Chandrapur breaking news : आरतीची हत्या करण्यासाठी समाधान ने ऑनलाइन मागवला चाकू

Samadhan koli

Chandrapur breaking news 26 जून रोजी जगप्रसिद्ध आनंदवन येथे आरती चंद्रवंशी या तरुणीची हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली होती, या घटनेनंतर पोलीस व आनंदवन प्रशासन चांगलेच हादरले होते.

दुसऱ्या दिवशी वरोरा पोलिसांनी एका युवकाला अटक केली, सदर हत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याचे निष्पन्न झाले, आरोपी समाधान कोळी व आरती दोघांचे प्रेमप्रकरण होते, मात्र आरती हिने लग्नाला नकार दिला तेव्हापासून समाधान असमाधानी झाला.

Chandrapur breaking news त्याने बदला घेण्याचे ठरविले, मार्च महिन्यात त्याने फ्लिपकार्ट वरून ऑनलाइन चाकू मागविला, चाकू आला, समाधान हा संधी शोधत होता, अखेर 26 जून ला ती संधी चालून आली.

आरती चे आई-वडील सेवाग्राम ला गेले, घरी कुणी नसल्याची चाहूल लागल्यावर समाधान आरती च्या घरी गेला, दोघात लग्नावरून भांडण झाले, आरती चे दुसऱ्या युवकासोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याची माहिती समाधान ला मिळाली होती.

अवश्य वाचा : समाधान च्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं?

Chandrapur breaking news समाधान ने आरती वर अत्याचार करीत तिच्यावर चाकूने वार केले, या हल्ल्यात आरती चा मृत्यू झाला, आरतीचे आई-वडील घरी आले तेव्हा सदर प्रकार उघडकीस आला, पोलिसांना याबाबत माहिती दिली, तपास सुरू केल्यावर दुसऱ्या दिवशी आरोपी समाधान ला अटक करण्यात आली.

आरोपी समाधान ला न्यायालयाने 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली, मात्र 30 जून रोजी जोड्याच्या लेस ने समाधान ने पोलीस कोठडीमधील बाथरूम मध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

Chandrapur breaking news समाधान तर गेला मात्र त्याने वरोरा पोलिसांना चांगलेच गोत्यात आणले, पोलीस अधीक्षक वरोरा येथे पोहचले तपास सुरू झाला, आरोपीच्या आत्महत्येप्रकरणी चूक कुणाची यावर सखोल चौकशी झाली.

https://ads.timesdiginews.com/2024/06/chandrapur-shocking-news-police-case/

पोलीस अधीक्षकांनी तात्काळ तिघांना निलंबित केले अशी माहिती पुढे आली असून यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे अशी माहिती पुढे आली आहे.

प्रेमात धोका मिळाल्याने समाधान कोळी यांनी बलात्कार, हत्या व नंतर आत्महत्या असे गंभीर गुन्हे केले, सध्या पुढील तपास CID कडे वर्ग करण्यात आला आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *