suicide due to family dispute case : चंद्रपूर/गोंडपिपरी ४ डिसेंबर (News३४) : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात कौटुंबिक वादातून एका ४० वर्षीय युवकाने स्वतःला जाळून घेऊन आत्मदहन केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ३) दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत गंभीररित्या भाजलेल्या युवकाचा उपचारासाठी नागपूर नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
तंबाखू माफिया : शिंदेसेनेने पकडला लाखोंचा तंबाखू, प्रशासन निद्रावस्थेत
प्राप्त माहितीनुसार, गोंडपिपरी जवळील दरूर गावामध्ये नामदेव वासुदेव सोनटक्के (वय ४०) या युवकाने बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास हे टोकाचे पाऊल उचलले. सोनटक्के यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
नामदेव सोनटक्के हे या आत्मदहन प्रक्रियेत गंभीररित्या भाजले गेले. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र, दुर्दैवाने उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. suicide due to family dispute case
बुधवारी ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. कौटुंबिक कलहामुळे त्यांनी निराशेतून हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे दरूर गावावर शोककळा पसरली आहे.
सध्या गोंडपिपरी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, नेमक्या कोणत्या कारणातून हा वाद झाला आणि नामदेव सोनटक्के यांनी आत्मदहन का केले, याबद्दल पोलीस अधिक माहिती गोळा करत आहेत.