Tag: chandrapur municipality

  • अमृत योजनेचे काम पूर्ण करा अन्यथा…..आप पार्टीचा इशारा

    News34 Aap Party

    चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. प्रभागातील डॉ. आंबेडकर नगर आणि बाबुपेठ या दोन भागातील नागरिकांना अजूनही पाणीपुरवठा होत नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.

    आम आदमी पार्टीचे शहर सचिव राजू कुडे यांनी सांगितले की, “बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम 2017 मध्ये सुरू झाले होते. त्यानुसार 2019 पर्यंत काम पूर्ण करावे लागते होते. मात्र, 2023 हे वर्ष संपत असतानाही अद्यापही काम पूर्ण झालेले नाही.

    यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कंत्राटदाराकडून कामात लापरवाई केली जात आहे. कामाची गुणवत्ताही चांगली नाही. अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे. यामुळे रस्ते खराब झाले आहेत. यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
    यासंदर्भात महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले.

    यावेळी आम आदमी पार्टीचे नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, युवा अध्यक्ष संतोष बोपचे, उपाध्यक्ष सुनील सतभय्या तब्बसुम शेख, सुधीर पाटील अनुप तेलतुंबडे, डॉ. देवेंद्र अहेर, जयदेव देवगडे, अजय बाथव, भिमराज बागेसर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

    “आम्ही मनपा प्रशासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम देत आहोत. जर एक महिन्यात काम पूर्ण झाले नाही तर आम आदमी पार्टीकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
    – राजू कुडे, शहर सचिव

  • चंद्रपुरात गणेशोत्सावर होणार लीग स्पर्धा

    News34

    Ganesh utsav festival

    चंद्रपूर – येत्या गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे पर्यावरण पुरक सार्वजनिक गणेश मंडळ व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यात सार्वजनिक गणेश मंडळांनी मनपातर्फे देण्यात आलेल्या विषयांवर सजावट/देखावा करणे तसेच सार्वजनिक जागा सौंदर्यीकरण करणे अपेक्षित असुन यात प्रथम आलेल्या मंडळाला १ लक्ष रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

     

    मनपा स्वच्छता विभागातर्फे गणेशोत्सव सौंदर्यीकरण पंधरवाडा दिनांक ०२ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत राबविला जाणार असुन यात सार्वजनिक जागांचे सौंदर्यीकरण करावयाचे आहे.यात पर्यावरण पूरक मूर्ती, पर्यावरण पूरक सजावट,ध्वनिप्रदूषण रहीत वातावरण, गणेशोत्सव मंडळाने आवश्यक सर्व शासकीय परवानगी घेणे,सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा घेणे,निर्माल्यपासुन खत निर्मिती करणे,परिसराची स्वच्छता व शिस्त ठेवणे, मंडप परिसरात सामाजीक संदेश देणारे देखावा तयार करणे इत्यादींवर गुण दिले जाणार आहेत.

     

    इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवी दुकान, खरेदी करा amazon वर

    रेन वाटर हार्वेस्टिंग,पर्यावरण संरक्षण व संवर्धन, पर्यावरण पुरक गाडी ( ई व्हेईकल ),स्वच्छ चंद्रपूर सुंदर चंदपूर या विषयांवर प्रचार प्रसिद्धी करणारे सजावट/देखावा गणेश मंडळांना करावयाचा आहे. यासोबतच शहराच्या वैभवाची साक्ष असणारे किल्ले यांची स्वच्छता करणाऱ्या मंडळांची विशेष दखल घेतली जाणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सर्व गणेश मंडळांनी यात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

    अटी व शर्ती :-
    मंडळ हे धर्मदाय आयुक्त यांचेकडे नोंदणी केलेले असावे किंवा महानगरपालिका चंद्रपूर यांची परवानगीधारक असणे बंधनकारक आहे.
    मंडळ चंद्रपूर शहरातील असावे
    सजावट/देखावा साठी कोणतेही साहित्य मनापाद्वारे पुरविण्यात येणार नाही.

    सौंदर्यीकरणासाठी जागा ही चौक किंवा सार्वजनिक स्थळ/जागा असावे.
    मनपा तर्फे झाडे व पेंटिंग कलर मर्यादित) पुरविण्यात येईल.
    स्पर्धा गटाचे सह्भागीतेवर बक्षीस रक्कम व रोख रक्कम कमी / जास्त करण्याचा अधिकार मनपा कडे राहील.

     

    बक्षिसे :
    प्रथम पारितोषिक – १ लक्ष व ट्रॉफी व सन्मानपत्र.
    द्वितीय पारितोषिक – ७१ हजार व ट्रॉफी व सन्मानपत्र.
    तृतीय पारितोषिक – ५१ हजार व ट्रॉफी व सन्मानपत्र.
    टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु बनविणे  – २१ हजार व ट्रॉफी व सन्मानपत्र.
    प्रोत्साहनपर १० पारितोषिक – २१ हजार व ट्रॉफी व सन्मानपत्र.

  • चंद्रपूर मनपाचे मिशन डेंग्यू सुरू

    News34

    Mission dengue

    चंद्रपूर – डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार या पावसाळ्यात होऊ नये या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असुन किटकनाशक फवारणी व धुरळणी मोहीम शहराच्या प्रत्येक भागात राबविण्यात येत आहे.

