Karale Master गुरू गुरनुले मूल :- स्पर्धेत यशस्वी व्हायचे असेल, तर पहिले माणूस बना आणि जिद्द चिकाटी परिश्रम घेऊन अभ्यास करा आणि आपल्या आवडीनुसार शिक्षण घ्या असा मौलिक सल्ला राज्यातील प्रसिदध वक्ते नितेश कराळे सर यांनी विदयार्थ्यांना दिला.
मुल संतोष सिंह रावत मित्र परिवाराच्या वतीने आयोजित गुणवंत विदयार्थी गौरव सोहळा व विदयार्थी मेळाव्या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते विद्यार्थ्यांसमोर हसत खेळत स्वतःचे जिवंत उदाहरण देत बोलत होते.
Karale Master मूल येथील कर्मवीर कन्नमवार सभागृहात शुक्रवारी क्रांती दिना निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उदघाटन गांडवाना विदयापीठाचे निवृत्त संचालक डॉ.एन.एस.कोकोडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत होते.प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल वैरागडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार,उपसभापती राजेंद्र कन्नमवार,संचालक घनश्याम येनूरकर,कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष गुरू गुरनूले, सामाजिक कार्यकर्त्या ममता रावत यांची उपस्थिती होती.
महत्त्वाचे : वाहतुकीचे नियम पाळा – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन
सरस्वती पुजन,दीपप्रज्वलन व शारदा स्तवन गायनानंतर कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी बोलताना नितेश कराळे म्हणाले,विदयार्थ्यांनी निष्ठा आणि माणूसकी निर्माण केली पाहिजे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल,तर शिक्षणाशिवाय आणि परिश्रमाशिवाय पर्याय नाही. शेती करा आणि शेतीला पुरक व्यवसायाची जोड दया. अपयश हे यशाची पहिली पायरी आहे. संकटातून यशाचा मार्ग सापडतो. असे मौलिक मार्गदर्शन त्यांनी विदयार्थ्यांना केले. त्यांच्या प्रत्येक वाक्याला विदयार्थ्यांनी टाळया वाजवून तेवढीच दाद दिली.
कोणतीही गोष्ट बलिदानाशिवाय मिळत नाही.संगणकाचा शोध विदर्भातील एका गरीब शेतकऱ्यांच्या मुलानेच लावला. कष्टाने विद्वत्ता निर्माण करता येते ,असे प्रतिपादन उदघाटक डॉ.एन.एस.कोकोडे यांनी उद्घघाटन प्रसंगी व्यक्त केले.
अवश्य वाचा : चंद्रपुरात लवकर सुरू होणार हवाई सेवा
समारंभाचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी विदयार्थ्यांनी सकारात्मक विचार मनात ठेवून अभ्यास केल्यास याशाची पायरी चढता येते. असे शेरो शायरी मधून मत व्यक्त केले. याप्रसंगी संतोष सिंह रावत मित्र परिवाराच्या वतीने नितेश कराळे, डॉ.कोकोडे, अॅड.अनिल वैरागडे यांचा शाल श्रीफळ,स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पोलिस उपनिरिक्षक पदाची परिक्षा उत्तीर्ण झालेल्या कविता कुमरे या विदयार्थीनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
तालुक्यामधून प्रथम,द्वितीय आणि तृतीय आलेल्या दहावी, बारावी आणि पदवीच्या परिक्षेतील २२ गुणवंत विदयार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल शेरकी यानी केले. संचालन संयोजक संजय पडोळे यांनी केले तर आभार सहसंयोजक गुरू गुरनूले यांनी मानले.कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने विदयार्थी, पालक,महिला नागरिक व संतोष सिंह रावत मित्र परिवार समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.
वर्तमानपत्राचे महत्व :- वर्तमानपत्राच्या वाचनाअभावी मी स्पर्धा परिक्षेत कमी पडलो. त्यामुळे नितेश कराळे यानी आवर्जून उपस्थित विदयार्थ्यांना वर्तमानपत्र वाचनाचे महत्व सांगितले. वर्तमानपत्रातून आपल्याला राष्टीय ,आंतरराष्टीय,क्रीडा आणि महत्वाच्या घडामोडी माहित होतात. सामान्य ज्ञान हे वर्तमानपत्रातून नियमित मिळत असते.तसेच कराळे यांनी विविध महत्वाच्या घडामोडी आणि स्पर्धा परिक्षेची तयारी कशी करावी हे त्यांनी आपल्या मार्मिक देह बोलीतून विदयार्थ्यांना सांगितले.

Leave a Reply