Author: Admin

  • Kite nylon manja | चंद्रपुरात नागरिकांचा गळा कापणारे सक्रिय?

    Kite nylon manja

    Kite nylon manja : मकरसंक्रांत जवळ आली की नागरिकांचा गळा कापणारे सिंडिकेट चंद्रपुरात सक्रिय होतात, प्रतिबंधित नायलॉन मांजा ची विक्री करीत आपल्या फायद्यासाठी सामान्य नागरिक व पक्ष्यांचे गळे कापत त्यांचे जीव घेण्याचं काम या दिवसात चालतं.

    राज्यात नायलॉन मांजा ची विक्री प्रतिबंधित असताना सुद्धा छुप्या मार्गाने सदर मांजा राज्यात पोहचत आहे, हे सर्व थांबावं यासाठी चंद्रपूर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

    वाघांची शिकार करणारी टोळी सक्रिय? चंद्रपुरात 4 वाघनखे जप्त

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने (crime branch) वर्षाच्या शेवटच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजा असा एकूण 24 हजार रुपयांचा माल जप्त करीत एकाला अटक केली आहे.

    रयतवारी बीएमटी चौक परिसरात राहणारे 28 वर्षीय श्रावण सविता हा आपल्या राहत्या घरी प्रतिबंधित नायलॉन मांजाची छुप्या पध्दतीने विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

    माहितीच्या आधारे पथकाने धाड मारीत श्रावण यांच्या घरची झडती घेतली असता विविध रंगांच्या चक्रीवर गुंडाळलेला नायलॉन मांजा एकूण किंमत 24 हजार रुपये जप्त करण्यात आले.

    आरोपी श्रावण वर कलम 223, 292, 293 सहकलम 5, 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत गुन्हा रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक दीपक कांकरेडवार, पोउपनी संतोष निंभोरकर, पोलीस कर्मचारी संतोष येलपुलवार, गोपीनाथ नरोटे, गोपाल आतकुलवार यांनी केली.

  • waghnakh | वाघांची शिकार करणारी टोळी सक्रिय?

    waghnakh

    waghnakh : चंद्रपूर शहरातील लोहारा येथे 4 वाघनखे सहित 2 आरोपीना वनविभागाने 30 डिसेंबर रोजी अटक केली असून या प्रकरणी काही आरोपी पसार आहे.
    जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यात असंख्य वाघ वास्तव्यास आहे मात्र काही वाघ हे जंगलाबाहेर आपला घरोबा करून आहे.


    वर्ष 2024 मध्ये 20 वाघ तर 17 बिबट्याचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये बरेचसे वाघ हे दोन वाघांच्या झुंजीत तर इतर वाघाचा मृत्यूचे कारण हे अस्पष्ट आहे.
    वर्ष 2024 मध्ये वनविभागाने वाघाची शिकार (tiger hunting) करणाऱ्या टोळीला अटक केली होती, त्यानंतर वनविभाग अश्या शिकाऱ्यांवर नजर ठेवून होती.

    खासदार धानोरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहलं महत्वाच्या विषयावर पत्र

    चंद्रपुरातील वनपरिक्षेत्र अधिकारी जी.आय.नायगामकर यांना वाघनखांच्या अवैध व्यापाऱ्यांची माहिती मिळाली होती, त्या आधारे 30 डिसेंम्बर रोजी सापळा रचत लोहारा येथील संदीप हरी तोडासे, शेखराम किसन तोडासे या दोघांना 4 वाघनखांसहित (waghnakh) अटक करण्यात आली.
    सदर वाघनखे हे अवैध व्यापारासाठी आणल्याचे निष्पन्न झाले, आरोपीना अटक करीत त्यांना न्यायालयात हजर करीत 2 दिवसांची वनकोठडी घेण्यात आली.

    सदर प्रकरण हे वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने अत्यन्त गंभीर स्वरूपाचे आहे, या प्रकरणी आरोपीची संख्या मोठी असू शकते, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीनी वाघाची शिकार केली का? याबाबत आरोपीची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नायगामकर यांनी दिली.

    सदरची यशस्वी कारवाई मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, विभागीय वनाधिकारी निकिता चौरे, सहायक वनसंरक्षक विकास तरसे, मध्य चांदाचे आदेश शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी नायगामकर, क्षेत्र सहायक तिजारे, एचपी डोंगरे, वनरक्षक कविता यादव, कोडापे, बोबाटे, यादव, पारवे व मट्टामी यांनी केली.

  • Wet and dry waste management | ओला व सुका कचरा व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

    Wet and dry waste management

    Wet and dry waste management : चंद्रपूर महानगरपालिका स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता कर्मचारी व वॉर्डसखींसाठी आयोजित करण्यात आलेली  “ओला व सुका कचरा व्यवस्थापन ” कार्यशाळा उत्साहात पार पडली. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात स्वच्छता कर्मचारी व वॉर्डसखींनी सहभाग दर्शविला.

    सेतू कामगारांच्या महत्वाच्या मागणीसाठी खासदार धानोरकर यांनी लिहलं मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र


     सोमवार 30 डिसेंबर रोजी स्वच्छ भारत अभियान 2.0 व स्वच्छ संरक्षण 2024-25 अंतर्गत भिवापूर वॉर्ड येथील तिरुमला भवन येथे झालेल्या कार्यशाळेत घर ते घर कचरा वर्गीकरण कसे करावे व कचऱ्यापासुन कंपोस्ट खत (Compost fertilizer from waste) कसे तयार करावे याचे प्रशिक्षण उपस्थितांना देण्यात आले. त्याचप्रमाणे स्वच्छतेविषयी जागरूकता वाढावी व त्यायोगे आपले शहर,नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.  


     स्वयंसेवकांनी स्वच्छता दूत म्हणून समाजात काम केले पाहिजे. स्वयंसेवक म्हणून प्रबोधनातून प्लास्टिक बंदी केली पाहिजे.’स्वच्छता अँप‘ याविषयी माहिती देऊन वापरण्याचे आवाहन चंद्रपूर पालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले यांनी यावेळी केले.

    स्वच्छता मोहिमेत कचरामुक्त परिसर करण्यासाठी आपण सर्वांनी करण्याचे आवाहन करत डॉ.अमोल शेळके व सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून या कार्यशाळेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. 

  • Higher education in abroad | परदेशात उच्च शिक्षणाची सुवर्णसंधी गमवू नका

    Higher education in abroad

    Higher education in abroad : अल्पसख्यांक विकास विभागांतर्गत अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती जागा निवडीसाठी सन 2024-25 करीता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

    योजनेच्या अटी व शर्ती:

    विद्यार्थी अल्पसंख्याक समुदायातील (Minority communities) तसेच महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे, पीएचडीसाठी 40 वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. (विवाहित महिला उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे.

    चंद्रपुरातील बुलेट राजांची आता खैर नाही

    जर विवाहित महिला उमेदवार विधवा, घटस्फोटीता असून वडिलांकडे वास्तव्यास असल्यास महिला उमेदवाराने वडिलाकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तसे कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.) परदेशी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत दोन वर्षे कालावधीचाच एमबीए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी 30 टक्के जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर त्या प्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे अधिकार निवड समितीला राहतील.

    सेतू केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी खासदार धानोरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहल पत्र

    एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावा. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत (QS World University Rank) 200 च्या आत असावी.

    लाभाचे स्वरुप:

    परदेशातील शैक्षणिक संस्थेने ऑफर लेटर मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजिकच्या मार्गांनी इकॉनॉमी क्लास विमान प्रवास भाडे (परतीच्या प्रवासासह), निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्यांने प्रत्यक्ष केलेला खर्च विहित केलेल्या वित्तीय मर्यादेत मूळ शुल्क भरणा पावती, प्रवासाचे मूळ तिकीट, मूळ बोर्डींग पास आदी तपासून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर भारतीय रुपयामध्ये प्रतिपूर्ती केले जाईल.

    विद्यार्थ्यांने वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करुन परिपुर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दि. 31 डिसेंबर 2024 पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत ऑनलाईन भरुन त्याची प्रिंट, समक्ष किंवा पोस्टाने समाजकल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे-411001 येथे सादर करावा. तसेच https://fs-maharashtra.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरावी. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या घडामोडी या लिंकवर जाऊन भेट द्यावी.

    तरी,अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त,  समाजकल्याण यांनी केले आहे.

  • pratibha dhanorkar on setu worker : खासदार धानोरकरांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहलं पत्र

    pratibha dhanorkar on setu worker

    pratibha dhanorkar on setu worker : महाराष्ट्रातील सर्व तहसिल कार्यालयात अनेक बेरोजगारानां अत्यल्प मानधनावर कामकरावे लागत असल्याने त्यांना शासनाने कंत्राटी सेवेत सामावून किमान वेतन देण्याची मागणी खा. प्रतिभा धानोरकर यांनी मा. मुख्यमंत्री देवेद्र फडणविस (devendra fadnavis) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

    चंद्रपुरातील बुलेट राजांवर होणार कठोर कारवाई


    प्रत्येक तहसिल कार्यालयात सेतुची कामे बेरोजगार तरुण तरुणी मार्फत अत्यल्प मानधनावर केली जात आहे. सेतु केंद्रामार्फत दिले जाणारे दाखले व प्रमाणपत्र देण्याचे काम या सबंधीत कर्मचाऱ्याकडे आहे.

    पंरतु या कर्मचाऱ्याना अत्यल्प मानधन मिळत असल्याने या संदर्भात खा. प्रतिभा धानोरकर यांची भेट घेवुन आपल्या मागण्या मांडल्या या संदर्भात खा. प्रतिभा धानोरकर यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना पत्र लिहुन सेतु कार्यालयातील अत्यल्प मानधन असलेल्या कर्मचाऱ्याना शासकीय कंत्राटी सेवेत सामावुन घेवून किमान वेतन देण्याची मागणी केली आहे.

    या संदर्भात मा. खा. प्रतिभा धानोरकर या मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेणार असल्याचे देखिल सांगितले. 

  • old pension | जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी लढा तीव्र करणार – आमदार अडबाले

    old pension

    old pension : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व नंतर टप्प्याटप्प्याने १०० टक्के अनुदानावर आलेल्या तसेच २००५ नंतर नियुक्त सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व राज्य कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे.

    पेन्शन मिळणे हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना (old pension scheme) लागू करण्यासाठी लढा अधिक तीव्र केला जाईल. लाखो कर्मचाऱ्यांच्या न्यायिक हक्कासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा सरकार्यवाह म्हणून सभागृहात आवाज उठवेल, असे प्रतिपादन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.

    चंद्रपुरातील बुलेट राजांवर होणार कारवाई

    विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूर महानगरतर्फे भवानजीभाई चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात २९ डिसेंबर रोजी चंद्रपूर महानगर अधिवेशन पार पडले. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून आमदार सुधाकर अडबाले बोलत होते.

    अधिवेशनाच्या अध्यक्षस्‍थानी माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्हाणे होते. याप्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून लक्ष्मणराव धोबे होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे, जगदीश जुनगरी, विज्युक्ता महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पातळे, डॉ. अनिल शिंदे,  विजय भोगेकर, विमाशि संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, वर्धा जिल्हाध्यक्ष विष्णू इटनकर, नागपूर महानगर कार्यवाह अविनाश बडे, नागपूर जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, जिल्हा कार्यवाह संजय वारकर, चंद्रपूर महानगर अध्यक्ष जयंत टोंगे सह

    कार्यवाह सुरेंद्र अडबाले, दिगांबर कुरेकर, भोंगळे सर, भाऊ गोरे, घोडसे सर, सौ. सीमा अडबाले, प्रमोद साळवे, मनोज आत्राम यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्‍यवरांचे लेझीम पथकाने स्‍वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार डायगव्हाणे, लक्ष्मणराव धोबे, वीतेश खांडेकर, जगदीश जुनगरी, डॉ. अशोक गव्हाणकर, रमेश काकडे, विजय भोगेकर आदींनी शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर प्रकाश टाकला.

    विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व शालेय कार्याबद्दल महानगरातील कॉन्व्हेन्टमधील प्राचार्य, शिक्षकांचा शाल, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्‍कार करण्यात आला.

