Tag: MH34

  • Pratibha Dhanorkar : त्या आईच्या भावनिक हाकेला खासदार धानोरकरांची साद

    Pratibha Dhanorkar : त्या आईच्या भावनिक हाकेला खासदार धानोरकरांची साद

    Pratibha Dhanorkar खासदार प्रतिभा धानोरकर ह्या नेहमी सामाजिक कार्यासाठी चर्चेत असतात. अशाच एका विद्यार्थ्याच्या पालकांनी मोबाईल वरुन खासदार प्रतिभा धानोरकर यांना संपर्क साधला. वडील नसलेल्या या विद्यार्थ्याच्या आईचे वॉट्सअॅप वरील निवेदन बघून खासदार प्रतिभा धानोरकर भारावून गेल्या व लगेच त्यांनी त्या मुलाचे संपूर्ण शुल्क भरुन शिक्षणासाठी मदतीचा हात दिला.

    चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट

    Pratibha dhanorkar अलीकडे अनेक राजकारणी स्वतः चा स्वार्थ बघत असतांना स्वतः च्या लोकसभा क्षेत्राबाहेरील उस्मानाबाद येथील एका विद्यार्थ्याच्या आईचे निवेदन वॉट्सअॅपवर प्राप्त झाले. त्यांनी सदर निवेदनात खासदार धानोरकरांना भावनीक साद घालत विद्यार्थ्याच्या वडिलाचे निधन झाले असून मुलगा सैनिकी शाळा बल्लारपूर येथे 10वी शिकत असल्याचे सांगितले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने चालू वर्षाचे शैक्षणिक शुल्क भरु शकत नसल्याचे खंत व्यक्त केली. शैक्षणिक शुल्क न भरल्यास वर्ष वाया जाण्याची भिती व्यक्त केली. सदर निवेदनाची दखल घेत सामाजिक भान राखत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सैनिकी शाळेच्या प्राचार्यांशी संपर्क करुन संपूर्ण शुल्क स्वतः भरणार असल्याचे सांगितले व आज  दि. 18 जुलै रोजी आपल्या स्वीय सहायकाच्या माध्यमातून शाळेची संपुर्ण शुल्क कुठलेही राजकीय स्वार्थ न ठेवता लोकसभा क्षेत्रा बाहेरच्या एका आईची भावनिक हाक म्हणून भरले. या प्रसंगाने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण ही व्याख्या सार्थ ठरविली. उस्मानाबाद येथील त्या विद्यार्थ्याच्या आईने खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार व्यक्त करीत लवकरच चंद्रपूर येथे येऊन भेट घेणार असल्याचे सांगितले.

    अवश्य वाचा : ती मृत्यूशी लढत होती आणि नागरिक तिचा व्हिडीओ काढत होते, धक्कादायक घटना

    Pratibha dhanorkarआजच्या व्यस्त कार्यात जनप्रतिनिधी यांना मोबाईल बघण्यासही वेळ नसतो, आमदार नंतर प्रतिभा धानोरकर ह्या खासदार बनल्या, त्यामुळे कामाचा व्याप वाढला, दररोज त्यांच्या मोबाईल वर हजारो कॉल येतात, त्यामधून सुद्धा खासदार धानोरकर यांनी अनोळखी नंबरवरून आलेल्या संदेशाचे वाचन केले आणि त्या काही काळ स्तब्ध राहिल्या.

    मुलांच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं व पत्नीच्या आयुष्यातून पतीचे अचानक जाणे हे त्या संदेशातून व्यक्त झाले होते, ती परिस्थिती व अनुभव खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या वाट्याला आला होता, मात्र त्या प्रसंगातून जाणाऱ्या आईचं दुःख खासदार धानोरकर यांना समजलं, त्यांनी त्या आईसोबत याबाबत चर्चा करीत पूर्ण माहिती घेतली. संपूर्ण माहितीची खातरजमा केल्यावर त्यांनी आपल्या स्वीय सहायकाला निर्देश दिले व त्या आईच्या भावनिक हाकेला त्यांनी साद दिली.

    खासदार धानोरकर यांच्या या कृतीची सर्वत्र चर्चा आता लोकसभा क्षेत्रात होत आहे.

  • chandrapur whether : चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

    chandrapur whether : चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

    chandrapur whether नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 18ते 22जुलै 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 19 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्याकरीता रेड अलर्ट, 20 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट तर 21 आणि 22 जुलै रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनमार्फत करण्यात आले आहे.

    जिल्ह्यासाठी 20 जुलै 2024 रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला असून या कालावधीत चंद्रपूर जिल्‍ह्यात एक दोन ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वारा (तासी 50-60 किमी वेगाने) आणि गडगडाटी वादळाची शक्यता तसेच 21 व 22 जुलै 2024 या कालावधीकरीता चंद्रपूर जिल्‍ह्याकरीता यलो अलर्ट असून या  कालावधीत एक-दोन ठिकाणी विजांच्‍या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्‍यता वर्तविली आहे.  खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी.

    ती बुडत होती आणि नागरिक व्हिडीओ बनवत राहिले, आणि तिचा अंत झाला

    chandrapur whether संरक्षणात्‍मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्‍या. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्‍यापासून दूर रहा. रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातुन जाणे टाळा. खराब दृश्‍यमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा. पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्‍या तारांपासून दूर रहा. फ्लॅश पूर चेतावणी किंवा विजेच्‍या तारोपासून दूर रहा.

    वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये

    विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.           

    तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

    जिल्‍ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घ्‍यावी, असे  आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.

  • Shikshan Prasarak mandal : शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या अध्यक्षपदी अॅड. अनिल वैरागडे अविरोध

    Shikshan Prasarak mandal : शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या अध्यक्षपदी अॅड. अनिल वैरागडे अविरोध

    Shikshan Prasarak mandal गुरू गुरनुले मूल – चंद्रपूर जिल्ह्यातील नामांकीत शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी मंडळाच्या निवडणुकीत अॅड. अनिल वैरागडे यांची अध्यक्षपदी अविरोध निवड झाली. तर सचिव पदासाठी झालेल्या निवडणुकीत निवृत्त मुख्याध्यापक शशिकांत धर्माधिकारी यांनी अजय वासाडे यांचा चार मतांनी पराभव करीत विजय मिळविला. दरम्यान, कार्याध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाला नसल्याने हे पद सध्या रिक्त आहे.

    Shikshan Prasarak mandal शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या अध्यक्ष पदासाठी अॅड. अनिल वैरागडे, उपाध्यक्ष पदाकरिता अॅड. प्रणव वैरागडे आणि अजय वासाडे, सहसचिव पदाकरीता प्राचार्य ते. क. कापगते यांच्या विरोधात कोणीही उमेदवारी दाखल न केल्याने ही सर्व पदे अविरोध निर्वाचित झाली होती. कार्यकारी सदस्य म्हणून यशवंत पुल्लकवार, वैशाली वासाडे यांचीही अविरोध निवड करण्यात आली. सचिव पदासाठी शशिकांत धर्माधिकारी व अजय वासाडे यांचे दोन उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक घेण्यात आली.

    डॉक्टर मुलीची आत्महत्या, लोक बनले मुकदर्शक

    १४ पैकी १२ सदस्यांनी मतदान केले, यामध्ये शशिकांत धर्माधिकारी यांना ८ तर अजय वासाडे यांना ४ मते मिळाली. दरम्यान, मागील २६ वर्षांपासून शिक्षण प्रसारक मंडळात सुरू असलेल्या अंतर्गत वादावर या निवडणुकीने कायमचा पडदा पडला आहे. संस्थेच्या वतीने मूल तालुक्यात शैक्षणिक विकास आता जोमाने करण्यात येईल, असा विश्वास नवनिवर्वाचित अध्यक्ष अॅड. अनिल वैरागडे यांनी व्यक्त केला.

    शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या वतीने मूल व सावली तालुक्यात विविध विद्यालय, महाविद्यालये व छात्रालये चालविली जातात. या संस्थेत १९९८ पासून अंतर्गत वाद होते. हे वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने २३ जानेवारी २०२४ रोजी अंतिम निर्णय देत, २००२ ते २००७ ची कार्यकारिणी वैध ठरवित सहा महिन्याच्या आत सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी नवीन कार्यकारीणीसाठी निवडणूक घ्यावी, असे आदेश दिले. या आदेशानुसार बुधवारी पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल येथे निवडणूक घेण्यात आली. अखेर मूलच्या पदाधिकाऱ्यांनी उभी केलेली संस्था २६ वर्षानंतर मूलच्या पदाधिकाऱ्यांच्या हातात आल्याने मुल नागरिकात आनंद व्यक्त केल्या जात आहे.

  • negative news : या नागरिकांच्या माणुसकीला भावपूर्ण श्रद्धांजली

    negative news : या नागरिकांच्या माणुसकीला भावपूर्ण श्रद्धांजली

    Negative News ब्रह्मपुरी येथील रहिवासी डॉक्टर घनश्याम बिंजवे यांची मुलगी कु. ईशा घनश्याम बिंजवे वय २४ हिने मंगळवार दिनांक 16 जुलै ला सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान आपल्या एक्टिवा एम. एच. ४९ झेड ४१७६ ने वडसा येथील वैनगंगा नदीच्या पुलावर येऊन गाडीवर आपली चप्पल ठेवली आणि नदीच्या पुलावरून उडी घेतली.

    विद्यार्थ्यांच्या संघर्षामुळे गावात आली लालपरी

    नदीच्या पात्रात जास्त पाणी नसल्याने ती बचावली मात्र त्यानंतर त्या मुलीने वाहत्या पाण्याच्या प्रवाहात पुन्हा डुबकी घेतली ती त्या प्रवाहात वाहून गेली. हि घटना 16 जुलैला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली, विशेष म्हणजे यावेळी वैनगंगा नदीच्या पुलावरील लोकांची गर्दी उमडलेली होती, त्या गर्दीने बघ्याची भूमिका घेत तिला वाचविण्याऐवजी त्या मुलीचे व्हिडिओ बनवीत सोशल मीडिया वॉट्सप ग्रुप वर टाकले, या प्रकाराने व्हिडीओ बनविण्याची धडपड दाखविणाऱ्या नागरिकांची माणुसकी अगोदर मरण पावली.

    https://ads.timesdiginews.com/2024/07/shivsena-shinde-our-officers-are-not-listening-appoint-3-district-heads/

    negative news वैनगंगा नदी ही वडसा तहसीलच्या हद्दीत येत असल्यामुळे वडसा पोलीस पथक वैनगंगा नदीच्या पात्रात मुलीचा शोध घेत होते. दुसऱ्या दिवशी नदीच्या पात्रा जवळ असणाऱ्या निलज गावाजवळ ईशा चा मृतदेह आढळून आला.ईशा ने MBBS ची पदवी घेतली होती, तिचे वडील डॉक्टर आहे. सध्या तरी आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही.

  • Tadpatri Vatap : झोपडपट्टीवासीयांना महेश मेंढे यांनी दिला आधार

    Tadpatri Vatap : झोपडपट्टीवासीयांना महेश मेंढे यांनी दिला आधार

    Tadpatri Vatap चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने भिवापूर वॉर्ड, बेनार चौक परीसरातील पाऊस वाऱ्याने अनेक घरांची छप्परे उन्मळून पडली होती अश्या झोपडपट्टी वासीयांना गोरगरीब गरजू लोकांना अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान, चंद्रपूरचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांच्या तर्फे ताडपत्रीचे वाटप करण्यात आले.

    दोन दिवसापूर्वी चंद्रपुरात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे होणाऱ्या मानवी मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. पाऊस वाऱ्याने अनेक घरांची छप्परे उन्मळून पडली आहेत. ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे, वादळामुळे छप्पर उखडले आहे अशा कुटुंबांच्या मदतीसाठी महेश मेंढे यांनी तात्काळ धाव घेतली असून तात्काळ मदतीसाठी ताडपत्री उपलब्ध करून दिल्या आहेत.

    चंद्रपूर मुख्य बस स्थानकावर चोरीचे वाढते प्रमाण, सीसीटीव्ही कॅमेरे लावा – चंदा वैरागडे

    Tadpatri vatap मुसळधार पावसामुळे घरांच्या आतील भागांना अधिक नुकसान होऊ नये म्हणून या ताडपत्री तात्पुरत्या छप्पर म्हणून वापरल्या जातील. त्यामुळे त्यांना थोडा आसरा मिळेल या उद्देशाने त्यांना ताळपत्रीचे वाटप करण्यात आले. ताळपत्री वाटप कार्यक्रमामुळे गोरगरीब गरजू लोकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सदर उपक्रमात लोकांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

    यावेळी ताळपत्रीचे वाटप करतांना अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान, काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांचेसह  मनपाचे माजी नगरसेवक वसंतदादा देशमुख, समाजसेविका सौ. वैशाली चंदनखेडे, सामाजिक कार्यकर्ता प्रकाश चंदनखेडे , उपसरपंच रोशन रामटेके, अविनाश मेश्राम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Main Bus Stand Chandrapur : बस स्थानकांवर सीसीटीव्ही लावा – चंदा वैरागडे

    Main Bus Stand Chandrapur : बस स्थानकांवर सीसीटीव्ही लावा – चंदा वैरागडे

    Main Bus Stand Chandrapur चंद्रपूर शहरातील मुख्य बस स्टाप वर अनेक महिलांचे दाग,दागिने व पैसे चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी पोलीस स्टेशन तसेच महिला काँग्रेस कडे प्राप्त झाल्या आहेत,परंतु बस स्थानकावर cctv नसल्यामुळे त्या चोरट्याना पकडणे शक्य नसल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्याकरिता बस स्थानकांवर सीसीटीव्ही लावण्यात यावे या मागणीचे निवेदन शहर महिला कांग्रेस अध्यक्ष चंदा वैरागडे यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना दिले आहे.


    मागील महिन्यात सौ.अगडे यांचे 6 तोळे आणि श्रीमती डोरलीकर यांचे 10 तोळे, सोनं बस स्थानकावरून चोरीला गेले. याबाबतची तक्रार रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर मध्ये करण्यात आली, परंतु पोलीस विभागाकडून अजूनपर्यंत कुठलही समाधानकारक उत्तर मिळत नाही आहे, त्यामुळे संबंधित महिलांनी शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली.

    चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात कलम 36 लागू

    या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन ज्यांचे सोने चोरीला गेले त्या महिलांना सोबत घेऊन पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का तसेच खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची भेट घेऊन दोन्ही महिलांचे सोने बस स्टॉप वरून चोरीला गेले असल्याने त्यांचेवर आर्थिक आणि मानसिक संकट ओढवले आहे,आपण याप्रकरणात लक्ष घालून न्याय देण्याची मागणी करणारे निवेदन खासदार धानोरकर तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिले.

    Main Bus Stand Chandrapur मागील अनेक वर्षांपासून मुख्य बस स्थानकाचे काम सुरू आहे, आता फक्त 10 टक्के काम शिल्लक आहे,मात्र अजूनही बस स्थानक व्यवस्थापकाने प्रवाश्यांची सुरक्षितता याबाबत विचार केला नाही, बस स्थानक हे नागरिकांच्या वर्दळीचे ठिकाण आहे, अश्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत चोर आपला डाव साधतात, हा प्रकार पोलीस व बस स्थानक व्यवस्थापक यांना माहीत आहे. याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे.

    मात्र त्यानंतर सुद्धा अजूनही प्रशासनाने याबाबत काही ठोस पाऊले उचलली नाही, त्यामुळे आजही चोरीच्या घटना बस स्थानक परिसरात घडत आहे. विशेष म्हणजे अजूनही परिसरातील प्रतिष्ठाने अजूनही बस स्थानकातील इमारतीमध्ये स्थानांतरित करण्यात आले नाही. त्यामुळे अजूनही बस स्थानक व्यवस्थापक प्रवाश्यांच्या सुरक्षितेतकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.

    चंद्रपुरातील शिवसैनिकांचे अधिकारी ऐकत नाही, 3 जिल्हाप्रमुख नियुक्त करा

    त्यामुळे अजूनही गुन्हेगारी मुख्य बस स्थानक परिसरात फोफावत आहे, प्रशासनाने बस स्थानक परिसरात तात्काळ सीसीटीव्ही लावत चोरीच्या घटनांना आळा बसवावा अशी मागणी महिला कांग्रेस तर्फे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे केली आहे.

  • Chandrapur lal pari : विद्यार्थ्यांच्या गावी आली लालपरी

    Chandrapur lal pari : विद्यार्थ्यांच्या गावी आली लालपरी

    Chandrapur lal pari डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थ्यांनी केलेल्या संघर्षाला यश आले आहे. वायगाव, निंबाळा आणि मामला परिसरातील विद्यार्थ्यांसाठी नियमित बस सेवा सुरू करण्यात आली आहे.


    बस स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी करोडो रुपये खर्च केले जात असताना, विद्यार्थ्यांना मूलभूत बस सुविधा मिळत नव्हत्या, ही अत्यंत खेदाची बाब होती. यापुढे तरी परिवहन महामंडळ प्राथमिकता ठरवून खर्च करेल अशी आशा आहे” अशी प्रतिक्रिया त्यांच्या कडून आली.

    चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात अश्विनी खोब्रागडे यांची दावेदारी


    त्यांनी पुढे स्पष्ट केले की, अपुऱ्या बस सुविधा आणि अनियमित वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना शाळेचे तास सोडून बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागत होती. “हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर गंभीर परिणाम करत होते,” असे त्यांनी नमूद केले.


    Chandrapur lal pari डॉ. गावतुरे यांनी परिवहन महामंडळाला सल्ला वजा सूचना देत त्या म्हणाल्या कि, “अमाप आणि अनावश्यक गोष्टींवर पैसे उधळण्याऐवजी, सरकारने गरीब आणि सामान्य जनतेच्या आवश्यक गरजांवर लक्ष केंद्रित करायला हवे.


    सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे मनापासून आभार मानले आहेत. डॉ. अभिलाषा गावतुरे, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या समस्येवर तातडीने कारवाई केल्याबद्दल आभार मानले

  • Hema malini : चंद्रपुरातील ताडोबा महोत्सवात हेमा मालिनीचे आगमन

    Hema malini : चंद्रपुरातील ताडोबा महोत्सवात हेमा मालिनीचे आगमन

    Hema malini चंद्रपूर – चंद्रपुरात सुरू असलेल्या 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सिनेअभिनेत्री हेमा मालिनी यांचे गंगा नृत्य नाटिका सादरीकरणासाठी 3 मार्चला चंद्रपुरात आगमन झाले.

    Hema malini 1 मार्चपासून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आयोजित ताडोबा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

    पालकांनो लक्ष द्या : 8 महिन्याच्या बाळाने गिळली काजळ ची डबी

    यावेळी हेमा मालिनी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करीत वनाचे संरक्षण हे आपले कर्तव्य आहे अशी बाब त्यांनी यावेळी व्यक्त केली.

    सोबतच त्यांना लोकसभा निवडणुकीची मथुरा येथून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहे. 3 दिवस चालणाऱ्या ताडोबा महोत्सवात बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी या गंगा नृत्य करणार आहे, नदीचे रक्षण कसे करावे, त्यासाठी काय उपाययोजना असाव्या याबाबत गंगा नाटिका मध्ये नृत्याद्वारे संपूर्ण विश्लेषण प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 3 दिवसीय ताडोबा महोत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानीचा आस्वाद चंद्रपूर वासीयांना मिळणार आहे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूरच्या वाघांची विशेषतः व त्यांची ओळख जगाला व्हावी हा या कार्यक्रमा मागचा उद्देश्य आहे, ताडोबा महोत्सवाचा प्रचार प्रसार सध्या जोमात सुरू असून यासाठी सौंदर्य स्पर्धा विजेत्यांनी आपल्या देशात ताडोबा अभयारण्याचा प्रचार सुरू केला असून त्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात ताडोबाचा वाघ काय आहे? किती संख्या वाघांची आहे याबाबत परदेशी पर्यटकांना सुद्धा संखोल माहिती मिळणार.

  • VIP Festival : ताडोबा महोत्सवातील VVIP, VIP व प्रीमियम प्रेक्षक कोण?

    VIP Festival : ताडोबा महोत्सवातील VVIP, VIP व प्रीमियम प्रेक्षक कोण?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील चांदा क्लब मैदानावर 1 ते 3 मार्च दरम्यान ताडोबा महोत्सवाचे भव्य आयोजन वनविभागातर्फे करण्यात आले आहे. Vip culture

     

    1 मार्च ला सिनेअभिनेत्री रविना टंडन यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले मात्र पहिल्याच दिवशी ढिसाळ नियोजनाचा अनुभव नागरिकांना बघायला मिळाला. Poor planning

     

    उदघाटन कार्यक्रमात नागरिकांची तुडुंब गर्दी झाली, मात्र वनविभागाच्या कोट्यवधीच्या कार्यक्रमात नियोजनाचा अभाव दिसला, नागरिकांना बसायला जागा नसल्याने त्यांनी जमिनीवर आपले बस्तान मांडत कार्यक्रम बघितला. Tadoba Festival

     

    ताडोबा महोत्सव कार्यक्रमात VVIP, VIP, GOLD व PREMIUM असे पासेस बनविण्यात आले होते मात्र ते पास सामान्य नागरिकांपर्यंत पोहचलेचं नाही. Tadoba mahotsav

     

    याबाबत माहिती काढली असता VVIP रांगेत राजकीय पक्षाचे पुढारी बसलेले होते, VIP रांगेत नागरिक सह पत्रकार हे उभे होते, खुर्ची न मिळाल्याने अनेकजण vip रांगेत खालीच बसले. Vip Member

     

    चंद्रपूर मनपाच्या महापौर पदाचे स्वप्न बघणाऱ्या नेत्याने VVIP पासेसचा गठ्ठा जवळ ठेवला होता, त्यांनी ते vvip पासेस आपले कार्यकर्ते व प्रभागातील श्रीमंत नागरिकांमध्ये वितरण केले. भावी महापौर यांच्या या कृत्याने सामान्य नागरिकांना पासेस मिळाले नाही त्यामुळे अनेकांना कार्यक्रम बघण्यापासून मुकावे लागले. Political vip

     

    नागरिकांच्या तोंडातून यावेळी एकच उदगार निघाले “हा कार्यक्रम प्रायव्हेट लिमिटेड आहे की शासकीय?” 3 दिवस चालणाऱ्या का कार्यक्रमाचे एकूण बजेट 9 कोटी रुपये म्हणजे दर दिवसाला 3 कोटींचा खर्च, इतके वर्ष ताडोब्यात असे कार्यक्रम झाले नाही तर मग यावर्षीचं हा इव्हेंट का आयोजित करण्यात आला, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

     

    जनतेच्या करातून केल्या जाणारी कोट्यवधी रुपयांची ही मोठी उधळण सध्या चंद्रपुरात सुरू आहे. विशेष म्हणजे जनविकास सेना व्यतिरिक्त या इव्हेंट ला कुणी ही विरोध दर्शविला नाही.

     

    जनतेच्या हक्कासाठी लढणारे पक्ष आज तोंडात मृग गिळून गप्प बसले आहे, निवडणुकीच्या वेळी याना जनता आठवते मात्र नागरिकांचा काहीएक फायदा नसलेल्या भव्य आयोजनाला यांचा विरोध दिसत नाही.

     

    पोलीस विभागाने चंद्रपूर-नागपूर मार्गावरील एक रस्ताचं महोत्सवासाठी बंद केला, एकंदरीत कार्यक्रमात गर्दी जमविण्यासाठी प्रशासनाने केलेला हा अयशस्वी प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी सुद्धा झाला, मात्र त्याचा नाहक त्रास जनतेला सोसावा लागत आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षीपासून सुरू झालेल्या या इव्हेंट्मुळे शासकीय कर्मचारी सुद्धा वैतागला आहे, कार्यालयातील कामे सोडून त्यांना इव्हेंट्स मध्ये आपली हजेरी लावावी लागत आहे.

  • Tragic Incident : राजुरा येथे दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू

    Tragic Incident : राजुरा येथे दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू

    news34 chandrapur

    चंद्रपूर/राजुरा – सास्ती गावात एका हृदयद्रावक घटनेत एका विहिरीजवळ पाणी आणि गाळ साचल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. वेकोलिच्या चड्डा या ठेकेदार कंपनीने विहिरीजवळील माती टाकल्याने अनावधानाने तलावासारखा पाण्याचा तलाव तयार झाल्याची घटना घडली. tragic incident

     

    दोन्ही विद्यार्थी, एक इयत्ता 11वी आणि दुसरा 9वीतला, या तलावासारख्या पाण्यात पोहायला गेले आणि त्यामुळे होणाऱ्या धोक्यांची कल्पना नव्हती. दुर्दैवाने, ते पाण्यात आणि गाळात अडकले, त्यामुळे मित्रांचा अकाली मृत्यू झाला. accident prevantion

     

    राजुरा तालुक्यातील सास्ती या गावी आज 2 मार्च ला सकाळी शाळा सुटल्यानंतर पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोन्ही मुलांचे प्रेत पाण्याबाहेर काढले आहे. या मृत मुलांची नावे पियुष राकेश सिडाम, वय17 व साहिल रमेश कुंदलवार, वय 15 अशी आहेत. chandrapur district

     

    घटनेची माहिती मिळताच तातडीने गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि राजुरा पोलिसांना माहिती दिली. यानंतर प्रेत बाहेर काढण्यात आले. मात्र यानंतर कंपनीने नाला रोखून अनाठायी तलाव निर्माण केला, त्यामुळे कंपनीने तातडीने आर्थीक सहायता द्यावी अन्यथा तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. आता या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत येथुन जमावाने प्रेत उचलु दिले नाही. chadda contractor