Tag: News34 impact

  • Pilgrimage : चंद्रपुरातील 400 नागरिक पुण्यभूमी अयोध्येसाठी रवाना

    Pilgrimage : चंद्रपुरातील 400 नागरिक पुण्यभूमी अयोध्येसाठी रवाना

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपूर येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्या ४०० प्रवाशांच्या तुकडीचे स्वागत केले. हे भाविक प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी पुण्यभूमी अयोध्येकडे प्रवासाला निघाले होते. बल्लारशाह-अयोध्या ही विशेष ट्रेन (क्र. ०१५९) चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून २० फेब्रुवारी रोजी निघाली. Pilgrimage

     

     

    दुपारी 12:15 वाजता स्थानकावर पोहोचल्यानंतर अहिर यांनी वैयक्तिकरित्या शुभेच्छा दिल्या आणि भाविकांना आनंददायी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला मनपाचे माजी सभापती रवींद्र गुरनुले, चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे दामोदर मंत्री, नरेंद्र सोनी, पूनम तिवारी, श्याम शारदा, अनिश दीक्षित, संजय मंघानी, किशोर बंडवार, रितेश वर्मा आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती. Punyabhumi ayodhya

     

    चंद्रपूर रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्यांनीही रामभक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 01:10 मिनिटांनी, “भारत माता की जय” आणि “जय श्री राम” च्या जयघोषात भाविक आणि मान्यवरांनी रेल्वे स्थानकाचा परिसर दणाणून सोडला. Hansraj ahir

     

    अयोध्येची ही शुभ यात्रा भक्तांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण ते प्रभू श्री रामचंद्रांचे आशीर्वाद घेण्यासाठी तीर्थयात्रेला निघतात. चेअरमन हंसराज अहिर आणि उपस्थित मान्यवरांचे उत्स्फूर्त स्वागत आणि पाठिंबा या पवित्र प्रवासाभोवती एकता आणि भक्तीचा भाव वाढवतो. Prabhu shri ramchandra

  • चंद्रपूर पोलिसांचा संयम सुटला आणि….

    चंद्रपूर पोलिसांचा संयम सुटला आणि….

    News34 chandrapur

    पोंभूर्णा :- धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर झालेल्या मागील आंदोलनात आंदोलनकर्त्यांवर लावण्यात आलेले कलम ३०७ व ३५३ मागे घेण्यात यावे या प्रमुख मागण्यांना घेऊन पोंभूर्णा पोलिस स्टेशन समोर सोमवार पासून सुरू असलेला ठिय्या आंदोलन तिसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी साडे अकरा वाजताच्या सुमारास पोलिसांनी हाणून पाडला. यावेळी ३० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.

     

    धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व ईको-पार्कमध्ये आदिवासी संस्कृतीची झालेली अवहेलना प्रकरणी पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.

    सदर आंदोलनात वन विभागाच्या कार्यालयाची तोडफोड सहित पोलीस कर्मचारी व उपविभागीय अधिकारी इंगळे यांच्यासोबत धक्काबुक्की करण्यात आली होती, त्यानंतर पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते, आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी थेट पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन सुरू झाले, 2 दिवस पोलिसांनी संयम बाळगला मात्र त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवले.

     

    विशेष म्हणजे आदिवासी समाज बांधवांना ठिय्या आंदोलन करण्यासाठी घेऊन आलेले कार्यकर्ते तिथून पळाले होते,

     

    बुधवारी दुपारी अकरा वाजताच्या दरम्यान प्रकरण चिघळणार असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी जुन्या गुन्ह्यातील ४ लोकांना व आंदोलनातील २६ लोकांना ताब्यात घेतले आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.

     

    यावेळी पोलिसांनी ३७ व ईतर २५ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असून त्यांचेवर कलम १४१, १४३, १४७,१४९,३४१,३५३,१०९,१८८ व भादवी सहकलम १३५ अन्वये गुन्हे दाखल केले.

    पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयातील आंदोलना दरम्यान जगन येलके व ईतर १२ लोकांवर ३०७ व ३५३ व विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यातील चार लोकांना पोलिसांनी आंदोलनस्थळी ताब्यात घेतले.

     

    यात गणेश परचाके,दर्शन शेडमाके,कांताबाई मडावी, दिनेश गेडाम यांचा यात समावेश आहे.सदर अटकेतील चारही आरोपींना न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरीत ९ लोकांसहित जगन एलके याना अटक करण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

  • News34 चा दणका – चंद्रपुरातील व्हिडीओ गेम पार्लर कायमचे बंद होणार

    News34 चा दणका – चंद्रपुरातील व्हिडीओ गेम पार्लर कायमचे बंद होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुरात नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लर बाबत 18 सप्टेंबर ला News34 ने बातमी प्रकाशित केली होती, त्या बातमीची चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत कारवाईचा सपाटा सुरू केला होता, याबाबत 13 व्हिडीओ गेम पार्लरचा अहवाल प्रशासनाने नाकारला असून यासोबत जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लर कायमचे बंद होणार अशी चिन्हे आहेत.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात व्हिडीओ गेम च्या नावाने सुरू असलेल्या जुगाराचा News34 ने पंचनामा करीत बातमी प्रकाशित केली होती, सदर बातमीने चंद्रपूर पोलीस व जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले होते, प्रशासनाने नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लर ची तपासणी सुरू केली, अनेकांचे परवाने नूतनीकरण झाले नसल्याची माहिती उघडकीस आली होती.

     

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांनी नियमबाह्य पध्दतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर धाडी मारल्या, मंजूर असलेल्या व्हिडीओ गेम मशीन सोबत अधिकच्या मशीन पोलिसांना आढळून आल्या होत्या, पोलीस व प्रशासनाचा कारवाईचा धडाका सुरू केला होता.

     

    जिल्हाधिकारी गौडा यांनी व्हिडीओ गेम पार्लर धारकांची बैठक बोलावली व 15 ऑक्टोबर पर्यंत परवाण्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले, कालावधी संपल्यावर पोलीस विभागाने अहवाल व परवाना नूतनीकरण नाकारले, प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे व्हिडीओ गेम पार्लर संचालकांचे धाबे दणाणून गेले.

     

    प्रशासनातील अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता आता जिल्ह्यातील नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाई होणार अशी माहिती दिली आहे.

  • पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने त्या अवैध बार वर कारवाई

    News34 Impact

    चंद्रपूर – दुर्गापुरात कसे खुलेआम विना परवाना अवैध बार सुरू आहे या मथळ्याखाली News34 ने 20 सप्टेंबरला बातमी प्रकाशित केली होती, त्या बातमीची दखल पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी घेतल्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली.

     

    विशेष म्हणजे या बार मध्ये कमी किमतीत आपल्याला दारू प्यायला मिळते, महत्वाची बाब म्हणजे दुर्गापुरात 1 नाही तर 2 विना परवाना अवैध बार सुरू आहे.

     

    मागील अनेक वर्षांपासून हा अवैध दारूचा गोरखधंदा नित्याने सुरू आहे, चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल्या जातो, कामगार वर्गाची संख्या याठिकाणी असंख्य आहे.

     

    त्याचा फायदा घेत काही 2 नंबरी चालकांनी थेट दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या अवघ्या 500 मीटर अंतरावर हे विना परवाना अवैध बार सुरू आहे, पोलिसांना हे माहिती नसेल असे मुळीच नाही.

    या मथळ्याखाली बातमी प्रकाशी होताच पोलीस अधीक्षकांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले.

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ दुर्गापूर पोहचताचं त्या अवैध बार वर धाड मारली, या धाडीत तब्बल 25 बॉटल सहित 3 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत मेश्राम नामक बार चालकांवर कारवाई करीत मेश्राम ला दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.

     

  • चंद्रपुर जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लरच्या परवान्याची तपासणी होणार

    News34 impact

    चंद्रपूर – जिल्ह्यात सुरू असलेले नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर विरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.

     

    News34 च्या वृत्तानंतर पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला, स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांनी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाईचे धाडसत्र सुरू केले, पार्लर संचालक यांच्या परवान्यात अनेक त्रुट्या आढळल्याने पोलिसांनी मशीन जप्त केल्या.

     

    आता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सुद्धा प्रशासनाला जिल्ह्यात सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लर चे परवाने तपासण्याचे आदेश पोलीस व तहसीलदार यांना दिले आहे, यासाठी त्यांनी पथक तयार केले असून 15 ऑक्टोबर च्या आता तपासणीचा संपूर्ण अहवाल प्रशासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले आहे.

     

    हे असतील तपासणी पथकातील प्रमुख सदस्य

    पोलीस स्टेशन रामनगर हद्द – तहसीलदार व पोलीस निरीक्षक

    शहर पोलीस स्टेशन, दुर्गापूर, पडोली, बल्लारपूर व इतर तालुक्यात पोलीस निरीक्षक/सहायक पोलिस निरीक्षक व तहसीलदार हे या समितीचे प्रमुख सदस्य असतील.

    पथकाचे काम काय?

    व्हिडीओ गेम पार्लर च्या परवान्याच्या जागेत बदल झाला काय?

    परवण्यातील नमूद वेळ पाळतात काय?

    परवान्यात दर्शविलेल्या संख्ये इतकी मशीन पार्लर वर लावण्यात आली की अतिरिक्त मशीन लावण्यात आले?

    पार्लर मध्ये इतर काही अवैध व्यवसाय चालतात काय?

    परवान्याच्या अटी-शर्तीचे भंग होत आहे काय?

    हे सर्व रीतसर तपासून पथकातील सदस्यांनी मुद्देनिहाय तपासणी करीत संयुक्तरित्या अहवाल 15 ऑक्टोबर च्या आत जिल्हाधिकारी यांना सादर करावा असे लिखित आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे.

     

    विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून सदर व्हिडीओ गेम पार्लर सुरू आहे, पार्लर चालक हे राजकीय पक्षाशी जुळून असल्याने त्यांनी अनेक नियमबाह्य कामे करीत कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली आहे.

    News34 च्या बातमीनंतर आता या नियमबाह्य कामाला काही प्रमाणात चाप बसणार हे निश्चित झाले आहे.