Tag: farmers safety against wild animals

  • bear attack on farmers । सावली तालुक्यात अस्वलाचा शेतकऱ्यांवर हल्ला

    bear attack on farmers : सावली – सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पिरंजी माल येथील शेतशिवारात अस्वलाने हल्ला करुन दोन शेतकऱ्यांना जखमी केल्याची घटना (दि. 30) रोजी दुपारच्या सुमारास घडली. रोशन कोडापे (42) व मनोहर तोरपकवार (75) अशी जखमी शेतकऱ्यांची नावे असुन दोघेही पिरंजी माल येथील रहिवासी आहेत.

    निवडणूक : चंद्रपूर जिल्ह्यातील ह्या नगर परिषद निवडणूक पुढे ढकलली

    तालुक्यातील पिरंजी माल येथील शेतकरी नेहमीप्रमाणे सदर स्वत:ची गुर ढोरे चारण्याकरीता शेतशिवारात गेले होते. झुडपात दबा धरुन बसलेल्या अस्वलाने अचानक रोशन कोडापे याचेवर हल्ला चढविला व त्याला गंभीर जखमी केले. त्याला वाचविण्याच्याकरीता मनोहर तोरपकवार याने अस्वलाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला असता त्याचेवरही हल्ला चढवून जखमी केले. दोघांनीही आरडाओरड केल्याने अस्वल जंगलाच्या दिशेने पळुन गेली. त्यामुळे दोघांचाही जिव वाचला. bear attack on farmers

    चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला

    चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे, आतापर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४१ नागरिकांचा बळी गेला आहे, अजूनही या संघर्षावर वनविभागाने ठोस पाऊले उचलली नाही आहे, ज्यामुळे या घटना सतत वाढत आहे.

    सदर घटनेची माहिती गावात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना सावलीचे ग्रामिण रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. रोशन कोडापे हा गंभीर जखमी असल्याने त्याला गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात पुढील उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक राजु मुरकुटे यांनी तात्काळ 5000/- रुपयाची जखमींना पुढील उपचाराकरीता वनविभागामार्फत मदत दिली. यावेळी गावकऱ्यांनी अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली