक्के पगारवाढीचा निर्णय घेतला.त्यामुळे आंदोलनाला यश प्राप्त झाले.कंत्राटी कामगारांच्या अद्यापही ज्या मागण्या अपूर्ण आहे. त्या सर्व मागण्या शक्तीनिशी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    महत्वाचे

    विविध प्रश्न मार्गी:
    चंद्रपूर नगरपरिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आणि 606 कर्मचारी स्थायी झाले. विधिमंडळात वनविभागातील वनमजुरांचा आवाज बुलंद करत त्यांच्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण केली आणि 11 हजारपेक्षा जास्त वनमजूर स्थायी झाले.
    ऑटो रिक्षावाल्यांचा व्यवसाय कराचा प्रश्न निर्माण झाला होता. स्वतःच कर्ज घेऊन व्यवसाय करणाऱ्यांच्या मागे व्यवसाय कर रद्द करण्याची भूमिका घेतली आणि ऑटो-रिक्षावाल्यांचे व्यवसाय कर रद्द करण्याचे कार्य केले.ऑटो रिक्षावाल्यांना पहिला घरकुलाचा टप्पा देत स्वतःच्या हक्काचे घर उपलब्ध करून दिले.

    कामगारांना अल्पदरात घरे
    चंद्रपूरच्या म्हाडामध्ये योजनेच्या माध्यमातून अल्पदरात घरे निर्माण करण्यात येत आहे. त्यांना स्वतःच्या हक्काचे घर नसेल अशा कंत्राटी कामगारांची यादी तयार करावी. या कंत्राटी कामगारांना अल्पदरात घरे उपलब्ध करून देणार असून घरकुलासाठी अडीच लाख रुपये अनुदान आहे. मात्र, केंद्र व राज्य शासनाच्या वतीने 2 लक्ष रुपये असे मिळून एकूण साडेचार लक्ष रुपये अनुदान उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

    100 खाटाच्या ई.एस.आय.सी हॉस्पिटलला मान्यता:-
    आरोग्याच्या संदर्भात, कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या रोजंदारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना ई.एस.आय.सी चा फायदा व्हावा याकरीता, केंद्र शासनाने अतिशय उत्तम तंत्रज्ञान असणारे 100 खाटाच्या ई.एस.आय.सी हॉस्पिटलला मान्यता दिली आहे. महाराष्ट्रात नसेल असे उत्तम व अत्याधुनिक हॉस्पिटल ई.एस.आय.सी चे होणार आहे. या रुग्णालयाचा फायदा कंत्राटी कर्मचाऱ्यांना निश्चितपणे होईल, असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

  • Vijay Wadettiwar : वडेट्टीवार यांनी केले त्या शेतकरी कुटुंबाचे सांत्वन

    Vijay Wadettiwar : वडेट्टीवार यांनी केले त्या शेतकरी कुटुंबाचे सांत्वन

    vijay wadettiwar वन्यप्राण्यांपासुन शेत पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेताच्या बांधावर तार लावत असतांना अचानकपणे त्या तारांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण ह़ोऊन चार जणांना आपला जीव गमवावे लागल्याची घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपुर येथील शेत शिवारात घडली. याची माहिती मिळताच आज राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी गणेशपुर व चिचखेडा येथे सदर मृतकांच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन करत आर्थिक मदत केली.

    Vijay wadettiwar कधी असमानी संकट तर कधी वन्य प्राण्यांचे हल्ले यातून जीविताचा धोका पत्करुन शेती व्यवसाय करणाऱ्यांना वन्य प्राण्यांकडुन शेतपिकांची नासधूस करून हैराण करून सोडल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी वर्ग प्रचंड चिंतेत आहेत. अश्यातच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातून शेत पिकांना वाचविण्यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपुर येथील प्रकाश राऊत, नानाजी राऊत शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर तार लावण्याचे  ठरविले. यासाठी त्यांनी गावातील युवराज डोंगरे व शेजारच्या चीचखेडा येथील पुंडलिक मानकर या रोजंदाराना कामावर बोलाविले.

    अवश्य वाचा : महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी आप ने ठेवला पोलीस विभागासमोर हा प्रस्ताव

    Vijay wadettiwar शेताच्या बांधावर तार लावण्याचे काम सुरू असताना नियतीने घात केला. व जवळच असलेल्या जीवंत विद्युत ताराच्या खांबाला तार गुंतून त्यातून विद्युत प्रवाह कुंपणाच्या तारात येऊन कुंपण करणाऱ्यांपैकी पाचही जणांना विद्युत प्रवाहने घात केला.व यात प्रकाश राऊत, नानाजी राऊत, युवराज डोंगरे व पुंडलिक मानकर या चौघांचा अनावधानाने मृत्यू झाला. तर सदर घटनेत एकाला गंभीर दुखापत झाली. आज राज्याचे  विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार तालुका दौरावर असताना त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेत तात्काळ गणेशपुर व चीचखेडा गाठून घटनेतील मृत्तकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व आर्थिक मदत देत इतरही शासन योजनेचा लाभ मिळवून देणार अशी ग्वाही दिली.

    यावेळी प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, चिचखेड सरपंच संजना घुटके, सिंदेवाही काॅंग्रेस तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे, तहसीलदार सतीश मासाळ, गटविकास अधिकारी रविंद्र घुबडे, पं.स.कृषी अधिकारी चौधरी, माजी न.प.उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, माजी जि.प.सदस्य भावना ईरपाते, उपसरपंच सुरेश ठीकरे, माजी कृउबा सभापती मनोहर गजबे यांसह ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

  • Ayushman bharat yojana : 70 वर्षावरील नागरिकांचे होणार मोफत उपचार

    Ayushman bharat yojana : 70 वर्षावरील नागरिकांचे होणार मोफत उपचार

    ayushman bharat yojana प्रत्येक नागरिकांना शासकीय व खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळावे यासाठी केंद्र सरकारने वर्ष 2017 मध्ये आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात केली होती, आता या योजनेत 70 वर्षावरील नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.

    ayushman bharat yojana या योजनेनुसार 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांवर मोफत उपचार केले जातील. या योजनेनुसार 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचा मोफत इन्शूरन्स कव्हर मिळणार आहे. 

    आयुष्यमान भारत योजना

    सरकारनं सांगितलं की, ‘योजनेनुसार पहिल्यांदा कव्हर करण्यात आलेल्या परिवारांशी संबंधित 70 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना प्रत्येक वर्षासाठी 5 लाखांचे अतिरिक्त टॉप अप कव्हर ( जे त्यांना 70 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना देता येणार नाही) मिळेल.

    ज्येष्ठ नागरिक ( 70 वर्षांपेक्षा ज्येष्ठ) जे पहिल्यापासून केंद्र सरकारची आरोग्य योजना (CGHS), माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS) आणि आयुष्यमान केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) सारख्या अन्य सार्वजनिक विमा योजनांचा फायदा घेत आहेत, ते त्यांची विद्यमान योजना निवडू शकतात. अथवा AB PM-JAY पर्याय निवडू शकतात. Ayushman bharat yojana

    महत्त्वाचे : ई सिम बाबत ही माहिती तुम्हाला माहित आहे काय?

    सरकारनं स्पष्ट केलंय की 70 वर्षांपेक्षा जास्त वयांपेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक जे खासगी विमा पॉलिसी तसंच कर्मचारी राज्य विमा योजनेच्या अंतर्गत आहे ते देखील AB PM-JAY योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.

    योजना काय आहे?
    ७० वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी खूषखबर .केंद्र सरकारनं ७० वर्षे पुर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता ५ लाख रूपयांचं मोफत विमा कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतलाय . याला कोणत्याही उत्पनाची अट नाही . या निर्णयाचा फायदा ६ कोटी लोकांना मिळणार आहे.त्यातही जर तुमचा कुठलाही इतर पाच लाखाचा विमा असेल तर दोन्ही विमा मिळून दहा लाख रुपये पर्यंतचा विमा ७० वर्षे पूर्ण झालेल्या मिळू शकतो. योजनेचा लाभ कसा घेणार ते आता आपण समजावून घेऊ. Ayushman bharat yojana

    कुटुंबातील किती लोकांना मिळणार विमा ?
    या संदर्भात कुटुंबातील गरजू जेवढे सदस्यातील तेवढ्यांना हा विमा मिळण्यासाठी ते पात्र ठरतील . एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड देखील होऊ शकतात.

