Tag: congress chandrapur

  • देशात व राज्यात कांग्रेसला अच्छे दिन – नितीन राऊत

    News34

    चंद्रपूर – राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणावर विश्वासहर्ता नाही, प्रत्येक वेळी पवारांच्या भूमिकेवर संभ्रमाची स्थिती असते अशी प्रतिक्रिया आमदार नितीन राऊत यांनी चंद्रपुरात दिली.

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर लोकसभा निरीक्षक कांग्रेसचे वरिष्ठ नेता आमदार नितीन राऊत व लोकसभा समनव्यक मोजीब पठाण हे चंद्रपूर जिल्ह्यातील लोकसभा क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी आले होते.

    राज्यातील कांग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे चंद्रपूर लोकसभेची जागा रिकामी झाली, लोकसभा पोट निवडणुक लागण्याआधी कांग्रेसने निवडणुकीची पूर्व तयारी सुरू केली आहे.

    लोकसभा क्षेत्राचा आढावा घेतल्यावर नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्दे मांडले.

    सध्या देशात व राज्यात कांग्रेसला अच्छे दिन आले आहे, 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण म्हणजे निरोपीय भाषण होते, देश व राज्यातील कांग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात राहुल गांधी यांना पंतप्रधान बनविण्याची इच्छा असून यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहे.

    शरद पवार यांच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला असता राऊत यांनी राजकारणात पवार यांच्या विश्वासहर्ता नसल्याचे म्हटले आहे, दरवेळेस त्यांच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण होतो, सध्या त्यांनी अजित पवार सोबत गुप्त बैठक घेतल्याने कांग्रेस सध्या त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे, पण शरद पवार शेवटपर्यंत महाविकास आघाडी मध्येच राहतील असा आम्हाला विश्वास असल्याचे म्हटले.
    राज्याला चंद्रपूर जिल्ह्यातून विरोधी पक्षनेता मिळाल्याने त्याचा लाभ राज्याला नक्कीच मिळेल अशी भावना राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.

    चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनातील भावना आम्ही समजून घेतल्या असून लोकसभा नंतर विधानसभा क्षेत्राचा आढावा घेतल्या जाणार त्यानंतर हा सर्व अहवाल पक्ष श्रेठीकडे सादर केल्या जाणार आहे.

    पत्रकार परिषदेत कांग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, वरिष्ठ नेते विनोद दत्तात्रय, कांग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, महिला शहर अध्यक्ष चंदा वैरागडे यांची उपस्थिती होती.