Tag: हिट अँड रन कायदा

  • चंद्रपुरात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन

    चंद्रपुरात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सुधारित हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक झाले असून हा कायदा तात्काळ मागे घ्यावा यासाठी आता वाहन चालकांनी स्टेअरिंग छोडो आंदोलनाला सुरुवात केली आहे.

    10 जानेवारीला शहरातील वरोरा नाका चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वाहन चालकांनी निषेध रॅली काढत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला, या रॅलीत जिल्हाभरातून वाहन चालक सामील झाले होते.

     

    हिट अँड रन हा कायदा सर्वांसाठी लागू आहे, ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांच्या हातून अपघात घडला तर 7 लाख दंड तर 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे, जर हा कायदा परत घेतला नाही तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा वाहन चालकांनी दिला आहे.

     

    या आंदोलनात जय संघर्ष चालक मालक संघटना, लाल बावटा वाहन चालक मालक व इतर संघटना सामील झाल्या होत्या.

  • केंद्र सरकारने नुकताच संसदेत “हिट अँड रन कायदा त्वरित रद्द करा

    केंद्र सरकारने नुकताच संसदेत “हिट अँड रन कायदा त्वरित रद्द करा

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले
    मुल – अपघात स्थळावरून गाडी चालक निघून गेल्यास त्याला सरसकट दहा वर्षे कारावास आणि सात लाख रुपयाचे दंडाची शिक्षा अशी तरतूद करण्यात करण्यात आली आहे. अपघात घडल्यास जखमीना
    मृत्यूच्या दारी सोडून जाणे हे अमानवीय कृत्य आहे.
    कोणताही वाहन चालक जाणून बुजून अपघात करीत नाही.

     

    कळत नकळत सुद्धा अपघात होतात ही वस्तूस्थिती आहे. म्हणून अपघात ग्रस्ताला घटनास्थळी जाऊ इच्छित नाही मात्र बरेच वेळा चालकाची चुक नसतांना देखील संतप्त नागरिक आणि जमवाकडून वाहन चालकाला मारझोड करुन त्याच्या गाडीची तोडफोड करुन एखाद्या वेळी जमावाकडुन प्राणघातक हल्ले केल्या जातात. परीणामी निष्पाप वाहन चालकाला जिवे मारण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यामुळे स्वतःच्या संरक्षना करीता काही वाहन चालक घटनास्थळावरून पळ काढतात. त्यांच्या या कृतीमुळे त्यांना अपघातास जबाबदार धरून त्यांना “हिट अँड रन” कायद्याखाली कठोर शिक्षेचा केन्द्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. असा कायदा करणे म्हणजे अमानवीय आहे, ज्यामुळे ह्या कायदाने वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाच्या मनात अत्यंत भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

     

    आणि हा कायदा वाहन चालकावर अन्याय करणारा असल्याने असा कायदा रद्द करावा अशी मागणी काळी पिवळी ट्रक्स संघटना व चालक मालक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.

    (गाडी चालक मालक संघटनेला तालुका काँग्रेसचा पाठिंबा)

    मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या काळी पिवळी व चालक मालक संघटनेच्या समस्त चालक रस्त्यावर उतरले असून आंदोलन करून याबाबत केंद्र सरकारचा जाहीर निषेध केल्या जात आहे.

     

    ही मागणी रास्त असून चालकांवर अन्याय करणारी आहे. म्हणून मुल तालुका काँग्रेसने कांग्रेस नेते जिल्हा सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे नेतृत्वात पाठींबा दर्शविला आहे. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, माजी तालुका अध्यक्ष तथा संचालक घनश्याम येनुरकर, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, संचालक संदीप कारंमवार ,संदीप मोहबे उपस्थित होते.

  • चिमूर शहरात वाहन चालकांचे चक्काजाम आंदोलन

    चिमूर शहरात वाहन चालकांचे चक्काजाम आंदोलन

    News34 chandrapur

    चिमूर – गुणवंत चटपकार

    जड वाहनचालकांसाठी तसेच मोठ्या वाहन चालकासाठी अन्यायकारक ठरणारा सुधारित हिट अँड रन कायद्या तत्काळ मागे घेण्यात यावा. या मागणीसाठी चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय समोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

     

    नुकताच संसदेत जुन्या हिट अँड रन कायद्यात बदल करून सुधारित कायदा पारित करण्यात आला. या कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या असून वाहन चालकांसाठी अन्यायकारक आहे. यात करावसाचा कालावधी आणि दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या कायद्यामुळे वाहनचालकांचे कुटुंब उद्ववस्त होणार आहे. अनेकदा अपघात हे आकस्मिक होतात. मात्र या अपघातात वाहन चालकांनाच जबाबदार धरले जातात. अनेकदा अपघाता नंतर वाहन चालकांना गंभीर मारहाण केली जाते. त्यामुळे अपघातानंतर वाहनचालक जख्मीला मदत करण्यापेक्षा पळ काढून पोलिस ठाण्यात आश्रय घेतात. परंतु नवीन कायदा हा वाहनचालकांसाठी अन्यायकारक ठरणार आहे.

     

    त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी दोन जानेवारीला चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटनेच्या वतीने चिमूर शहरातून मोर्चा काढून तहसील कार्यालय समोर चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे

  • चंद्रपुरातील बंगाली कॅम्प चौकात वाहनचालकांचे चक्काजाम आंदोलन

    चंद्रपुरातील बंगाली कॅम्प चौकात वाहनचालकांचे चक्काजाम आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जडवाहनचालकांसाठी तसेच मोठ्या वाहनचालकांसाठी अन्याय कारक ठरणारा सुधारित हिट ॲण्ड रन कायदा तत्काळ मागे घेण्यात यावा या मागणीसाठी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने मंगळवार २ जानेवारी रोजी बंगाली कॅम्प चौकात चक्काजाम आंदोलन आले.

    नुकताच संसदेत जुन्या हिट ॲण्ड रन कायद्यात बदल करून सुधारित कायदा पारीत करण्यात आला. या कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या असून, वाहनचालकांसाठी अन्यायकारक आहे. यात कारावासाचा कालावधी आणि दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या कायद्यामुळे वाहनचालकांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे.अनेकदा अपघात हे आकस्मिक होतात. मात्र, या अपघातात वाहनचालकांनाच जबाबदार धरले जातात.

     

    अनेकदा अपघातानंतर वाहनचालकांना गंभीर मारहाणही केली जाते. त्यामुळे अपघातानंतर वाहनचालक जखमीला मदत करण्यापेक्षा पळ काढून पोलीस ठाण्यात आश्रय घेतात. परंतु, नवीन कायदा हा वाहनचालकांसाठी अन्यायकारक ठरणार आहे.त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवार २ जानेवारीला बंगाली कॅम्प चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

     

    सकाळी 11 वाजता बंगाली कॅम्प चौकात असंख्य वाहन चालक संघटनेचे सदस्य व पदाधिकारी एकत्र आले, त्यांनतर मूल मार्गे चंद्रपुरात येणाऱ्या वाहनांची वाहतूक वाहन चालकांनी थांबवित आंदोलन सुरू केले, यावेळी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता, जोपर्यंत हा काळा कायदा परत घेणार नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण देशात असेच आंदोलन करणार असा इशारा वाहन चालकांनी यावेळी दिला.