    योजनेचे लाभार्थी कोण असणार?
    आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत देशातल्या सर्वच ७० वर्षावरील नागरिक असतील. तसेच निराधार नागरिक, आदिवासी, दलित तसेच दिव्यांग नागरिक आणि जे असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असतील ते देखील यासाठी पात्र आहेत. ऑनलाइन pmjay.gov.in ह्या संकेत स्थळावर अर्ज करून पात्र आहे किंवा नाही हे देखील समजू शकतं.

    सरकारी योजनेचे लाभ घेणारे देखील पात्र
    केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी सुद्धा लाभ घेऊ शकतात .या योजनेचा लाभ जेष्ठ नागरिक आधीपासून केंद्र सरकारची आरोग्य योजना (CGHS) घेत आहेत जे माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS )घेत आहेत आणि जे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAF)तसेच इतर सार्वजनिक आरोग्य विम्याचा लाभ घेणारे देश नागरिक सुद्धा पात्र असतील.

  • special activities : महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत आप चा पोलीस विभागाला महत्वाचा प्रस्ताव सादर

    special activities : महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत आप चा पोलीस विभागाला महत्वाचा प्रस्ताव सादर

    special activities चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपक्रमांचा आप चा प्रस्ताव

    special activities चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेल्या महिला व मुलीच्या अत्याचार प्रकरणबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने पोलीस विभागाला महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत विविध उपक्रमांचा प्रस्ताव पोलीस विभागाला सादर केला आहे.

    अवश्य वाचा : त्या 4 शेतकऱ्यांचा मृत्यू असा झाला, महावितरण ने सांगितले कारण


    आम आदमी पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांना एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले आहे. या निवेदनात, त्यांनी जिल्ह्यातील महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी काही ठोस उपाययोजना सुचवल्या आहेत. (Special activities)
    राईकवार यांनी जिल्ह्यात महिला विद्यार्थींच्या आत्महत्या, अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या घटनांमध्ये होत असलेली चिंताजनक वाढ निदर्शनास आणून दिली. त्यांनी या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.


    राईकवार यांनी खालील मुद्दे मांडले:

    विशेष महिला पोलीस पथकाची स्थापना:

    शैक्षणिक संस्था आणि कार्यस्थळांवर जाऊन महिला व मुलींशी संवाद साधण्यासाठी.
    महिलांचा विश्वास संपादन करणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी.

    व्यापक जनजागृती मोहीम:

    महिलांच्या अधिकार, सुरक्षा उपाय आणि मदतीच्या मार्गांबद्दल माहिती देण्यासाठी.
    आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य जागृती कार्यक्रमांवर विशेष भर.

    गोपनीय सल्ला सेवा:

    मानसिक तणाव, ब्लॅकमेलिंग किंवा छळाला सामोरे जाणाऱ्या महिला व मुलींसाठी.
    २४x७ हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देणे.

    त्वरित प्रतिसाद पथक:

    आणीबाणीच्या परिस्थितीत तात्काळ कारवाई करण्यासाठी.
    अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या तक्रारींवर तातडीने कारवाई. (Special activities)

    नियमित पाठपुरावा आणि मूल्यमापन:

    या उपक्रमांच्या प्रभावाचे मूल्यमापन आणि आवश्यक सुधारणा करण्यासाठी.

    व्हाट्सअॅप गटाची निर्मिती:

    पोलीस आणि नागरिकांमध्ये थेट संवाद साधण्यासाठी.
    सुरक्षा टिप्स आणि महत्त्वाची माहिती शेअर करण्यासाठी.

    खाजगी संस्था आणि व्यापारी संघटनांमध्ये महिला सुरक्षा समिती:

    खाजगी इन्स्टिट्यूट्स आणि व्यापारी संस्थांमध्ये महिला सुरक्षा समित्यांची स्थापना करण्यासाठी प्रोत्साहन.
    शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष मार्गदर्शन कक्ष स्थापन करणे.

    राईकवार यांनी म्हटले की, “चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आणि मुलींविरुद्धच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, विशेषतः महिला विद्यार्थींच्या आत्महत्या, अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या घटना हे अत्यंत चिंताजनक आहे. आमच्या या सूचना पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घ्याव्यात आणि त्वरित अंमलबजावणी करावी अशी आमची अपेक्षा आहे.”
    त्यांनी पुढे सांगितले, “या उपाययोजनांमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेत लक्षणीय सुधारणा होईल, त्यांच्यावरील अत्याचार कमी होतील आणि आत्महत्येच्या घटना रोखण्यास मदत होईल असा आमचा विश्वास आहे.”


    अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी या निवेदनाचा स्वीकार केला असून, त्यांनी लवकरच खाजगी संस्था आणि व्यापारी संघटनांमध्ये महिला सुरक्षा कार्यक्रम घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर त्यांनी या गंभीर समस्यांवर लक्ष केंद्रित करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.


    निवेदन सादर करताना खालील पदाधिकारी उपस्थित होते:
    मयूर राईकवार, जिल्हाध्यक्ष, राजकुमार नगराले, जिल्हा सचिव, प्रशांत सिदुरकर, जिल्हा सचिव, राजू कूड़े, युवा जिल्हाध्यक्ष, कुणाल शेट्टे, जिल्हा पदाधिकारी, योगेश गोखरे, शहर अध्यक्ष, संघम सागोरे, वाहतूक जिल्हाध्यक्ष
    एड. तबस्सुम शेख, महिला अध्यक्ष, आदित्य नंदनवार, युवा सचिव, अनूप तेलतुंबड़े, युवा उपाध्यक्ष,आम आदमी पक्ष पोलीस प्रशासनासोबत सहकार्य करून या उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

  • Opposition to reservation : आरक्षणाला विरोध, कांग्रेसचा पर्दाफाश

    Opposition to reservation : आरक्षणाला विरोध, कांग्रेसचा पर्दाफाश

    Opposition to reservation राहुल गांधींची आरक्षण संपवणारी योजना अमेरिकेतून उघड…राहुल गांधी याचं वक्तव्य निषेधार्ह…देवेंद्र फडणवीस

    Opposition to reservation राज्यात विधानसभा निवडणुका जवळ येताच पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी अमेरिकेत बसून आरक्षणासंदर्भातील आपली योजना सांगितली आहे. काँग्रेस आरक्षण संपवू शकते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे, मात्र त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. ते म्हणजे निष्पक्षता म्हणजेच समानता. खरे तर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, भारतात आरक्षणाच्या बाबतीत निष्पक्षता असेल तेव्हाच काँग्रेस पक्ष आरक्षण संपवण्याचा विचार करेल आणि आता तशी परिस्थिती नाही. प्रतिष्ठित जॉर्जटाउन विद्यापीठात विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी ही माहिती दिली.

    यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत म्हणाले…राहुल गांधी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर नेहमीच देशविरोधी वक्तव्ये केली आहेत, जी कोणत्याही प्रकारे राष्ट्रहिताच्या दृष्टीने नाहीत. Opposition to reservation

    हम तो शिवभक्त है

    आरक्षण संपवण्याबाबत राहुल गांधी यांनी नुकतेच केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात राहुल गांधी आणि काँग्रेसने आरक्षणाबाबत खोटी कथा पसरवली पण आता त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे.

    महत्त्वाचे : हम तो जहर पिते भी है, और जिते भी है – देवेंद्र फडणवीस

    राज्यघटनेचे निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. राहुल गांधींनी कोणत्याही व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला तरी देशातील प्रत्येक वर्गाला त्यांचे हक्क मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. Opposition to reservation

    वॉशिंग्टनमधील युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी राहुल यांना आरक्षणाबाबत प्रश्न विचारला होता आणि ते किती दिवस सुरू राहणार असा सवाल केला होता. त्यावर ते म्हणाले, ‘जेव्हा भारतात (आरक्षणाच्या बाबतीत) निष्पक्षता येईल, तेव्हा आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू. सध्या भारत यासाठी योग्य जागा नाही.’ राहुल गांधी म्हणाले, ‘जेव्हा तुम्ही आर्थिक आकडेवारी पाहता, तेव्हा आदिवासींना 100 रुपयांपैकी 10 पैसे मिळतात. दलितांना १०० रुपयांपैकी पाच रुपये मिळतात आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) लोकांनाही जवळपास तेवढीच रक्कम मिळते. त्यांना योग्य सहभाग मिळत नाही हे सत्य आहे.

  • Maharashtra Politics : हम तो जहर भी पिते है और जिते भी है – देवेंद्र फडणवीस

    Maharashtra Politics : हम तो जहर भी पिते है और जिते भी है – देवेंद्र फडणवीस

    maharashtra politics “हम तो भगवान शिव को मनाने वाले है। जहर भी पिते है और फिर भी जिते है। असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले होते.

    Maharashtra politics या पाठीमागे त्यांचा उद्देश फार महत्वाचा होता त्यांना राज्यतिल जनतेला कमी शब्दांत बरच काही सांगायचं होत. 2014 साली राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवताना राज्य हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले त्यात सर्वाधिक डोकेदुखी ठरणार विषय म्हणजे मराठा आरक्षण.

    असं का म्हणाले देवेंद्र भाऊ

    या आरक्षणावरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीत जरांगे सारखा मराठा उपोषण कर्ता अभ्यासाविना जे तोंडात येईल ते बोलून राज्याच्या उच्च पदस्थ असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला , देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाज हिताचे अनेक निर्णय घेतले.

    अवश्य वाचा : त्या चौघांचा मृत्यूचे कारण काय? महावितरण ने दिले स्पष्टीकरण

    “सारथी” संस्थेची स्थापना केली,सारथी च्या माध्यमातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा, व्यवसायिक कर्ज अश्या अनेक योजना अंतर्गत मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधला , मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकवणं असेल अण्णा साहेब पाटील महामंडळ द्वारे कर्ज योजना असेल असे अनेक फायदे पोहचवले. असे असताना देखील शेवटी याच समाजाचा उपोषण कर्ता मनोज जरांगे कश्या भाषेत बोलत होते हे महाराष्ट्रातिल जनतेला ज्ञात आहे ते वेगळं सांगायची गरज नाही.

    2022 मध्ये पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पदावर रुजू होऊन राज्य हिताचे कार्य केले, अनेकदा विरोधकांनी देखील अश्या प्रकारे चकरव्ह्यू रचण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व वादळ पेलवलित. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील स्वच्छ निर्मळ पणे त्यांनी माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन असे आश्वासन राज्यातील जनतेला दिलं व त्याला ते जागले देखील.

  • Mahavitaran : शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू कसा झाला? महावितरणने सांगितले कारण

    Mahavitaran : शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू कसा झाला? महावितरणने सांगितले कारण

    mahavitaran अनाधिकृत जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने चार शेतकऱ्यांचा मृत्यू व एक किरकोळ जखमी

    Mahavitaran महावितरण ब्रह्मपुरी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या मेंडकी वीज वितरण केंद्रातील मौजा गणेशपुर येथे चार शेतकऱ्यांना प्राणांकित वीज अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी कर्मचारी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यावरील सविस्तर माहिती अशी दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी अंदाजे सकाळी ९:३० वाजता दरम्यान श्री नानाजी राऊत यांचे शेतामध्ये वन्यप्राणी पासून शेतीचे होणारे नुकसान किंवा वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी कुंपणाची तार लावण्याचे काम सुरु होते.

    सदर तार लावण्याकरिता शेतमालका सोबत इतर सहा जण होते सदर कुंपण तार अंदाजे एक किलोमीटरचा असून संपूर्ण शेताला कुंपण करत असताना शेताच्या एका कोपऱ्यामध्ये असलेल्या लघुदाब वहिनी वर अनाधिकृत 3ph केबल वायरचा वापर करण्यात आला सदर केबल वायरला हाताने ओढत असलेल्या जी आय ताराचे घर्षण झाल्याने केबल वरील इन्सुलेशन निघाले व जे पाच शेतकरी कुंपणासाठी वापरण्यात येणाऱ्या ताराला पकडून ओढत असताना त्यांना करंट लागुन त्यापैकी चार लोकांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला तसेच त्यापैकी एका शेतकऱ्याच्या हाताला भाजले व तो मागच्या बाजूला पडला त्यामुळे किरकोळ जखमी झाला.

    अवश्य वाचा : आई – बाबा सॉरी, आणि विद्यार्थिनीने केली आत्महत्या

    एलटी पोल वरून आलेली 3ph केबल वायर हे अनधिकृत वीज पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येत होते. वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी त्याच्या कुंपणात वीज पुरवठा सोडण्याच्या प्रकारातून तर ही दुर्घटना घडली नसावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. महावितरण लाईनचा कुठल्याही प्रकारचा संपर्क आलेला नाही याबाबत महावितरण व पोलीस खात्यातर्फे चौकशीचे काम काज सुरू आहे. मरण पावलेल्या शेतकऱ्यांची नावे श्री नानाजी राऊत, प्रकाश राऊत (शेत मालक) युवराज डोंगरे, पुंडलिक मानकर आणि किरकोळ जखमी झालेले श्री सचिन नन्नावरे हे आहेत तसेच त्यांच्या सोबत शेतात श्री विनोद वसाके आणि श्री किशन ढोरे हे होते.

  • Active E Sim : काय आहे ई सिम? जाणून घ्या सविस्तर माहिती

    Active E Sim : काय आहे ई सिम? जाणून घ्या सविस्तर माहिती

    E sim तुम्हाला माहीत आहे का ई-सिम आणि फिजिकल सिम कार्डमध्ये काय फरक आहे?  दोनपैकी कोणते सिम तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल?  ई-सिम कसे काम करते?

    E sim एम्बेडेड सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्युल म्हणजेच ई-सिम आजकाल खूप चर्चेत आहे.  वास्तविक, काही काळापूर्वी ॲपलने आपल्या iPhone-14 आणि iPhone-14 Pro मॉडेल्समध्ये फिजिकल सिमऐवजी केवळ ई-सिमचा पर्याय ग्राहकांना दिला होता.  मात्र, ई-सिम असलेले आयफोन मॉडेल फक्त अमेरिकेतच उपलब्ध आहे.  आता भारतातही अनेक कंपन्या ई-सिम सुविधा देत आहेत.  असे मानले जाते की भविष्यात बहुतेक स्मार्टफोन वापरकर्ते फक्त ई-सिम वापरण्यास सुरवात करतील.  भारतात ई-सिम सुविधा पुरवणाऱ्या कंपन्या ग्राहकांना फिजिकल सिमचा पर्यायही उपलब्ध करून देतील, असे सांगण्यात येत आहे.

    ई-सिम (e sim) हे मोबाइल फोन, स्मार्टवॉच, टॅब्लेटमध्ये वापरले जाणारे आभासी सिम कार्ड आहे.  हे प्रत्यक्ष सिमपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.  तुम्ही ई-सिमचा पर्याय निवडल्यास, तुम्हाला फोनमध्ये कोणतेही कार्ड घालावे लागणार नाही.  टेलिकॉम कंपनी ई-सिम ओव्हर-द-एअर सक्रिय करते.  आम्ही तुम्हाला सांगूया की फिजिकल सिम कार्डची सर्व वैशिष्ट्ये तुम्हाला ई-सिममध्ये देखील उपलब्ध आहेत.  मोबाईल उत्पादक कंपन्या हँडसेट बनवताना ई-सिम देखील बनवतात.  ई-सिम हार्डवेअरमध्येच असल्याने फोनमध्ये जागा वाचते.  त्याच वेळी, फोनमधील सिमसाठी वेगळा ट्रे बनवण्याची गरज नाही.  ई-सिम 4G, 5G नेटवर्कला देखील सपोर्ट करते.  भारतात दूरसंचार कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone-Idea ई-सिमची सुविधा देत आहेत.

    महत्त्वाचे : ओयो हॉटेल ची ही काय आहे चर्चा?

    ई-सिमचे काय फायदे होतील?

     ई-सिम वापरकर्त्यांना टेलिकॉम ऑपरेटर बदलताना सिम कार्ड बदलण्याची गरज नाही.  त्यामुळे, मोबाईल नेटवर्क स्विच करणे सोपे होते.  एका वेळी जास्तीत जास्त पाच व्हर्च्युअल सिम कार्ड ई-सिमवर (e sim) संग्रहित केले जाऊ शकतात.  सोप्या भाषेत, जर तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर पूर्ण सिग्नल मिळत नसेल तर तुम्ही लगेच नेटवर्क बदलू शकता.  प्रवास करताना नेटवर्क स्विच करणे सोपे आहे.  सिम कार्ड ट्रे काढून टाकल्याने निर्मात्याला बॅटरीचा आकार वाढविण्याचे स्वातंत्र्य मिळते.  सध्या, ई-सिमला सपोर्ट करणारे अनेक स्मार्टफोन भारतात उपलब्ध आहेत.  यामध्ये ॲपल, सॅमसंग, गुगल, मोटोरोला या कंपन्यांच्या स्मार्टफोनचा समावेश आहे.

    ई-सिमचे काही तोटे आहेत का?

     फिजिकल सिम वापरताना तुमचा फोन खराब झाल्यास, तुम्ही कार्ड सहजपणे काढून दुसऱ्या फोनमध्ये वापरू शकता.  ही सुविधा ई-सिममध्ये (e sim) उपलब्ध नाही.  मोबाइलच्या हार्डवेअरमध्ये ई-सिमचा समावेश असल्याने.  त्यामुळे तुम्ही ते फोनवरून काढू शकत नाही.  तथापि, जर डेटा क्लाउड स्पेसमध्ये संग्रहित केला असेल, तर आपण सर्वकाही सहजपणे दुसर्या फोनवर हस्तांतरित करू शकता.  तुमच्या ऑनलाइन क्रियाकलापांचा मागोवा घेतल्याबद्दल तुम्हाला काळजी वाटत असल्यास, ई-सिम तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते.

    सीडीएमए फोनमध्ये सिम कार्ड नसते?

     कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस फोन म्हणजेच सीडीएमए फोनमध्येही फिजिकल सिम कार्ड वापरले जात नाही.  सीडीएमए डेटा ट्रान्समिशनसाठी स्प्रेड स्पेक्ट्रम तंत्रज्ञान वापरते.  CDMA मध्ये, वापरकर्ते आणि खात्यांबद्दल संपूर्ण माहिती डिव्हाइसच्या अंतर्गत मेमरीमध्ये संग्रहित केली जाते.  जर तुमच्या मोबाईल फोनमध्ये फिजिकल सिम कार्ड टाकायचे असेल तर तो ग्लोबल सिस्टम मोबाईल म्हणजेच GSM फोन आहे.  त्याच वेळी, फोनमध्ये फिजिकल सिम कार्ड घालायचे नसेल तर तो सीडीएमए फोन आहे.

    eSIM साठी WiFi नेटवर्क आवश्यक आहे?

     तुमच्या मोबाईल हँडसेटमध्ये ई-सिम सुविधा असल्यास ते सक्रिय करण्यासाठी तुम्हाला वायफाय किंवा सेल्युलर कनेक्शनची आवश्यकता असेल.  तुमच्याकडे फक्त ई-सिम असलेले iPhone-14 किंवा iPhone-14 Pro मॉडेल असले आणि तुमच्याकडे वायफाय नेटवर्क नसले तरीही Apple चे ई-सिम सक्रिय केले जाऊ शकते.  हे तुम्हाला तुमचे नवीन ई-सिम वायफायशिवाय सेटअप करण्यास अनुमती देते.  यासाठी तुम्हाला काही पैसेही द्यावे लागणार नाहीत. (E sim)

    भौतिक सिमच्या तुलनेत ई-सिम किती सुरक्षित आहे?

      सध्याच्या युगात, स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी सुरक्षितता पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची झाली आहे.   फिजिकल सिम कार्डांप्रमाणे, ई-सिम इंटरनेटशी कनेक्ट होण्यासाठी सर्वात सुरक्षित आणि खाजगी मार्ग प्रदान करतात.   सेल्युलर नेटवर्कवरील सुरक्षा मानके तुम्हाला विमानतळ, हॉटेल किंवा कॅफेमध्ये मिळू शकणाऱ्या सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कच्या तुलनेत खूप जास्त आहेत.   याशिवाय 3G आणि 4G कनेक्टिव्हिटीमुळे हॅकर्सना डेटा चोरणे अशक्य होईल.

    तुमच्यासाठी कोणते सिम अधिक फायदेशीर आहे?

     ई-सिम किंवा फिजिकल सिममध्ये तुमच्यासाठी फायदेशीर असलेले कार्ड तुमच्या वैयक्तिक गरजा आणि प्राधान्यांवर अवलंबून असते.  तुम्ही लहान, सुरक्षित आणि सोयीस्कर सिम कार्ड शोधत असाल तर तुमच्यासाठी ई-सिम हा एक चांगला पर्याय आहे.  त्याच वेळी, जर तुम्ही एखादे सिम कार्ड शोधत असाल जे सर्वत्र सहज उपलब्ध असेल आणि कमी किमतीचे असेल, तर भौतिक सिम अधिक चांगले होईल.  ई-सिम कार्ड फक्त हँडसेटमध्ये साठवले जाते.  तुम्हाला तुमचा फोन चोरीला जाण्याचा किंवा हरवण्याचा धोका असल्यास, तुम्ही तुमच्या ई-सिम कार्डचा बॅकअप घेऊ शकता. (E sim) यामुळे तुमच्यासाठी दुसऱ्या फोनवर डेटा ट्रान्सफर करणे सोपे होईल.

    कोणत्या हँडसेटवर ई-सिम उपलब्ध आहे?

     आता बहुतेक मोठे मोबाईल उत्पादक त्यांच्या ग्राहकांना ई-सिम सुविधा देत आहेत.  तथापि, तंत्रज्ञान अगदी नवीन असल्याने आणि लोक त्याबद्दल कमी जागरूक असल्याने, कंपन्या त्यांच्या सर्व मॉडेल्सवर ही सुविधा देत नाहीत.  Apple iPhone XS सह अनेक iPhone मॉडेल्समध्ये ही सुविधा देत आहे.  त्याच वेळी, Google Pixel, Motorola Razr 5G आणि Samsung Galaxy च्या काही मॉडेल्समध्ये e-SIM कार्ड सक्षम केले आहे.

  • Shocking Chandrapur : आई-बाबा सॉरी आणि चंद्रपूर हादरलं

    Shocking Chandrapur : आई-बाबा सॉरी आणि चंद्रपूर हादरलं

    shocking chandrapur आई बाबा सॉरी, मला अभ्यासाचे खूप टेन्शन आहे, या आशयाची चिठ्ठी लिहत 17 वर्षीय विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेत आत्महत्या केली.


    Shocking chandrapur 11 सप्टेंबर रोजी सदर बाब उघडकीस आली, यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील 17 वर्षीय प्रांजली हनुमंत राजूरकर असे आत्महत्या केलेल्या मृत मुलीचे नाव आहे.


    जिल्हा क्रीडा संकुल जवळील प्रा. विजय बदखल यांचे इन्स्पायर इन्स्टिट्यूट आहे, नीट आणि mh – cet, अभियांत्रिकी शिक्षणासाठी आवश्यक पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी शेकडो विद्यार्थी या कोचिंग सेंटरमध्ये शिक्षण घेतात. या कोचिंग सेंटर मध्ये निवासी वसतिगृहाची सुद्धा व्यवस्था आहे.

    अवश्य वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना, विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू

    आत्महत्येपूर्वी काय घडलं?


    10 सप्टेंबर रोजी प्रांजली हि मामाच्या घरी गेली होती, त्यादिवशी सायंकाळी ती वसतिगृहात परतली, प्रांजली ला थकवा जाणवित असल्याने मी उद्या क्लास मध्ये येऊ शकणार नाही असे तिने मैत्रिणींना सांगितले होते. 11 सप्टेंबर रोजी ती क्लास मध्ये गेली नाही, सायंकाळ झाली तरी प्रांजली रूम च्या बाहेर आली नाही, प्रांजली च्या मैत्रिणींना याबाबत संशय येताच त्यांनी तात्काळ याची माहिती वसतिगृह कर्मचाऱ्यांना दिली, कर्मचारी वसतिगृहात आले त्यांनी दरवाजा ठोठावला मात्र काही प्रतिसाद मिळाला नसल्यानं त्यांनी दरवाजा तोडला.

    प्रांजली गळफास लागल्याच्या अवस्थेत रूम मध्ये आढळली. मृत्यूपूर्वी प्रांजली ने आई बाबा च्या नावाने चिठ्ठी लिहली होती, ज्यामध्ये आई-बाबा सॉरी मला अभ्यासाचे खूप टेन्शन आले आहे, त्यामुळे मी या जगाचा निरोप घेत आहे.
    इन्स्पायर व्यवस्थापनाने याबाबत रामनगर पोलिसांना माहिती दिली, पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पंचनामा करीत मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला.