Tag: Tiger cube

  • अखेर त्या बछड्याचा मृत्यू

    News34

    चंद्रपूर – जिल्ह्यातील बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कळमना उपक्षेत्रात 7 सप्टेंबर ला वन कर्मचारी गस्तीवर असताना 2 वाघांचे बछडे त्यांना मृतावस्थेत आढळले व एका बछड्याला वनविभागाने रेस्क्यू केले होते मात्र 9 सप्टेंबरला रेस्क्यू केलेल्या बछड्याचा मृत्यू झाला. Tadoba tiger cube

     

    7 सप्टेंबरला वन कर्मचारी कळमना उपक्षेत्रातील वनखंड क्रमांक 572 मध्ये एक वाघाचा अशक्त बछडा आढळला, त्यानंतर परिसरात शोध मोहीम राबविली असता 2 वाघांचे बछडे मृतावस्थेत आढळले होते.

     

    अशक्त वाघाच्या बछड्याला वनविभागाने रेस्क्यू करीत त्याला वन्यजीव उपचार केंद्र ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात आणले होते, सदर बछडा हा मादी असून त्याचे वय अंदाजे 5 महिने आहे. मात्र उपचारा दरम्यान आज बछड्याचा मृत्यू झाला.

    ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी दिव्य मराठीला माहिती दिली की सदर बछडा हा भुकेने व्याकुळ झाला होता, वाघीण शिकारीला निघून गेल्याने बछड्याना दूध मिळालं नाही, त्यामुळे 2 बछड्याचा मृत्यू झाला, मात्र आम्ही एका बछड्याला रेस्क्यू करीत वन्यजीव उपचार केंद्रात आणले, त्या बछड्यावर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र तो उपचाराला सहकार्य करीत नव्हता, 3 ते 4 दिवस तो बछडा उपाशी असल्याने त्यांच्या शरीरातील अवयव उपचाराला साथ देत नव्हते, आज उपचारा अंती त्याचा मृत्यू झाला.

    वाघिणीचा शोध घेण्यासाठी वनविभागाने जंगल परिसर व इतरत्र कॅमेरे लावले आहे, मात्र जंगलाची व्याप्ती मोठी असल्याने वाघीण नेमकी कुठं गेली याबाबत सांगता येत नाही, तरीसुद्धा वनविभाग वाघिणीचा शोध घेत आहे.

  • धक्कादायक चंद्रपुरात 2 वाघांच्या बछड्याचा मृत्यू

    News34

    चंद्रपूर – जिल्ह्यातील बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कळमना उपक्षेत्रात वन कर्मचारी गस्तीवर असताना 2 वाघांचे बछडे त्यांना मृतावस्थेत आढळले व एका बछड्याला वनविभागाने रेस्क्यू केले.

     

    7 सप्टेंबरला वन कर्मचारी कळमना उपक्षेत्रातील वनखंड क्रमांक 572 मध्ये एक वाघाचा अशक्त बछडा आढळला, त्यानंतर परिसरात शोध मोहीम राबविली असता 2 वाघांचे बछडे मृतावस्थेत आढळले.

     

    अशक्त वाघाला वनविभागाने रेस्क्यू करीत त्याला वन्यजीव उपचार केंद्र ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात आणले आहे, सदर बछडा हा मादी असून त्याचे वय अंदाजे 5 महिने आहे.

     

    मृत वाघांचे बछडे ताब्यात घेत शवं विच्छेदन करीता पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यावर त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत नेमकी माहिती मिळेल.

     

    वन विभागानुसार सदर बछडे हे वाघिणीसोबत असल्याची माहिती आहे, मात्र वाघीण शिकार करण्यासाठी गेली असल्याने हे बछडे भरकटले असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, सध्या वनविभाग वाघिणीचा शोध घेत आहे.

     

    सदर प्रकरणाचा तपास श्वेता बोड्डू उपवनसंरक्षक मध्य चांदा, शेख तौसिफ शेख हैदर सहायक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारपूर करीत आहे.