Tag: Chandrapur political events 2025

  • Rinku Rajguru in Chandrapur । सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू चंद्रपुरात

    Rinku Rajguru in Chandrapur : बल्लारपूर ३० नोव्हेम्बर २०२५ (News३४) – भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, स्टार प्रचारक, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा बल्लारपूर मतदारसंघाचे लोकनेते आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या भव्य जाहीर सभांचे सोमवार, दि. १ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. मुल आणि बल्लारपूर येथे होणाऱ्या या सभांना ‘सैराट’फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिची उपस्थिती विशेष आकर्षण ठरणार आहे.

    राजकीय – भाजप उमेदवारासाठी कांग्रेस महिला शहर अध्यक्षाचा राजीनामा

    मूल येथे सायंकाळी ५ वाजता आणि बल्लारपूर येथे सायंकाळी ७ वाजता या जाहीर सभा होणार आहेत. मूल येथील गुजरी चौकात आणि बल्लारपूर येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ (गांधी चौक), अभिनेत्री रिंकू राजगुरू नागरिकांशी संवाद साधणार आहे. युवक, महिला आणि सर्व नागरिकांसाठी ही प्रेरणादायी भेट ठरणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

    रिंकू राजगुरू यांचा ‘आशा’ हा चित्रपट येत्या 9 डिसेंबरला प्रदर्शित होणार असून यामध्ये महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. या कथानकाच्या केंद्रस्थानी असलेल्या आशा सेविकेची प्रमुख भूमिका रिंकू राजगुरू  हिने साकारली आहे. रिंकूने साकारलेली ‘आशा’ ही फक्त आरोग्य यंत्रणेतील एक कर्मचारी नसून प्रत्येक महिला व प्रत्येक कुटुंबासाठी मार्गदर्शक आवाज आहे. त्यादृष्टीने आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सभांमध्ये रिंकू राजगुरू हिची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरणार आहे.