Author: Admin

  • Chandrapur district collector । चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा ‘बालस्नेही’ पुरस्काराने सन्मान

    Chandrapur district collector

    Chandrapur district collector : बालकांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या विविध कायद्यांची चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी तसेच बाल संगोपन योजनेसाठी घेतलेला पुढाकार यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची नागपूर विभागातून उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली व त्यांना मुंबई येथे ‘बालस्नेही’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    जिल्हाधिकारी श्री. गौडा यांच्या  नेतृत्वात महिला व बालविकास विभागाने बाल विवाह प्रतिबंधक कायदा, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, POCSA यासारख्या काय‌द्याची प्रभावी अंबलबजावणी करून बाल संगोपन योजनेसाठी अभिनव उपक्रम राबविले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्यामार्फत जिल्हाधिकारी विनय गौडा यांची नागपूर विभागातून उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून ‘बालस्नेही’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. Maharashtra child rights

    चंद्रपुरातुन अवैध दारू वाहतुकीचा प्रयत्न फसला

    हा पुरस्कार वितरण समारंभ 3 मार्च रोजी मुंबई येथे पार पडला. यावेळी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मनिषा कायंदे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा, आयोगाचे सदस्य प्रशांत नारनवरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

    चंद्रपूर जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागाने केलेल्या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी यांच्या सोबतच दीपक बानाईत यांना ‘बालस्नेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी’ हा वैयक्तिक पुरस्कार, बाल कल्याण समिती चंद्रपूर यांना ‘बालस्नेही सीडब्ल्यूसी’ पुरस्कार तसेच बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर यांना ‘बालस्नेही डीसीपीयू’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशाप्रकारे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात जिल्ह्याला चार बालस्नेही पुरस्कार मिळाले आहेत. Child protection laws

    जिल्हा प्रशासनाची मंत्रालयात दखल : तीन दिवसांपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांचा नुकताच मंत्रालयात सत्कार करण्यात आला होता. तर आता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. एकप्रकारे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या उल्लेखनीय कार्याची दखल मंत्रालय स्तरावर होत असून जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब आहे.

  • Chandrapur thermal power plant pollution । चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या प्रदूषणावर कारवाई – MPCB कडून कठोर पावले

    Chandrapur thermal power plant pollution

    आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा तारांकित प्रश्न

    Chandrapur thermal power plant pollution : चंद्रपूर येथे महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पातून निघणाऱ्या धुळीमुळे प्रदुषणात वाढ झाल्याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, चंद्रपूर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दि. १७/०१/२०२५ रोजी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र व वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या मे. दुर्गापुर खुली खाण या उद्योगांची पाहणी करण्यात आली. भेटी दरम्यान आढळुन आलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने संबंधित उद्योगांवर नियामाप्रमाणे आवश्यक कारवाई करण्यात आली आहे. Western Coalfields Limited Durgapur mine environmental impact

    चंद्रपुरातील प्रदूषणाबाबत आमदार जोरगेवार यांची महाजेनको अधिकाऱ्यांशी बैठक

    चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र या उद्योगास दि. १७/०१/२०२५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली व त्या अनुषंगाने सदर उद्योगाने दि. ३०/०१/२०२५ रोजीच्या पत्रान्वये अनुपालन अहवाल सादर केला आहे. तसेच, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड दुर्गापुर या उद्योगास दि. २९/०१/२०२५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली व त्या अनुषंगाने सदर उद्योगाने दि. ०७/०२/२०२५ रोजीच्या पत्रान्वये अनुपालन अहवाल सादर केला आहे. तसेच उपरोक्त दोन्ही उद्योगांची अनुक्रमे रू.१५.०० लक्ष व रू.५.०० लक्ष बँक हमी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. Chandrapur air quality concerns

     चंद्रपूर जिल्ह्यातील ऊर्जानगर, कोंडी व नेरी येथील वेकोलि दुर्गापूर सीएचपी बंकर, सीएचपी रोप-वे व महाऔष्णीक विद्युत केंद्र प्रकल्पातून २४ तास निघणाऱ्या धुळीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वायुप्रदुषण होत असल्याची बाब आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुळ तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून निदर्शनास आणली. प्रदुषणामुळे नागरिकांना श्वसनाच्या व त्वचेच्या होणाऱ्या विकारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, ही प्रदुषणकारी उपकरणे हटविण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी सदर प्रश्नाद्वारे केली. Coal mining impact on agriculture in Chandrapur


    चंद्रपूर तालुक्यातील येरूर येथील एमआयडीसीतील कारखान्यामुळे तसेच अल्ट्राटेक व माणिकगड सिमेंट कंपन्यामुळे गडचांदूर, नांदा फाटा व लगतच्या गावांमध्ये जल व वायू प्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान होत असल्याची बाब आ. मुनगंटीवार यांनी तारांकित प्रश्नाद्वारे निदर्शनास आणली. या विषयाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळा मार्फत प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येत असल्याचे पर्यावरण मंत्र्यानी लेखी उत्तरात सांगितले.

  • Chandrapur power plant pollution । आमदार किशोर जोरगेवार यांची महाजनको अधिकाऱ्यांसोबत प्रदूषण नियंत्रणावर महत्वपूर्ण चर्चा

    Chandrapur power plant pollution

    Chandrapur power plant pollution : आमदार किशोर जोरगेवार यांनी आज महाजनकोच्या व्यवस्थापकीय संचालक राधाक्रिष्णा यांची मुंबई येथे भेट घेतली असून, सीएसटीपीएसच्या युनिट क्रमांक ८ व ९ मधून होणाऱ्या प्रदूषण नियंत्रणाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी तात्काळ प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. CSTPS Unit 8 and 9 emissions

    १० मार्च रोजी चंद्रपूर मनपा या नागरिकांची नावे करणार जाहीर

    यावेळी, प्रदूषणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. स्थानिक नागरिकांना श्वसनासंबंधी विकार, त्वचारोग आणि इतर आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

    तसेच, प्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. धुरामुळे शेतमालाच्या गुणवत्तेत घट होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व प्रशासनाच्या सक्रिय पुढाकाराची आवश्यकता असल्याचे आमदार जोरगेवार यांनी म्हटले आहे. Mahagenco pollution measures

    प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा झाली. प्रकल्पाच्या कार्यप्रणालीत सुधारणा करणे, स्थानिक जनतेच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आणि शेतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे या दृष्टीने त्वरित उपाययोजना राबविण्याची मागणी यावेळी आमदार जोरगेवार यांनी केली.महाजनको प्रशासनाने त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले आहे.

  • Illegal liquor transportation । अवैध दारू वाहतुकीचा पर्दाफाश; चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला लाखोंचा मुद्देमाल

    Illegal liquor transportation

    Illegal liquor transportation : चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेत बदल झाल्यानंतर अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. या कारवाईच्या मालिकेमध्ये, गुन्हे शाखेने विना परवाना दारूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करून ११ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    प्रशासक राजवटीविरोधात चंद्रपूर कांग्रेसचे आंदोलन

    कारवाईची माहिती:

    ३ मार्च रोजी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले यांना गुप्त माहिती मिळाली की, चंद्रपुरातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे, चंद्रपूर शहरातील वीर सावरकर चौकात नाकाबंदी करण्यात आली. Chandrapur crime branch raid

    नाकाबंदीदरम्यान, एमएच ३४ सीडी ७११६ क्रमांकाची मारुती अर्टिगा कार संशयास्पद स्थितीत येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवून झडती घेतली असता, त्यामध्ये विना परवाना देशी-विदेशी दारू आणि बिअर असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. Crime news Maharashtra

    या प्रकरणी पोलिसांनी ४० वर्षीय खुशाल भैयाजी बांगडे (रा. कोरपना) याला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Liquor smuggling arrest

    कारवाई करणारे पोलीस अधिकारी:

    ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, मधुकर सामलवार, पोलीस कर्मचारी सुनील गौरकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत नागोसे आणि दिनेश अराडे यांनी केली.

  • municipal administration protest । प्रशासक राजवटीमुळे नागरिक त्रस्त; काँग्रेसचे आंदोलन

    municipal administration protest

    municipal administration protest : महानगरपालिकांमध्ये सुरू असलेल्या प्रशासक राजवटीविरोधात काँग्रेस शहर कमिटीच्या वतीने 4 मार्च रोजी कस्तुरबा चौकात आंदोलन करण्यात आले. मागील काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधींची निवड न होता प्रशासकांमार्फत प्रशासन चालवले जात आहे. यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता घसरली असून, नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. Maharashtra Nagar Palika election.

    १० मार्च रोजी चंद्रपूर मनपा या नागरिकांची नावे करणार जाहीर

    काँग्रेस शहर कमिटीच्या वतीने आयोजित या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले, तर माजी आमदार व काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. या आंदोलनात ज्येष्ठ नेते विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, महिला कमिटीचे शहर अध्यक्ष चंदा वैरागडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, माजी नगरसेवक  सुनीता लोढिया, माजी नगरसेवक नंदू नगरकर, माजी नगराध्यक्ष सुरेश महाकूलकर, दिनेश चौखारे, पप्पू देशमुख, मनीष तिवारी, अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर खोबरागडे, अश्विनी खोब्रागडे, अनुश्री देहगावकर, साकीना अन्सारी, ललित रेवल्लीवार यांचेसह

    राजेश  रेवल्लीवार, प्रशांत दानव, मनोरंजन रॉय, खुशबू चोधरी, नरेंद्र बोबडे, भालचंद्र दानव, नीलेश ठाकरे, खुशबू चौधरी, कुणाल चहारे, शिरीष गोगुलवार, राहुल चौधरी, अनिल नरुले, विजय पोहनकर, रतन शिलावार, शालिनी भगत, रामकृष्ण कोंड्रा, बापू अंसारी, शोभाताई वाघमारे, दुर्गेश कोडाम, अली अमजद, राजू वासेकर, पप्पू सिद्धीकी, नवशाद शेख, जावेद शेख, दौलत चालखुरे, अजय बल्की, अजय महाडोरे, युसुफ चाचा, गौस खान, गुंजन येरणे आदींसह काँग्रेसच्या युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, एन.एस.यु.आय., इंटक आदी विविध आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  Local government elections India

    – जनविकास सेनेचे समर्थन

    प्रशासक राजवटीच्या निष्क्रियतेला वाचा फोडण्यासाठी शहर काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होत जनविकास सेनेने संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी समर्थन दिले.

  • Property tax arrears Chandrapur । चंद्रपूर मनपाचा इशारा : 10 मार्चला थकबाकीदारांची नावे होणार जाहीर

    Property tax arrears Chandrapur

    Property tax arrears Chandrapur : 1 लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या थकबाकीदारांना करभरणा करण्यास मनपाद्वारे 8 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली असुन 8 मार्चपर्यंत करभरणा न केल्यास 10 मार्च रोजी अश्या सर्व थकबाकीदारांची नावे सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केली जाणार आहेत.  

    चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना, पोलीस तक्रारीनंतर घटना उघडकीस

       शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते, परंतु सुविधांचा लाभ घेणारे अनेक जण कराचा भरणा करण्यासाठी चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठीच मनपाने थकीत कर वुसलीसाठी विशेष मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे.कर विभागातील अधिकारी कर्मचारी नागरिकांना समजावून सांगत असल्याने अनेक जणांनी कराचा भरणा केला आहे. Property tax defaulters list


       1 लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मनपाच्या अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे पाठपुरावा केला जात आहे.त्यांना यासाठी 8 मार्चची मुदतसुद्धा देण्यात आली आहे.मात्र याउपर करभरणा न केल्यास थकबाकीदारांची नावे विविध माध्यमातुन प्रसिद्ध केली जाणार आहे. Chandrapur municipal tax notice

       नावे प्रसिद्ध झाल्यानंतर जर कुणाची मानहानी झाली तर त्याला ते स्वतः जबाबदार राहणार असल्याचे चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे. या होणाऱ्या कारवाईमुळे ज्यांना या मोहिमेची कल्पना झाली आहे ते थकीतदार ऑनलाईन अथवा ऑफलाईन माध्यमातुन आपल्या कराचा भरणा करताना दिसत आहेत.तरी अश्या संभाव्य कारवाई टाळण्यासाठी आजच मालमत्ता कराचा भरणा करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. Chandrapur property tax payment

  • Tribal school visit | आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांनी घेतला डिजिटल शाळांचा अनुभव

    Tribal school visit

    Tribal school visit : जिल्हा नियोजन समिती चंद्रपूर मार्फत मुल्यमापन, सनियत्रंण व उपयुक्तता तपासणी योजनेच्या अनुषंगाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत येणाऱ्या शासकीय /अनुदानित एकलव्य आश्रम शाळेतील शिक्षकांकरीता एक दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. Teacher training Maharashtra

    पोलिसात तक्रार आणि समोर आलं भीषण सत्य

    आश्रम शाळेतील 41 शिक्षकांना जिल्ह्याबाहेरील उपक्रमशील शाळा दाखविण्यात आल्या. यात जिल्हा परिषद डिजीटल प्राथमिक शाळा खराशी (जि. भंडारा) व पीएमश्री जवाहरलाल नेहरु नगर परिषद शाळा गडचिरोली या शाळांना भेटी देण्यात आल्या. सदर शाळांमध्ये विविध नाविण्यपुर्ण उपक्रम घेतले जातात. भेटीदरम्यान शाळेतील विविध उपक्रमांचा शिक्षकांनी अनुभव घेतला. Maharashtra government schools

    यात दैनिक परीपाठ, डीजीटल अंगणवाडी, बोलके वर्ग व बोलके विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांची स्वयं अध्ययन क्षमता, शिक्षक अध्यापन पद्धती, डिजिटल यंत्राचा प्रत्यक्ष वापर, शाळेचे आनंददायी वातावरण, दप्तरविना शाळा, सुट्टीच्या दिवशीची शाळा, विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड यांचा समावेश होता. 

                 सदर शाळा भेटी दरम्यान प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी युवराव चव्हाण, महेश गिरडकर, प्रविण कुळसंगे, सुरेश श्रीरामे हे शिक्षकांसोबत उपस्थित होते.

    यावेळी प्रकल्प अधिकारी श्री. राचेलवार म्हणाले, शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी हा केंद्रस्थानी असतो. त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता शाळेत विविध शैक्षणिक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक असते. त्या दृष्टिने शिक्षकांना विविध नाविण्यपूर्ण उपक्रमाची भर मिळावी, त्याचा उपयोग विद्यार्थ्यांकरीता व्हावा हा उद्देश समोर ठेवून सदर शाळाभेटीचे आयोजन प्रकल्प कार्यालयामार्फत करण्यात आले होते.

    उपक्रमशील शिक्षकच एक गुणवत्तपुर्ण विद्यार्थी तयार करू शकतो. सदर शाळांना भेटी दरम्यान शाळेतील विविध नाविण्यपूर्ण उपक्रम, प्रगत विद्यार्थी, बोलके विद्यार्थी, विविध शैक्षणिक साहित्य, डिजिटल वर्ग यांचा अनुभव शिक्षकांना घेतला.  तेव्हा यांचा उपयोग आश्रम शाळेतील ‍विद्यार्थ्यांकरीता करता येईल व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी यामुळे मदत होईल.

     सदर अभ्यास दौऱ्याकरीता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकल्प अधिकारी यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे विशेष आभार मानले.

  • Love suicide | पोलिसांत तक्रार, अन् समोर आलं भीषण सत्य

    Love suicide

    Love suicide : ब्रह्मपुरी तालुक्यातील उचली शिवारात एका प्रेमीयुगुलाने वीज टॉवरला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रोहित रमेश लिंगायत (वय २५, रा. उचली) आणि एका १४ वर्षीय मुलीने आपली जीवनयात्रा संपवली. Couple suicide

    चंद्रपुरात वीज थकबाकीचा डोंगर

    प्रेमसंबंध आणि पळून जाणे:

    उचली येथील रोहित लिंगायत याचे चांदली येथील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. ती मुलगी भंडारा जिल्ह्यातील एका वसतिगृहात राहून नववीचे शिक्षण घेत होती. तिचे आई-वडील मजुरी करतात. काही दिवसांपूर्वी ती वसतिगृहातून घरी आली होती. तिचे वडील मजुरीला, तर आई घरकामात व्यस्त असताना रोहित २६ फेब्रुवारी रोजी सकाळी दुचाकीवर तिच्या घरासमोर आला. त्याने तिला घराबाहेर बोलावून दुचाकीवर बसवून पळवून नेले. आई-वडिलांनी तिच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो बंद आढळला. त्यामुळे त्यांनी ब्रह्मपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली. Teenage suicide

    आत्महत्या आणि ओळख:

    दरम्यान, उचली शिवारातील वीज टॉवरला अज्ञात युवक-युवतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे काही नागरिकांना आढळून आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. तपासादरम्यान, मृत प्रेमीयुगुलाची ओळख पटली. पोलिसांनी मृतकांच्या कुटुंबीयांना बोलावून पंचनामा केला. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करत आहेत.

    तपास आणि अधिक माहिती:

    • पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
    • दोघांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
    • पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
    • मुलीचे वय 14 वर्षाचे असल्याने, हे प्रकरण अत्याधिक गंभीर आहे.
  • Electricity bill arrears | चंद्रपुरात वीज बिल थकबाकीचा डोंगर

    Electricity bill arrears

    वीज कर्मचाऱ्यांवर हल्ला? 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास

    Electricity bill arrears : चंद्रपूर: मार्च महिन्यात वीज बिल थकबाकी वसुली मोहिमेला वेग येणार असून, महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी घराघरात जाऊन वसुली करतील. मात्र, मागील काही महिन्यांत वीज कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर महावितरणने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. (Electricity workers attacked)

    थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. तरीही, विजेच्या पुरवठ्यासंदर्भात लोक आक्रमक होऊन वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले करत आहेत, हे चिंतेचे कारण ठरत आहे. अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, हल्लेखोरांना दहा वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. Electricity Bill Payment

    वीज कर्मचाऱ्यांवरील हल्ले गंभीर गुन्हा

    महावितरणचे कर्मचारी हे शासकीय काम बजावत असतात. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करणे, सरकारी कार्यालयांची तोडफोड करणे, अथवा शासकीय कामात अडथळा आणणे, हे गंभीर गुन्हे आहेत. अशा प्रकरणांवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये कठोर कारवाई करण्यात येते.

    चंद्रपूर मनपाच्या पथकाला शिवीगाळ व धमकी, गुन्हा दाखल

    कायदेशीर तरतुदी:

    • कलम 353 – शासकीय कामात अडथळा आणल्यास फौजदारी कारवाई
    • कलम 332 आणि 333 – शासकीय कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ल्यासाठी कठोर शिक्षा
    • कलम 504 आणि 506 – कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि गैरवर्तन
    • कलम 427 – कार्यालयात जबरदस्तीने प्रवेश आणि मालमत्तेचे नुकसान
    • कलम 141, 143, 148 आणि 150 – अनधिकृत जमाव जमवणे व गोंधळ घालणे

    या गुन्ह्यांसाठी दोन ते दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

    कोट्यवधी रुपयांची थकबाकी

    चंद्रपूर जिल्ह्यात वीज ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असून, त्यातील मोठा वाटा शेती जोडण्यांचा आहे. सध्या शेतकऱ्यांची चालू बिले माफ झाली असली तरी, थकबाकीची वसुली महत्त्वाची आहे. Chandrapur electricity

    महावितरणचे आवाहन: वेळेवर बिल भरा

    महावितरणने स्पष्ट केले आहे की, थकबाकी वसुलीसाठी आलेले कर्मचारी केवळ त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. ग्राहकांनी वेळेवर वीजबिल भरून वीज खंडित होण्याची वेळ येऊ नये, याची खबरदारी घ्यावी. अखंडित वीजपुरवठ्यासाठी वेळेवर बिल भरणे अत्यावश्यक आहे, असे महावितरणने सांगितले आहे.

  • Obstruction of Government Work | चंद्रपूर मनपा पथकाला शिवीगाळ व धमकी

    Obstruction of Government Work

    Obstruction of Government Work : मालमत्ता व नळकर वसुली करणाऱ्या मनपा पथकास शिवीगाळ केल्या प्रकरणी राजीव गांधी नगर एकता चौक येथील संगीता किशोर भेलोंडे व इतरांवर भारतीय न्याय संहिता कलम 221 व 352 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रपूर महानगरपालिकेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांचा अश्लील शिवीगाळ करतांनाचा व्हिडीओ पुरावा म्हणुन सादर करण्यात आला आहे.  

    महिला पोलिसाची गैरवर्तणुक, 82 वर्षीय वृद्धाने पोलीस अधिक्षकाकडे केली तक्रार


       बुधवार 26 फेब्रुवारी रोजी मनपा कर वसुली पथक राजीव गांधी नगर, एकता चौक येथील संगीता किशोर भेलोंडे या थकबाकीदाराकडे कारवाई करण्यास गेले असता त्यांनी कर भरणा करण्यास नकार देऊन इतर लोकांच्या मदतीने मनपा पथकास शिवीगाळ करण्यास सुरवात केली. Chandrapur Police Complaint

    Property Tax Chandrapur

    कर भरणा न केल्यास 2 दिवसानंतर नळ कपात व मालमत्ता जप्त करण्याच्या सुचना त्यांना यापुर्वी देण्यात आल्या होत्या,मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करून मनपा कर्मचाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्यामुळे मनपातर्फे भारतीय न्याय संहिता कलम 221 व 352 नुसार गुन्हा दाखल करण्यास रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.


       कर भरणा करण्याचा शेवटचा महिना मार्च असल्याने थकबाकीदारांकडे मनपा कर वसुली पथकाद्वारे वसुली मोहीम राबविली जात आहे. करवसुली करिता महानगरपालिकेतर्फे 15 पथके नेमण्यात आली असुन प्रत्येक पथकाला दर दिवशी किमान 10 मालमत्ता धारकांवर कारवाई करण्याचे तसेच जप्तीसोबतच मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Water Tax Recovery Chandrapur

    त्यानुसार आतापर्यंत 60 नळ कनेक्शन खंडित करण्यात आले असुन 106 मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तरी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी त्वरित कराचा भरणा करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.