Tag: मूल तालुका कांग्रेस

  • Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्य तालुका कांग्रेस तर्फे विनम्र अभिवादन

    Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्य तालुका कांग्रेस तर्फे विनम्र अभिवादन

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त दिनांक १९ फरवरी २०२४ रोजी सकाळी १०-३९ वाजता तालुका काॅंग्रेस मूल तर्फे काॅंग्रेसचे जेष्ठ नेते संतोषसिंह रावत (अध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक) व माजी जी.प.अध्यक्ष चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

     

    याप्रसंगी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी ज्येष्ठ संचालक शांताराम कामडी, डॉ.पद्माकर लेनगुरे, संचालक किशोर घडसे, सभापती राकेश रत्नावार व्यानी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

     

    याप्रसंगी डॉ .पद्माकर लेनगुरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजेशाही न्याय प्रशासन आणि जनतेची सेवा याबाबत मनोगत व्यक्त केले. तर सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी यांनीही पुष्प वाहून अभिवादन करुन राजेंना मानाचा मुजरा केला. याप्रसंगी तालुका कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, शहर सरचिटणीस संदीप मोहबे,विष्णू सादमवार, महिला कांग्रेस अध्यक्ष रुपाली संतोषवार, महिला शहर अध्यक्षा नलिनी आडपावर, सचिव शाम्मलता बेलसरे, पदाधिकारी समता बंसोड, नाजुका लाटकर, मनोज आदी तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

     

    कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी केले तर मनोगत व आभार प्रदर्शन महिला सचिव शामलता बेलसरे यांनी मानले.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालुका कांग्रेस तर्फे विनम्र अभिवादन

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालुका कांग्रेस तर्फे विनम्र अभिवादन

    News34 chandrapur

    मुल – भारतिय राज्य घटनेचे शिल्पकार युगपुरुष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिना निमित्त दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोज मंगळवार सकाळी १०-०० वाजता काॅंग्रेस भवन मूल येथे, काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आदरणीय .संतोषसिंह रावत (अध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक) व माजी जी.प.अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  याप्रसंगी उपस्थित सर्व कांग्रेस पदाधिकारी यांनी बाबासाहेबांच्या फोटोला पुष्प माला व पुष्प वाहून विनम्र अभिवादन केले.

     

    याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नवार, माजी सभापती संचालक घनश्याम येनुरकर, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, संचालक किशोर घडसे, सरपंच तथा संचालक अखिल गांगरेडिवार, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, व्यंकटेश पुल्लकवार, माजी नगरसेविका ललिता फुलझेले, महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार, शहर अध्यक्ष नलिनी आडपवार, कांग्रेस सरचिटणीस संदीप मोहबे, सुरेश फुलझेले, महिला सरचिटणीस शामलता बेलसरे, कोषाध्यक्ष राधिका बुक्कावार, सदस्य समता बनसोड, फर्जना शेख, यांचेसह ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, ज्येष्ठ कांग्रेस पदाधिकारी बंडूभाऊ गुरनुले, अन्वर शेख, विष्णू सादमवार, प्रशांत उराडे,राजू कानमपल्लीवार, ग्रामीण,शहरी,युवक व महिला तसेच ओबीसी सेल किसानसेल, व सर्व सेलच्या पदाधीकारी उपस्थित होते.

  • अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत, तात्काळ नुकसान भरपाई द्या – कांग्रेसचे निवेदन

    अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत, तात्काळ नुकसान भरपाई द्या – कांग्रेसचे निवेदन

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या २७ नोव्हेंबर २३ रोजी आकस्मिक आवकाळी पाऊस पडला यात मुल – सावली तालुक्यातील धान तूर कापूस पिकांची प खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.यामुळे राज्य शासनाने व जिल्हाधिकारी यांनी धान कापून तूर धान्य आदी पीकाना अवकाळी पावसाच्या फटक्या बाबत त्वरित सर्वेक्षण करुन माहिती घेण्यासाठी महसूल विभागात प्रत्यक्ष मोका चौकशी करून झालेल्या नुकसानीचा अहवाल शेतकऱ्यांना सोबत घेऊन करण्यात यावे. यात धान पीक तूर कापूस पीक याचा प्रामुख्याने समावेश करावा अधिकाधिक धान पीक उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे, अवकाळी पावसाचा फटका धान पिकाला जास्त बसला आहे.

     

    आता धान पीक कापणी केले असून आलेल्या पाण्याने धा सरदड्या जमिनीला चीपकुन गेल्या आहेत. अजूनही कापणी होताच आहे. काही भागात मोठ्या प्रमाणात कापणी झाली आहे, धान बांधण्यापूर्वी धान शेतातच सुकायला ठेवल्या जातो आता अचाणक आलेल्या अवकाळी पावसाने कापलेला आणि उभा असलेल्या धान पीकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.

     

    त्यामुळे धान कापूस तूर इतर पिके कडधान्य पीक नुकसानच्या धर्तीवर धान पीक नुकसानीची मोका पाहणी करून नुकसानग्रस्त शेतक-यांना तात्काळ मदत देण्यात यावी.करीता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने. सी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे नेतृत्वात मान. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री यांना मा. तहसीलदार यांचे मार्फत आज दि.२८/१२/२०२३ रोजी निवेदन देण्यात आले. आपला मुल तालुका हा केवळ एका धान पीक पट्टा म्हणून परिचित आहे,बहुतांश शेती वर पाण्यावरची असल्याने येतील शेतकरी कसाबसा आपल्या कुटुम्बाचा उदरनिर्वाह करीत असतो. त्यात नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुबाला साभाळणे अडचणीचे झाले आहे. मुलाबाळांचे शिक्षण, लग्न कसे करावे.

     

    पहिलेच कर्ज बाजारी असताना पुन्हा कुठून कर्ज घ्यावे या विवंचनेत सापडले आहेत. शासनाने या सर्व बाबींचा विचार करून तातडीने धान पीक नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे तयार करावे.आणि शासनाकडून शेतक-याना नुकसान लवकारत लवकर भरपाई मिळवून दयावी. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांनी चालू वर्ष २०२४ चा पीक विमा काढला असून कंपनीने विम्याचे पैसे जमा केले आहे. तेव्हा विमा कंपनीला शासनाने आदेश देऊन नुकसानग्रस्त शेतकरी यांचे त्वरित पाहणी व पंचनामे करून तात्काळ तात्काळ विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी तालुका काँग्रेसने निवेदनातून केली आहे.

     

    निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, माजी सभापती व संचालक घनश्याम येणुरकर, तालुका कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, ओबीसी राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, सोसायटी संचालक विवेक मुत्यलवार, आ.भा.समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, संचालक संदीप कारमवार, मनोज ठाकरे, युवक अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार, शहर उपाध्यक्ष कैलाश चलाख, महिला शहर अध्यक्ष नलिनी आडपवार, सचिव शामला बेलसरे, कोषाध्यक्ष राधिका बुक्कवार, सदस्या समता बंसोड, अन्वर शेख, नंदकिशोर मडावी, औद्योगिक काँग्रेसचे उपाध्यक्ष दत्तात्रय समर्थ, सुशी सरपंच अनिल सोनुले , संचालक हसन वाढई, मनोज, यांचेसह कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्त व शेतकरी बांधव उपस्थित होते.

     

    काँग्रेसने निवेदन देताच शासनाचे पंचनामे करण्याचे आदेश

    मुल तालुका कांग्रेस शेतकऱ्यांच्या अवकाळी आकस्मिक पाऊसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी व विमाचे पैसेही त्वरित मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांना, तहसीलदार यांचे मार्फतिने निवेदन देताच महाराष्ट्र शासनाने लगेच अवेळी पाऊसाने नुकसान झालेल्या शेतीपिकाचे पंचनामे करण्याबाबतचे आदेश क्र.सी एल एस-२०२३/प्रं. क्र.२६०/म.३ दिनांक २८/११/२०२३ अन्वये तात्काळ आदेश उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केले आहे.

  • माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त तालुका कांग्रेस तर्फे अभिवादन

    माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त तालुका कांग्रेस तर्फे अभिवादन

    News34 chandrapur गुरू गुरुनुले

    मुल -भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान,राष्ट्रमाता स्व.इंदिरा गांधी यांची जयंती काॅंग्रेस भवन मूल येथे साजरी करण्यात आली. काॅंग्रेसचे जेष्ठ नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे अध्यक्षतेत जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला.

     

    कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र कन्नमवार, मूल काॅंग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक घनशाॅमभाऊ येनुरकर, महिला काॅंग्रेस अध्यक्षा रुपालीताई संतोषवार,सचिव शाॅमल बेलसरे, बाजार समितीच्या संचालक चंदाताई कामडी, व्यापारी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तूभाऊ समर्थ, मुल शहर काॅंग्रेस उपाध्यक्ष संदिप मोहबे, माजी नगरसेवक विनोद कामडे,सिमा भसारकर, फरजाना शेख उपस्थित होते.

     

    शहर महिला काॅंग्रेस अध्यक्ष सौ.नलिनी आडेपरवार व काॅंग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी श्री बंडूभाऊ गुरणूले यांनी इंदिरा गांधी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. सुत्रसंचालन शहर काॅंग्रेस अध्यक्ष सुनिल शेरकी सर तर आभार प्रदर्शन शहर काॅंग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश फुलझेले यांनी मानले.

  • शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे काम तिघाडी सरकार करीत आहे – विजय वडेट्टीवार

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – वाघाच्या दहशतीने शेतकरी त्रस्त झाला असून रानटी डुकराच्या व वन्य प्राण्यांच्या हैदोशाणे शेती नष्ट झाली आहे. तरी नुकसान भरपाईचा पत्ता नाही. वर्तमान स्थितीत शेती कोणी करणार नाही. व धान उत्पादक शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे.

     

    नियमित कर्ज भरनाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले नाही. परंतु उद्योगपतींचे 7 हजार कोटींचे कर्ज माफ केले परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला पैसे नाही. म्हणून आता संतोष रावत यांचे पाठीमागे राहून कांग्रेसला निवडून दिले पाहिजे असे मार्गदर्शन महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हजारो शेतकऱ्यांसमोर केले. याप्रसंगी सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष संतोषभाऊ‌ रावत यांनाही शेतकऱ्यांच्या समस्या, नजुल व वनहक्क धारकांना जमिनीचे पट्टे दिल्या गेले नाही.

     

    हे मार्गी लावण्याचे विजुभाऊ मार्गी लावतील परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला जाण्याची तयारी आपण ठेवावे असे मार्गदर्शन केले. उपस्थित युवा नेत्या शिवानी ताई वडेट्टीवार यांनी पालक मंत्र्याच्या क्षेत्रात शेतकऱ्यांची अवदशा होणे ही शोकांतिका असल्याचे मत व्यक्त केले. मोर्चात तालुक्यातील २५०० च्या वर दुष्काळ ग्रस्त शेतकरी व महिला उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांना निवेदन उपविभागीय अधिकारी मेश्राम,तहसीलदार डॉ.रवींद्र होळी यांना विजय वडेट्टीवार व संतोशसिंह रावत यांचे हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी विभागीय वन अधिकारी ,वन परिक्षेत्र अधिकारी उपस्थित होते.

     

    कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी केले. मंचावर सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार,माजी सभापती व संचालक घनश्याम येनुरकर, शिवा राव, माजी जिल्हा महिला अध्यक्ष चित्रा डांगे, माजी कांग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे,ओबीसी सचिव गुरुदास चौधरी,दीपक वाढई यांचेसह महिला अध्यक्षा,युवक अध्यक्ष,व तालुका शहर पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चाच्या आयोजनासाठी बजार समितीचे सर्व संचालक, तालुक्यातील सर्व सरपंच, कांग्रेस पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. आभार शहर अध्यक्ष सुनील शेरकी यांनी मानले.

     

  • युवक कांग्रेस अध्यक्षाने प्रशासनाला दिला आमरण उपोषणाचा इशारा

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – जी.आर. क्रिष्णा येथील ठेकेदार (व्हिनस सर्व्हिसेस) हे नेहमीच काम करणाऱ्या आपरेटर व ड्रायव्हर यांना धमकी देत असून त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देत असल्याने सर्व 20 से 22 ऑपरेटर व्हिनस सर्व्हिसेस यांचेवर उपासमारीची पाळी आली असून त्यांच्या त्रासापाई वैतागले आहेत.

     

    करीता त्यांचेवर त्वरित कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार यांनी एका लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार मुल यांचेकडे दिला आहे.

    कंपनीच्या काम करीत असताना वाहनांना काही वेळ आराम असताना त्याच वेळेस ऑपरेटर आराम करताना अशाच वेळी ठेकेदाराने त्यांचे फोटो काढून कंपनीच्या वरिष्ठ एच आर साहेबांना पाठउन ड्युटीमद्ये गैरहजरी लावतात कंपनीमध्ये राब – राब राबवून जरा तरी जगायचे कसे हा सर्व ऑपरेटर व ड्रायव्हर बांधवांना प्रश्न निर्माण झाला आहे.

     

    ते असे वागतात कि तुम्हाला आम्ही कंपनीमधुन काढुन टाकू असे एक ते दोन वेळा नसून वारंवार करतात आणि आम्हाला पक्या शिव्या देतात आम्हाला काही झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

    याकरिता आपणास विनंती आहे की जी आर क्रिष्णा येथील ठेकेदार ( विनस सर्विसेस ) याध्यावर योग्य ती कारवाई करावी व ही समस्या दूर न झाल्यास आमरण उपोषणास करण्यात येईल व या मागणीसाठी आत्मदहन करण्याची परवानगी देण्यात यावी. असा इशारा भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार यांनी दिला आहे.