    आरोग्य विभागामार्फत डासअळी उगमस्थाने शोधुन नष्ट करण्यास कंटेनर सर्वे राबविला जात असुन संभाव्य दुषित घरे ओळखुन त्यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. पाण्यातील डासांची अंडी खाऊन टाकणारे गप्पी मासे विविध पाण्यांच्या साठ्यात सोडण्याची धडक मोहीम सुद्धा शहरात राबविली जात असुन   नागरिकांना आपल्या घरी गप्पी मासे ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

    २५ ब्रिडींग चेकर्स, १५ एएनएम,आशा वर्कर, स्वच्छता निरीक्षक हे घरोघरी भेट देऊन कुलर, फ्रिज, फिश पॉट, पाण्याची टाकी इत्यादी डासोत्पत्ती स्थाने अबेट द्रावणाद्वारे नष्ट करत असुन प्रत्येक घरी डेंग्युविषयी जनजागृती केली जात आहे. प्रथम कंटेनर सर्वे अंतर्गत झालेल्या घरांच्या तपासणीत १४ टक्के घरे दुषित आढळल्याने दुसऱ्या टप्प्यात ज्या घरांमध्ये डासअळी उगमस्थाने आढळतील त्यांना दंडीत केले जात आहे.
    सर्व शाळांना स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड देण्यात आले असुन शिक्षक, पालक व विद्यार्थी यांना डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचे उगमस्थान व रोगापासुन आपला बचाव कसा करावा याची माहीती देण्यात येत आहे. आता शाळकरी मुले आपल्या घरी डेंग्युविषयी जागृती करत आहेत व मनपाच्या मोहीमेस सहकार्य करत आहे. डेंग्युचा डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करणे आवश्यक असुन कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे यात पाणी साचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी साठवण्याची भांडी कोरडी करणे,डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाकणे, पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाकणे हे डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यास आवश्यक आहे.

    डेंगू हा जीवघेणा आजार आहे असल्याचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे डांस वाढीला प्रतिबंध हाच सर्वात उत्तम उपाय आहे.डेंग्यु रोगासंदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

  • चंद्रपूर मनपा इमारतीच्या पार्किंग मध्ये मिळालेला तो व्यक्ती कोण?

    News34

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील महानगरपालिका इमारतीच्या पार्किंगमध्ये पोलिसांना एक व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत आढळला होता, पोलिसांनी त्या इसमाला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले, काही वेळांनी डॉक्टरांनी त्या इसमाला मृत घोषित केले.

    9 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान कर्तव्यावर असताना शहर पोलीस स्टेशनचे पोउपनी किशोर मानकर यांना सकाळी 7.15 वाजे दरम्यान माहिती मिळाली की मनपाच्या पार्किंग मध्ये एक अनोळखी इसम झोपलेल्या अवस्थेत आहे.

    पोलिसांनी तात्काळ पार्किंग मध्ये जाऊन बघितले असता त्याठिकाणी अंदाजे 50 वर्षीय पुरुष त्याच्या चेहऱ्यावर माशा लागून असलेल्या अवस्थेत होता, पोलिसांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले मात्र काही वेळाने त्याचा मृत्यू झाला.

    मृतक इसमाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे,

    वय अंदाजे 50 वर्ष, रंग काळा, डाव्या हातावर गौतम बुद्धाचे गोदवलेले चित्र या वर्णनाच्या व्यक्तीला कुणी ओळखत असेल तर चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

  • दादमहल वार्डात मनपाच्या आरोग्य वर्धिनी केंद्राचे उदघाटन

    News34

    चंद्रपूर –  भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पुर्ण केली असतांना शासनाद्वारे विविध आरोग्यदायी योजना यशस्वीपणे राबविल्या जात असुन आरोग्य या मुलभुत सेवेसाठी दर्जेदार व्यवस्था उभारण्यास नेहमीच कटीबद्ध राहणार असल्याचे मा.पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगीतले.

    चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी दादमहल येथील डॉ. जाकीर हुसेन उर्दु प्राथमिक शाळा येथील मनपा आरोग्यवर्धिनी केंद्राचे उदघाटन मा.पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले की, आज शासनाद्वारे ग्रामीण तसेच शहरी भागातील आरोग्य सेवा सक्षम केल्या जात आहेत. उपचारासाठी मोठ्या रुग्णांलयांचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने आणि गरजूंना घराजवळ उपचाराची सुविधा मिळवून देण्याची गरज लक्षात घेऊन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यात ७०० ठिकाणी सुरु केले जात आहेत.

    केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्मान भारत योजना राबविली जात असून या योजनेंतर्गत महात्मा फुले आरोग्य सेवेचे विमा संरक्षण हे दीड लाखांपासून ५ लक्ष पर्यंत वाढविण्यात आले आहे. घराजवळ आरोग्य वर्धिनी केंद्र उपलब्ध होत असल्याने आता कुणालाही आर्थीक परिस्थितीमुळे आजार अंगावर काढण्याची गरज नाही. या आरोग्य विम्याच्या माध्यमातून खाजगी व सरकारी रुग्णालयांच्या सहाय्याने एकूण १२०९ उपचार व शस्त्रक्रियांवर मोफत सेवा रुग्णास देण्यात येत असुन गरीब व गरजुंना आरोग्य सेवेचा लाभ योग्य प्रकारे दिला जात आहे.

    चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे दादमहल येथील नवीन आरोग्यवर्धिनी केंद्र मिळुन एकूण १२ केंद्रे सुरु करण्यात आली आहे. या केंद्रांवर बाह्यरुग्ण सेवा,मोफत औषधोपचार,मोफत तपासणी,गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण,फोनद्वारे आरोग्य सल्ला देणे इत्यादी आरोग्य सेवा देण्यात येतात.

    या प्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल,उपायुक्त अशोक गराटे ,उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता अनिल घुमडे, विजय बोरीकर, रविंद्र हजारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार,माजी उपमहापौर राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे,माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश धारणे, डॉ. आविष्कार खंडारे उपस्थीत होते.