Tag: Polling & counting day dry day

  • dry day during local body elections । चंद्रपूर जिल्ह्यात ३ दिवस ‘ड्राय डे’ जाहीर!

    dry day during local body elections : चंद्रपूर, दि. २९ नोव्हेम्बर (News३४) : चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगर परिषदा आणि १ नगर पंचायत क्षेत्रात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सलग तीन दिवस ‘मद्य विक्री बंदी’ (ड्राय डे) चे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत.

    राजकीय : वरोरा कांग्रेस मध्ये संकट, महिला अध्यक्षांनी दिला राजीनामा

    जिल्ह्यात २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान वातावरण शांत व निर्भय राहावे, याकरिता ही दारूबंदी लागू करण्यात आली आहे.

    या काळात दारूबंदी:

    • मतदानाच्या पूर्वसंध्येला: १ डिसेंबर २०२५
    • मतदानाच्या दिवशी: २ डिसेंबर २०२५
    • मतमोजणीच्या दिवशी: ३ डिसेंबर २०२५

    या तिन्ही संपूर्ण दिवसांदरम्यान निवडणुकीच्या क्षेत्रात मद्य, बिअर आणि ताडी विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

    निवडणूक कुठे?

    बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, मूल, राजूरा, घुग्घुस, गडचांदूर, नागभीड, चिमूर या नगर परिषदा आणि भिसी नगर पंचायतीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. dry day during local body elections

    जिल्हाधिकारी गौडा यांनी स्पष्ट केले आहे की, या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध (परवानाधारक) नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येईल.