Tadoba National Park Tourism : केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना देशातील ५० पर्यटन स्थळांचा विकास करण्याचा मनोदय जाहीर केला आहे. चंद्रपूर जिल्हयातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अर्थात ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राचा पर्यटन विषयक मानबिंदू आहे. हे जागतीक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वाधिक वाघ असून विविध प्राणी देखील या व्याघ्र प्रकल्पात आहेत. कोअर झोन तसेच बफर झोन मध्ये मोठ्या संख्येने पर्यटक सातत्याने येत असतात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ५० पर्यटन स्थळामध्ये या प्रकल्पाचा समावेश व्हावा अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीने पारित करावा व हा ठराव केंद्र व राज्य शासनाकडे पाठवावा असेही ते म्हणाले. Tadoba Andhari Tiger Reserve development
सोमनाथ तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा देण्यात यावा
मूल तालुक्यातील सोमनाथ हे प्रसिद्ध पर्यटन व तीर्थस्थळ असून या ठिकाणी मोठया संख्येने भाविक व पर्यटक सातत्याने येत असतात. या ठिकाणी श्री शंकराचे जागृत देवस्थान आहे. हा परिसर निसर्गरम्य असून मोठा धबधबा या ठिकाणी आहे. या ठिकाणी भाविक व पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या या दृष्टीने या स्थळाला ब वर्ग दर्जा देण्याचा ठराव पारित करण्याची मागणी आ मुनगंटीवार यांनी यावेळी केली. Somnath tourist place Chandrapur
श्री क्षेत्र धाबा ता. गोंडपिपरी या तिर्थस्थळाला ब वर्ग दर्जा देण्यात यावा
चंद्रपूर जिल्हयातील गोंडपिपरी तालुक्यातील श्री क्षेत्र धाबा येथे संतश्री परमहंस कौंडय्या महाराज यांचे समाधीस्थळ आहे. मोठया प्रमाणावर भाविक याठिकाणी सातत्याने येत असतात. भाविकांसाठी सोईसुविधा अपु-या आहेत. दरवर्षी जानेवारी महिन्यात याठिकाणी मोठी यात्रा भरते. या तिर्थस्थळाचा समावेश ब वर्गात करण्याची आवश्यकता आहे. सदर तिर्थस्थळाला ब वर्ग दर्जा मिळण्याबाबतचा ठराव पारित करण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. हे तिन्ही ठराव जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मंजूर करण्यात आले असून पुढील कार्यवाहीसाठी केंद्र व राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. Gondpipari tourist places
Union Budget 2025 India : पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्रभाई मोदी यांच्या सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास या धोरणानुसार भारताच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकरी, महिला, युवक, नोकरदार आदी सर्वच घटकांना न्याय देणारा भारताच्या सर्वसमावेशक विकासाचा संकल्प मांडणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. देशाला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल आमदार मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे अभिनंदन केले आहे.
या अर्थसंकल्पात शेतकरी वर्गाला अर्थमंत्र्यांनी केंद्रास्थानी ठेवले आहे. विशेषतः कापूस उत्पादकांसाठी ५ वर्षांचे पॅकेज, कापुस उत्पादक मिशन, स्वस्त व्याजदरावर शेतक-यांना ५ लाखापर्यंतचे कर्ज हे संकल्प देशातील शेतक-यांना दिलासा देणारे आहे. कापुस उत्पादक शेतक-यांना केंद्र सरकारने दिलेली ही विशेष भेट आहे. त्याचप्रमाणे आर्थिक घडामोडींमध्ये ७० टक्के महिलांचा असलेला सहभाग तसेच अनुसुचित जाती व जमातींच्या महिलांना उद्यमी म्हणून प्रोत्साहन देण्याचा संकल्प महिला विकासाला चालना देणारा आहे. (Nirmala Sitharaman Budget 2025)
एमएसएमईसाठी नॅशनल मॅन्युफॅक्चरींग मिशनची घोषणा या क्षेत्राला प्रोत्साहन देणारी आहे. तसेच एमएसएमईसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. मत्स्य उत्पादनाला मोठे प्रोत्साहन देखील देण्यात आले आहे. कमी उत्पन्न असलेल्या जिल्हयांसाठी धनधान्य योजना शेतकरी व गरीब नागरिकांना दिलासा देणारी आहे. युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षणाच्या योजना व त्यासाठी करण्यात आलेली तरतूद युवक कल्याणाबद्दल सजगता दर्शविणारी आहे. (Farmer benefits in Budget 2025)
पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी ५० पर्यटन स्थळे विकसित करण्याचा संकल्प तसेच मेडीकल टूरिझम ही संकल्पना राबविण्याचा संकल्प पर्यटन विकासाला चालना देणारा आहे. पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत करण्यात आलेली तरतूद विशेष महत्वपूर्ण असून येत्या १० वर्षात १२० विमानतळ विकसित करण्याचा तसेच नविन काही ग्रीनफिल्ड विमानतळ विकास विकसित करण्याचा संकल्प देखील महत्वाचा आहे.
आर्थीक सुधारणा करताना करदात्यांना मोठा दिलासा अर्थमंत्र्यांनी दिला आहे. देशातील मध्यमवर्गीयांना या माध्यमातुन मोठा दिलासा दिला आहे. १२ लाख रू. पर्यंत उत्पन्न असलेल्यांवर कोणताही कर न आकारण्याचा निर्णय अतिशय महत्वाचा असून कॅन्सर व इतर गंभीर आजारांसाठीची औषधे करमुक्त करण्याचा निर्णय देखील दिलासा दायक आहे.
याशिवाय सुक्ष्म उद्योगांसाठी कस्टमाईज क्रेडीट कार्ड, छोटया गुंतवणुकदारांना प्रोत्साहन ही देखील महत्वाची पाऊले सरकारने उचलली आहे. सर्वच क्षेत्रातील सर्वच घटकांना न्याय देत महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प देशाला प्रगतीपथावर नेणारा असल्याची प्रतिक्रिया आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
Chandrapur Sand Mafia : 30 जानेवारीला भद्रावती तालुक्यातील कारेगाव येथे तलाठी अनंत गीते वाळू तस्करी रोखण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर वाळू तस्करांनी ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न व धक्काबुक्की करण्यात आला.
याबाबत तलाठी अनंत गीते यांनी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध कलम 132, 296, 303(3), 3(2) व 48 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. शेगाव पोलिसांनी या प्रकरणात वाहन चालक 34 वर्षीय अनिल उर्फ शंभू नथ्थू भरडे रा.चंदनखेडा, 23 वर्षीय महेश गणेश गुंटिकवार यांना अटक केली. इतर आरोपींचा पोलिसांद्वारे शोध सुरू आहे. (Revenue Officer Attack)
2 वर्षांपासून जिल्ह्यातील वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया झाली नसल्याने वाळू तस्करी जोमात सुरू आहे, प्रशासनाला न जुमानता व आर्थिक संबंध जोपासत वाळू तस्करी सुरू आहे.
विशेष म्हणजे या वाळू तस्करी मध्ये जिल्ह्यातील नामवंत राजकीय पदाधिकारी यांचा सहभाग आहे. महसूल विभाग तर निद्रा अवस्थेत असल्याने वाळू तस्करी बेलगाम झाली आहे.
tiger poaching in chandrapur : राज्यात सर्वात जास्त वाघ असलेल्या चंद्रपुरात वाघाची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित पारधी आदिवासी याला चंद्रपूर जिल्ह्यातील राजुऱ्यातून वनविभागाने २५ जानेवारीला अटक केल्यावर चांगलीच खळबळ उडाली आहे. अजित सह इंजेक्शन पारधी आदिवासी, रीमाबाई अजित पारधी आदिवासी, रविना आयुष आदिवासी, सेवा यश आदिवासी व राजकुमारी अजित पारधी यांना अटक करण्यात आली आहे. ३१ जानेवारी पर्यंत ६ आरोपीना न्यायालयाने वणकोठडी सुनावली होती. (Wildlife Crime)
यादरम्यान चौकशी मध्ये अजित ने एका वाघाची शिकार केली असल्याची कबुली वनविभागासमोर केली. वनाधिकारी यांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार सापळे व वाघाचे अवयव खड्ड्यात लपवून ठेवलेल्या ठिकाणाहून जप्त करीत सदर अवयव फॉरेन्सिक तपासणी करीता पाठविण्यात आले होते, फॉरेन्सिक अहवालात सदर अवयव वाघाचे असल्याचे स्पष्ट झाले.
विशेष म्हणजे या प्रकरणाशी संबंधित संशयित आरोपी ५० वर्षीय लालनेइसुंग याला शिलॉंग येथून ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक व तीन सदस्यीय Sit प्रमुख आनंद रेड्डी येल्लू यांनी अटक केली आहे, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो च्या सहयोगाने आरोपी लालनेइसुंग ला चंद्रपुरात आणण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीनुसार लालनेइसुंग याचे चंद्रपुरात अटक करण्यात आलेल्या अजित पारधी सोबत व इतर आरोपीशी संबंध असल्याची माहिती वनविभागाच्या हाती लागली आहे. आरोपी लालनेइसुंग ला ४ फेब्रुवारी पर्यंत वणकोठडी सुनावली आहे. (wildlife crime in chandrapur)
आरोपींची ३१ जानेवारी रोजी वणकोठडी संपल्याने त्यांना JMFC न्यायालय राजुरा मध्ये हजर करण्यात आले असता अजित पारधी, इंजेक्शन पारधी, रीमा, रविना, सेवा याना ४ फेब्रुवारी पर्यंत वणकोठडी सुनावण्यात आली तर राजकुमारी पारधी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. Tiger Poaching
कोण आहे अजित पारधी?
अटक करण्यात आलेल्या आरोपींचे इतर टोळी सोबत संबंध आहे काय? त्यांच्या संपर्कात अजून कोण आहे याबाबत ११ सदस्यीय विशेष तपास पथकातील DCF सेंट्रल चांदा स्वेता बोड्डू, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, dfo सचिन शिंदे, बापू येळे, आदेश शेंडगे, वेणुगोपाल, महेश गायकवाड, सुरेश येलकवाड, अरुण गोंड, आकाश सारडा, मुकेश जवळकर, शहाबाज शेख करीत आहे. (Baheliya gang tiger hunting)
अजित पारधी हा राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे कुटुंबासहित मागील ३ महिन्यापासून राहत होता, विशेष म्हणजे कुटुंबातील महिला वाघाच्या शिकारीसाठी मदत करीत होते. वनविभागाने अजित ला अटक केल्यावर त्याच्या फोन ची तपासणी केली असता त्यामधून ७० लाखांचा व्यवहार झाला असल्याची माहिती मिळाली. अजित हा मूळचा मध्यप्रदेश राज्यातील कटनी जिल्ह्यातील बिरहूली या भागात राहतो वाघाच्या शिकारीसाठी प्रसिद्ध असलेल्या बहेलिया टोळीचा तो म्होरक्या आहे. विशेष बाब म्हणजे मागील ३ महिन्यापासून तो चंद्रपुरात होता याची साधी चाहूल वनविभागाला का लागली नाही? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित झाले आहे. अभयारण्यातील वाघ हे सुरक्षित असतात मात्र ज्या ठिकाणी वनविभागाचे दुर्लक्ष असते त्याच ठिकाणी शिकारी आपले जाळे विणत होता.
attack on government employee : मागील २ वर्षांपासून वाळू घाटाचे लिलाव झालेले नाही, मात्र यावर वाळू तस्कर घाटाच्या लिलावाची वाट न बघता नदीला पोखरण्यासाठी सज्ज झाले आहे, मागील २ वर्षांपासून राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज वाळू तस्करीच्या व्यवसायात उतरलेले आहे. दिवसा राजकारण व रात्री वाळू चोरी अशी दिनचर्या काही नेत्यांची झाली आहे. विशेष म्हणजे प्रशासनातील काही सोबत आर्थिक हितकारण करीत हि महसूल चोरी मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
३० जानेवारीला भद्रावती येथील कारेगाव येथे वाळू तस्करी (Sand mafia) थांबविण्यासाठी गेलेल्या तलाठीला जीवघेणा अनुभव आला. (Talathi attack) कारेगाव मध्ये ट्रॅक्टर चालक शंभू भरडे हे गावात वाळू खाली करीत होते तलाठी अनंत गीते यांनी ते दृश्य बघताच रेती बाबत परवाना आहे का विचारले मात्र चालकाकडे परवाना नव्हता. तलाठी गीते यांनी मंडळ अधिकारी व पोलिसांना याबाबत संपर्क केला. मात्र त्यावेळी तिथे उपस्थित तस्कर समर्थकांनी तलाठीच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न करीत धक्काबुक्की केली.
पोलीस तक्रार झाली मात्र आरोपी फरार
पोलिसांनी या प्रकरणी ट्रॅक्टर चालक शंभू भरडे, राजेश्वर गायकवाड, गंटिकवार व त्यांचे बंधू यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १३२, २९६, ३०३ (२), ३ (५), ४८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महसूल खात्यातील महत्वाचा घटक म्हणून तलाठी आपले काम बजावीत आहे मात्र त्याच्यावर वाळू तस्करांचा हल्ला हि गंभीर बाब असताना सुद्धा जिल्हा महसूल प्रशासन निद्रावस्थेत असल्याचे दाखवीत आहे. (Accused absconding)
जिल्ह्यात मूल, पोंभुर्णा व सावली हे ठिकाण वाळूचे मोठे हब आहे मागील २ वर्षांपासून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत आहे मात्र प्रशासन या महसूल चोरीवर मुकदर्शकाची भूमिका घेऊन गप्प बसले आहे. या २ वर्षात हायवा ट्र्क वर अत्यन्त दुर्लभ कारवाया करण्यात आल्या आहे हे विशेष. या घटनेवरून पोलीस व जिल्हा प्रशासनाला जाग येणार काय? हि तर येणारी वेळच सांगणार.
Utsav Narishakticha : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने १ फेब्रुवारीला शनिवारी घुग्घूस येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात उत्सव नारिशक्तीचा या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सैराट (Sairat) फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु (आर्ची) (Rinku Rajguru) यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण राहणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने घुग्घूस शहरवासीयांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
घुग्घूस शहरातील महिला कलावंतांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात संध्याकाळी ५ वाजता होणार असून, यात एकल नृत्य, युगल नृत्य आणि समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सुमारे ५० नृत्य गटांनी सहभाग नोंदवला आहे.
या विशेष कार्यक्रमाला अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार असून, महिलांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम म्हणून याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे घुग्घूस शहरवासीयांनी या भव्य आयोजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Aurobindo Realty road closure : अरबिंदो रिअॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रशासनाने जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणायां मौजा किलोनी, बेलोरा, जेना, इजिमा 16 येथील रस्ते रात्रीच्या वेळी चोरट्या पद्धतीने खोदुन बंद केले त्यामुळे सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
तसेच रस्ता बंद झालयाने परिसरातील शेतकयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात, भद्रावती पंस माजी अध्यक्ष प्रविण ठेंगणे तसेच बेलोरा ग्रामवासियांनी पत्रकार परिषदेत रस्ता दुरुस्त करून पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परीषदेच्या माध्यमातुन जिला प्रशासन आणि कंपनी प्रशासनाला दिला आहे. (road closure impact on farmers)
ठेंगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 29 जानेवारीच्या रात्री 1.30 वाजता अरबिंदो कंपनीने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावाचे आणि टाकळी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचे उल्लंघन करून हा रस्ता बेकायदेशीरपणे खोदून बंद केला आहे. त्यामुळे किलोनी, बेलोरा, टाकळी, जेना, पानवडाळा, कांसा येथील ग्रामस्थ आणि प्रकल्पग्रस्त शेतक_यांमध्ये अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Kiloni Belora road dispute)
याशिवाय, कंपनी प्रशासनाने केलेल्या बेकायदेशीर उत्खननामुळे आणि संबंधित रस्त्यावरील जड वाहतुकीमुळे ग्रामस्थांचे जीव धोक्यात आले आहेत. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा आणि ग्रामपंचायत टाकळी मासिक सभेचा ठराव अंमलात आणला जात नाही, प्रकल्पात प्रस्तावित असलेली संपूर्ण शेती जमीन संपादित केली जात नाही, बेलोरा गावाचे पुनर्वसन केले जाणार नाही आणि प्रकल्पामुळे बाधित झालेल्या लोकांना कायमस्वरूपी नोकरी दिली जाणार नाही तोपर्यंत कंपनी प्रशासनाला रस्ता वळवण्याची परवानगी देऊ नये आणि रस्ता वळवण्याची प्रक्रिया त्वरित रद्द करण्याची मागणी बेलोरा ग्रामवासियांनी केली आहे.
दरम्यान, कंपनी प्रशासनाने बुधवार 29 जानेवारी रोजी मध्यरात्री 1.30 वाजता मौजा किलोनी, बेलोरा, जेना इंजिमा 16 येथील रस्ता बेकायदेशीरपणे खोदला आहे, ज्यामुळे सार्वजनिक रस्ताचे नुकसान होऊन तो रस्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे संबंधित गावातील लोकांना ये-जा करण्यात अनावश्यक अडचणी येत आहेत. प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ग्रामस्थांच्या स्वाक्षरी ने प्रकल्पग्रस्त समितीने सदर रस्ता दुरुस्त करून पुन्हा सुरू करावा आणि योग्य चौकशी करावी अशी मागणी करून कंपनी प्रशासनाविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वरोरा उपविभागीय अधिकारी यांचेकडे केली आहे. (village road dispute Chandrapur)
स्थानिक जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि बांधकाम विभागाने या गंभीर प्रकरणाची दखल न घेतल्यास आणि सुरू असलेले काम न थांबविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त समितीने दिला आहे. आंदोलन दरम्यान कंपनीचे काही नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद बांधकाम विभाग प्रशासन आणि कंपनी प्रशासनाची असेल असा ही इशारा दिला आहे.
पत्रकार परिषदेला भद्रावती पंचायत समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण ठेंगणे, प्रकल्पग्रस्त समिती सदस्य, जेना संगीता सुरेश देहारकर (सरपंच ग्रामपंचायत टाकळी), प्रदीप शंकर महाकुलकर (सरपंच गाव पानवडाळा), प्रभा मोतीराम बोढाले (सरपंच ग्रामपंचायत जेना), हेमंत धानोरकर, हरिचंद्र आसुटकर, बंटी पांडिले, प्रशांत मत्ते, मनोज मत्ते, विलास परचाके, ईश्वर उताने, नीलेश उत्ताणे आणि अनेक प्रकल्पग्रस्त, शेतकरी, ग्रामस्थ आणि प्रकल्पग्रस्त समिती सदस्य उपस्थित होते.
Farmers Protest Against Illegal Road Closure by Aurobindo Realty in Maharashtra
Chandrapur Municipal Corporation action : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई सुरू असुन उपद्रव शोध पथकाद्वारे रामनगर येथील साई पान शॉप येथे कारवाई करून खर्ऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे 180 किलो प्लास्टिक पन्नी जप्त करण्यात आल्या तसेच संबंधितांवर 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (Single-use plastic ban Chandrapur)
बंदी असलेल्या व एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार 8 टीम्स बनविण्यात आल्या आहेत. या सर्व चमूंद्वारे शहरात नियमित कारवाई करण्यात येते. यावेळेस सुद्धा या दुकानासंबंधी गुप्त माहिती मनपास प्राप्त झाली होती. प्लास्टीक साठा,पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येत असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास 5 हजारांचे बक्षिस दिल्या जात असल्याने अनेक सुजाण व्यक्तींकडुन अवैध साठ्यासंबंधी तक्रारी मनपास प्राप्त होत आहेत.
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर 5 हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास 10 हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर 25 हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. (One-time use plastic penalty)
सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रवींद्र भेलावे व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके,स्वच्छता निरीक्षक शुभम खोटे,शुभम चिंचेकर,राहुल गगपल्लिवर, प्रफुल पोतराजे यांनी केली
National Leprosy Eradication Programme : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत दि. 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. (Leprosy Detection Campaign 2025) त्याअनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.ललीत पटले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे आदी उपस्थित होते.
समाजात लपून राहिलेले कुष्ठरोग लवकरात लवकर व विनाविकृती शोधून काढत त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे, तसेच नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करून होणारा प्रसार कमी करणे, व समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे, तसेच 2027 पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करणे हा मोहिमेचा उद्देश आहे. (Leprosy Awareness Campaign)
कुष्ठरोगाची लक्षणे : त्वचेवर फिकट/ लालसर बधीर चट्टा त्या ठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर तेलकट/ चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे. भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पुर्ण बंद करता न येणे, तळहात व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे, त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, हात व पायामध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे ही लक्षणे आहे.
जिल्ह्यामध्ये 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची कुष्ठरोग विषयक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तदनंतर संशयित कुष्ठ रुग्णांची तपासणी करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत निदान करण्यात येणार आहे. (Leprosy Infection Control Plan)
ग्रामीण व शहरी भागातील एकूण लोकसंख्या 18 लक्ष 12 हजार 994, तर एकूण घरे 4 लक्ष 41 हजार 362 करिता ग्रामीण व शहरी भागातील एकूण 1537 टीम असणार आहे. सदर कार्यक्रम जनतेच्या हिताचा असून यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत घरोघरी जाऊन आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे. तरी, सर्व जनतेने येणाऱ्या कर्मचाऱ्यामार्फत आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
Revenue officer assault case : सर्वसामान्य नागरिकांची कामे जलद गतीने व्हावी, यासाठी राज्य शासनाने सर्व विभागांना 100 दिवसांच्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच अधिका-यांनासुध्दा फिल्ड व्हीजीट करून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.
याबाबत अधिकारी वर्ग प्रत्येक गावाना भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. तर एकीकडे भद्रावती तालुक्यातील शेगाव येथे तलाठी अनंत गीते वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तलाठी गीते यांनी तक्रार दिली आहे. (Shegaon Talathi attack)
महसूल उत्पन्न वाढीत क्रमांक एक वर असलेल्या जिल्ह्यात सध्या वाळू तस्करांचा मोठ्या प्रमाणात हैदोस सुरू आहे, प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत आर्थिक हित जोपासत हा व्यवसाय सध्या चांगला सुरू आहे.
30 जानेवारीला सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास कारेगाव येथे तलाठी अनंत गीते व सहायक कोतवाल संजय लभाने व नितीन बुरचुंडे रेतीने भरलेला ट्रॅक्टर अडवीत परवाण्याबाबत विचारपूस केली, परवाना नसल्याने सदर ट्रॅक्टर हा भद्रावती तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले असता 2 अज्ञात व्यक्तींनी ट्रॅक्टर चालकाला तलाठ्यांच्या अंगावर वाहन चालविण्यास सांगितले. (Talathi Anant Gite news)
चालकाने वाहन तलाठ्यांच्या अंगावर चढविण्याचा प्रयत्न केला, तलाठी गीते वाहनसमोरून न हटल्याने त्या 2 व्यक्तींनी तलाठी गीते सोबत धक्काबुक्की करीत त्यांना बाजूला सारले. त्यांनतर ट्रॅक्टर चालकाने वाहनसहित तिथून पळ काढला.
या सर्व प्रकाराची माहिती गीते यांनी तहसीलदार राजेश भांडारकर यांना दिली, ट्रॅक्टर चालक व त्या दोन इस्माविरुद्ध गीते यांनी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
या घटनेचा पटवारी संघाचे विभागीय अध्यक्ष राजूरकर यांनी निषेध करीत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.