Author: Admin

  • Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana । “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आता 11 महिन्यांची – प्रशिक्षणार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!”

    Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana

    Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana ​ : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 महिने ऐवजी 11 महिने करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी 10 मार्च 2025 किंवा त्यापूर्वी आपले सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल, अशा प्रशिक्षणार्थींना उर्वरित पाच महिने कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या वाढीव 5महिन्यांच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार तसेच सद्यस्थितीत प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व योजनेचा नव्याने लाभ घेण्यास इच्छूक उमेदवारांची आधार पडताळणी व आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार, शैक्षणिक पात्रता, क्य, अधिवास प्रमाणपत्र इ.) तपासणी करणे आवश्यक आहे. CMYKPY eligibility criteria

    अटल योजनेचा निधी अडकला, आमदार जोरगेवार पोहचले मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला

    त्याचप्रमाणे योजनेच्या https://www.cmkpy.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील प्रतिज्ञापत्राचा नमुना प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांनी संबंधित सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्याकडे सादर करणे अनिवार्य आहे. यापुढे Aadhar Seeded DBT होऊ शकेल. त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी बैंक खाते Aadhar Seeding करून घ्यावी. तसेच ज्या आस्थापना या योजनेतंर्गत प्रशिक्षणार्थी घेण्यास इच्छूक आहेत, त्या आस्थापनांची शासन निर्णयानुसार कार्य प्रशिक्षणार्थी सामावून घेण्याची क्षमता आवश्यक कागदपत्रांची तपासणी/पडताळणी करूनच उमेदवारांना आस्थापनेवर रुजू करून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. CMYKPY stipend amount

    10 मार्च 2025 च्या शासन निर्णयानुसार आधार व कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थीना रुजू करून घेण्यात येणार नाही. प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांची आधार पडताळणी अनिवार्य आहे, ज्या बैंक अकाऊंटला आधार लिंक आहे, तोच बैंक अकाऊंट नंबर योजनेच्या विद्यावेतन DBT साठी नमुद करणे आवश्यक आहे. Skill development programs in Maharashtra

    प्रशिक्षणार्थ्यांच्या आधार पडताळणीची प्रक्रिया खालीलप्रमाणे :

    योजनेच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Intern Login Forgot password आधार नंबर, प्रविष्ट करणे. सेंड OTP Verify OTP The intern enters the received OTP Successful झाल्यानंतर password तयार करून आधारने Intern Login करून Profile अद्यावत करून घ्यावे.

    आधार पडताळणी झाल्याशिवाय पोर्टलवर हजेरी दर्शविता येणार नाही. प्रशिक्षणार्थी यांनी आधार पडताळणी करणे तसेच, आस्थापना/नियोक्ते यांनी कागदपत्रे तपासणीसाठी आपल्या जिल्ह्याचे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर यांच्याशी 30 एप्रिल 2025 पर्यंत संपर्क साधून आवश्यक ती तपासणी करून घ्यावी.

    याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.

  • Atal economic support scheme । “अटल योजनेचा निधी अडकलाय, शेतकऱ्यांची कामं खोळंबलीत – आमदारांचा आवाज बुलंद!”

    Atal economic support scheme

    Atal economic support scheme : चंद्रपूर ८ एप्रिल – चंद्रपूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी शासनाच्या अटल अर्थसहाय्य योजने अंतर्गत प्रकल्प उभारणीसाठी सादर केलेल्या मंजूर प्रस्तावांना चालू आर्थिक वर्षात तातडीने निधी वितरित करण्यात यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन केली. यावेळी त्यांनी संबंधित मागणीचे निवेदनही मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर केले.या भेटीप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण तालुकाध्यक्ष नामदेव डाहुले, मनोज पाल आदीची उपस्थिती होती. MLA demand for farmers scheme

    स्थानिक गुन्हे शाखेने पकडला ५ लाखांचा सुगंधित तंबाखू

    चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण १५ सहकारी संस्थांनी प्रत्येकी ५ लाख रुपये गुंतवणूक करून अटल अर्थसहाय्य योजनेअंतर्गत शेती उपयोगी प्रकल्पांसाठी सहकार विभागाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. सर्व संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह त्रुटींची पूर्तता पूर्ण केली असूनही अद्याप निधी मिळालेला नाही.

    विशेष म्हणजे, स्कॉर्पिओ, ट्रक यांसारख्या वाहनांसाठी निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र अर्थमूव्हर्स सारख्या शेतीसाठी उपयुक्त वाहनांना या योजनेच्या लाभातून वगळण्यात आले आहे. अर्थमूव्हर्स वाहनांचा शेतीतील पाट काढणे, तळी साफ करणे, समांतर करणे, गाळ काढणे यांसारख्या अवजड कामांमध्ये उपयोग होतो. तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रस्तावांना अंतिम मंजुरी दिली गेलेली नाही. Atal Yojana Maharashtra

    mla demand for farmers scheme

    या अन्यायामुळे सहकारी संस्थांवर ताण आला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित हस्तक्षेप करून मंजूर प्रस्तावांवरील निधी वितरित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केली. यावेळी मतदार संघातील विविध विकासकामांवर सुद्धा चर्चा करण्यात आली असून प्रलंबित असलेले विकास कार्यांना मंजुरी देण्याची मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. 

  • police action on tobacco । चंद्रपुरात “सुगंधित तंबाखूचा साठा उध्वस्त, जयसुख-गुप्ता-वसीम अजूनही मोकाट!”

    Chandrapur police action on tobacco

    चंद्रपूरमध्ये पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरू तंबाखूचा ‘मौत का व्यापार’!

    police action on tobacco : चंद्रपूर ८ एप्रिल – विदर्भात मोठ्या प्रमाणावर सेवन केला जाणारा खर्रा हा सुगंधित तंबाखू मिसळून तयार केला जातो. या तंबाखूचा अवैध व्यापार चंद्रपूर जिल्ह्यात जयसुख, वसीम आणि गुप्ता या तिघांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरु ठेवला आहे. कोरोना काळानंतर या तिघांनी जिल्ह्यात आपल्या अवैध धंद्याचं वर्चस्व निर्माण केलं असून, पोलिसांच्या कारवाईलाही हे तिघे भीक घालत नाहीत. विशेष म्हणजे, अजूनही यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. illegal tobacco warehouse raid

    महावितरणच्या विजेत्यांची नावे जाहीर

    या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांकडून सुगंधित तंबाखूच्या तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिम राबवली जात आहे. ८ एप्रिल रोजी बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे स्थानिक गुन्हे शाखेने किरायाच्या गोडावूनवर छापा टाकून ईगल हुक्का, होला हुक्का आणि मजा १०८ ब्रँडच्या तंबाखूचा ५ लाख ६ हजार ९१० रुपयांचा साठा जप्त केला.

    सदर तंबाखूचा साठा हरीश अंबाराम ठक्कर याचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. tobacco smuggling network busted in Chandrapur

    ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, मधुकर सामलवार, तसेच पो. का. धनराज करकाडे, सुरेंद्र महतो, चेतन गज्जलवार, प्रफुल गारघाटे व मिलिंद टेकाम यांनी केली.

    सद्यस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखूचा अवैध व्यापार जयसुख, वसीम व गुप्ता यांच्या माध्यमातून बेधडक सुरू आहे. पोलिसांनी जर या मुख्य सूत्रधारांवर निर्णायक कारवाई केली, तर युवकांना कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराकडे नेणारा सुगंधित तंबाखू जिल्ह्यातून नामशेष होऊ शकतो.

  • Caste Validity Certificate Chandrapur । डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चंद्रपुरात विशेष अभियान!

    Caste Validity Certificate Chandrapur

    Caste Validity Certificate Chandrapur : ७ एप्रिल २०२५ चंद्रपूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 11 एप्रिल ते 1 मे या कालावधीत सामाजिक न्याय पर्व अभियान अंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपुर मार्फत विशेष मोहिमेव्दारे जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. तसेच त्रुटीपूर्तता व अर्ज सुध्दा स्वीकारण्यात येईल.

    महावितरण लकी ड्रॉ योजनेचे विजेते जाहीर, पहा यादी

                सत्र 2024-25 मध्ये प्रवेशित इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील (12th Science Caste Certificate Verification) ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपावेतो जात प्रमाणपत्र पडताळणी करीता अर्ज दाखल केलेला नाही. तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमास सीईटी देऊन 2025-26 मध्ये प्रवेश घेऊ इच्छीत असणा-या (तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाचे अंतिम वर्षाला प्रवेशीत असणारे ज्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे थेट व्दितीय वर्षाला प्रवेश घ्यावयाचे आहे) विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय पर्वाच्य विशेष मोहिमेत सहभागी व्हावे व जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन घ्यावी.

