Tag: Chandrapur mns

  • धक्कादायक चक्क मुख्याध्यापकानेचं चोरले शाळेतील संगणक

    News34

    चंद्रपूर :- वरोरा तालुक्यातील बोर्डा या गावांतील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतून संगणक चोरी व शा.पो.आ योजनेचे कॅश बुक गहाळ केल्याने सेवानिवृत्त मुख्याध्यापक गौतम गेडाम यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांच्या नेत्रुत्वात गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

    दरम्यान गटशिक्षणाधिकारी यांनी तीन नोटीस देऊनही सेवानिवृत्त गेडाम यांनी संगणक जमा केले नसल्याने त्याच्या पेंशन मधून पैसे कपात करण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्डा येथील सेवानिवृत्त गेडाम यांनी दिनांक 16/06/2022 ला शाळेचा प्रभार देण्यासंदर्भात मारोतराव रायपुरे केंद्र प्रमुख, वरोरा यांनी शाळेला भेट दिली असता रजिस्टर नंबर 33, पान क्र. 75 वरील नोंदीनुसार दिनांक 26/01/2020 ला गट ग्रामपंचायत, बोर्ड ने शाळेला कंपनीचे संगणक दिलेले आहे. त्या संगणकाची नोंद माल पुस्तकात घेतली आहे, परंतु मून मॅडम यांच्याकडे प्रभार देताना यादीत संगणकाची नोंद सेवानिवृत्त मुख्याध्यापक गौतम गेडाम यांनी घेतली नाही व संगणक सुपूर्दही केलेले नाही. तसेच शालेय पोषण आहार योजनेचे कॅश बुक रजिस्टर शाळेत उपलब्ध नाही.

    दरम्यान या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे चौकशी अहवाल गटशिक्षणाधिकारी यानी पाठविला आहे, परंतु या संदर्भात कुठलाही निर्णय घेतला नसल्याने शाळेच्या संगणकाची चोरी करणाऱ्या मुख्याध्यापकांना जिल्हा परिषद पाठीशी घालत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आज शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चक्क मुख्याध्यापकांनी शाळेचे संगणक शाळेतून चोरून न्यावे ही बाब अत्यंत गंभीर असून शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी आहे.

     

    करिता सेवानिवृत्त मुख्याध्यापक गौतम गेडाम यांनी संगणक व शा.पो.आ योजनेचे कॅश बुक गहाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर त्वरीत फौजदारी कारवाई करावी व त्यांच्या पेंशन मधून संगणकाची किमंत वसूल करावी व त्यातून शाळेला संगणक देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.

     

    यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे. मनसे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे. मनसे वरोरा तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी. मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रवीण शेवते, देवा येरणे, प्रतीक मुडे, सूरज मानकर, संतोष नागपूरे, मनविसे तालुका उपाध्यक्ष मयूर खंगार शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष बबलू परचाके इत्यादींची उपस्थिती होती.

  • चंद्रपूर जिल्हा मनसेचा चौकशी समितीला घेराव

    News34

    चंद्रपूर – जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालय रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिकेचा कर्तव्य बजावत असताना झालेल्या मृत्यूने शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अतिशय महत्वपूर्ण असणाऱ्या आरोग्य व्यवस्थेत डॉक्टर उपलब्ध नसल्याने व उपचाराअभावी मृत्यू झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रोष व्यक्त करीत, सदर प्रकरणाची चौकशी सुरु असलेल्या समितीच्या बैठीकित प्रवेश करीत उपस्थित समितीला पदावर बसण्याचा नैतिक अधिकार नसून पदाचे राजीनामे देण्याची मागणी यावेळी केली. व बाहेरील स्वतंत्र उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी करण्याची मागणी यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केली.

    या घटनेमुळे सामान्य नागरिकांनि या सरकारवर व व्यवस्थेवर विश्वास ठेवावा तरी कसा, असा प्रश्न आता सामान्याना पडला आहे. या मृत्यूस सर्वस्वी जवाबदार डॉक्टर आहेत असा आरोप तेथील सर्व परिचरिकेंनी करत काम बंद आंदोलन केले. यावरून तेथे काम करणाऱ्यांकडे डॉक्टर दुर्लक्ष करत आहेत तर सामान्य नागरिकांचा उपचार वाऱ्यावर असल्याचे सिद्ध होते.

    यावेळी मनसे तर्फे वर्षभरा आधी दिलेल्या निवेदनात औषध बाहेरून विकत घ्यावे लागते, घाणीचे साम्राज्य, रुग्णालयात सोनोग्राफी सारख्या अतिशय महत्वाच्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध राहत नाही त्यामुळे रुग्णांना एक दोन महिन्याची सोनोग्राफीची तारीख देण्यात येते यावर तक्रार केली होती परंतु तेही परिस्थिती जैसे थे असल्याचे यावेळी चौकशी समितीच्या निदर्शनात आणून देण्यात आले. तसेच सीआर्म ऑर्थो मशीन बंद आहे, येथील कार्यरत डॉक्टर्स स्वतः रुग्णालयात उपस्थित न राहता मेडिकल इंटर्न कडून रुग्णांची तपासणी करत असल्याने एखादी अनुचित घटना घडू शकते ह्या सर्व विषयांना घेऊन मनसे तर्फे प्रभारी अधिष्ठाता डॉ. उईके यांना घेराव करीत वरील प्रश्न उपस्थित करण्यात आले.

    सदर बैठकीत यंत्रणा पुरविण्यात सरकारचा हलगर्जी पणा, डॉक्टर, परिचारिकाचा अभाव व त्यांची रखडलेली भरती यामुळे हे सर्व प्रकार घडत असल्याचा समितीचा एकंदरीत सुर असल्याने शासनाची आरोग्य विभागा बद्दलची उदासीनता या साठी कारणीभूत असल्याचे चित्र स्पष्ट होते, औषधांचा पुरवठा शासनाकडून होत नाही ही शरमेची बाब आहे असा आरोप यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केला.

    यावेळी विधी विभागाच्या जिल्हाध्यक्ष मंजुषा लेडांगे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासालवार, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे, जिल्हासचिव किशोर मडगुलवार तालुकाअध्यक्ष प्रकाश नागरकर, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, शहरसंघटक मनोज तांबेकर, मनविसे शहर उपाध्यक्ष सुयोग धणवलकर, राकेश पराडकर, मयूर मदणकर, तुषार येरमे, कार्तिक खंगार, बाळु शेवते व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.