Tag: EVM machine vandalism Gadchandur December election

  • Chandrapur polling percentage | चंद्रपूर नगरपरिषद निवडणूक; निवडणुकीत पैसे वाटप ईव्हीएम फोडली

    Chandrapur polling percentage : चंद्रपूर ३ डिसेंबर (News३४) – ९ नगरपालिका व १ नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले, २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने लोकशाहीच्या उत्सवाची ऐशीतैशी केल्याचे चित्र दिसून आले. गडचांदूर, राजुरा अश्या अनेक भागात खुलेआम सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप करण्यात आले, त्याचे व्हिडीओ समाजमाध्यमात चांगलेच व्हायरल झाले मात्र प्रशासनाने अद्याप त्यांच्यावर कारवाई केली नाही.

    गोंधळ : गडचांदूरात मतदाराने फोडली ईव्हीएम मशीन

    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, चिमूर, गडचांदूर, मूल, नागभीड, राजुरा, वरोरा नगरपरिषद व भिसी नगरपंचायत साठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. घुग्गुस नगरपरिषदेची निवडणूक २० डिसेंबर तर मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे.

    कुठे किती मतदान?

    नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण ३ लक्ष ३९ हजार ४९ मतदार लोकशाहीच्या उत्सवात मतदानाचा हक्क बजावणार होते मात्र यापैकी २ लक्ष १३ हजार ४९१ मतदारांनी मतदान केले, जिल्ह्यातील एकूण मतदानाची टक्केवारी ६२.९७ टक्के होती.सर्वात कमी मतदानाची टक्केवारी बल्लारपूर ५५.३१ टक्के तर गडचांदूर नगरपरिषदेची ५९.५० टक्के तर सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी भिसी नगरपंचायतीसाठी झाले. Chandrapur polling percentage

    • बल्लारपूर नगरपरिषद – ५५.३१ टक्के एकूण मतदार ८३ हजार ८२१, मतदान ४६ हजार ३६०
    • भद्रावती – ६०.५६ टक्के एकूण मतदार ५२ हजार ५७२, एकूण मतदान ३१ हजार ८३६
    • ब्रह्मपुरी – ६७.९० टक्के, एकूण मतदार ३३ हजार ७७९, एकूण मतदान – २२ हजार ९३६
    • चिमूर – ७२.१२ टक्के, एकूण मतदार – २२ हजार ५५७ तर मतदान १६ हजार २६७
    • गडचांदूर – ५९.५० टक्के, एकूण मतदार २४ हजार ४५७ तर एकूण मतदान १४ हजार ५५२
    • मूल – ६८.०८ टक्के एकूण मतदार २१ हजार ७४५, एकूण मतदान – १४ हजार ८०३
    • नागभीड – ७८.५३ टक्के, एकूण मतदार – २० हजार ९९२ तर एकूण मतदान १६ हजार ४८५
    • राजुरा – ६१.८० टक्के, एकूण मतदार – २६ हजार ८५५ तर एकूण मतदान – १६ हजार ५९७
    • वरोरा – ६०.७१ टक्के, एकूण मतदार – ४३ हजार ३२९ तर प्रत्यक्षात मतदान – २६ हजार ३०६
    • भिसी नगरपंचायत – ८२.१९ टक्के, एकूण मतदार – ८ हजार ९४२, प्रत्यक्षात मतदान – ७ हजार ३४९

    वोट चोरीचा ठप्पा लागलेल्या राजुरा विधानसभेत मतदानात मोठा गोंधळ उडाला, गडचांदूर शहरात नगारा वर ईव्हीएम बटन दाबल्यावर कमळ चिन्हाचा लाईट लागला म्हणून मतदाराने थेट ईव्हीएम मशीन फोडून टाकली, यानंतर मतदान केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला होता. भाजप पदाधिकारी तर थेट रस्त्यावर खुलेआम पैसे वाटताना दिसले. भाजप शिस्तप्रिय पक्ष आहे असे जनतेला सांगायचे आणि स्वतः लोकशाहीची चेष्टा करायचं हे काम सत्ताधारी भाजपने चालविले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजपने लोकशाहीची चेष्टा करून टाकली असे चित्र २ डिसेंबर रोजी सर्व जनतेने बघितले.