Tag: ओबीसी प्रवर्ग

  • मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये – भावसार समाजाची मागणी

    मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये – भावसार समाजाची मागणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर :-भावसार समाज महिला फाउंडेशन चंद्रपूरच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी श्री संजय जी पवार चंद्रपूर यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यास हरकत नाही परंतु ओबीसी आरक्षणातून देण्यात येऊ नये. असे निवेदन देण्यात आले.

     

    या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष योगिता धनेवार, अभिलाषा मैंदळकर, प्रीती लखदिवे, मीनाक्षी अलोने, कांता दखणे, डॉ. नंदकिशोर मैंदळकर, बबन धानेवार, निकेश पेटकर, प्रदीप गोविंदवार,मोहन जिवतोडे,आदी समाज बांधव उपस्थित होते. इतर मागास वर्गात एकूण 346 जाती आहेत त्यात 37 मुस्लिम जाती पण आहेत. राज्यात एकूण ओबीसींची संख्या 27% आहे मात्र आरक्षण 19% देण्यात येत आहे.

     

    ओबीसींना जाती-गणनेनुसार 27% आरक्षण देण्यात यावे हे अपेक्षित होते. त्यात मराठा समाजाचा १० टक्के लोकसंख्येचा भार का सहन करायचा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास मराठा समाजातील १० टक्के लोकसंख्येचा भार ओबीसी आरक्षणावर पडेल व ओबीसी वर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी आपल्या जीवाची परवाना करता आमरण उपोषण सुरू केले ओबीसींना जागविण्याकरीता आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी आहोतच परंतु ओबीसी नेतेच स्वतःच्या स्वार्थाकरिता त्यांना विसरलेले दिसतात.

     

    कुठे पोहोचले मनोज जरांगे पाटील, कुठे आहेत रवींद्र टोंगे पाटील. (त्यांनी आपले प्राण पणाला लावले होते सांगा कोणासाठी लढायचे)हीच ओबीसींची खरी समस्या आहे. न्यायमूर्ती खत्री आयोग व न्यायमूर्ती बापट आयोगाने आरक्षण नाकारले होतेच. तेव्हा सदर आयोगाचाही विचार होणे गरजेचे आहे. आम्ही मराठा समाजास आरक्षण देण्याच्या विरोधात नाही. त्यांना आरक्षण शासनाने खुशाल द्यावे परंतु ओबीसीच्या कोट्याला न हात लावता आरक्षण देण्यात यावे.

  • ओबीसी समाजाच्या न्यायिक मागण्यांसाठी दोघांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

    ओबीसी समाजाच्या न्यायिक मागण्यांसाठी दोघांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

    News34 chandrapur

    चिमूर – ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य न झाल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने चिमूर क्रांतीभूमीतून 7 दिसेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे चिमूर तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू झाले आहे.

     

    चंद्रपूर येथे ओबीसींच्या मागन्यासाठी रविंद्र टोंगे. विजय बल्की आणि प्रेमानंद जोगी यांनी 11 सप्टेंबर पासून आंदोलन सुरू केले होते. दरम्यान ओबीसींच्या शिष्टमंडलासोबत शासनाच्या झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबरला चंद्रपुरात येऊन अन्नत्याग आंदोलन आश्वासन देऊन सोडविले होते. परंतु ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य झाल्या नाही. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने चिमूर क्रांतीभूमीतून 7 डिसेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे आंदोलन सुरू झाले आहे.

     

    चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेऊन रलीच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलक अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांना तहसील कार्यालयच्या बाजूला उपोषण मंडपात उपोषणाला बसविण्यात आले.

     

    यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर, राज्य उपाध्यक्ष डॉ सतीश वारजूकर, ओबीसी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शाम लेडे, राष्ट्रिय ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, दिनेश कष्टी. माधव डूकरे, अशोक सोनटकके, मारोती अतकरें, चिमूर चे तालुकाध्यक्ष उपस्थित होते

  • 7 डिसेंबर पासून चिमूर तालुक्यात ओबीसींच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होणार

    7 डिसेंबर पासून चिमूर तालुक्यात ओबीसींच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर: चंद्रपुर मध्ये ओबीसींच्या मागण्या करिता रवींद्र टोंगे, विजय बलकी, आणि प्रेमानंद जोगी यांनी ११ सप्टेंबर २०२३ पासून सुरू केले होते, २९ ऑक्टोबर २०२३ ला सह्याद्री अतिथीगृहावर सरकारची ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चां नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक ३० सप्टेंबर २०२३ ला चंद्रपुरात येऊन अन्नत्याग आंदोलन आश्वासन देऊन सोडविले होते परंतू ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य न झाल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या चिमूर क्रांतीभूमीतून ७ डिसेंबर २०२३ पासून अक्षय लांजेवार, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे चिमूर तालुकाध्यक्ष व अजित सुकारे अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहे.

     

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी मंत्री अतुल सावे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जिल्हाधिकारी मार्फ़त याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

     

    ओबीसींच्या मागण्या मध्ये मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा जात-निहाय सर्वे करण्यात यावा, महाराष्ट्र शासनाने थांबविलेली मेगा नोकर भरती त्वरीत सुरु करण्यात यावी, ओबीसी, विजा, भज,व विशेष मागास प्रवर्ग समाजाचा रिक्त पदांचा अनुशेष त्वरित भरण्यात यावा, ओबीसी, विजा, भज,व विशेष मागास प्रवर्ग समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह त्वरित सुरू करण्यात यावे, वसतिगृहात प्रवेशीत नसणार्‍या विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्यात यावी, ओबीसी, विजाए भज,व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शहरात व तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र वाचनालयाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, म्हाडा व सिडको मार्फत बांधून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत ओबीसी, विजा, भज, व विशेष मागास प्रवर्ग संवर्गासाठी आरक्षण लागू करण्यात यावे, विजा, भज, इ.मा.व वि. मा. प्र. या प्रवर्गातील विध्यार्थासाठी ६०५ अभ्यासक्रमात सामाविष्ट नसलेल्या अभ्यासक्रमास स्कॉलरशिप तथा फ्रीशिप लागू करण्यात यावे, ८ लाख रूपये उत्पन्नाची अट रद्द करण्यात यावी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्यावर हिंगोली येथे नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यात यावा यासह विविध मागण्यांना घेवून चिमूर क्रांतीभूमीत राष्ट्रीय ओबीसी महासंघ अन्नत्याग आंदोलन करणार आहे.

  • चंद्रपुर जिल्ह्यात ओबीसींच्या भविष्यासाठी भेटीगाठी जनजागृती अभियान राबविणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मातोश्री सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघ , ओबीसी संघटना व जात संघटनायांची बैठक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली सभा घेण्यात आली.

     

    यासभेत ओबीसीच्या मागण्यांसाठी 21 दिवस अन्नत्याग आंदोलन, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा, तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे, स्वाधार योजना सुरू करण्यात यावी, या व इतर 22 मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेले आंदोलन 30 सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आले.

     

    मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर दिनांक 29 सप्टेंबर ला राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार,ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले. तसेच या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिले. उपोषण सोडायला आलेले उपमुख्यमंत्री यांनी पुढील तीन दिवसात या सर्व मंजूर मागण्यांचे इतिवृत्त प्रकाशित करू असे बोलले. परंतु अजून पर्यत इतिवृत्त दिलेले नसल्यानें सरकारचा निषेधाचा ठराव करण्यात आला.

     

    ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे, विजय बलकी व प्रेमानंद जोगी यांचा नागरी सत्कार कार्यक्रम दिनांक 30 ऑक्टोबर प्रियदर्शन सभागृहात सायंकाळी 6 वाजता घेणार आहे , ओबीसीत मोडणारे खासदार ,आमदार यांनी अजून पर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून देऊ नये असे निवेदन सरकारला दिले नाही आहे , त्यांना तसे निवेदन देण्यासाठी भाग पाडणे आणि 1 नोव्हेंबर 2023 रविंद्र टोंगे यांच्या वेंडली ता चंद्रपूर गावापासून “ओबीसींच्या भविष्यासाठी भेटी गाठी जनजागृती अभियान “सुरू करून जिल्ह्यातील संपूर्ण 15 तालुक्यात अभियान राबविण्यात येणार असून सामारोप चिमूर तालुक्यात करण्यात येइल.

     

    यावेळी सभेला विदर्भ तेली महासंघाचे प्रा सूर्यकांत खणके, माळी महासंघाचे अरुण तिखे, रामभाऊ खडलिंगे, प्रा अनिल शिंदे नंदू नागरकर, पप्पु देशमुख, रविंद्र टोंगे, विजय बलकी , प्रेमानंद जोगी, डॉ दिलीप कांबळे, शाम लेडे ,राजेश बेले, श्रीधर मालेकर,कृनाल चहारे, अरूण देऊलकर, एम वि पोटे, प्रा सुरेश विधाते, प्रा बबन राजूरकर, देवराव दिवसे, प्रदीप पावडे, दिनेश कष्टी, विनोद शेंडे, गणपती मोरें, अक्षय येरगुडे, देवा पाचभाई, शखील शेख, पांडूरंग गावतुरे बंडू लेनगुरे, नाझीर गुलाब कुरेशी, महेश खगार, विलास माथनकर सुधाकर काकडे सुनिल मचणवार,देवराव सोनपित्तरे, अवधुत कोटेवार, रणजित डवरे, भाऊराव झाडे, बाबूराव पारखी,गणेश आवारी, हितेश लोडे,मनिषा बोबडे, कुसुमताई उदार, रजनी मोरे, गोमती पाचभाई उपस्थित होते.

  • पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची शिष्टाई यशस्वी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मुंबई येथे शुक्रवारी (दि.२९) राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची अतिशय सकारात्मक बैठक घेण्यात आली. यात संघटनांच्यावतीने मांडण्यात आलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असून राज्य सरकार ओबीसी समाजाच्या उत्थानाला प्राधान्य देईलअशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विशेष म्हणजे राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ही बैठक घडून आली.

     

    चंद्रपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांच्या उपोषण मंडपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भेट दिली. उपोषणकर्ते श्री. टोंगेविजय बलकीप्रेमानंद जोगी यांना लिंबू पाणी देऊन २० दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची सांगता करण्यात आली.

     

    ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी २० दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करणारे राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांच्या उपोषण मंडपाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १८ सप्टेंबरला भेट दिली होती. त्यांच्यासोबत जवळपास दीड तास चर्चा केली. ओबीसी समाजाच्या मागण्या चर्चेतून आणि संवादातून सोडविण्यात येतील, असा विश्वास देऊन श्री. टोंगे यांनी अन्नत्याग उपोषण सोडावे, असे आवाहन त्यांनी केले होते.  श्री. मुनगंटीवार यांच्या शिष्टाईमुळेच उपोषणाची सांगता होऊ शकली, अशी प्रतिक्रिया जनमानसांतून व्यक्त होत आहे.

    ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत श्री. मुनगंटीवार सुरुवातीपासून अतिशय आग्रही आहेत. त्यांनी याबाबत सातत्याने सरकारकडे पाठपुरावा देखील केला. त्यांच्याच पुढाकारातून शुक्रवार दि. २९ सप्टेंबर २०२३ ला मुंबई येथे ओबीसींच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा घडून आली. राज्य शासनाने सर्व मागण्या मान्य केल्या. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री. टोंगे यांचे उपोषण सोडण्यासाठी चंद्रपुरात आणण्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यशस्वी देखील ठरले.

  • मराठ्यांचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करू नका – अशोक जीवतोडे

    News34 maratha reservation

    चंद्रपूर : मराठ्यांचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, असे ठाम मत ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले आहे. Bolt ear Buds वर 73 टक्क्यांची सूट आजच खरेदी करा…. amazon

    सध्या राज्यात विशेषतः मराठवाड्यात ओबीसी समाजात मराठा समाजाचा समावेश करून आरक्षण देण्याबाबत चर्चा सुरू आहे.

     

    मात्र निजामशाहीतील रेकॉर्ड तपासून कुणबी निकष पूर्ण करणाऱ्या कुणबी समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध नाही, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्यांना याअगोदर पण ओबीसी म्हणून प्रमाणपत्र मिळतच होते, त्याला आमचा विरोध नाहीच, मात्र सरसकट सर्व मराठ्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध आहे.

     

    प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले त्यासाठी आमची तयारी आहे, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले. यात कुणीही राजकारण आणू नये असे देखील डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले, व हीच भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आहे.