Chandrapur death | त्यांना पोलीस व्हायचे होते पण नदीत असं घडलं की…..

Chandrapur death

Chandrapur death : ग्रामीण व शहरी भागातील मुले-मुली शासकीय नोकरीत लागावी यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. सोबतच अनेक मुली व मुलांना आपल्या अंगावर खाकी वर्दी यावी यासाठी पोलीस भरती चा सराव करीत आहे.

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून मिळाला डच्चू

हा सराव करताना आज 15 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 10 वाजताच्या सुमारास पोलीस भरतीचा सराव करताना भोयेगाव मार्गावरील वर्धा नदीत दोघे बुडाले यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

जिल्ह्यातील धानोरा भोयगाव मार्गावरील वर्धा नदीत तीन जण बुडाल्याची माहिती पुढे आली आहे, यात दोन तरुणी एक तरुणाचा समावेश आहे यातील एका मुलीला वाचविण्यात यश आले असून दोन जणांचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. Chandrapur death

सदर घटना धानोरा भोयगाव मार्गांवरील नदीच्या पत्रात आज सकाळी घडली असून संध्या शिंदे वय २० वर्ष रा. जिवती (पहाड वणी), युगल नागापुरे वय १९ वर्ष रा.सोनापूर गोंडपिपरी असे मृत्तकांची नावे असून समीक्षा शेंडे वय २० वर्ष बाबुपेठ चंद्रपूर या तरुणीला पाण्यात बुडाली असता वाचविण्यात यश आले आहे.

ग्रामीण भागासह शहरी भागात पोलीस भरतीसाठी (police bharti) विद्यार्थी तसेच तरुण तरुणी मेहनत घेत सकाळी रनिंग व्यायाम करताना दिसत आहेत अश्याच आदर्श फिजिकल ग्रुप चंद्रपूर चे संचालक आदर्श चिवंडे यांनी आपल्या एकूण ३६ विद्यार्थ्यांना व्यायाम करण्यासाठी धानोरा भोयगाव मार्गांवरील वर्धा नदीवर आणले होते.

व्यायाम झाल्यानतर काही मूल मुली नदीच्या पाण्यात उतरले पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोन मुली नदीच्या पात्रात बुडाल्या त्यातल्या एका तरुणाने मुलीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र तो ही पाण्यात बुडाला तर आणखी काही विद्यार्थ्यांच्या मदतीने एका मुलीला वाचविण्यात यश आले तर एका मुलीचा मृतदेह पाण्यातुन बाहेर काढण्यात आला तर वाचविण्यासाठी उडी मारलेल्या मुलाचा मृत्तदेह अजूनही पाण्यात बुडून असल्याची माहिती आहेत.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घुग्गुस व गडचांदूर पोलिसांनी धाव घेतली असून युगल नागापुरे या तरुणाचा शोध सुरु असून अधिक तपास घुग्गुस पोलीस करीत आहेत.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *