Tag: विजय वडेट्टीवार यांची माणुसकी

  • Competitive Exam Preparation : भावी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मदतीला धावले विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार

    Competitive Exam Preparation : भावी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मदतीला धावले विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार

    Competitive Exam Preparation ब्रम्हपूरी शहरातील बोंडेगाव वार्ड येथे प्रज्ञा राजकुमार मेश्राम ही युवती राहते. सदर युवती ही अनाथ असुन काही वर्षापुर्वी तिचे आईवडील दोघेही मृत्यू पावले. तेव्हा पासून ती आपल्या आत्यासह दोघीच जणी राहतात. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिला शिक्षण घेतांना अनेक अडथळे निर्माण होत होते. तरी सुद्धा या युवतीने ब्रम्हपूरी येथे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मात्र तिला भविष्यात प्रशासकीय अधिकारी बनायचे असल्याने ती पदवीच्या प्रथम वर्षांपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती.

    योजना : लाडक्या बहीण योजनेचे फक्त या महिलांना मिळणार 3 हजार रुपये

    Competitive Exam Preparation आता पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ती दिल्ली येथे जाणार आहे. मात्र दिल्ली येथील स्पर्धा परीक्षेचे शिक्षण देणाऱ्या एका संस्थेची शुल्क भरण्यासाठी तिच्या कडे पैसे नव्हते. मात्र तिने ऐकले होते की ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार हे नेहमीच प्रत्येक गरजुंच्या मदतीला धावून जात असतात. व त्यांच्या कडे आपली समस्या घेऊन गेलेला माणुस कधीच निराश होऊन परतत नाही. म्हणून ती आमदार विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपूरी येथील निवासस्थानी आली व त्यांना भेटुन स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठीकरीता तिला येत असलेल्या अडचणीबाबत माहीती दिली. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता सदर युवतीला दिल्ली येथील संस्थेत शुल्क भरण्यासाठी लागणार असलेली सर्व आर्थिक मदत तात्काळ त्या युवतीला दिली. यावेळी न.प.माजी बांधकाम सभापती विलास विखार यांनी देखील तिला आर्थिक मदत दिली. युवतीने देखील आमदार विजय वडेट्टीवार व न.प. माजी बांधकाम सभापती विलास विखार यांचे आभार मानत हसऱ्या चेहऱ्याने प्रशासकीय अधिकारी बनून ब्रम्हपुरीचे नाव उंचावणार असे सांगितले.

    ब्रह्मपुरी विधानसभा असो की इतर क्षेत्र त्यामध्ये गरजू नागरिकांच्या मदतिला धावून जाणारे विजय वडेट्टीवार हे आपल्या कार्याने नेहमी चर्चेत असतात, नागरिकांना न्याय आणि त्यांचा अधिकार वडेट्टीवार हे अग्रक्रमाने मिळवून देतात.

  • Humanity of Vijay Vadettiwar : त्या अपघातग्रस्त व्यक्तीचे विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांनी वाचविले प्राण

    Humanity of Vijay Vadettiwar : त्या अपघातग्रस्त व्यक्तीचे विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांनी वाचविले प्राण

    Humanity of Vijay Vadettiwar ब्रह्मपुरी – 3 फेब्रुवारीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे  ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात दौऱ्यावर होते, अतिव्यस्त कार्यक्रम आटोपून ते विधानसभेत पुढच्या दौऱ्यावर निघाले असता एक अपघात घडला मात्र विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांनी आपले वाहन थांबवित त्या अपघातग्रस्त युवकाचे प्राण वाचविले.

    गावातच बिबट्याने घेतला आश्रय, आणि एका घरी बछड्याना दिला जन्म

    Humanity of vijay vadettiwar नागभीड- ब्रम्हपुरी रस्त्यावर रात्री 8 वाजता दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला, या अपघातात गंभीर झालेल्या व्यक्तीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तातडीने मदत करीत रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्याचे आदेश दिले.

    त्यामुळे अपघात ग्रस्त व्यक्तीला त्वरित उपचार मिळाल्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीचे जीव वाचविण्यात यश आल्याची माहिती आहे.

    विरोधीपक्ष नेते व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार हे नाव जनसामान्य नागरिकांचे परिचयाचे नाव आहे, विधानसभा क्षेत्रात काही घडलं तर त्यांच्या मदतीला धावून जाणारा माणूस म्हणजे विजय वडेट्टीवार, नागरिक जेव्हा न्यायाची अपेक्षा घेऊन वडेट्टीवार यांच्याकडे येतात त्यावेळी ते अमीर श्रीमंत न बघता तो मानसिक त्रासाने खचला आहे आधी त्याला आधार देत त्याला न्याय मिळवून देण्याचे काम वडेट्टीवार करीत असतात.

    त्यामुळे दौऱ्यावर असताना एक अपघात घडतो आणि त्याच क्षणी वडेट्टीवार यांना त्याबाबत माहिती मिळते, मात्र ते दौरे थांबवित आधी मदतिला धावतात, त्यांच्या कार्याची शैली ही नेत्यांपेक्षा वेगळी असते, मनात कसलाही भेदभाव न करता ते आधी मदत करतात हे विशेष.