Tag: Chandrapur student suicide 2025

  • जनता कॅरिअर लॉन्चर विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात महत्वाची माहिती

    संस्थाअध्यक्ष व सचिवावर गुन्हे दाखल होणार?

    Janata Career Launcher harassment case : चंद्रपूर २८ नोव्हेम्बर (News३४) – २० नोव्हेम्बर रोजी चंद्रपुरातील चांदा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाऱ्या जनता कॅरिअर लॉन्चर या शिकवणी वर्गातील १७ वर्षीय प्रथमेश सुदरी या मुलाने प्राचार्य, शिक्षक व वॉर्डन यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. संस्थेच्या संस्थाचालकावर अद्याप कारवाई न झाल्याने चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त मुंडे साहेब यांना निवेदन दिले.

    राजकीय : भाजप सरकारने केली ओबीसींची फसवणूक – विजय वडेट्टीवार

    सहारे यांनी मागणी केली कि चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांची यांना सहआरोपी बनवीत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा. शेतकरी कुटुंबातील मुलाने शिक्षणाच्या माध्यमातून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनता करिअर लॉन्चर मध्ये प्रवेश घेतला होता. मात्र या शिकवणी वर्गात त्याला प्राचार्य व शिक्षक आणि वस्तीगृह वॉर्डन यांनी प्रथमेश ला मानसिक त्रास देणे सुरु केले होते. त्यामुळे १७ वर्षीय प्रथमेश ने टोकाचे पाऊल उचलले. आपल्या शिक्षण संस्थेत काय चालतंय? वसतिगृहात काय सुरु आहे? याची काही कल्पना अध्यक्ष व सचिवाना नव्हती का? विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणात प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापक व वॉर्डन जितके दोषी आहे तितकेच संस्था अध्यक्ष व सचिव सुद्धा जबाबदार आहे.

    सहारे यांच्या मागणीवर कारवाई करण्यासाठी तात्काळ चौकशी करीत गुन्हा दाखल करणार असं सकारात्मक उत्तर उपायुक्त मुंडे यांनी दिले. त्यामुळे प्रथमेश च्या आत्महत्येला जबाबदार व्यक्तीवर कारवाई होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत चंद्रपुरातील पोलीस अधीक्षक व महिला बाल विकास विभागाला कारवाई बाबत निवेदन दिले मात्र अद्यापही कारवाई काही झाली नाही.

    शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात वरदहस्त असल्याने जनता करिअर लॉन्चर च्या संस्थाचालकांवर अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही. अल्पवयीन मुलाच्या आत्महत्या प्रकरणी तात्काळ चौकशी होत जबाबदार प्राचार्य सहित संस्था चालक व अध्यक्षांवर गुन्हा दाखल करावा अन्यथा यावर आम्ही आंदोलन पुकारू असा इशारा विक्रांत सहारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.