Tag: News34 chandrapur

  • जिल्हाधिकारी गौडा यांनी केली ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची पाहणी

    EVM security guidelines : चंद्रपूर, दि. ०५ डिसेंबर (News३४) : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी चंद्रपूर  विनय गौडा जी. सी. यांनी आज वरोरा तालुक्यात विविध कार्यांचा आढावा घेत क्षेत्रदौरा केला. सुरवातीला त्यांनी वरोरा येथील मतमोजणीसाठी ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनच्या स्ट्रॉंग रूमची पाहणी करून  सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि ईव्हीएम सुरक्षेसंदर्भात आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

    यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मौजे शेगाव बुद्रुक येथील झुडपी जंगल गट क्रमांक 1 ची पाहणी केली. सदर जमीन डी-लिस्टिंगसाठीचा प्रस्ताव वन विभागास पाठविण्याची प्रक्रिया महसूल विभागाने गतिमान करावी, असे निर्देश त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिले. यानंतर चारगाव बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी  मधुकर भलमे यांच्या तूर उत्पादन व बियाणे उत्पादन शेताला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. (हे हि वाचा : ताडोबा अभयारण्यात नियमांचे उल्लंघन)

    शेतकऱ्यांना मार्गदर्शन

    तेलबिया उत्पादन वाढीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब, प्रयोगशील शेती आणि नाविन्यपूर्ण पद्धतींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे सांगून कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे निर्देश त्यांनी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना दिले. EVM security guidelines

    या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी  संदीप भस्के, तहसीलदार योगेश कौटकर, पोलीस निरीक्षक श्री. तांबाडे, उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरिणखेडे, मुख्याधिकारी नगरपरिषद वरोरा श्री. मेश्राम, तालुका कृषी अधिकारी श्री. राठोड, महसूल मंडळ अधिकारी अजय निखाडे यांसह तलाठी व कृषी सहाय्यक उपस्थित होते.

  • ब्रेकिंग: पक्षफोडी सरकारवर धानोरकरांचा हल्लाबोल!

    Maharashtra politics : चंद्रपूर ५ डिसेंबर (News३४) –महाराष्ट्र राज्यात ‘दोन पक्ष फोडून’ स्थापन झालेल्या वर्तमान सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्य सरकारच्या कामगिरीवर जोरदार टीका केली आहे. ‘संतभूमी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचे चित्र गेल्या वर्षभरात अत्यंत निराशाजनक झाले असून, राज्याचे जगासमोर ‘तीन तिघाडा आणि महाराष्ट्राचे काम बिघाडा’ असे लाजिरवाणे झाले आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

    राज्यातील शेतकरी संकटात

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे की, एकीकडे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे, मात्र सध्या राज्यातील शेतकरी पूर्णपणे संकटात सापडले आहेत आणि राज्याची घडी पूर्णपणे मोडलेली आहे. “राज्यात कायद्याची आणि सुव्यवस्थेची स्थिती इतकी बिघडली आहे की, राज्यातील महिलांना निवडणूक अर्ज भरण्यासाठीसुद्धा बंदूकधारी  घेऊन जावे लागते, ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. (हे हि वाचा : चंद्रपूर स्थानिक निवडणुकीतील उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी)

    वर्षभरात पक्ष फोडण्याचे काम

    “या एका वर्षात सरकारने दोन प्रमुख पक्ष फोडून हे सरकार बनवले. पण या सत्तासंघर्षातून आणि पक्षफोडीच्या राजकारणातून सामान्य नागरिकांसाठी काय साध्य केले आहे?” असा थेट प्रश्न खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. केवळ सत्ताकारणासाठी धडपडणाऱ्या या सरकारने महाराष्ट्राची प्रतिमा आणि प्रगती दोन्ही धोक्यात आणले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या सरकारला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देत, त्वरित राज्याच्या मूलभूत समस्यांवर आणि शेतकरी व महिलांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली आहे.

  • चंद्रपुरात १३.५० ग्रॅम एमडीसह २ तरुणांना अटक

    Police raid MD drugs : चंद्रपूर ५ डिसेंबर (News३४) – चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ (एमडी) मेफेड्रोन ची विक्री करणाऱ्या २ तरुणांना अटक करीत त्यांचेजवळून १३.५० ग्राम एमडी सह २ लक्ष २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांविरोधात गुन्हे शाखा मोहीम राबवित कारवाई करीत आहे. जुगार असो कि अंमली पदार्थाची विक्री यावर प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांकडून सुरु आहे. (हे वाचा – स्थानिक गुन्हे शाखेची वाळू तस्करावर कारवाई)

    एमडी तस्करी वाढली

    चंद्रपुरात काही वर्षांपासून गांजा व एमडी पावडरची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, यावर नियंत्रण यावे यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत असली तरी छुप्या मार्गाने हे पदार्थ जिल्ह्यात यदाखल होत आहे.

    म्हाडा कॉलोनी मध्ये राहणारे २४ वर्षीय प्रांजल राकेश तिवारी व २४ वर्षीय अदनान जाकीर शेख राहणार म्हाडा कॉलोनी हे दोघे एमडी पावडरची विक्रीसाठी नागपूर रोडवरील ढाब्याजवळ आले होते. Police raid MD drugs

    गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

    गुन्हे शाखेला याबाबत गोपनीय माहिती प्राप्त होताच दोघांना ढाब्याजवळून अटक केली, आरोपी प्रांजल तिवारी व अदनान शेख कडून १३.५० ग्राम एमडी पावडर, रोख रक्कम सह दोन मोबाईल असा २ लक्ष २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघांवर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये NDPS अधिनियम अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.

    यशस्वी कारवाई पथक

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, हिरालाल गुप्ता यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास सपोनि निलेश वाघमारे करीत आहे.

  • ताडोबा कोर झोनमध्ये ड्रोन उडवला: नियमभंग प्रकरण

    चंद्रपूर/ताडोबा ५ डिसेंबर (News३४) : Tadoba rule violation प्रकरणात गोविंदा असोपा नावाच्या तरुणाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये वाहन थांबवून खाली उतरला. ड्रोन उडवून रील शूट केली. अधिकाऱ्याच्या गाडीचा वापर झाल्याची चर्चा सुरु असून अद्यापही वनविभागाने त्या युवकावर कारवाई केली नाही.

    कोर झोनमध्ये सर्रास नियमभंग: काय घडले?

    ताडोबा कोर झोनमध्ये वाहनातून खाली उतरण्यास सक्त मनाई. असे असताना सुद्धा
    गोविंदा असोपा याने परवानगी नसताना गाडी थांबवली.
    फोटो, व्हिडिओ रील शूट + ड्रोन उडवले आणि अपलोडही केले.

    अधिकाऱ्याच्या गाडीचा वापर? वरदहस्ताचा संशय

    बफर झोनमध्येही उतरण्यास बंदी, कोर झोनमध्ये हा प्रकार.
    ताडोबा अधिकाऱ्याची गाडी वापरल्याची चर्चा.
    वन्यजीवप्रेमींकडून चौकशीची मागणी, असोपा याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे पाठबळ तर नाही अशी चर्चा आता बाहेर आली आहे.

    दुर्दैवी : कौटुंबिक वाद, युवकाने स्वतःला पेटवले

    वन विभागाची कारवाई कधी? ताडोबा सुरक्षेला धोका

    अद्याप गोविंदा असोपा यांच्यावर कोणतीही कारवाई नाही.
    Tadoba rule violation मुळे वन्यजीवांना धोका निर्माण झालं आहे.
     ताडोबा नियम पहा.

    वन्यजीव सुरक्षेसाठी कडक चौकशी आवश्यक

    गोविंद असोपा यांच्या विरुद्ध वनविभागाला तक्रार देण्यात आली आहे, वन्यजीवांच्या या क्षेत्रात असोपा यांनी नियमांचे भंग करीत वन्यजीवांची सुरक्षा धोक्यात टाकली आहे, उलट तक्रारदाराला असोपा यांनी धमकी सुद्धा दिली असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

  • local crime branch sand seizure । गुन्हे शाखेची वाळू तस्करावर कारवाई

    local crime branch sand seizure : राजुरा ४ डिसेंबर (News३४) – राजुरा पोलीस स्टेशन हद्दीत वाळू तस्करी करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड मारत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत ३ ब्रास रेती सह एकूण १५ लक्ष १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    दुर्दैवी : युवकाने स्वतःला पेटविले

    चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरु आहे. महसूल प्रशासन या तस्करीवर झोपेचं सोंग घेऊन आहे. या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने राजुरा हद्दीत सापळा रचत रेतीचा उपसा करीत वाहतूक करणाऱ्यांना वर धरपकड कारवाई केली.

    या कारवाईत ३ ट्रॅक्टर ट्रॉली सह ३ ब्रास गौण खनिज किंमत १५ हजार व ट्रॅक्टर ट्रॉली किंमत १५ लक्ष असा एकूण १५ लक्ष १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत राजेश्वर श्रीधर मालेकर, शुभम नामदेव मुसळे व सचिन भीमराव मडावी राहणार आर्वी तालुका राजुरा यांना ताब्यात घेण्यात आले. घटनेचा पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे. local crime branch sand seizure

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, पोलीस कर्मचारी स्वामीदास चालेकर, अजय बागेसर व गोपीनाथ नरोटे यांनी केली.

    राजुरा तालुक्यात विविध ठिकाणी वाळू माफिया सक्रिय झाला असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा सुरु आहे, मात्र महसूल प्रशासन यावर डोळेझाक करताना दिसत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

  • hospital pollution case WCL Chandrapur । फौजदारी गुन्हे दाखल करा

    hospital pollution case WCL Chandrapur : चंद्रपूर ४ डिसेंबर (News३४) – रुग्णालय परिसरात कालबाह्य झालेल्या औषधी जाळल्याने संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले आक्रमक झाले असून याला जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी बेले यांनी केली आहे.

    संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थ्या, संस्थापक अध्यक्ष. श्री. राजेश वारलुजी बेले यांनी क्षेत्रिय महाप्रबंधक मुख्य चिकित्सा सेवाये, क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी. क्षेत्रिय नोडल अधिकारी, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, चंद्रपूर क्षेत्र यांच्या विरोधात चंद्रपूर शहर पोलीस निरिक्षक यांच्याकडे फौजदारी गुन्हा दाखल करण्याकरीता लेखी तक्रार केली आहे.

    गुन्हेगारी माफिया : चंद्रपुरात शिंदेसेनेने पकडला १२ लक्ष रुपयांचा सुगंधित तंबाखू

    क्षेत्रिय चिकित्सालय, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, लालपेठ चंद्रपूर आवारात कालबाहय झालेल्या औषधी व काही वैद्यकीय साहित्य उघडपणे जाळल्याने वातावरणामध्ये घातक रासायनिक वायू मिश्रीत झाल्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला, मानवाला तसेच मानवी जीव, वन्य प्राणी, पाळीव प्राणी, जलजन्य प्राणी व पक्षी यांच्या संरक्षण कायद्याचे उल्लघन झालेले आहे. त्याकरीता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, चंदपूर यांनी कारणे दाखवा नोटीसमध्ये कठोरपणे वेकोली रूग्णालय, लालपेठ का बंद करण्यात येवू नये अशा प्रकारे नोटीस बजावली आहे व रूग्णालय परिसरात कालबाहय औषधी व वैद्यकीय साहित्य उघडपणे जाळले असल्यामुळे वातावरणात घातक वायु प्रदुषण निर्माण झालेले आहे व 15 दिवसाच्या आत उत्तर मागविण्यात आलेले आहे. hospital pollution case WCL Chandrapur

    ४८ तासांच्या आत उत्तर द्या

    तसेच चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांनी वेकोली रूग्णालय, लालपेठ चंद्रपूर क्षेत्र यांना कालबाहय औषधी व वैद्यकीय साहित्य जाळले असल्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत नोटीस बजावलेली आहे, त्या नोटीसचे उत्तर 48 तासाच्या आत वेकोली वरिष्ठ अधिका-यांना मागितलेली आहे.

    संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थ्या संस्थापक अध्यक्ष, श्री. राजेश वारलुजी बेले यांनी क्षेत्रिय महाप्रबंधक. मुख्य चिकित्सा सेवाये, क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रिय नोडल अधिकारी, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, चंद्रपूर क्षेत्र यांच्याद्वारे वायो मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, नियमानुसार समिती अधिकृत जल प्रदुषणाची तरतुद आणि नियंत्रण कायदा 1974 च्या कलम 25/26 अंतर्गत स्थापित चलीत हवा प्रदुषणाची तरतुद आणि नियंत्रण कायदा 1981 आणि धोकादायक वेस्ट व्यवस्थापन आणि हाताळणी नियम 1989 आणि सुधारीत नियम 2016 च्या पर्यावरण कायद्याचे उल्लंघन झाले त्यामुळे याच्यावर कायदेशीर चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी चंद्रपूर शहर, पोलीस निरिक्षक यांच्याकडे करण्यात आली. त्यावेळी इटकचे सचिव के. के. सिंग उपस्थित होते.

  • illegal tobacco supply chain in Chandrapur । चंद्रपुरात १२ लक्ष रुपयांचा सुगंधित तंबाखू पकडला

    illegal tobacco supply chain in Chandrapur : चंद्रपूर ४ डिसेंबर (News३४) – राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची मोठी खेप शिंदेसनेच्या लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांनी वरोरा शहरात पकडली, नगरपरिषदेचे मतदान झाल्यावर तंबाखू माफिया पुन्हा सक्रिय झाला मात्र राजकीय पुढाऱ्यांनी प्रतिबंधित तंबाखू वाहतूक एकूण मुद्देमाल १७ लक्ष ४० हजार २६० रुपयांचा पकडत प्रशासनाच्या हवाली केल्याने माफियांचे चांगलेच धाबे दणाणले.

    २ महिन्यापूर्वी शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांच्याकडे महिलांनी सुगंधित तंबाखू विक्री वरोरा शहरात थांबवावी असे निवेदन दिले होते, मात्र निवडणुकीच्या काळात यावर कारवाई झाली नाही, निवडणूका संपताच जिवतोडे यांनी महिलांच्या निवेदनावर लक्ष देत ३ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास एकार्जुना तालुका वरोरा येथे अशोक लेलँड कंपनीचा मालवाहू वाहन क्रमांक MH३४ BG १००९ उभी होती, जिवतोडे यांनी आपल्या सहकाऱ्यासमक्ष वाहनांची झडती घेतली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात इगल हुक्का तंबाखू, शिशा, ईगल झेन, विमल, पान पराग पान मसाला असा एकूण १२ लक्ष ४० हजार २६० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. illegal tobacco supply chain in Chandrapur

    गुन्हेगारी – मकोका गुन्ह्यातील आरोपीला अटक

    याबाबत मुकेश जिवतोडे यांनी तात्काळ पोलीस व अन्न व औषध प्रशासनाला याबाबत सूचित केले, वरोरा पोलीस पथक एकार्जुना मध्ये दाखल होते वाहन चालक ५२ वर्षीय मिथुन लहानू घोटेकर राहणार चंद्रपूर याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सांगितले कि सदर माल हा वरोरा शहरातील अनिल बोधे यांच्याकडे पोहचविण्यात येत होता.

    वरोरा पोलिसांनी वाहन चालक घोटेकर व बोधे यांच्यावर कलम १२३, २२३, २७४, २७५ भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम ५९ अन्न सुरक्षा मानदे २००६ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच अनिल बोधे पसार झाले.

    झोपलेल्या प्रशासनाला आली जाग

    शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अवैध सुगंधित तंबाखू पकडल्यानंतर वरोरा पोलीस व अन्न व औषध प्रशासन खळबळून जागे झाले, ४ डिसेंबर रोजी वरोरा शहरात ठिकठिकाणी अनिल फुलचंद शर्मा यांनी साठवून ठेवलेला सुगंधित तंबाखू किंमत ६ लक्ष ४९ हजार १७० रुपये जप्त करण्यात आला.

    चंद्रपूर जिल्हा तंबाखू माफियासांठी अत्यंत सेफ झोन आहे, चंद्रपुरात ठिकठिकाणी खुलेआम सुगंधित तंबाखूची विक्री होते मात्र यावर अन्न व औषध प्रशासन सह पोलीस विभाग डोळेझाक करीत असतात. महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांची प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची उलाढाल होत असते. चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूचा व्यवसाय कोण करत? हे प्रशासनाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. पण प्रशासन यावर निद्रावस्थेत असल्याची भूमिका घेते.

  • SC ST atrocity victims heir job । SC/ST अत्याचार पीडित कुटुंबीयांसाठी मोठी घोषणा!

    सरकारी नोकरी देण्यासाठी जिल्हा समिती सक्रिय

    SC ST atrocity victims heir job : चंद्रपूर, दि. 04 डिसेंबर (News३४) : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत नोंदविण्यात आलेल्या खुन किंवा अत्याचाराच्या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शैक्षणिक अर्हतेनुसार गट-क व गट-ड संवर्गातील शासकीय/निमशासकीय सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 20 नोव्हेंबर 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

    गुन्हा : चंद्रपुरात कांग्रेस नेत्यावर खंडणी चा गुन्हा दाखल

    या निर्णयाच्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक आज (दि. 04 ) जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत नोंदविण्यात आलेल्या मृत्यू प्रकरणातील पात्र वारसांना शासनाने निश्चित केलेल्या तरतुदीनुसार तात्काळ सेवा नियुक्त्या देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

    संबंधित विभागांनी प्रकरणांची छाननी करुन आवश्यक कागदपत्रे त्वरित सादर करावीत, तसेच योग्य पात्र वारसांची निवड करुन शासनाच्या निर्णयानुसार नियुक्ती प्रस्ताव तात्काळ पाठवावेत, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. समितीने या प्रकरणातील विलंब टाळण्यासाठी सर्व विभागांना वेळबद्ध कार्यवाही करण्याचे आदेश दिले असून, अत्याचारग्रस्त कुटुंबीयांना दिलासा मिळावा, यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. SC ST atrocity victims heir job

    बैठकीला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे व इतर अधिकारी उपस्थित होते.

  • special train for Mahaparinirvan Diwas । महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्ध अनुयायांसाठी विशेष सुविधा द्या – खासदार धानोरकर

    special train for Mahaparinirvan Diwas : चंद्रपूर 4 डिसेंबर (News३४): भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) चैत्यभूमी (मुंबई) आणि दीक्षाभूमी (नागपूर) येथे अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांच्या सोयीसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

    खंडणी : वाळू घाट बंद पाडतो, खंडणीचा गुन्हा दाखल

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून समृद्धी महामार्गावर (मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग) टोलमधून संपूर्ण सवलत देण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, महापरिनिर्वाण दिनी लाखो अनुयायी खासगी वाहनांनी प्रवास करतात. त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी व्हावा, तसेच त्यांना वेळेवर आणि सुलभपणे पोहोचता यावे, यासाठी बौद्ध अनुयायांची वाहने टोलमुक्त करावीत. महाराष्ट्राकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्याचा हा मोठा सन्मान ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. special train for Mahaparinirvan Diwas

    दरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही पत्र पाठवून बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरून मुंबईसाठी विशेष रेल्वेगाडी चालवण्याची मागणी करण्यात आली आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईला जातात. नियमित गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन, अनुयायांच्या सोयीसाठी ०५ डिसेंबर रोजी बल्लारपूरहून मुंबईसाठी (अप) आणि ०७ डिसेंबर रोजी मुंबईहून बल्लारपूरसाठी (डाऊन) अशी एक विशेष रेल्वेगाडी त्वरित चालवावी, अशी विनंती रेल्वेमंत्र्यांना करण्यात आली आहे.

  • Pt Deendayal Upadhyay cancer hospital । चंद्रपुरातील कॅन्सर हॉस्पिटलचे नामकरण

    Pt Deendayal Upadhyay cancer hospital : चंद्रपूर, दि.०३ – चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक ठरणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय’ असे नाव देण्यास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. आज विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या रुग्णालयाला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली. या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ संमती दर्शवली असून आता हे रुग्णालय अधिकृतपणे ‘पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय’ या नावाने ओळखले जाणार आहे.

    २८० कोटींचा प्रकल्प

    चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांना नवे परिमाण देणारा २८० कोटींचा १४० खाटांचा कॅन्सर रुग्णालय प्रकल्प लवकरच जनसेवेसाठी उपलब्ध होणार आहे. टाटा ट्रस्ट यांच्या विशेष सहकार्यातून सहकार्यातून उभारलेले हे अत्याधुनिक रुग्णालय पूर्वविदर्भातील आदिवासी, ग्रामीण आणि सर्वसामान्य लोकांसाठी जीवदानाचा नवा आशादायी केंद्रबिंदू ठरणार आहे.

    पैश्याचा बाजार : नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा घोडेबाजार

    अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टी, सततच्या प्रयत्न आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीतून साकारलेला हा सर्वात मोठा आरोग्य प्रकल्प पूर्वविदर्भासाठी ‘नवजीवनाचा आशादायी प्रकाश’ देणारा ठरणार आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी २०१४ पासून या प्रकल्पासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. २०१८ मध्ये शासन निर्णयानंतर उभारणीला गती मिळाली आणि आज हे केंद्र पूर्णत्वास आले आहे. येत्या २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा.मोहनजी भागवत व राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून पूर्व विदर्भासाठी हे रुग्णालय महत्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे.

    रुग्णालयाची वैशिष्ट्ये
    तळमजला + ४ मजले : १,००,०००+ चौ. फूट बांधकाम,१४० बेडचे अत्याधुनिक कॅन्सर उपचार केंद्र,Linear Accelerators (२), ब्रेकीथेरपी, मॅमोग्राफी, 3D/4D अल्ट्रासाऊंड, डिजिटल एक्स-रे,केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, प्रगत प्रयोगशाळा अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात उपलब्ध आहे.