honest politics : राजुरा विधानसभा क्षेत्रात प्रामाणिक राजकारणावर विरोधकांनी खेळला रडीचा डाव

honest politics गडचांदूरात ॲड. वामनराव चटपांच्या बॅनरची विटंबना, विरोधकांचे खालच्या स्तराचे राजकारण निषेधार्ह- विलास धांडे

honest politics गडचांदूर: विधानसभेची रणधुमाळी गाजू लागली आहे. दिवसेंदिवस ॲड. वामनराव चटप यांना मिळणाऱ्या जनतेचा पाठिंबा वाढताना दिसतोय. ॲड. वामनराव चटप यांची प्रचारातली आघाडी बघून विरोधकांचे धाबे दणाणले आहे. ॲड. वामनराव चटप यांचे गडचांदूर शहरातील पोलीस स्टेशन जवळ प्रचार बॅनर लागले आहे.

चंद्रपुरातील कुख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी केले स्थानबद्ध

बॅनरवरील ॲड. वामनराव चटप यांच्या फोटोला शेण फासण्याचे कुटील काम अज्ञात व्यक्तीने केले आहे. इतक्या खालच्या स्तराचे विरोधकांचे राजकारण निषेधार्ह असल्याचे म्हणत शेतकरी संघटनेने गडचांदूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. honest politics


तीनदा आमदारकी भूषविणारे ॲड. वामनराव चटप यांचा जनमाणसात मोठा आदर आहे. नागरिक व कार्यकर्ते या घटनेविषयी संतप्त असून रोष व्यक्त करीत आहे.

फेक नरेटिव्ह वापरत भाजपचा रडीचा डाव


शेतकरी संघटनेचे विलासराव धांडे, रत्नाकर चटप, नरेश सातपुते, अरुण रागीट, अतुल थोटे, मोरेश्वर अस्वले, अरुण काळे, अविनाश डोहे, अनिल कौरासे, गजानन टेकाम आदींनी याविषयी लेखी तक्रार ठाणेदार यांना दिली असून दोशींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *