Maharashtra labor registration centers । ⚠️ “खाजगी दलालांपासून सावध! कामगार नोंदणीसाठी फक्त या अधिकृत केंद्रांशीच संपर्क करा!”

Maharashtra labor registration centers

Maharashtra labor registration centers : चंद्रपूर – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतणीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ, हे संगणकीकृत प्रणालीव्दारे अदा केले जातात. अर्ज केल्यावर सर्व कागदपत्रांची छाननी / तपासणीअंती सदरचे लाभ हे थेट बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा करण्यात येते. construction workers welfare schemes

चंद्रपुरात मौजमजा करण्यासाठी गंभीर गुन्हे

मात्र सदरची कामे करून देण्याबाबत काही खाजगी व्यक्ती कामगारांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांनी अशा आमिष अथवा दबावास बळी पडू नये. अशा बाबी निदर्शनास आल्यास तातडीने जवळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अथवा जिल्हा कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा.

कामगारांना नोंदणी, नुतणीकरण तसेच विविध योजने अंतर्गत लाभाचे अर्जाबाबत काही शंका /अडचण असल्यास खालील तालुका सुविधा केंद्राशी संपर्क साधावा.

  1. तालुका सुविधा केंद्र, प्रशासकिय इमारत, तळ मजला चंद्रपूर, 2. सोमानी कॉम्प्लेक्स, जी.एन. कॉलेज जवळ, बामणी, बल्लारपूर, 3. नालमवार बिल्डिंग, शिंदे पेट्रोल पंपाच्या मागे, पोस्ट ऑफिस समोर, भद्रावती, 4. व्यंकटेश नगरी, दत्त नगरी गेट समोर, धनश्री नाकाडे हॉस्पिटल रोड ता. ब्रम्हपुरी, 5. आर.टी.एम. कॉलेज समोर, मारूती सुझुकी शोरूमच्या मागे, कानपा रोड, वडाळा पयकू, चिमूर, 6. अभ्यार्लावार कॉम्प्लेक्स, वार्ड नं 7, राममंदिर गेट जवळ, अहेरी रोड, गोंडपिपरी, 7. एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर, सेनगाव रोड, जिवती, 8. बाजारवाडी रोड, बस स्टँड जवळ, सतीश मेडीकल समोर, कोरपना,
  1. 9. गोगुलवार कॉम्प्लेक्स, सिद्धी विनायक मंदिर जवळ, ताडाला रोड, मुल, 10. वी.आर. मार्टच्या बाजुला, ब्रम्हपुरी रोड, नागभिड, 11. वनकर कॉम्प्लेक्स, आंबेडकर चौक, मूल रोड पोंभुर्णा, 12. आसिफाबाद रोड, स्टुडंट बुक डेपो समोर, तिवारी कॉम्प्लेक्स, राजुरा, 13. राकेश दंडमवार बिल्डींग, डॉ विजय शेंडे यांच्या दवाखान्याजवळ, सावली, 14. भिमविद्या कॉम्प्लेक्स, रेल्वेस्टेशन पाथरी रोड, सिंदेवाही, 15. टेंमुर्डे निवास, रेल्वे स्टेशन रोड, फॉरेस्ट ऑफिस समोर, वरोरा. येथे संपर्क करण्याचे आावाहन सहायक कामगार आयुक्त यांनी केले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *