Author: Admin

  • Poshan Ahar : पोषण आहाराचा खेळखंडोबा, 106 विद्यार्थ्यांना विषबाधा

    Poshan Ahar

    Poshan Ahar 4 डिसेंबर रोजी सावली तालुक्यातील 106 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली, या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली, दुसऱ्या दिवशी सदर घटना उघडकीस आली मात्र मुख्यमंत्री यांचा शपथविधी असल्याने सदर घटनेबाबत वाच्यता फुटली नाही.

    तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामधुन विषबाधा झाल्याची घटना गुरुवारला घडली. यात 106 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असुन सदर विद्यार्थ्यांना वेगवेगळया रुग्णालयात हलविण्यात आले आहे. Poshan Ahar

    नझुल जमीन धारकांसाठी शासनाची विशेष अभय योजना

    चंद्रपूरच्या रुग्णालयात 05, गडचिरोली च्या रुग्णालयात 20, सावली येथील ग्रामिण रुग्णालयात 19 विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. जागेअभावी मुल येथील रुग्णालयात 62 विद्यार्थ्यांना हलविण्यात आले आहे. शाळेतील उपस्थित 126 विद्यार्थ्यापैकी 106 रुग्णालयात तर 20 विद्यार्थ्यांवर गावातच उपचार सुरु असुन उकडलेल्या चण्याच्या नमुन्यासह बाधीत विद्यार्थ्यांचे हगवण, उलटी व लघवीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. Poshan Ahar

    पारडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातुन विषबाधा झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात येत असले तरी प्रयोग शाळेतील येणाऱ्या अहवालानुसारच पुढील उपचार करण्यात येणार असल्याचे आरोग्य यंत्रणेकडुन सांगण्यात येत आहे.

    ईव्हीएम विरोधात चंद्रपुरात आमरण उपोषण

    4 डिसेंबर ला विद्यार्थ्यांना उकडलेले चणे तिखट, मीठ लावून देण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी 5 तारखेला विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनानंतर हगवण, उलटी यासारखी लक्षणे आढळून आल्याने विद्यार्थ्यांना सावलीच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. सर्वच विद्यार्थ्यांना सायंकाळी सहा वाजेपर्यंत अशी लक्षणे दिसु लागल्याने 106 विद्यार्थ्यांना भरती करण्यात आले. Food poisoning

    कीड लागलेल्या धान्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सावलीच्या ग्रामिण रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या विद्यार्थ्यावर आरोग्य यंत्रणेने वेळीच उपचार केल्याने सुदैवाने आतापर्यंत कोणतीही दुर्घटना झालेली नाही.

    मध्यरात्रीपर्यंत चंद्रपूरचे जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे, वैद्यकीय अधिक्षक बंडू रामटेके, गटविकास अधिकारी मधुकर वासनिक, गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंढे उपस्थित होते. जिल्हयातील सर्व अधिकाऱ्यांनी पारडी गावात भेट दिली असुन दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    नेमकं काय घडलं?

    सावली तालुक्यातील पारडी गावातल्या जिल्हा परिषद शाळेची एकूण पटसंख्या 133 आहे, 4 डिसेंबर रोजी 126 विद्यार्थी शाळेत हजर होते यावेळी शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना उकळलेले चने तिखट मीठ लावून दिले, रात्रीच्या वेळेस विद्यार्थ्यांना हगवण व उलट्या सुरू झाल्या, तापाची साथ आहे असा मनात चंग बांधत पालकांनी दुर्लक्ष केले मात्र दुसऱ्या दिवशी विद्यार्थी शाळेत गेले आणि पुन्हा त्यांना उलट्या सुरू झाल्या, विद्यार्थ्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.पोषण आहारातील चना हा 2 महिन्यांपूर्वी शाळेत आला होता, त्यादिवसापासून तो तसाच पडून होता. Food poisoning

    बाधीत विद्यार्थ्यांच्या हगवण, उलटी, लघवीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत. सध्या भरती असलेल्या विद्यार्थ्याची प्रकृती धोक्याबाहेर असुन प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

    महादेव चिंचोळे, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर

    विद्यार्थ्यांची विचारपूस केली असता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, या प्रकरणी लवकर चौकशी समिती नेमत दोषींवर कारवाई करण्यात येईल.

    मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर विवेक जॉन्सन

    या प्रकरणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती घेत विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करून द्यावे, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी याना आमदार मुनगंटीवार यांनी दिले आहे.

  • Nazul Land : नझुल जमीन धारकांसाठी विशेष अभय योजना

    Nazul Land

    Nazul land नागपूर व अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनीबाबत ‘विशेष अभय योजना 2024-25’ शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

    या अनुषंगाने ज्या नझुल जमिनी निवासी प्रयोजनार्थ लिलावाद्वारे –प्रिमियम अथवा अन्य प्रकारे भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत, अशा जास्तीत जास्त नझुल जमीनधारकांनी विशेष अभय योजनेचा लाभ घ्यावा तसेच आपल्या नझुल जमिनी वर्ग ‘ब’ मधून ‘अ’ मध्ये करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे. Nazul land

    चंद्रपुरात ईव्हीएम मशीन विरोधात आमरण उपोषण

    16 मार्च 2024 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार नागपूर व अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनीबाबत विशेष अभय योजना सन 2024-25 च्या तरतुदी खालीलप्रमाणे विहित करण्यात आल्या आहेत. Nazul

    • 1) ज्या नझुल जमिनी निवासी प्रयोजनार्थ लिलावाद्वारे – प्रिमियम अथवा अन्यप्रकारे भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत, त्यांनाच सदर योजना लागू राहील. 2) अभय योजना 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2025 या कालावधीसाठीच लागू राहील.
    • 3) नझुल जमिनी निवासी प्रयोजनार्थ लिलावाद्वारे – प्रिमियम अथवा अन्यप्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या आहेत, त्यांनाच फ्री होल्ड करण्याकरीता (भोगवटदार – 1) अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील येणा-या बाजारमुल्याच्या 2 टक्के एवढे अधिमुल्य आकारण्यात यावे. फ्री होल्ड करण्याकरीता पुर्वीचा भाडेपट्टा नियमित करणे, शर्तभंग नियमानुकूल करणे संदर्भात पूर्वीच्या अटी कायम राहतील. अभय योजनेत थकीत भाडेपट्ट्याची रक्कम 0.02 टक्के दराने आकारणी करण्यात येईल.
    • 4) निवासी प्रयोजनार्थ प्रिमियम लिलावाद्वारे अन्यप्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनीचे वार्षिक भु-भाडे आकारणी 0.02 टक्के दराने व 31 जुलै 2025 या कालमर्यादेत भरणे अनिवार्य असेल. 31 जुलै 2025 पर्यंत प्रलंबित भु-भाडे न भरल्यास थकीत भू-भाडे व त्यावर वार्षिक 10 टक्के दंडनीय व्याज आकारणी करण्यात येईल. 5) विशेष अभय योजना समाप्तीनंतर 1 ऑगस्ट 2025 पासून शासन निर्णय 23.12.2015 व शासन निर्णय 2.3.2019 च्या तरतुदी लागू राहतील. त्यानंतर भु-भाडे अथवा फ्री होल्ड करण्यास अभय योजनेमध्ये मिळणारे फायदे मिळणार नाहीत. त्यानंतर फ्री होल्ड करण्याकरीता प्रयोजन परत्वे 2 मार्च 2019 च्या शासन निर्णयान्वये निवासी प्रयोजनाकरीता 5 टक्के तर वाणिज्यिक / औद्योगिक प्रयोजनाकरीता 10 टक्के रुपांतरण अधिमुल्य आकारून नझुल जमीन फ्री होल्ड केली जाईल. Nazul

    त्यामुळे जास्तीत जास्त नझुल जमीनधारकांनी विशेष अभय योजना 2024-25 चा लाभ घ्यावा व आपल्या नझुल जमिनी सत्ताप्रकार ‘ब’ मधून ‘अ’ मध्ये करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

  • evm hatao desh bachao : चंद्रपुरात ईव्हीएम मशिनविरोधात आमरण उपोषणाला सुरुवात

    evm hatao desh bachao

    evm hatao desh bachao नुकत्याच महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक पार पडली, या निवडणुकीत महायुतीने विरोधकांना चांगलीच चपराक देत 200 च्या वर जागा जिंकल्या, त्यानंतर विरोधकांनी हा विजय ईव्हीएम मशीनचा आहे असा सूर लावत ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन उभारण्याचे संकेत दिले.


    6 डिसेंम्बर रोजी चंद्रपुरातून ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे.
    कांग्रेस चे परिवहन विभागाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सचिन रामटेके यांनी ईव्हीएम मशीन हटाव असा नारा देत आमरण उपोषणाला सुरुवात केली.

    ताडोब्यात रिसॉर्ट च्या नावावर 41 लाखांची फसवणूक


    विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मशीन द्वारे घोळ करीत महायुतीने निवडणुका जिंकल्या आहे, त्यामुळे आता ह्या ईव्हीएम मशीन बंद करीत बॅलेट पेपर वर निवडणुका व्हायला हव्या याकरिता मी आजपासून आमरण उपोषण करीत आहो अशी प्रतिक्रिया रामटेके यांनी दिली. Evm machine controversy

    ईव्हीएम मशीन मुळे लोकशाही धोक्यात आली आहे, जर असेच सुरू राहीले तर पुढच्या काळात निवडणुका घेण्याची गरज सत्ताधारी पक्षाला भासणार नाही कारण बहुमत ते मशिनद्वारे सहजरित्या मिळवू शकतात, विरोधी पक्षाला संपविण्याचा हा भाजप सरकारचा डाव आहे.
    जोपर्यंत ईव्हीएम मशीन बंद होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार आहे असा इशारा सुद्धा रामटेके यांनी प्रशासनाला दिला आहे.

  • mahaparinirvan diwas 2024 : महामानवाला आमदार जोरगेवार यांची आदरांजली

    mahaparinirvan diwas 2024

    Mahaparinirvan diwas 2024 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते एक महान तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि मानवतेचे खरे सेवक होते. त्यांनी शिक्षण, समानता, आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांनी कोट्यवधी लोकांचे जीवन बदलले.

    संघर्षातून समाजाला विषमतेच्या विळख्यातून मुक्त करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासाला अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या प्रेरणादायी संघर्षाची गाथा म्हणता येईल, असे विधान आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.

    ताडोबा येथे कुटीचे बांधकाम, आणि 41 लाखांची फसवणूक

     महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्य रस्त्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयातही अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. Mahaparinirvan diwas

    या कार्यक्रमाला भाजपचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते दशरथसिंह ठाकुर, माजी नगरसेविका कल्पना बबुलकर, वंदना हातगावकर, सविता दंढारे, सायली येरणे, विमल कातकर, निलिमा वनकर, अमोल शेंडे, नकुल वासमवार, आशा देशमुख, सुमित बेले, स्वप्नील पटकोटवार, चंद्रशेखर देशमुख, हेरमन जोसेफ, डॉ. सत्यजित पोद्दार, विनोद अनंतवार, छाया चवरे, सुरेंद्र अंचल, संजय महाकालीवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    चंद्रपुरात भाईगिरी चे वाढते ट्रेंड

    यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, “आपण आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली  अर्पण करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त नाव नाही, तर एका क्रांतीचे प्रतिक आहे. त्यांच्या जिद्द आणि आत्मविश्वासाने त्यांनी स्वतःसाठी आणि समाजासाठी समानतेचा मार्ग शोधला. Mahaparinirvan diwas

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान केवळ भारतापुरते मर्यादित नाही. ते एका वैश्विक विचारधारेचे प्रतिक आहेत. शिक्षण, समानता, आणि सामाजिक न्याय या तत्त्वांवर आधारित समाज उभारण्यासाठी त्यांनी दिलेला संदेश अमूल्य आहे.

    mahaparinirvan diwas

      महापरिनिर्वाण दिन हा त्यांच्या स्मृतींना वंदन करण्याचा दिवस असला तरी, त्यांच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्याचा दिवस आहे. डॉ बाबासाहेब  यांनी  दाखविलेल्या मार्गावर चालून आपण त्यांच्या स्वप्नातील समाज घडवण्यासाठी वचनबद्ध होऊया, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Tadoba Kuti Fraud : ताडोबा कुटी आणि 41 लाखांची फसवणूक

    Tadoba Kuti Fraud

    Tadoba Kuti Fraud ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणा-या पर्यटकांसाठी रिसोर्ट प्रमाणे कुटी किरायाने देऊन प्रतिमाह आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचे प्रलोभन दिल्याप्रकरणी तसेच कुटीचे बांधकाम न करता 41 लक्ष 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्सचा मालक भरत नानाजी धोटेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    भरत धोटे याने मौजा किटाळी येथील डॉ. अमोल सतिश पोद्दार यांच्या ले-आऊटवर तसेच चांदा रयतवारी येथील ले-आऊट वरील गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याने संबंधित प्लॉटधारकांनी या संदर्भातील कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. Tadoba resort chandrapur

    देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, चंद्रपुरात जल्लोष

    आरोपी भरत नानाजी धोटे (वय 38) रा. तुकूम, चंद्रपूर याने भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्स या नावाने खाजगी कंपनी स्थापन करून अभिकर्ते नियुक्त केले. त्यांच्या माध्यमातून मौजा पद्मापूर, अजयपूर, तळोधी (तुकूम), बोर्डा, किटाळी येथे कुट्यांचे बांधकाम करून सदर कुटी युनिव्हर्स ॲग्रो टूरिझम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करारनामा करण्याचे आमिष दाखविले. Tadoba resort chandrapur

    ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणा-या पर्यटकांसाठी रिसोर्टप्रमाणे कुटी किरायाने देऊन प्रतिमाह 7083 रुपये देण्याचे प्रलोभन दाखवून प्रत्येक गुंतवणूकदारांकडून 2 लक्ष 50 हजार रुपये याप्रमाणे एकूण 41 लक्ष 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सर्व पिडीत अन्यायग्रस्तांतर्फे अशोक पांडूरंग भटवलकर, रा. म्हाडा कॉलनी, दाताळा यांच्या लेखी रिपोर्टवरून 19 डिसेंबर 2022 रोजी भरत धोटेविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

    ऑनलाईन कराचा भरणा करा आणि मिळवा 5 टक्क्यांची सूट

    सदर गुन्ह्याचा तपास चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखा करीत असून या तपासात आरोपी भरत नानाजी धोटे याने भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्स या नावाने खाजगी कंपनी स्थापन करून मौजा किटाळी येथील डॉ. अमोल सतीश पोद्दार यांचे सर्व्हे क्रमांक 76/3 आणि 76/4 तसेच मौजा चांदा रयतवारी भुमापन क्रमांक 415/1 व 416 येथे सुध्दा ले-आऊट तयार करून प्लॉटच्या विक्रीकरीता सदर ग्राहकांसोबत 100 रुपयांच्या स्टँप पेपरवर विसारपत्र केल्याचे तपासात आढळून आले आहे. Tadoba Kuti Fraud

    त्यामुळे संबंधित ले-आऊटमधील प्लॉट घेण्याकरीता विसारपत्र करणा-या लोकांनी त्यांच्याजवळ असलेले संबंधित प्लॉटचे विसारपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे बातमी प्रकाशित झाल्यापासून 8 दिवसांच्या आत आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे जमा करावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर चिकनकर यांनी केले आहे.

  • chandrapur property tax online payment : मालमत्ता करात मिळणार 5 टक्के सूट, पण….

    chandrapur property tax online payment

    chandrapur property tax online payment नियमित मालमत्ता कर भरणा करणाऱ्यांकरीता प्रोत्साहन म्हणुन 31 डिसेंबरपर्यंत मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी 4 टक्के सूट तसेच ऑनलाईन पद्धतीने कराचा एकमुस्त भरणा करणाऱ्यांना 5 टक्के सुट देण्याचे मनपातर्फे जाहीर करण्यात आले आहे.        
        मालमत्ता कर हे मनपाच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. शहरासाठी नियमित सोयी सुविधा पुरविण्यास मालमत्ता कराची अधिकाधिक वसुली होणे गरजेचे आहे. महापालिका क्षेत्रात जवळपास 80 हजार मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे मागणी नोंदवली जाते. Cmc chandrapur property tax

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, चंद्रपुरात जल्लोष

    करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करणे ही कर विभागाची पहिली प्रक्रिया मानली जाते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने करवसुलीस प्राधान्य दिले जाते.  


         करभरणा हा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अथवा https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येणे शक्य आहे.  ऑनलाइन युपीआय ॲप अर्थात फोन पे, गुगल पे,भीम ॲप ( भारत इंटरफेस फॉर मनी ) यांचाही पर्याय मनपाने उपलब्ध करून दिलेला आहे.

    तसेच व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर करून सुद्धा मालमत्ता कर भरता येणार असुन याकरिता 8530006063 या क्रमांकावर वर “hi” टाईप करून आलेल्या उत्तरात ४ था क्रमांकाचा पर्याय निवडुन कर भरता येईल.  

  • Chandrapur On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, चंद्रपुरात जल्लोष

    Chandrapur On Devendra Fadnavis

    Chandrapur on devendra fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. याचे थेट प्रक्षेपण गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पटांगणावर करण्यात आले.

    भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, लाडू वाटप करत जल्लोष साजरा केला.

    दुरसंचार कंपनी बीएसएनएल तोट्यात – खासदार धानोरकर

    यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते खुशाल बोंडे, विजय राऊत, प्रमोद कडू, संजय कंचर्लावार, भाजपचे माजी महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुडवाडे, माजी नगरसेवक संदीप आवारी, रवी आस्वानी, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, माजी नगरसेविका छबू वैरागडे, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, वंदना जांभुळकर, शीला चव्हाण, अनिल फुलझेले, युवा नेते मनोज पाल, चंद्रकला सोयाम,  आत्राम, तुकुम मंडळ अध्यक्ष पुरुषोत्तम सहारे, बंगाली मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, सिव्हिल लाईन मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, सिव्हिल लाईन महिला मंडळ अध्यक्ष शीतल इटनकर

    यांच्यासह दशरथसिंग ठाकूर, भाजप महामंत्री किरण बुटले, माजी नगरसेवक रवी गुरनुले, प्रकाश धारणे, युवती प्रमुख मुग्धा खाडे, वंदना हातगावकर, सायली येरणे, सविता दंढारे, वैशाली मद्दीवार, विमल कातकर,  भाग्यश्री हांडे, निलीमा वनकर, वंदना हजारे,  कल्पना शिंदे, अमोल शेंडे, राशिद हुसेन, नकुल वासमवार,  करणसिंग बैस, प्रतीक शिवणकर, जितेश कुळमेथे, मंगेश अहिरकर, श्याम हेडाऊ, देवानंद साखरकर, अस्मिता डोनारकर  आदींची प्रमुख उपस्थिती होती. Chandrapur on devendra fadnavis

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील आजाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.

    यावेळी  महामहिम राज्यपाल सि.पी राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. भव्य अश्या या शपथविधी कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने गांधी चौक येथील महानगरपालिकेच्या पटांगणावर जय्यत तयारी करण्यात आली होती. Chandrapur bjp

    चंद्रपुरात वाढलंय भाईगिरी चे ट्रेंड

    यावेळी शपथविधी कार्यक्रम सुरू होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी सुरू करत जल्लोष साजरा केला. तसेच लाडू वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या. या सोहळ्यास भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. Devendra fadnavis

    ३५ फूट उंच मुख्यमंत्री फडणवीसांचे बॅनर ठरले आकर्षण

    devendra fadanvis banner
    चंद्रपुरात 35 फूट उंच बॅनर

    भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी गांधी चौक येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छांसाठी ३५ फूट उंच बॅनर लावले होते. हे बॅनर विशेष आकर्षण ठरले. 

    ३५ फूट उंच बॅनरला चारही बाजूंनी लावण्यात आलेली लायटिंग यामुळे हे बॅनर उठून दिसत होते. त्यामुळे गांधी चौकातील उपस्थितांनी हे बॅनर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

  • telecom companies : BSNL दूरसंचार कंपनी तोट्यात – खासदार प्रतिभा धानोरकर

    telecom companies

    telecom companies संसदेचे हिवाळी अधिवेशन दिल्ली येथे सुरु असून खासदार प्रतिभा धानोरकर ह्या विविध प्रश्नांच्या माध्यमातून सरकार चे लक्ष वेधत आहे.

    एकीकडे सरकारी दुरसंचार कंपनी बीएसएनएल ही घाट्यात असून इतर खाजगी कंपन्या कसा फायदा कमवतात असा प्रश्न खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकार विचारला आहे. telecom companies

    चंद्रपुरात भाईगिरी चा वाढता क्रेज

    एकीकडे दूरसंचार क्षेत्रातील जीओ, एअरटेल, व्ही.आय. या खाजगी कंपन्या अमाप पैसा कमवत असून दुसरीकडे देशभर इन्फ्रास्ट्रक्चर तयार असलेली दुरसंचार क्षेत्रातील सर्वात जुनी कंपनी बीएसएनएल हि तोट्यात असल्याचा आरोप खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सरकार कडे केला आहे.

    BSNL मधील कर्मचाऱ्यांचे वेतन देखील निघण्याइतपत फायदा सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएल ला होतो का असा प्रश्न त्यांनी दुरसंचार मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया यांना संसदेत विचारला. त्यासोबतच इतर कंपन्या कसा फायदा मिळवतात, ते बीएसएनएल ला का शक्य होत नाही असा प्रतिप्रश्न देखील खासदार धानोरकर यांनी मंत्री महोदयांना विचारला.

    चंद्रपूर जिल्ह्यातील महिला व्यापारी बेपत्ता

    यावर ज्योतिरादित्य सिंधीया यांनी मागील काही महिन्यांत बीएसएनएल चे ग्राहक वाढले असल्याचे सांगितले व सेवा उत्तम देत असल्याचे सांगुन भविष्यात फायदा कमावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही मंत्री महोदयांनी दिली.

    यावर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दुरसंचार क्षेत्रातील इतर कंपन्यांशी स्पर्धा करुन बीएसएनएल ला फायदा मिळेल यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी विनंती देखील खासदार धानोरकर यांनी यावेळी मंत्री महोदयांकडे केली.

  • Farmer Producer Company : शासनाच्या कोट्यवधी रुपयांना लागतोय चुना

    Farmer Producer Company

    Farmer producer company मुल – (गुरु गुरनुले) मुल तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रोडूसर कंपन्या आहेत. या कंपन्या शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन केल्या असताना सुद्धा ते शेतकऱ्यांना कुठलाही लाभ न देता स्वतः चाच स्वार्थ साधत असल्याने व स्वहिताकडेच जास्त लक्ष देत असून शासनाची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करीत असल्याचे विदारक चित्र आहे.

    अशा कंपन्यांची शासन स्तरावरून संबंधित विभागाकडून तपासणी करण्यात यावी व योग्य चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. Farmer producer company

    चंद्रपुरात भाईगिरी चे वाढते ट्रेंड

    शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) ही सहकारी संस्था आणि खाजगी मर्यादित कंपन्यांमधील संकर आहे. भारतीय कंपनी कायदा, 2013 अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये लोकशाही शासन असते.

    शेतकरी उत्पादक कंपनी कायदा १९५६ कलम ५८१ ऐ ते ५८१ झेड टी नुसार शेतकरी उत्पादक कंपनीची संकल्पना आली आहे.

    उत्पादन,कापणी,खरेदी,प्रतवारी,संकलन,हाताळणी,प्रक्रिया,बाजारपेठ,विक्री, सदस्यांच्या प्राथमिक उत्पादंनांची निर्यात किंवा त्यांच्या लाभाकरीता उत्तम प्रतीच्या सेवांची आयात करणे हा संस्थेच प्राथमिक उद्देश आहे. प्रक्रिया अंतर्गत साठवणूक,माल सुकविणे,प्रतवारी,ग्रेडेशन,जाहिरात आणी सदस्यांच्या मालाचे पॅकिंग करणे इत्यादी कार्य कंपनीला करावे लागते. Farmer producer organization

    शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापन :-


    उत्पादक कंपनी स्थापन करण्याकरिता कमीत कमी ५ व जास्तीत जास्त १५ संचालकांची नोंदणी करता येते.

    शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी ही कंपनी स्थापन केल्या जाते. शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत शेती संबंधित अनेक कामे करावी लागतात. Farmer producer organization

    चंद्रपूर जिल्ह्यातील महिला व्यापारी बेपत्ता

    कंपनीतील शेतकरी सभासदांसाठी तसेच बाहेरील शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राबवून शेतकऱ्यांच्या हितासाठी कंपनीला शासनाच्या नियमानुसार कामे करावी लागतात.

    तालुक्यात अनेक संस्था कार्यरत असून या संस्था स्वहितासाठी स्थापन केल्या असून शासनाकडून उपक्रम राबवित असल्याच्या नावावर आर्थिक निधी प्राप्त करीत असून अशा कंपन्यांची तालुका स्तरावरून सविस्तर चौकशी करण्याची मागणी तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. अशीच परिस्थिती इतरही तालुक्यात असल्याची चर्चा केली जात आहे.

  • Bhaigiri : चंद्रपुरात वाढलं भाईगिरीचे ट्रेंड

    Bhaigiri

    bhaigiri चार चौघात आपली दहशत रहावी यासाठी सर्वत्र भाईगिरी चा ट्रेंड सुरू झाला आहे, मुंबई, नागपूर नंतर हा ट्रेंड चंद्रपुर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.

    दारूबंदी च्या काळात बल्लारपूर शहरातील मध्यभागी एक हत्याकांड घडलं आणि त्यांनतर चंद्रपुरात सुरू झालं गुन्हेगारीचे मिर्झापुर, आज हत्या करणं हे अत्याधिक सोपं झालं असल्याचे बघायला मिळत आहे. bhaigiri

    आज जिल्ह्यात गुन्हेगारी वृत्तीच्या युवकांकडे शस्त्र हे सहजरित्या उपलब्ध होते, तलवार, कोयता व आता बंदूकची ट्रेंड या निमित्ताने वाढले, तलवार व कोयत्याने जीवघेणा हल्ला तर कुणाला संपवायचं झालं तर बंदूक.

    चंद्रपूर जिल्ह्यातील महिला व्यापारी मागील 10 दिवसापासून बेपत्ता

    बंदूक तर सोप्या रीतीने उपलब्ध व्हायला लागली आहे, चंद्रपूर शहरात 2 दिवसांपूर्वी पोलीस अटकेपासून फरार असलेल्या गुन्हेगाराने दोघांना संपविण्यासाठी बंदूक घेऊन आला होता, त्यांनतर बल्लारपूर येथे 3 बंदुकीसह 18 काडतुसे व 5 आरोपीना अटक करण्यात आली, आता चंद्रपूर शहरातील पडोली येथे एका कडून बंदुकीसह 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. Bhaigiri status

    चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अवैध धंदे, अवैध शस्त्र व प्रतिबंधक कारवाई मोहीम राबवित आहे, यादरम्यान स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाला युवकाजवळ बंदूक असल्याची माहिती मिळाली.

    माहितीच्या आधारे 28 वर्षीय राकेश चंद्रय्या माटला रा. टिळकनगर आमराई वार्ड घुग्गुस याला पडोली येथील मुख्य चौकात नाकाबंदी करीत अटक करण्यात आली.

    चंद्रपूर जिल्हा बनतोय गुन्हेगारीचे मिर्झापुर

    पोलिसांनी राकेश ची झडती घेतली असता त्याच्या जवळून देशी बनावटीची पिस्टल व 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली, आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती आहे. Bhaigiri status

    आरोपीवर पडोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, संतोष निंभोरकर, पोलीस कर्मचारी किशोर वैरागडे, नितेश महात्मे, दीपक डोंगरे, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, संतोष एलपूलवार, गोपाळ आतकुलवार, गोपीनाथ नरोटे व दिनेश अराडे यांनी केली.