Tag: शेतकरी

  • pik vima : पीक विम्याबाबत महत्वाची बैठक

    pik vima : पीक विम्याबाबत महत्वाची बैठक

    Pik vima शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही, सदर रक्कम तात्काळ मिळावी यासाठी पुढचे पाऊल काय असणार आहे, याबाबत डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती.

    pik vima वीरई ग्राम पंचायत येथे शेतकऱ्यांनी पीक विम्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे तातडीने एक बैठक बोलावली. त्या बैठकीत डॉ अभिलाषा गावतुरे या उपस्थित होत्या. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त भागाची नोंदणी करून सुद्धा बरेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा ची रक्कम जमा झाली नाही हा गोरगरीब शेतकऱ्यावर अन्याय आहे. त्यांचा अन्याय दुर करण्यासाठी व इतर अन्यायग्रस्त शेतकऱ्यानां न्याय मिळवून देण्यासाठी व तसेच ही माहिती सर्व सामान्य शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवीत गोरगरीब शेतकऱ्यांना पीक विमा ची रक्कम मिळावी यासाठी यापुढील भूमिका काय राहील यासाठी ही बैठक घेण्यात आली.

    धक्कादायक बातमी : तुझ्या अब्रूचे धिंडवडे उडवीत तुला ठार करणार, अवैध दारू विक्रेत्यांची महिलेला धमकी

    डॉ गावतुरे यांनी यावर गांभीर्याने विचार करून तातडीने संबंधित विभागाला संपर्क करण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेऊ असे त्या म्हणाल्या. या सभेत शेतकरी बांधव न्याय मिळवून देण्यासाठी सरपंच शांताबाई गेडाम,काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक वाढई,काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष विक्रमजी मोहरले, नेताजी सोनुले ,नंदकिशोर वाढई,उत्तम गणवीर, शशिकांत जेंगठे, सुरज गिरडकर, सुखदेवजी वाढई, भुजंग आगळे, रमेश वाढई, बंडू निकोडे ,मोरेश्वर गोंगले ,पुरुषोत्तम गोंगले, सुरेश सोनुले ,सुरेश माहुर्ले, सदाशिव वसाके, संतोष गुडलावार, नंदकिशोर वाढई, प्रशांत जेंगठे, नवनाथ जेंगठे व सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    जेलभरो आंदोलन
  • Ncp Ap : विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

    Ncp Ap : विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

    Ncp AP मनोज गोरे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्याच्या ठिकाणी भागातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आबिद अली प्रदेश सहसचिव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले परिसरातील शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येनी सहभागी होवून शासनाचे प्रशासनाचे लक्ष वेधले राजुरा उपविभागातील राजुरा, कोरपना,जिवती तालुक्यात वर्ग २ जमीन १ कामासाठी वाद २ दशकापासून सुरु आहे यामुळे शेतकऱ्याची पिळवणुक आर्थिक भुर्दंड तसेच चकरा मारण्यात वेळ जात आहे.

    अवश्य वाचा : पावसाळी अधिवेशनात खासदार प्रतिभा धानोरकर यांची जोरदार बॅटिंग

    Ncp Ap नागरिक त्रस्त आहेत कार्यालयातील चकरा व शासनाने ऑनलाईन करतांना वर्ग २ नोंदविल्याने शासनाने वेळोवेळी शासन निर्णय होवून सुद्धा प्रश्न सुटले नाही मोहीम राबवीत हा प्रश्न सोडवावा व ग्रामपंचायत तलाठी साजा निहाय वर्ग १ मोहीम राबवावी वन्यप्राण्यामुळे होणारे शेतकऱ्याचे नुकसान ७५% अनुदानावर पिक संरक्षणासाठी कुंपण झटका मशीन उपलब्ध करण्यात यावे आदिवासी पेसा क्षेत्रातील ३ पिढीचा पुरावा अट शिथिल करावी व गैरआदिवासींना जमिनीचे पट्टे वाटप करावे राष्ट्रीय महामार्ग जडवाहतुकीमुळे ग्रामीण रस्ते नादुरुस्त झाले ते तातडीने दुरुस्त करण्यात यावीत व जि.आर.आय.एल कंपनीने मंजूर क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन कामाची चौकशी करावी जिवती-कोरपना तालुक्यातील जलजीवन मिशन निकृष्ठ कामाची व गैरव्यवहाराची चौकशी करावी संजय गांधी निराधार योजनेच्या बोगस लाभार्थी रद्द करावे या सह अनेक मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री,महसूल मंत्री,वनमंत्री,विभागीय आयुक्त यांना तहसीलदार कोरपना मार्फत देण्यात आले.

    यावेळी शिष्ट मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे स.आबिद अली, महादेव साखरकर,संजय पिंपळशेंडे,महादेव पेंदोर,धनराज जीवने,विवेक वडस्कर,मोहब्बत खान, मारोती खापने विकास टेकाम, नादिर कादरी, शहेबाज अली,हिरालाल चव्हाण, भाऊराव ठाकरे, चंद्रभान तोडासे, लक्ष्मन मोहितकर यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते.

    अवश्य वाचा : भरोसा सेल ने पालकांना दिला भरोसा

    यावेळी तहसीलदार मा.व्हटकर यांनी वर्ग २ जमिनीचा भूमिधारी बाबत गावनिहाय्य नियोजन करून प्रकरण निकाली व हि मोहीम आँगस्ट महिन्यापासून सुरु करण्यात येईल वन्यप्राणी व पंचनामे संबंधात वनविभागाला योग्य सुचना करण्यात येईल आपल्या निवेदनातील स्थानिक प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले व तहसिलविभागाचे प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याचे शिष्ठमंडळाला आश्वासित केले यावेळी अनेक शेतकऱ्याचे प्रश्न तहसीलदारांनी समजून घेतले आंदोलन कर्त्यांनी घोषणाबाजी करित तहसीलकार्यालयासमोर धरणे दिले.

    यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता. परिसरातील नागरिकांचे महत्वाचे प्रश्न आंदोलनात चर्चेला आल्यामुळे शेतकरी मागण्या शासनाने मान्य करण्याची मागणी केली