MP Pratibha Dhanorkar : संविधानाचा जयघोष प्रतिभा धानोरकर यांनी घेतली खासदारकी ची शपथ

Pratibha dhanorkar

MP Pratibha Dhanorkar चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेसह भारतात सर्वच ठिकाणी लोकसभेच्या निवडणूक पार पडून खासदार म्हणून अनेक पक्षाचे नेते  निवडून आले. त्यात कॉग्रेसच्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार म्हणून प्रतिभा धानोरकर निवडून आल्या. त्यांनी आज संसदेच्या नविन इमारतीत आपल्या सदस्य पदाची शपथ घेतली.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार पदी प्रतिभा धानोरकर ह्या भरघोस मतांनी निवडून आल्या. त्यांनी जनतेच्या अनेक कामांना सुरुवात देखील केली. त्यांच्या कार्याची खरी सुरुवात आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजून 13 मिनीटांनी शपथ घेऊन झाली.

अवश्य वाचा : कांग्रेस नेत्याने चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकाराला दिली जीवे मारण्याची धमकी

MP Pratibha Dhanorkar निवडणूकी दरम्यान देखील संविधान वाचविण्याची शपथ घेणाऱ्या धानोरकर यांनी नविन संसद भवनात नतमस्तक होऊन प्रवेश केला व आपल्या पदाची शपथ घेऊन जह हिंद जय संविधान चा नारा देऊन आपली लढाई हि लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी असेल असे देखील सांगितले. संसद भवनाच्या नविन इमारतीत आज अनेक खासदारांनी आपल्या सदस्य पदाची शपथ घेतली. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील मराठी भाषेतून शपथ घेऊन मराठा भाषेचा सन्मान जागविला.

अवश्य वाचा : वेकोली मध्ये तुकडेबंदी कायद्याची अवहेलना

भविष्यात संविधानाच्या रक्षणासाठी संसदेत आज बुलंद करणार असून आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी सदैव कटिबध्द असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी पुनःश्च एकदा जनतेचे आभार मानून मी माझ्या नव्या राजकीय जीवनाला सुरुवात करीत असल्याचे सांगितले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *