Police Bharti 2024 : पोलीस भरतीसाठी मोठी अडचण, गृह विभागाने ठेवली मोठी अट

Home ministry new rule

Police Bharti 2024 राज्यात 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत असून यासाठी राज्यभरातून तब्बल 17 लाख 76 उमेदवारांनी अर्ज केले आहे, मात्र आता या भरती प्रक्रियेत गृह विभागाने नवी अट ठेवल्याने उमेदवारांना नुकसान होण्याची चिन्हे आहे.

News :  मोफत शिक्षणाचा अधिकार, RTE प्रवेश प्रक्रिया सुरू

Police Bharti 2024 पोलिस भरतीसाठी एक नवीन नियम आणला आहे. हा नियम उमेदवारांसाठी अडचणीचा ठरणार आहे. पोलिस भरतीसाठी आता एक जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अर्ज भरले होते. पोलीस प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर गृह विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

का घेतला निर्णय

 

Police Bharti 2024 राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत अनेकांनी वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी अर्ज केले आहेत. परंतु आता त्यांना एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठी हमीपत्र द्यावे लागणार आहे. उमेदवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्यामुळे भरती प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहतात. कारण एका उमेदवाराची दोन जिल्ह्यात निवड झाल्यास तो सोयीचा जिल्हा निवडतो. परंतु दुसऱ्या जिल्ह्यातील जागा रिक्त राहते. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. प्रशासनाच्या लक्षात ही बाब आल्यामुळे एकाच जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची अट करण्यात आली आहे.

 

आता १७ मे पर्यंत द्यावा लागणार अर्ज

ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जिल्ह्यात अर्ज केले आहेत, त्यांना हमीपत्र द्यावे लागणार आहे. एकापेक्षा जास्त जिल्ह्यात केलेले अर्ज नियमबाह्य ठरवण्यात येणार आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांनी याबाबत आदेश जारी केली आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या वास्तव्याच्या जिल्ह्यातील पोलिस कार्यालयात १७ मे २०२४ पर्यंत हे हमीपत्र देणे आवश्यक आहे.

 

Police Bharti 2024 आता उमेदवाराच्या केवळ एकाच अर्जाला प्राधान्य दिले जाईल. हमीपत्रात उमेदवाराने कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे त्याचा तपशील द्यावा लागणार आहे. तसेच त्याने किती अर्ज केले आहेत आणि ते कुठे कुठे केले ही माहिती द्यावी लागणार आहे. तसेच एका पदासाठी केवळ एका अर्जालाच प्राधान्य देण्याची हमी त्यास द्यावी लागणार आहे.

अवश्य वाचा : ताडोबा जंगलात पर्यटकावर कारवाई

भरतीसाठी डॉक्टर, एमबीए उमेदवारांचे अर्ज

पोलीस भरतीसाठी डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए, वकील, एमएस्सी, बी-टेक, बीबीएचे शिक्षण घेतलेले उच्चशिक्षितांचे अर्ज आले आहेत. 17 हजार 471 पदांसाठी राज्यभरातून 17 लाख 76 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सरकारी नोकरी आणि बेरोजगारीमुळे हे अर्ज केले आहेत.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *