Tag: दुःखद बातमी

  • नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरातील 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

    नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरातील 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

    News34 chandrapur

    विसापूर : बल्लारपूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला वर्धा नदीवर हडस्ति ते कढोली दरम्यान मोठा पूल आहे. या पुलाखाली चंद्रपूर येथील काही मुले खेळत होते. दरम्यान त्यांना वर्धा नदी पात्रात पोहण्याचे ठरविले.मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने जुन्या वर्षाला निरोप देताना एकाचा त्यात मृत्यू झाला.

    New year 2024 ad
    अशोक जीवतोडे यांच्याकडून देशवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

    ही घटना रविवारी सकाळी ११.30वाजता दरम्यान बल्लारपूर तालुक्यातील हडस्ति गावाजवळील पुला जवळ घडली. या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव जित रवींद्र गावतुरे (१५ ) रा.नगीना बाग चंद्रपूर असे आहे.
    चंद्रपूर येथील काही मुले बल्लारपूर तालुक्यातील हडस्ति गावा जवळच्या पुला खाली व्हालिबाल खेळत होते. यावेळी त्यांच्या सोबत एक मोठा युवक देखील होता.

     

    खेळ खेळल्यानंतर त्यातील चार जणांनी वर्धा नदीत पोहण्याच्या बेत केला.पोहत असताना त्यातील तिघे वर्धा नदीच्या पात्रातून बाहेर आले.मात्र जित्रू गावतुरे हा मुलगा खोल पाण्यात बुडाला. त्याला नदीच्या पात्रातील खोल पाण्याचा अंदाज आला नाही.त्यामुळे त्याचा वर्धा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला.

     

    या घटनेची माहिती बल्लारपूर तहसील प्रशासनाला देण्यात आली.त्यावेळी नायब तहसीदार ठाकरे व नांदगाव ( पोडे ) येथील तलाठी महादेव कन्नाके यांनी घटनास्थळी धाव घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती दिली. दरम्यान गावातील नावाडी व एन डी आर एफ च्या पथकाने त्याचा शोध घेऊन सायंकाळी जितृचा मृतदेह बाहेर काढल्याची माहिती ,बल्लारपूरच्या तहसीलदार कांचन जगताप यांनी दिली.या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस अधिक तपास करत आहे.

  • ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चूंचूवार यांना मातृशोक

    News34 chandrapur

    चंद्रपूर -ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चूंचूवार यांच्या मातोश्री श्रीमती लीलाबाई गामाजी चूंचूवार यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. गेली ६ वर्षे त्यांनी कर्करोगाशी झुंज दिली.

    त्यांच्या पश्चात प्रशांत, विनोद, दै. पुढारी मुंबईचे राजकीय संपादक प्रमोद आणि गणेश ही मुले, सूना नातवंडे आणि बराच आप्त परिवार आहे.

    बुधवारी, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता चंद्रपूर, (ता.जि. .चंद्रपूर) येथे त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते निवासस्थान- द्वारा जी पी चूंचूवार यांचे घर, डॉ ताटेवार यांच्या रूग्णालयासमोर, ताडोबा रोड,तुकुम, चंद्रपूर
    येथून निघेल. त्यांच्या पार्थिवावर शांतिधाम स्मशानभूमी बिनबा गेट जवळ चंद्रपूर येथे अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

  • चंद्रपूर मनसे चे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांचं निधन

    News34 chandrapur

    दुःखद बातमी

    चंद्रपूर – चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष व मनसे राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार यांचं 22 ऑक्टोबर ला दीर्घ आजाराने निधन झाले.

     

    राजकारणात अनेक वर्षे कार्यरत दिलीप रामेडवार यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष करीत न्याय दिला, मध्यंतरी त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी राजकारणातून विश्रांती घेतली होती. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.

     

    22 ऑक्टोबर ला विठ्ठल मंदिर वॉर्ड येथील राहत्या घरी त्यांनी अंतिम श्वास घेतला, दिलीप रामेडवार हे 61 वर्षाचे होते, त्यांच्या जाण्याने मनसे पक्षाची फार मोठी हानी झाली आहे.