    प्रास्‍ताविक विमाशि संघ महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले यांनी केले. संचालन प्रा. प्रमोद उरकुडे, रंजना कन्नाके तर आभार जयंत टोंगे यांनी मानले. या अधिवेशनाला चंद्रपूर महानगरातील शिक्षकांची मोठी उपस्थिती होती. अधिवेशनानंतर चंद्रपूर महानगर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात महानगर अध्यक्षपदी दिगांबर कुरेकर, कार्यवाहपदी सुरेंद्र अडबाले, उपाध्यक्ष म्हणून मनोज पुलगमकर, दादाराव श्रीरामे, शकील शेख, वनश्री मेश्राम, सहकार्यवाह म्हणून प्रविण आबोजवार, चरणदास राठोड, रूपाली मुंगल, प्रमोद पेद्दीलवार तर कोषाध्यक्ष म्हणून राजू वाढई यांची अविरोध निवड करण्यात आली.

    निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. विजय हेलवटे यांनी जबाबदारी पार पाडली.

  • Bullet raja : चंद्रपुरातील ‘बुलेट राजांची” आता खैर नाही

    Bullet raja

    Bullet raja : चंद्रपुरातील वाहतूक नियंत्रण शाखेने कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
    या मोहिमेदरम्यान वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 8 दुचाकी वाहनावर कारवाई केली.

    बीड जिल्ह्यात जी घटना घडली, ती पुन्हा भविष्यात – सुधीर मुनगंटीवार

    वाहतूक पोलिसांची चंद्रपूर जिल्ह्यात नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर कारवाई मोहीम हाती घेतली आहे, 29 डिसेंबर रोजी चंद्रपूर शहरात पोलिसांच्या कारवाईत drunk एन्ड ड्राइव, ट्रिपल सीट व दुचाकी वाहनांचे मोडीफिकेशन यांचा समावेश होता, शहरातील युवक आपल्या वाहनात बदल करीत सायलेन्सर व कर्णकर्कश हॉर्न लावत वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात यावर आळा बसावा यासाठी पोलिसांनी शहरात कारवाई सत्र राबविले. (Chandrapur traffic police)


    जप्त करण्यात आलेल्या दुचाकी वाहनांचे सायलेन्सर काढण्यात आले असून चालकांना मेमो दिला आहे, सोबतच आपण वाहनात असा बदल का केला याबाबत परिवहन अधिकाऱ्याला स्पष्टीकरण द्यायचे आहे.

    जप्त करण्यात आलेल्या दुचाकी वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी दिली.

  • sudhir mungantiwar on santosh deshmukh | बीड मध्ये जी घटना घडली ती भविष्यात.. सुधीर मुनगंटीवार

    sudhir mungantiwar on santosh deshmukh

    sudhir mungantiwar on santosh deshmukh राज्यात सध्या चर्चेत असलेले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्वत्र निषेध होत असून या घटना पुन्हा घडू नये यासाठी येणाऱ्या अधिवेशनात अशासकीय विधेयक मांडत मी सरपंच बंधू-भगिनींचा आवाज बुलंद करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मुनगंटीवार यांनी दिली.

    नवीन वर्षाचे स्वागत करताना ही चूक करू नका

    चंद्रपुरात धनोजे कुणबी समाजातर्फे 3 दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्यामध्ये राज्यात सरपंचावर होत असलेल्या हल्ल्यावर प्रकाश टाकण्यात आला.

    बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली त्यानंतर सलग 2 सरपंचावर हल्ला करण्यात आला होता.


    यावर आता माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बीड जिल्ह्यातील घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी मार्च मधील विधानसभेच्या अधिवेशनात सरपंचांना सुरक्षा पुरविण्यात यावी त्यांच्या कार्यकाळात कसलीही अप्रिय घटना घडू नये असे कायदे अस्तित्वात आणण्यासाठी अशासकीय विधेयक मी मांडणार अशी प्रतिक्रिया आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. राज्यातील सरपंच बंधू-भगिनींच्या पाठीशी मी पूर्ण ताकदीनिशी उभा राहणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

  • New Year celebration | नवीन वर्षाचे स्वागत करतायं तर ही चूक करू नका

    New Year celebration

    New Year celebration : येत्या 31 डिसेंबर 2024 रोजी वर्ष समाप्ती व नववर्षाच्या स्वागताप्रसंगी अतिउत्साही तरुण मंडळीकडून मद्यप्राशन करून वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, असे प्रकार निदर्शनास येतात. यावर आळा घालण्यासाठी अशा वाहन चालकांविरुध्द कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले आहे

    नववर्षाचा उत्सव साजरा करण्याकरीता अतिउत्साही तरुण मंडळी मद्य प्राशन करून दुचाकी, चारचाकी वाहने भरधाव वेगाने व बेदरकारपणे चालवतात. तसेच रस्त्यावर स्टंटबाजी किंवा अतिशय निष्काळजीपूर्व ड्रायव्हिंग करणे यासारखे कृत्य करीत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता असते. Drunk and drive punishment

    अशा प्रकारच्या कृत्यावर आळा घालण्याच्या दृष्टीने 29 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकेबंदी लावण्यात येणार आहे.

    आपलं विमान पुन्हा उतरणार – आमदार मुनगंटीवार

    जर मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरिता वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन अंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालविणे, ट्रिपल सीट, रफ ड्रायव्हिंग, स्टंटबाजी करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकावर मोठ्या प्रमाणात विशेष मोहिमेद्वारे कडक कारवाई करण्यात येणार आहे. Chandrapur traffic police

    त्यामुळे नववर्षाचे स्वागत करताना सर्व नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व अपघात होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी कळविले आहे.

  • krishi mahotsav |चंद्रपुरातील कृषी महोत्सव म्हणजे कृषी विकास आणि सामाजिक बांधिलकीचा संगम – आमदार जोरगेवार

    krishi mahotsav

    krishi mahotsav : कुणबी समाज नेहमीच मेहनती, प्रामाणिकपणा आणि परंपरांचे जतन यासाठी ओळखला जातो. या कृषी महोत्सवाच्या आणि वधू-वर परिचय मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येऊन कृषी क्षेत्र आणि सामाजिक एकता अधिक बळकट केली आहे. हे एकत्रीतरित्या आयोजित झालेले आयोजन म्हणजे कृषी विकास आणि सामाजिक बांधिलकीचा संगम असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी केले.

    कुणबी समाजाच्या (dhanoje kunbi samaj) वतीने चांदा क्लब मैदानात कृषी महोत्सव आणि वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपूते, श्रीधर मालेकर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, अनिल धानोरकर, मनोहर पाउनकर, सुनील मुसळे, अजय जयसवाल, विलास माथनकर, माजी नगरसेवक वाढई, विनोद पिंपळशेंडे, अतुल देउळकर, अरुण मालेकर, प्रा. अनिल डाहाके, प्रा. मोरे आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    आपलं विमान पुन्हा उतरणार – सुधीर मुनगंटीवार

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून विधानसभेत पोहोचलो आहे. त्यामुळे माझ्यावर आता अधिकची जबाबदारी आहे. मागील पाच वर्षांत अनेक विकासकामे आपल्याला करता आली. तर अनेक विकासकामे या पाच वर्षांत करण्याचा निर्धार आपण केला आहे. मतदारसंघात मोठ्या अभ्यासिका आपण तयार करत आहोत. तसेच अनेक भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपला भर असल्याचे यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

     वधू-वर परिचय मेळावा म्हणजे नव्या नात्यांची सुरुवात आहे. हे नाते केवळ दोन व्यक्तींचे नसून दोन कुटुंबे, संस्कृती आणि संपूर्ण समाजाची बांधिलकी दर्शवणारे असते. आज येथे उपस्थित तरुण-तरुणींनी एकमेकांची ओळख करून घेऊन नव्या वाटचालीस सुरुवात करावी.

    कृषी महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शेतीतील नवसंकल्पना आणि सरकारी योजनांची माहिती मिळते. आपल्या शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीचे मार्ग यातून शोधता येतात. कृषी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा अधिकाधिक लाभ शेतकरी बांधवांनी घेण्याचे आवाहन यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

      आपण कुणबी समाजाच्या अभ्यासिकेसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिला आहे. यातून मोठी अभ्यासिका तयार होत आहे. येथे साहित्य खरेदीसाठी आणखी 50 लक्ष रुपयांच्या निधीची मागणी समाजाच्या वतीने आली असून साहित्य खरेदीसाठी 50 लक्ष रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

    सोबतच घुग्घूस येथे कुणबी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास असून तेथेही अभ्यासिका बांधकामासाठी आपण 50 लक्ष रुपये देणार असल्याची घोषणा यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. या कार्यक्रमाला समाज बांधवांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.