  • सुधारित ‘ हिट ॲण्ड रन’ कायद्याविरोधात वाहनचालकांचा चक्काजाम

    सुधारित ‘ हिट ॲण्ड रन’ कायद्याविरोधात वाहनचालकांचा चक्काजाम

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जडवाहनचालकांसाठी तसेच मोठ्या वाहनचालकांसाठी अन्याय कारक ठरणारा सुधारित हिट ॲण्ड रन कायदा तत्काळ मागे घेण्यात यावा या मागणीसाठी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने मंगळवार २ जानेवारी रोजी बंगाली कॅम्प चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

     

    नुकताच संसदेत जुन्या हिट ॲण्ड रन कायद्यात बदल करून सुधारित कायदा पारीत करण्यात आला. या कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या असून, वाहनचालकांसाठी अन्यायकारक आहे. यात कारावासाचा कालावधी आणि दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या कायद्यामुळे वाहनचालकांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे.अनेकदा अपघात हे आकस्मिक होतात.

     

    मात्र, या अपघातात वाहनचालकांनाच जबाबदार धरले जातात. अनेकदा अपघातानंतर वाहनचालकांना गंभीर मारहाणही केली जाते. त्यामुळे अपघातानंतर वाहनचालक जखमीला मदत करण्यापेक्षा पळ काढून पोलीस ठाण्यात आश्रय घेतात. परंतु, नवीन कायदा हा वाहनचालकांसाठी अन्यायकारक ठरणार आहे.त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवार २ जानेवारी बंगाली कॅम्प चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन वाहनचालक संघटनेने केले आहे.

     

    पत्रकार परिषदेला विनोद चांदेकर, कॉमे्रड प्रकाश रेड्डी, रवींद्र उमाठे, विजय पवार, नितीन कोलारकर, सचिन वनकर, राजू काळे आदी उपस्थित होते.

    New year 2024 ad
    अशोक जीवतोडे यांच्याकडून देशवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
  • हिट अँड रन कायदा रद्द करा, चंद्रपुरात वाहन चालकांचा निषेध मोर्चा

    हिट अँड रन कायदा रद्द करा, चंद्रपुरात वाहन चालकांचा निषेध मोर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : पूर्वीच्या हिट ॲण्ड रन कायद्यात सुधारणा करून नवीन हिट ॲण्ड रन कायदा २०२३ गृहमंत्री अमित शहा यांनी आणला आहे. हा कायदा देशभरातील वाहनचालकांसाठी अन्यायकारक असून, लहानमोठ्या अपघातात वाहनचालक भरडले जाणार आहे.

     

    अनेकदा वाहनचालकांनी चुकी नसतानाही अपघात होतात. मात्र, अशावेळी मोठ्या वाहनचालकांना दोषी ठरविले जाते. नवीन कायद्यामध्ये मोठ्या शिक्षेची आणि दंडाची तरतूद करण्यात आल्याने हा कायदा रद्द यावा या मागणीसाठी अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने शनिवार ३० डिसेंबर रोजी गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढली, या रॅलीत असंख्य वाहन चालक सहभागी झाले होते.

     

    यापूर्वी अपघातातील दोषींना शिक्षा देण्यासाठी विविध कलमे अस्तित्वात आहे. शिवाय मोटार वाहन कायदा अस्तित्वात आहे. असे असतानाही सुधारित हिट ॲण्ड रन कायद्यात नव्याने कलम ३०२ म्हणजे हत्येचे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. नव्या कायद्यानुसार १० वर्ष कारावासाची शिक्षा, २ लाख ते १० लाख रुपयेपर्यंत दंड अशी तरतूद करून हा कायदा २० डिसेंबर २०२३ रोजी संसदेत पारीत करण्यात आला आहे.

     

    अनेक अपघात अचानक झालेले असतात. अशोवळी मोठ्या वाहनाचे वाहनचालक नाहक भरडले जातात. त्यामुळे हा कायदा रद्द करण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे उपरे यांनी सांगितले. देशाच्या अर्थव्यवस्थेत वाहनचालकांचा मोठा वाटा असताना त्यांच्यावर अन्यायकरणारे कायदे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. या निषेध रॅलीत वाहनचालकांनी मोठ्या संख्येत सहभाग दर्शविला.

    New year 2024 ad
    अशोक जीवतोडे यांच्याकडून देशवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..