               15 ते 17 एप्रिल व 21 ते 25 एप्रिल 2025 दरम्यान त्रुटीपुर्तता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता अर्ज दाखल केले आहे, परंतु अपुर्ण पुराव्याअभावी ज्यांची प्रकरणे त्रुटीमध्ये आहेत, त्यांनी वरील दिनांकास किंवा त्यापुर्वी सादर केलेल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्यावी, असे समितीचे उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी कळविले आहे.

  • Mahavitaran lucky draw winners list । महावितरणचा लकी ड्रॉ: विजेत्यांची नावे जाहीर!

    Mahavitaran lucky draw winners list

    Mahavitaran lucky draw winners list : चंद्रपूर:- महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा पहिला लकी ड्रा ऑनलाईन पध्दतीने दि. ७ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात आला. या लकी ड्रॉतून पहिल्या क्रमांकाचे 29 तर दुसऱ्या क्रमांकासाठी 58 व तिसऱ्या क्रमांकासाठी 58 विजेते जाहिर करण्यात आले. विजेत्या ग्राहकांची यादी महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. Mahavitaran lucky draw first prize winners

    चंद्रपुरात भारतीय जनता पार्टीच्या भवनासाठी एक एकर जागा देणार, आमदार जोरगेवार यांची घोषणा


    प्रत्येक उपविभाग स्तरावर एक या प्रमाणे पहिल्या क्रमांकाकरिता 29 विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन बक्षिस म्हणून दिले जात आहे. तर प्रत्येक उपविभागात प्रत्येकी दोन प्रमाणे दुसऱ्या क्रमांकासाठी 58 विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन व प्रत्येकी दोन प्रमाणे तिसऱ्या क्रमांकासाठी 58 विजेत्या ग्राहकांना स्मार्ट वॉच बक्षिस म्हणून दिले जात आहे. यापुढील लकी ड्रॉ मे व जून २०२५ या महिन्यात काढण्यात येईल.


    महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीन पेक्षा अधिक वीज बिले ऑनलाईन पध्दतीने भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे.


    ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (एल टी- लाईव्ह) वीजग्राहकांसाठी लागू असून, ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळास www.mahadiscom.in भेट द्यावी. (How to check Mahavitaran lucky draw results)
    ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पध्दतीने वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पध्दतीने वीज बिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. Mahavitaran lucky draw prizes

    ग्राहकांना देय रक्कमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. परिणामी सध्या राज्यात ७० टक्के हून अधिक वीज ग्राहक ऑनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे.


    या योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळास www.mahadiscom.in भेट द्यावी. जनसंपर्कअधिकारी, महावितरण, चंद्रपूर

  • Maharashtra public service rights । विनय गौडा यांचे निर्देश – 90% तक्रारींचे निवारण अनिवार्य

    Maharashtra public service rights

    Maharashtra public service rights : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत नागरिकांना विहित मुदतीत व कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व शासकीय विभागांनी लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले. Maharashtra citizen services act

    संसदेतून थेट जनतेच्या दरबारात

    नियोजन भवन येथे आज (दि.7) आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, शासकीय कार्यालयांनी त्यांच्याकडे प्रलं‍बित असलेल्या तक्रारी निकाली काढून त्याचा अहवाल सादर करावा. लोकसेवा हक्क आयोगाद्वारे विहित केलेल्या नमुन्यात सुचना फलक सर्व कार्यालयांनी दर्शनी भागात प्रकाशित करावे. या कायद्याविषयी नागरिकांना माहिती होण्यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसार मोहीम राबवावी.

    जिल्ह्यातील पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात मॉडेल ‘आपले सरकार सेवा केंद्र’ उभारावेत. त्यात  सर्व प्रकारच्या अधिसूचित सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी  मिळणे अपेक्षित आहे. ज्या सेवा ऑनलाईन आहेत, त्या ऑनलाईन पध्दतीनेच देण्यात याव्या. तसेच संबंधित विभागाने त्यांच्याकडे असलेल्या एकूण तक्रारींपैकी 90 टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारी निकाली काढणे बंधनकारक आहे, याची सर्व विभाग प्रमुखांनी नोंद घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.

    बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.

  • Pratibha Dhanorkar news । संसदेतून थेट जनतेच्या दरबारात: प्रतिभा धानोरकर यांची समस्या निवारणासाठी तत्परता!

    Pratibha Dhanorkar news

    Pratibha Dhanorkar news : लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच खासदार प्रतिभा धानोरकर या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पुढे आल्या असून त्यांच्या माध्यमातून आज दि. 07 एप्रिल रोजी वरोरा येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.

    चंद्रपूर बस स्थानकावर शिवाई बसने चिरडला ऑटो चालकाचा पाय

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जनतेच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे मत वरोरा येथील आयोजीत जनता दरबाराच्या वेळीस केले. अर्थ संकल्पीय अधिवेशनात आपल्या लोकसभेतील अनेक प्रश्नांचा पाढा केंद्र सरकार समोर वाचून आता त्या पुन्हा एकदा जनसेवेत रुजू झाल्या आहेत.

    वरोरा येथे आयोजित जनता दरबारात अनेक नागरिकांच्या समस्यासंदर्भात त्यांनी निराकरण केले. अनेक नागरिकांनी आज आयोजित जनता दरबारात लेखी निवेदनासह खासदार धानोरकर यांच्याकडे समस्या मांडल्या. या संदर्भात खासदार धानोरकर यांनी अनेक समस्यांच्या निराकरणासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून नागरीकांच्या समस्या सोडविल्या.

    यावेळी, खासदार धानोरकरांनी प्रत्येक नागरीकांची समस्या ही माझ्याकडून सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्न केले जाईल अशे आश्वासित मत व्यक्त केले. येणाऱ्या काळात प्रत्येक तालुक्यात तसेच, जिल्हा परिषद क्षेत्रात जनता दरबाराचे आयोजन करुन नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले. 

  • Chandrapur bus stand accident | चंद्रपूर बसस्थानकात भीषण अपघात – ऑटोचालकाचा पाय चाकाखाली, गंभीर जखमी

    Chandrapur bus stand accident

    Chandrapur bus stand accident चंद्रपूर शहरातील मुख्य बसस्थानकात प्रवेश करत असलेल्या बसच्या चाकाखाली आल्यामुळे एक ऑटोचालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत त्याला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज, रविवार दुपारी सुमारे १२.१० वाजता घडली. गंभीर जखमी झालेल्या ऑटोचालकाचे नाव नानाजी मेश्राम (वय ५७), रा. बाबूपेठ असे आहे. state transport bus accident

    चंद्रपुरातील भाजप भवनासाठी आमदार जोरगेवार देणार 1 एकर जमीन

    चंद्रपूर हे जिल्हा मुख्यालय असल्याने येथे राज्यातील अनेक शहरांमधून एसटी बसांचे नियमित आगमन असते. या पार्श्वभूमीवर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून १२.०७ कोटी रुपये खर्चून आधुनिक सुविधांनी सुसज्ज बसस्थानकाचे बांधकाम करण्यात आले आहे. बसस्थानकाच्या बाहेर ऑटो पार्किंगसाठी आणि प्रवाशांना घेण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र ऑटोस्टँड उभारले आहे. या ऑटोस्टँडवर ऑटोचालक आपली वाहने लावून, आपला नंबर आल्यावर प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थळी नेतात.

    आज दुपारी नागपूर इमामवाडा डेपोची शिवाई-ई बस (क्रमांक MH 49 Z 4668) नागपूर येथील चालक सुरज नेवारे बसस्थानकात प्रवेश करत असताना प्रवेशद्वाराबाहेर ही दुर्घटना घडली. बसचा पुढचा उजवा चाक मेश्राम यांच्या पायावरून गेल्यामुळे त्यांच्या जांघेपासून पायापर्यंत गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमीला रुग्णालयात रवाना केले. auto rickshaw accident news

    घटनास्थळी उपस्थित इतर ऑटोचालकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. बसस्थानकातील वाहतुकीच्या अयोग्य नियोजनामुळे हे अपघात घडत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांनी असेही सांगितले की, संबंधित बस चालक खूप वेगात बस घेऊन येत होता, त्यामुळे मेश्राम यांचा पाय चाकाखाली आला.

    अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बसचालक सुरज नेवारे यांना रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आणि त्यांनी तिथे अपघाताची नोंद केली.

    – अंकुश खाडिलकर,
    डिपो मॅनेजर, चंद्रपूर डिपो

  • sudhir mungantiwar on gharkul yojana sand । रेतीचा प्रश्न सोडवणार! मुनगंटीवारांचा पुढाकार; 3,528 घरकुलांची कामे मार्गी लागणार?

    sudhir mungantiwar on gharkul yojana sand

    sudhir mungantiwar on gharkul yojana sand : घरकुल योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, ग्रामीण व शहरी गरजू कुटुंबांना घराची सोय व्हावी यासाठी ही योजना राबवली जाते. मात्र, पोंभुर्णा तालुक्यातील अनेक घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध न झाल्यामुळे घरबांधणीच्या कामात विलंब होत आहे. घरबांधणीसाठी आवश्यक असलेली रेतीची अडचण सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. Free sand for rural housing

    चंद्रपुरात भाजप भवनासाठी आमदार किशोर जोरगेवार देणार १ एकर जमीन

    राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन विस्तृत चर्चा करण्यात येईल. चर्चेतून लाभार्थ्यांना अधिक सुलभतेने रेती मिळण्याचा मार्ग मोकळा होईल आणि पोंभुर्णा तालुक्यातील रेती आणि घरकुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. Sudhir Mungantiwar sand distribution

    पोंभूर्णा तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यासंदर्भात वनविश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी खासदार अशोक नेते, तहसीलदार पोंभुर्णा रेखा वाणी, गट विकास अधिकारी पंचायत समिती पोंभुर्णा विवेक बेल्लारवार, भाजपा प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, सुलभाताई पिपरे,हरिभाऊ ढवस, विनोद देशमुख,राहुल संतोषवार,रोशन ठेंगणे, रवी मरपल्लीवार,राहुल पाल,अजित मंगळगिरीवार, दर्शन गोरंटीवार, ऋषी कोटरंगे, रवी गेडाम, तुळशीराम रोहनकर, बंडु बुरांडे,विस्तार अधिकारी प्रणय गरमडे, उप अभियंता प्रदीप बाराहाते आदिंची उपस्थिती होती.

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अर्ज केल्यानंतर 15 दिवसाच्या आत रेती उपलब्ध करून द्यायचा निर्णय केला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी वेळेत होत नाही. पोंभूर्णा तालुक्यातील 3,528 अपूर्ण घरकुल पूर्ण करण्याकरिता 17 हजार 640 ब्राॅस रेतीची आवश्यकता आहे. घरकुलांना रेती उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात आली असून काही अंशी रेती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

    घरकुल लाभार्थ्यांनी छोटे-छोटे घाट आरक्षित करून प्रत्येक गावातील घरकुलांना लागणारी रेती तहसीलदार आणि तलाठी यांच्या निरीक्षणात न्यायची. असा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग करून आपण घरकुलांना मोफत रेती उपलब्ध करून द्यायची. रेती मिळण्यास येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याशी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येईल. पोंभुर्णा तालुक्यातील रेती आणि घरकुलाच्या प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही ते म्हणाले.

    त्यासोबतच, पोंभुर्णा तालुक्यामध्ये पाणीपुरवठ्याच्या 32 योजना कार्यान्वित आहे. ज्या गावांमध्ये फ्लोराइड युक्त आणि दूषित पाणी आहे त्याची माहिती घ्यावी. पाणीटंचाईमध्ये ट्युबवेल, विहिरी, सोलर पंप लावून पाण्याच्या योजना आखण्यात येईल, असे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

  • kishor jorgewar land donation । “भाजप भवनासाठी एक एकर स्वतःची जमीन देणार – आमदार जोरगेवार यांची भावनिक घोषणा!”

    kishor jorgewar land donation

    kishor jorgewar land donation : जेव्हा पक्ष नव्हता, सत्ता नव्हती आणि संधीसुद्धा नव्हती, अशा काळात या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यांनी केवळ विचारांवर विश्वास ठेवून, रात्रंदिवस झटून पक्षाचे बीज रुजवले. त्यांच्या निष्ठा, समर्पण आणि निःस्वार्थ सेवेमुळेच आज भारतीय जनता पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. आज पक्षाच्या स्थापना दिनी होत असलेला ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान केवळ औपचारिकता नाही, तर ही आपल्या अंतःकरणातील कृतज्ञतेचे खरे प्रतीक आहे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त, भारतीय जनता पक्ष चंद्रपूर विधानसभा विभागाच्या वतीने श्री माता कन्यका सभागृहात ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पक्षाच्या शेकडो ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार जोरगेवार बोलत होते. BJP senior workers honor ceremony

    Kishor jorgewar announcement

    मराठीसाठी चंद्रपुरात मनसेचा रणसंग्राम

    यावेळी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर (hansraj ahir), भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस, ज्येष्ठ नेते रमेशचंद्र बागला, विजय राऊत, माजी महानगराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश देवतळे, अशोक जिवतोडे, अजय जयस्वाल, तुषार सोम, रघुवीर अहिर, मनोज पाल, राजेंद्र अडपेवार, माजी नगरसेवक देवानंद वाढई, माजी नगरसेविका वनिता डुकरे, वंदना हातगावकर, सविता दंढारे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

    यानंतर बोलताना आ. जोरगेवार म्हणाले, पक्षासाठी निष्ठेने आणि समर्पण भावनेने काम करणाऱ्या आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा हा पवित्र प्रसंग आहे. या माध्यमातून पक्षाच्या वाटचालीत योगदान दिलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आदरभावनेचा नम्र नमस्कार करण्याचा हा सोहळा आहे. भारतीय जनता पक्ष ही केवळ राजकीय संघटना नसून एक विचारधारा आहे. Political leaders honoring ceremony​

    राष्ट्रवाद, पारदर्शक प्रशासन, विकासाची निष्ठा आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा निर्धार, या विचारधारेचे बीज आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पेरले, जपले आणि रुजवले. त्यांच्यामुळेच आज पक्ष देशात आणि राज्यात बळकटपणे उभा आहे. पक्षासाठी केवळ निवडणुकीत नव्हे, तर प्रत्येक संकटात, प्रत्येक लढ्यात खंबीरपणे उभे राहणारे हे ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्यासाठी आदर्श आहेत. BJP foundation day celebrations

    भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस हा संघर्ष, समर्पण आणि निष्ठेची आठवण करून देणारा दिवस आहे. आज आपण ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करतो आहोत. ते केवळ कार्यकर्ते नसून पक्षाच्या मूळ पाया आहेत. त्यांनी पक्ष नसताना झेंडा घेतला, जनतेपर्यंत विचार पोहोचवले, अनेक वेळा संघर्ष केला. त्यांचे योगदान कधीही शब्दांत मावणारे नाही. सत्ता असो वा नसो, कार्यकर्त्यांनी पक्षासाठी खांद्याला खांदा लावून काम केले आहे. त्यांचा समर्पणभाव खरोखर वंदनीय आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. Veteran BJP workers felicitation

    यावेळी बोलताना राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी ज्येष्ठ कार्यकर्ते हे पक्षाची खरी ताकद आहेत. त्यांच्या त्यागातूनच हा पक्ष उभा राहिला आहे व पुढे जात आहे, असे सांगितले. तर ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांनी आयोजनाचे कौतुक करताना जनसंघापासूनच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. आणीबाणीच्या काळात कारागृह सोसले. हाच पक्ष जुन्या कार्यकर्त्यांच्या विचारांवर उभा राहिला आहे. हा पक्ष नेत्यांचा नसून कार्यकर्त्यांचा असल्याचे सांगितले.

    यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना भोजनासाठी मानाच्या पंगतीत बसवून आदरभाव व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाईव्ह संबोधन कार्यकर्त्यांना दाखवण्यात आले. पक्षाचा झेंडा लहरवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. स्वर्गवासी कार्यकर्त्यांना यावेळी नमन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्याम हेडाऊ यांनी केले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. BJP foundation day celebrations

    पक्षाच्या भवनासाठी एक एकर जागा – आमदार किशोर जोरगेवार यांची घोषणा
    भाषणात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, शहरात पक्षाचे कार्यक्रम घेण्यासाठी स्वतःच्या हक्काचे भवन नाही, ही खंत आहे. त्यामुळे मी स्वतःच्या मालकीची एक एकर जागा भारतीय जनता पक्षाच्या भवनासाठी देण्याची घोषणा करतो. यामध्ये कार्यकर्त्यांच्या निवासाचीही सोय करू असे ते म्हणाले.