Tag: जीवघेणे खड्डे

  • fatal potholes : चंद्रपुरातील जीवघेण्या मार्गावरील खड्ड्यात अपघात

    fatal potholes : चंद्रपुरातील जीवघेण्या मार्गावरील खड्ड्यात अपघात

    Fatal potholes चंद्रपूर शहरातील जीवघेणा मार्ग म्हणजे बागला चौक ते लालपेठ, या मार्गावर जगात कुठेही नसलेले खड्डे तयार झाले आहे, त्या खड्ड्यातून नागरिक आपली वाट काढतात, विशेष बाब म्हणजे दुहेरी मार्ग असलेल्या या रस्त्यावर फक्त 100 मीटर रस्ता तयार झाला आणि उर्वरित रस्ता निधी अभावी रखडला.
    या मार्गावर चंद्रपूर गडचिरोली विभागाचे महावितरण कार्यालय व राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, मात्र त्यानंतर सुद्धा प्रशासन व जनप्रतिनिधी झोपल्याचे सोंग करून आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील रस्त्यावर खड्डयासोबत काढा सेल्फी, आणि मिळवा रोख बक्षिसे


    Fatal potholes 10 ऑगस्टला रात्री mh34 d 7491 हा ऑटोरिक्षा लालपेठ कडे जात होता, ऑटो मध्ये 3 ते 4 प्रवासी होते, महावितरण कार्यालय पर्यंत रस्ता बरा असल्याने ऑटो व्यवस्थित जात होता मात्र अर्धवट मार्ग संपल्यावर ऑटो जीवघेण्या खड्ड्यात फसला व ऑटोचे चिमटा तुटला, यामुळे ऑटो चा पुढील भाग खड्ड्यात अडकला, या खड्डेमय अपघातात प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली.
    ऑटो रिक्षा चालकाने सरळ मनपा व जनप्रतिनिधी यांच्यावर आरोप करीत लालपेठ व बाबूपेठ भागात जनावरे राहतात काय? असा प्रश्न उपस्थित करीत हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी केली.

    महत्त्वाचे : लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर


    चंद्रपूर शहरातील लालपेठ व बल्लारपूर येथे जाणाऱ्या ह्या मार्गावर रोज हजारो वाहने जातात मात्र जीवघेण्या खड्ड्यामुळे नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागते.
    मागील 3 ते 4 वर्षांपासून हा रस्ता पूर्णतः खड्ड्यात गेला असून पावसाळ्यात रस्त्यावर फक्त पाणी दिसते, सदर मार्गावरील रस्ता जणू चोरीला गेला की काय अशी अवस्था या मार्गाची झाली आहे. या मार्गावरून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी यांनी सुद्धा प्रवास केला मात्र या खड्ड्यांकडे त्यांचं लक्ष गेलं नाही का असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.

  • Chandrapur Road : शहरातील जीवघेणे खड्डे तात्काळ बुजवा – बसपाची मागणी

    Chandrapur Road : शहरातील जीवघेणे खड्डे तात्काळ बुजवा – बसपाची मागणी

    Chandrapur Road सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर व इतर वार्ड आणि प्रभागातील रस्त्यांवर अतिशय जीवघेणे खड्डे पडले आहे. जसे महाकाली मंदिर समोरील रस्ता, बागल चौक ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचा रस्ता, चंद्रपूरच्या प्रमुख बस स्थानकापासून बंगाली कॅम्प व समोरील रस्ता, बस स्थानकापासून तूकूम कडे जाण्याचा प्रमुख रस्ता इत्यादी व शहरातील इतर प्रभाग जसे बाबुपेठ प्रभाग, महाकाली कॉलरी प्रभाग , लालपेठ कॉलरी प्रभाग , रयतवारी कॉलरी प्रभाग, इंडस्ट्री इस्टेट प्रभाग, रहमतनगर , भिवापूर प्रभाग, अशा अनेक प्रभागाच्या व शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिशय जीवघेणे खड्डे पडले आहेत.

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज नामंजूर झाला तर असा करा दुरुस्त

    Chandrapur road या रस्त्यांवर सतत वाहतूक सुरू असते, वाहन चालकांना वाहन चालवताना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे.

    खड्डे चुकवताना अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. रात्रीच्या वेळी काही रस्त्यांवर पथदीप नसल्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यात आढळून दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेले आहेत. तरी लवकरात लवकर रस्त्यावरील सर्व जीवघेणे खड्डे बुजवून चंद्रपूरचे शहराचे रस्ते खड्डे मुक्त करून शहरातील लोकांना न्याय द्यावा अशी सकारात्मक चर्चा चंद्रपूर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त साहेब यांच्याशी करण्यात आली व या संबंधीचे निवेदन ही त्यांना देण्यात आले याप्रसंगी बहुजन समाज पार्टी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार , जिल्हा प्रभारी प्रशांत रामटेके, चंद्रपूर शहर अध्यक्ष अमोल राहुलगडे, घुगुस शहराध्यक्ष सिद्धार्थ कोंडागुर्ला, चंद्रपूर शहर महासचिव मंगेश, सागर करमरकर ,विवेक दुपारे अमरदीप दसोडे , अखिल निमगडे, सुवर्णा रामटेके, पौर्णिमा अवतरे , पूजा पोरेकर व बहुजन समाज पार्टी चे इतर कार्यकर्ता उपस्थित होते.