Tag: Chandrapur shivsena

  • शिवसेना म्हणते आता होऊ द्या चर्चा

    News34

    भद्रावती : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) द्वारा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविल्या जात आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून थेट जनतेत जावून त्यांच्याशी विविध रूपाने नाळ जोडण्याचा प्रयत्न शिवसेना (ऊबाठा) पक्ष करीत आहे. याच पठडीतला “होऊ द्या चर्चा” हा थेट जनतेत जावून मतदारांना बोलत करणारा उपक्रम पक्षातर्फे घेण्यात आलेला आहे. त्याची सुरुवात शेतकऱ्यांचा वर्षातील सर्वात मोठा बैल पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.

     

    सदर उपक्रमाच्या माध्यमातून विद्यमान बोलघेवड्या राज्य सरकारच्या कामाची व योजनांची पुरेपुर कल्पना जनतेला यावी, या उद्देशाने बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी “होऊ द्या चर्चा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

     

    या उपक्रमाबद्दल माहिती देताना रविंद्र शिंदे म्हणाले की, उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यात अडीच वर्षे मुख्यमंत्री राहून जन-कल्याणकारी कार्य केले. ठाकरे सरकारने  शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली. त्यांच्या कारकिर्दीत कोविड-१९ चा प्रादुर्भाव देशभरात पसरलेला होता. त्या दरम्यान कोरोणा काळातील त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली. संयमी राहून कामांचा धडाका त्यांनी राज्यात राबविला होता. त्याउलट ज्या आमदारांना शिवसेनेने बनविले तेच पक्षाला बेईमान झाले व विद्यमान सरकार स्थापन केले.

     

    “खोटे बोला पण रेटून बोला”, या उक्तीप्रमाणे केवळ बोलघेवडेपणा करून सध्या राज्य सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. विद्यमान राज्य सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर यावा. फक्त कागदावर व सरकार मधील नेत्यांच्या तोंडावर असलेल्या योजनांचा भांडाफोड व्हावा, गद्दारांची गद्दारी व एक फुल दोन हाफ सरकारचे अपयश जनतेसमोर आणावे, या हेतूने सदर उपक्रम जनतेत जावून राबविल्या जात असल्याचे रविंद्र शिंदे यांनी सांगितले आहे.

    शिवसेना (ऊबाठा) पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक जनतेत जावून ठाकरे सरकार व शिंदे सरकार या दोन्ही सरकारच्या काळातील कारकिर्दीची तुलनात्मक चर्चा या उपक्रमाच्या माध्यमातून करणार असून जनतेच्या मनातील उत्कृष्ठ सरकार कोणते, हे जाणून घेणार आहे.

    जनतेनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना (ऊबाठा) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले आहे.

  • चंद्रपुरात आज रंगणार दहीहंडी स्पर्धेचा थरार

    News34 dahi handi 2023

    चंद्रपूर – जन्माष्टमी चा सण आज देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे, या उत्साहाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी चंद्रपुरात शिवसेना ठाकरे गटातर्फे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

     

    चंद्रपूर शहरात प्रथमच शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केल्याने जिल्ह्यातील गोविंदा यांना यामध्ये सहभागी होण्याची संधी चालून आली आहे.

     

    7 सप्टेंबर ला रामनगर सिंधी पंचायत मैदानावर सायंकाळी 5 वाजता या स्पर्धेचा रोमांचक थरार नागरिकांना बघायला मिळणार आहे, सोबतच गोविंदाच्या चमुला रोख 1 लक्ष रुपयांचे बक्षीस सुद्धा शिवसेनेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

     

    गोविंदा पथकाची दहीहंडी फोडण्याची चुरस बघण्यासाठी असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून जन्माष्टमी चा उत्साह द्विगुणित करण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी केले आहे.

  • असंख्य ग्रामस्थांचा शिवसेना पक्षात प्रवेश

    Newa34

    भद्रावती : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासून पक्षाचा सन्मान, आपला आब व सोज्वळ राजकारणाचा आदर्श कायम ठेवला आहे.

     

    ८०% समाजकारण व २०% राजकारण हे ब्रीद जोपासत त्यांचे जनसेनेचे कार्य सतत सुरू आहे. याच नितीला चंद्रपूर जिल्ह्यातील 75-वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात राबविण्याचे काम शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे सामाजिक कार्याला प्राधान्य देवून करीत आहे. विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने वरोरा व भद्रावती तालुक्यातील कार्यकर्ते शिवसेनेत पक्षप्रवेश करीत आहेत.

     

    भद्रावती तालुक्यातील जवळपास 500 लोकसंख्या असलेले कान्सा ( शिपूर ) गाव गावात असंख्य सार्वजनिक  समस्या आहेत. गावातील समस्या रविंद्र शिंदे मार्गी लावू शकतात. हा दृढ विश्वास मनात ठेवीत यांना साथ द्यायची असे ठरवित कान्सा ( शिरपूर ) गावातील बहुसंख्य जेष्ठ, युवा, महिला यांनी शिंवबंधन बांधीत पक्ष प्रवेश घेतला.

    विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उप-जिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांच्या मार्गदर्शनात, भद्रावती तालुका प्रमुख नंदु पढाल व नंदोरी-कोकेवाडा विभाग प्रमुख हरीभाऊ रोडे यांच्या नेतृत्वात अनिल मत्ते, पुरुषोत्तम चौधरी, विकास मत्ते, शेखर घुगुल, प्रशांत पिदुरकर, शंकर रोडे, वसंता मत्ते, विलास गेडाम, वामन रोडे, देवराव पिदुरकर, विजय आसुटकर, भास्कर मत्ते, भास्कर पिदुरकर, प्रकाश मत्ते, सुनिल रोडे, ललीत पिदुरकर, गजानन कुंभारे, अजय आसुटकर, अक्षय चौधरी, नंदकिशोर रोडे, सुनिल मत्ते, प्रविण टोंगे, विकास नैताम, केशव पेंदाम, मारोती निखाडे आणि  राजु आसुटकर तसेच महिला वर्गातून बयनाबाई गेडाम, कुसुम रोडे, मंदा पिदुरकर आणि शारदा आसुटकर आदीनी गावकऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश घेतला.

    या पक्षप्रवेश सोहळयाला भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, युवासेना जिल्हा सरचिटणीस येशु गार्गी, भद्रावती विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रोहन कुटेमाटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मत्ते, महादेव रोडे, नामदेव टोंगे, संजय किन्नाके, रामराव मडावी, जयदीप मिलमिले, महादेव आसुटकर, मंगला झाडे, ‍शशिकला टोंगे, गिता मत्ते तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरीक, जेष्ठ, युवा व महिला वर्ग फार मोठया संख्येत  उपस्थित होते.

     

    या पक्षप्रवेश प्रसंगी “कान्सा गावकऱ्यांनी वाचनालयाकरीता गावात जागा द्यावी, मी गावातील युवक- युवतीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे वाचनालय सुरू करणार आहे .” असे विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे म्हणाले, तसेच गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरीता प्राधान्याने कार्य करेन असे पुढे म्हणाले.

    रविंद्र शिंदे यांनी याप्रसंगी कान्सा गावातील सरपंच मयुर टोंगे यांची प्रकृती बरी नसल्याने कार्यक्रम समारोपा नंतर मयुर टोंगे यांच्या घरी जावून प्रकृतीची विचारपूस केली. तसेच कोणतीही आरोग्याविषयक मदत लागल्यास शिवसैनिक सदैव तत्पर आहे, फक्त एक हाक द्या, सर्वतोपरी मदतीचा विश्वास दिला.