Tag: wcl chandrapur

  • wcl chandrapur : Wcl ने ते कंत्राट रद्द करावे – मनसेची मागणी

    wcl chandrapur : Wcl ने ते कंत्राट रद्द करावे – मनसेची मागणी

    wcl chandrapur चंद्रपुर:-वेकोली महाकाली कॉलरी चंद्रपूर अंतर्गत रुग्नवाहीका चालक हे कंत्राटी वाहनचालक असून या वाहनचालकांचा कंत्राट सध्यास्थितीत हाईप्राईड या कंपणीकडे आहे, मात्र या कंपणीच्या कंत्राटदाराने सदर वाहनचालकांना नियमीत मासीक वेतन देत नसून या रुग्णवाहिका चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

    अवश्य वाचा : अतिवृष्टी मुळे नुकसान, तहसीलदार यांनी दिले ई पंचनाम्याचे आदेश

    Wcl chandrapur मागील काही दिवसांपासून या वाहन चालकांचे वेतन रखडले असून यांच्यावर कुंटुबाचे उदनिर्वाह कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे, हाईप्राईड या कंपनीचे कंत्राटदार जाणीवपूर्वक या रुग्णवाहिका चालकांच्या वेतनाकडे दुर्लक्ष करीत असून यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे, तेव्हा आपण आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून हाईप्राईड या कंपणीचे कंत्राट तात्काळ रद्द करून या रुग्ण वाहनचालकांना दिलासा द्यावा या आशयाचे निवेदन wcl च्या जनरल मॅनेजर यांना देण्यात आले.

    अवश्य वाचा : त्या वाघाला पकडण्यास वनविभागाला आले यश

    आठ दिवसाचे आत कोणतीहि कार्यवाही न झाल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार आणि याला सर्वस्वी संबधीत प्रशासन जबाबदार असेल. या आशयाचे निवेदन मनसेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार व मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे, रुग्ण मित्र क्रिष्णा गुप्ता, राजु देवागण, जावेद पटाण, महेन्द्र कामपेल्ली, संदीप मेश्राम यांनी दिले. निवेदन देणार्या शिष्टमंडळात मनसेचे पदाधिकारी व मनसैनिक अणि रुग्ण वाहिका चालक प्रामुख्याने उपस्थित होते

  • तर वेकोली अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार – राजू झोडे यांचा इशारा

    तर वेकोली अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार – राजू झोडे यांचा इशारा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दुर्गापूर उपक्षेत्र वेकोली परिसरात 7 नोव्हेम्बरला 12 वर्षीय प्रेम वाघमारे या बालकाचा वेकोलीच्या वॉटर प्लांट मध्ये बुडून मृत्यू झाला होता, त्यावेळी पीडित परिवाराला 25 लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य करू असे लिखित आश्वासन दिले होते मात्र वेकोली तर्फे आज पत्र मिळाले की अशी मदत करण्याचे कसलेही प्रावधान नाही.

     

    याविरोधात उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे व दुर्गापुरातील नागरिकांनी वेकोली कार्यालयात धडक दिली, वेकोलीच्या वतीने आधीच पोलिसांना बोलाविण्यात आले होते, त्याठिकाणी अनुचित घटना घडून यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

     

    बराच वेळ झोडे यांनी चर्चा केली मात्र काही तोडगा निघत नसल्याने चंद्रपूर वेकोली क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधकांनी आम्हला आठवडा भराचा वेळ द्या आम्ही यामध्ये काही तडजोड करीत विशेष बाब म्हणून पीडित परिवाराला आर्थिक मदत करू असे आश्वासन दिले.

     

    झोडे व नागरिकांना आश्वासन मिळाल्यावर आम्ही आठवड्या नंतर पुन्हा येऊ असे सांगितले, जर पीडित परिवाराला मदत मिळाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राजू झोड यांनी दिला.

     

    कामगार संघटनेच्या भूमिकेवर संभ्रम

    आजच्या चर्चेत वेकोलीच्या 2 कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या, मात्र त्यांनी पीडित परिवाराला मदत मिळावी यासाठी कसलेही भाष्य केले नाही, यावर राजू झोडे संतापले व दोन्ही कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना खडेबोल सुनावले.

    News year 2024
    डॉ. अशोक जीवतोडे यांच्याकडून देशवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • टक्केवारी वरून वेकोली अधिकारी यांची कोळसा पुरवठादार सोबत जुंपली

    टक्केवारी वरून वेकोली अधिकारी यांची कोळसा पुरवठादार सोबत जुंपली

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर ओळखल्या जाते, जिल्ह्यात कोल इंडियाच्या अनेक खाणी आहे मात्र या खाणीतून निघणारा कोळस्याचा झोल मोठया प्रमाणात सुरू असतो.

     

    चंद्रपुरातील वेकोली अधिकारी व कोळसा पुरवठादार यांच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे, या क्लिप मध्ये टक्केवारी बाबत बोलणे सुरू आहे, मात्र वेकोली अधिकारी त्या पुरवठादार याला जे बोलायचे आहे ते कार्यालयात येऊन बोला असे सांगत आहे, कारण विषय अर्थकारणाचा आहे, ती टक्केवारी खालून ते वर पर्यंत जात असल्याने वेकोली अधिकाऱ्याला सावधगिरीचा भाग म्हणून पुरवठादार याला कार्यालयात बोलवावे लागले.

     

    आपण विचारात पडला असेल की हा अधिकारी आहे तरी कोण? चंद्रपूर वेकोली क्षेत्रात असे अनेक प्रकार आजपर्यंत घडले मात्र सदर ऑडिओ क्लिप मूळे टक्केवारी चे काय घबाड असे ते यामुळे बाहेर पडले आहे. याबाबत चौकशी झाल्यास तो टक्केवारी मागणारा अधिकारी कोण आहे हे नक्की कळेल.

  • कोळसा खाणीत होणाऱ्या गुन्ह्यांवर आता ड्रोन ची नजर

    News34

     

    चंद्रपूर/यवतमाळ/नागपूर- चंद्रपूर, यवतमाळ व अन्य जिल्ह्यांमधील वेकोलि खाण क्षेत्रात, क्षेत्रालगतच्या वसाहती तसेच ग्रामिण भागात वेकोलि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत व बेजबाबदार वृत्तीमुळे कोळसा चोरींचे प्रमाण वाढले असुन यातून टोळ्या-टोळ्यांचे माध्यमातून अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळाल्याने गंभीर स्वरूपाच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली आहे.

     

    या क्षेत्रात गँगवार, खुनीसंघर्ष व निर्घृण हत्यांसारखे प्रकार राजरोसपणे सुरू असल्याने वेकोलि क्षेत्रांमध्ये आधुनिकीकरणाचा अवलंब करून ड्रोनद्वारे निगरानी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी वेकोलि प्रबंधनाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना सुनावणी दरम्यान दिले.

     

    उपरोक्त विषयाला घेवून त्रस्त मागासवर्गीय नागरीक तसेच ग्रामिण क्षेत्रातील प्रकल्पपिडीतांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची गांभिर्याने दखल घेवून मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दि. 25 ऑगस्ट 2023 रोजी क्षेत्रीय कार्यालय वेकोलि घुग्गुस येथे सुनावणी घेत या प्रश्नी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

     

    एनसीबीसी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सुनावणीला वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक मनोज कुमार, चंद्रपूरच्या अतिरीक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, यवतमाळचे अतिरीक्त पोलिस अधिक्षक पियुष जगताप, वेकोलिचे मुख्य सुरक्षा अधिकारी कमांडंट विक्रांत, वेकोलि वणी चे क्षेत्रीय महाप्रबंधक आभाषचंद्र सिंह, वेकोलि चंद्रपूर क्षेत्राचे महाप्रबंधक संजय वैरागडे, वणी नॉर्थ क्षेत्राचे श्रीवास्तव, माजरी क्षेत्राचे इलियाज हुसैन यांची या सुनावणीला प्रामुख्याने उपस्थिती होती.

     

    सदर सुनावणीत हंसराज अहीर यांनी वेकोलितील वाढत्या गुन्हेगारीला वेकोलि प्रबंधनास जबाबदार ठरवित या गुन्हेगारीच्या उच्चाटनाकरीता अंतर्गत व परिसरातील सुरक्षा यंत्रणा अत्याधुनिक व सुसज्ज ठेवण्याची सुचना केली. पेट्रोलिंग व शस्त्रसज्ज सुरक्षा रक्षकांच्या संख्येत वाढ करीत स्थानिक पोलिस विभागाशी समन्वय व संपर्क प्रस्थापित करीत त्यांच्या सहकार्याने वेकोलि क्षेत्रातील चोऱ्या व गुन्हेगारीवर अंकुश घालण्याचे निर्देश दिले.

     

    या सुनावणी दरम्यान उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी काही विधायक सुचना करीत त्या अध्यक्ष महोदयांच्या निदर्शनास आणल्या. वेकोलि क्षेत्राच्या 10 किमी अंतरावर स्क्रॅपच्या दुकानांना अनुमती देवू नये याकरिता वेकोलि प्रबंधनाने निवेदनाव्दारे संबंधितांकडे मागणी करावी, वेकोलिच्या अनेक क्षेत्रामध्ये अजुनही चोऱ्यांचे प्रमाण जैसे थे सुरू असल्याने. वेकोलि प्रबंधनाने ड्रोन एजन्सीद्वारा न घेता स्वतः ड्रोनची खरेदी करून या अनुचित घटनांवर नियंत्रण ठेवावे, ज्यादा मनुष्यबळ असलेल्या ठिकाणी कामगारांना सुरक्षा कामी नियुक्त करावे अशा सुचना सुध्दा श्री. अहीर यांनी उपस्थित वेकोलि अधिकाऱ्यांना केल्या.

  • दारू खरेदीसाठी उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या वाहनाचा वापर

    News34

    चंद्रपूर – वेकोली चंद्रपुर क्षेत्रातील एका उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या वाहनाचा वापर दारू खरेदीसाठी करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे.

    मिळालेल्या माहिती नुसार आज 16 ऑगस्ट बुधवारी सायंकाळच्या सुमारास चंद्रपुर क्षेत्रातील एका उपक्षेत्रीय प्रबंधकाचे वाहन शहरातील एक वाइन शॉप जवळ उभे करीत वाहन चालक थेट दारूच्या दुकानात शिरला व दारू खरेदी करीत पुन्हा वाहनात जाऊन बसला.

    हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे,  त्यावेळी त्या वाहनात एक कर्मचारी बसून होता, विशेष बाब म्हणजे बुधवारी सुट्टीचा दिवस असतांना ही गाड़ी शहरात आली कशी? आणि त्यात बसलेला तो कर्मचारी कोण? सदर दारू कुणासाठी खरेदी करण्यात आली? असा प्रश्न काही कर्मचारी करत आहे, यापूर्वी सुद्धा अनेक वेळा वेकोलीच्या वाहनाच्या सर्रासपने दुरुपयोग करण्यात आला परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्या मुळे आता थेट दारू खरेदी करण्यासाठी वेकोलीच्या वाहनाचा वापर केल्या जात आहे