Tag: Chandrapur congress

  • जनसंवाद पदयात्रेचा इफेक्ट

    News34 गुरू गुरनुले

    मुल – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानव्ये जनसंवाद पदयात्रेने काँग्रेस नेते सी.डी.सी.डी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात मुल तालुक्यातील कोसंबी, मारोडा, आदर्षखेडा, उषराळा, भादूर्णी, मरेगाव, चीतेगाव, बेलगाटा, चिखली, गांगलवाडी, डोंगरगाव, राजोली, ताडाळा, चीचाळा, हळदी, भेजगावं, येरगाव, चांदापुर, जूनासुरला, गडीसुरला, नवेगाव (भू), बाबराळा, बेबाळ, बोंडाळा, नांदगाव, जानाळा, फूलझरी ,कांतापेठ, टोलेवाही, चिरोली, हेटी, खालवसपेठ, उठलपेठ, नलेश्र्वर, सुशी, केळझर इत्यादी गावात पदयात्रा काढून काँग्रेसचे पदाधिकारी, महिला,पुरुष व युवक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवादल काँग्रेस प्रेमी बहुसंख्येने सहभागी होऊन केंद्र व राज्य सरकारने चालवलेली हुकूमशाही, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार ,विजेचे वाढते दर, शेतकरी दुष्काळ, मानवावर वन्य प्राण्यांचे हल्ले, लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ह्या जनसंवाद पदयातत्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या हुकूमशाहीने सुरु असलेल्या महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, विजेचे वाढीव दर, शेतकरी दुष्काळ, वन्यप्राण्यांचे हल्ले, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार, खोटे खटले दाखल करुन लोकशाहीची हत्या करणे अशा महत्वाच्या समस्याची जाणीव चर्चेतून सर्व सामान्य जनतेशी संवाद साधून समजाऊन सांगण्यात आली. Congress party news

     

    पदयात्रेत काँग्रेसने सी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सर्व संचालक, ३४ ग्राम पंचायतीचे सरपंच,उपसरपंच व सदस्य, माजी नगरसेवक, सहकारी सोसायट्यानचे अध्यक्ष व सदस्य, तालुकाचे अध्यक्ष व पदाधिकारी युवक कांग्रेस अध्यक्ष व पदाधिकारी, महिला काँग्रेसचे अध्यक्षा व पदाधिकारी, महिला शहर काँग्रेसच्या अध्यक्षा व पदाधिकारी, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष पदाधिकारी, ओबीसी सेल, किसान सेल पदाधिकारी, औद्योगिक सेलचे पदाधिकारी, व तालुक्यातील कांग्रेस प्रेमी पदयात्रेत सहभागी झाले. यात्रेत असंख्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

     

    बेंबाळ येथे भाजप व वंचीत कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

    बेंबाळ यात्रेच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे गंगाधर आनंदराव बोरकर व वंचीत आघाडीचे प्रमोद वाळके, साजिद उराडे यांनी असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यात्रेचे नेतृत्व सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष सिंहरावत यांनी प्रवेश करणाऱ्यांचे पुष्प गुच्छ व गळ्यात काँग्रेस दुपट्टा घालून स्वागत केले अभिनंदन केले.

     

    याप्रसंगी बाजार समिती सभापती राकेश रत्नावार,माजी तालुकाध्यक्ष व संचालक घनश्याम येनुरकर, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, ग्रामीण कांग्रेस नेते दीपक पाटील वाढई, राजू पा. मारकवार, सरपंच चांगदेव केमेकर, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, प्रशांत उराडे, उपसरपंच देवाजी ध्यांनबोइंनवार, माजी सरपंच विजय बॉम्मावार,किशोर नंदीग्रामवार, विनोद वाढई, गणेश नीलमवार, शहर अध्यक्ष सुनील शेरकी दीपक कोटगले, ज्येष्ठ कांग्रेस नेते नत्थु पा.आरेकर, बंडूभाऊ गुरनुले,ओबीसी राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, सेवादलाचे नामदेवराव गावतुरे, संचालक सुमित आरेकर, युवा नेते मनी बुग्गावार, पं.स.माजी उपसभापती. दशरथ वाकुडकर, सरपंच हिमानी वाकुडकर, बाजार समिती संचालक योगेश शेरकी, जालिंदर बांगरे, सरपंच धीरज गोहने, संतोष चावरे, संदीप मोहबे, तालुका महिला कांग्रेस अध्यक्षा रुपाली संतोषवार, शशिकला गावतूरे ,शहर अध्यक्षा नलिनी आडपवार, सचिव शामला बेलसरे,सीमा भसारकर, समता बनसोड, लता निंदेकर यांचेसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • मॅच फिक्सींगचा काळ गेला, बल्लारपूर विधानसभेचा भावी आमदार काँग्रेसचा होणार – नाना पटोले

    News34 गुरू गुरनुले

    मूल : भुतकाळाचा विचार आता करू नका, प्रवाहाचा विरूध्द दिशेने पोहुनही आपण कित्येक वर्षापासुन काँग्रेसच्या बळकटीसाठी प्रयत्न करीत आहात. याचा अभिमान असुन आता मँच फिक्सींग होणार नाही. तो काळ गेला असुन क्षेञाचा पुढील आमदार काँग्रेसचा राहील. यासाठी प्रयत्नशील राहील. असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दिले.

     

    काँग्रेसच्या वतीने काढण्यात येत असलेल्या जनसंवाद याञेनिमित्य जिल्ह्यात आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले काल चंद्रपूर येथुन गडचिरोली कडे जात असताना राञो ९.४५ वा. दरम्यान त्यांचे स्थानिक गांधी चौकात जंगी स्वागत करण्यात आले. आ. पटोले यांच्या आगमना निमित्य काँग्रेस भवन येथे मार्गदर्शनाचा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी काँग्रेसचे संघटक नाना गावंडे, वडसा येथील माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी उपस्थित होते.

     

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी तालुका काँग्रेसच्या वतीने व कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रावत मित्र परिवार सहका-यांच्या वतीने आ. नाना पटोले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आल्यानंतर संतोषसिंह रावत यांनी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना बोलुन दाखवतांना आपले पायगुण चांगले असल्याने पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्याने पाऊस मिळाला. असे म्हणत नानाभाऊच्या नेतृत्वात पक्षकार्याची प्रशंसा केली.

    Chandrapur rular congress
    नाना पटोले यांचा मूल तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करताना

    क्षेञात भाजपाचा आमदार आणि मंञी असतांना तालुक्यात काँग्रेस आघाडीवर आहे. परंतु सत्ता नसल्याने प्रशासनाकडून सातत्याने अन्याय सहन करावा लागत आहे. अशी खंत व्यक्त करतांना भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तालुक्याला नेतृत्वाची संधी द्यावी. अशी आग्रही विनंती संतोषसिंह रावत यांनी बोलुन दाखविली. यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपले नेते खा. राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंतच्या भारत जोडो याञेचे अनुकरण करत आपण जनसंवाद याञेचे नियोजन केले असल्याचे सांगतांना याञेला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेतल्यास राज्यात यावेळी सत्तांतर अटळ असल्याचे सांगितले.

     

    सध्याची स्थिती काँग्रेस करीता अनुकुल असुन मत आणि मनभेद दुर ठेवुन काम करा. संधी न गमवता संधीचे सोने करा, अन्यथा आपल्या सारखे कपाळ करंटे लोक नाही. हे लक्षात घेवुन कामाला लागा. असे आवाहन केले.

     

    शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी संचलन आणि गुरू चौधरी यांनी आभार मानले. यावेळी कांग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, माजी तालुका अध्यक्ष व बाजार समिती संचालक घनश्याम येनुरकर, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, सोसायटी अध्यक्ष संदीप कारंमवार, सरपंचं संघटनेचे अध्यक्ष अखिल गांगरेड्डीवार, महीला अध्यक्ष रूपाली संतोषवार, शहर अध्यक्ष नलीनी आडेपवार, युवक अध्यक्ष पवन निलवार, संचालक किशोर घडसे, राहुल मुरकुटे,हसन वाढई, योगेश शेरकी, दिपक वाढई, दशरथ वाकुडकर,जालिंदर बांगरे,भगवान ढोरे,बंडू गुरनुले, शांताराम कामडे, कैलाश चलाख, प्रशांत उराडे, रुपाल रावत, लिना फुलझेले, केदारनाथ कोटगले, संदीप मोहबे, सुरेश फुलझेले, छोटू रावत, शामला बेलसरे, राधिका बुक्कावार,समता बंसोड, आर. टी.गुरनुले, भाऊजी लेनगुरे, यांचेसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी तालुका युवक आणि महीला काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

  • कांग्रेसची जनसंवाद यात्रा हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्याची दुसरी लढाई – नाना पटोले

    News34

    चंद्रपूर – केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या धोरणांचा पदार्फाश करण्यासाठी राज्यात जनसंवाद यात्रेचा कांग्रेस ने शुभारंभ केला, जनसंवाद यात्रा ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे असे वक्तव्य नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केले.

    चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेस पक्षाने जनसंवाद यात्रेची सुरुवात केली आहे. शहरातील विविध भागात 5 सप्टेंबर ला नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती.

     

    कांग्रेसच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, जनसंवाद यात्रा मागील हेतू काय? कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी या यात्रेबाबत माहिती दिली.

     

    नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की वर्ष 2014 मध्ये मोदी सरकार मतदारांना थापा व खोटे आश्वासन देत सत्तेत आले.

    आज देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हुकूमशाही, महागाईने सध्या नागरिक त्रस्त झाले आहे. आम्ही नागरिकांना जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून धीर देण्याचं काम करीत आहो, सामान्य नागरिकांशी संवाद साधताना इतकंच जाणवतं की आता परिवर्तन हवं.

    जालण्यात झालेला लाठीचार्ज हा शासन पुरस्कृत होता अशी चर्चेमार्फत आम्हाला माहिती मिळाली, मात्र फडणवीस-शिंदे व पवार सरकारने आंदोलनकर्त्यांची माफी मागितली म्हणजेच सरकारचे कुठेतरी चुकले.

    विशेष म्हणजे आंदोलन कर्त्यावरील गुन्हे सरकारने मागे घेतले आहे, मराठ्यांना आरक्षण व त्यांना न्याय फक्त कांग्रेस पक्ष देऊ शकतो, मात्र ओबीसी कोट्यातून त्यांना आरक्षण देणं म्हणजे एकाच्या तोंडाचा घास दुसऱ्याच्या तोंडात टाकण्याची ही भाषा आहे.

    राज्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यकाळ संपला आहे, मात्र निवडणूक अद्यापही सरकारने घेतली नाही, कारण सत्ताधारी पक्षाविरोधात जनतेचा कौल असून सरकार निवडणुकीला घाबरत आहे.

    निवडणूक उद्या घेतल्यास कांग्रेस पक्ष हुकूमशाही सरकार विरोधात लढायला तयार बसली आहे.

    फडणवीस-शिंदे सरकारमध्ये पुन्हा एक A जोडण्यात आला आहे आता हे येड्यांची सरकार बनली आहे, राज्यात सध्या सुरू असलेल्या पदभरती मध्ये बेरोजगार युवकांकडून फी च्या नावाखाली लूटमार करणे सुरू आहे, आमची सत्ता आल्यास प्रत्येक पदभरती साठी एकच व कमी शुल्क आकारू.

    पत्रकार परिषदेत जिल्हा कांग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, शहर कांग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, दिनेश चोखारे यांची उपस्थिती होती.

  • मूल तालुक्यात कांग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा झंझावात

    News34 गुरू गुरनुले

    मुल – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानव्ये जनसंवाद पदयात्रेचा शुभारंभ मुल येथील गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चरखासंघ पुण्यभूमीतून काँग्रेस नेते सी.डी.सी.डी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला. मुल येथून निघालेल्या पदयात्रेत काँग्रेसचे महिला,पुरुष पदाधिकारी,कार्यकर्ते, काँग्रेस प्रेमी बहुसंख्येने सहभागी झाले होते.

    लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ह्या जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या हुकूमशाहीने सुरु असलेल्या महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी दुष्काळ, वन्यप्राण्यांचे हल्ले, भ्रष्टाचार, लोकशाहीची हत्या संबंधित मुद्दे आणि स्थानिक पातळीवरील विविध मुद्यांबाबत मरेगावं, बेलगाटा,चिखली,डोंगरगाव, राजोली येथे जनसंवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत करुन लोकांशी संवाद साधला. चौकात सभा घेण्यात आली. सभेला बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

    तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले ,ओबीसी राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी,यांनी नागरिकांशी संवादात्मक मार्गदर्शन केले. पदयात्रेत कृ. ऊ.बा.स.सभापती राकेश रत्नावार, संचालक व माजी तालुका अध्यक्ष घनश्याम येनूरकर, सेवादलाचे ज्येष्ठ नामदेवराव गावतूरे, शशिकला गावतूरे, संचालक संदीप कारमवार, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, दीपक पा. वाढई, संदीप मस्के , संचालक हसन वाढई, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, विवेक मुत्यलवार, अतुल गोवर्धन, संदीप मोहबे, संचालक लहू कडस्कर, भुजंग चौधरी, नीलकंठ मेश्राम,उमाजी चुद्री,गणपत कडस्कर, डोपाजी कडस्कर, मरेगावचे युवक आकाश वाकुडकर, उपसरपंच ज्योत्स्ना पेंदोर, प्रकाश शेरकी, व अन्य गावकरी, डोंगरगाव,नंदुजी मडावी व असंख्य ग्रामस्थ, राजोली येथील. संचालक सुनील गुज्जनवार, काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष श्याम पुटावार, सरपंच जितेंद्र लोणारे, उपसरपंच गजानना पा. ठीकरे, शीतल संगिडवार, दिलीप ठिक्रे, मैनाबाई राठोड,श्रीहरी कुडमेथे, श्याम पेश्ट्टीवार, युवक अध्यक्ष प्रदीप राखडे, खितेश दाडमल, सुरेखा शेंडे, संगीता गरमडे, विठ्ठल बावने, गुड्डी टेकाम, गंगाधर घुगरे, महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार, सचिव शामला बेलसरे, कोषाध्यक्ष राधिका बुक्कावार, सदस्या फर्जणा शेख, सीमा भसारकर, माधुरी नैताम, सविता मारटकर समता बनसोड, इतर महिला,युवक शहर अध्यक्ष व्यंकटेश पूल्लकवार ,एन. टी .सेल अध्यक्ष गणेश गेडाम, दहा युवकांची संदीप वाढई, यांचेसह तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते, बहुसंख्येने उपस्थित होते.

  • चंद्रपूर कांग्रेसच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    Chandrapur congress news

    चंद्रपूर – केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या धोरणांचा पदार्फाश करण्यासाठी चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने रविवारी, ३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ६ वाजता महाकाली माता मंदिर, चंद्रपूर येथून जनसंवाद यात्रा निघाली. News34

    या यात्रेत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामु) तिवारी, माजी अध्यक्ष विनायक बांगडे, माजी अध्यक्ष सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रेय, के. के. सिंग, दिनेश चोखारे, माजी नगरसेवक संतोष लहामगे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, चंद्रपूर ग्रामीण महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे, माजी महापौर संगीता अमृतकर, प्राचार्य नरेंद्र बोबडे, युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश अडूर, काँग्रेस नेते महेश मेंढे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र दानव, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष राहुल चौधरी, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष ताजुद्दीन शेख, विजय नळे, प्रशांत भारती यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. Jan samvad yatra

    या यात्रेत उपस्थित मान्यवरांनी चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली देवीचे पुजन केले. त्यानंतर माता महाकाली मंदिर येथून पदयात्रा निघाली. गांधी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले. गांधी चौक येथे सेवादल काँग्रेस चंद्रपूरद्वारा ध्वजारोहण कार्यक्रम झाला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे शहराच्या प्रमुख मार्गाने ही जनसंवाद यात्रा निघाली. आझाद बगीचा येथे जनसंवाद साधण्यात आला. त्यानंतर पदयात्रा पुन्हा मार्गस्थ झाली. कामगार चौक, नेहरू स्कुल घुटकाला येथे सभेनंतर समारोप झाला. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाषजी धोटे यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाने जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेतून पक्षाच्या धोरणांविषयी जनतेला माहिती देण्यात येईल. तसेच, जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेच्या सोबत आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पक्षाने कोणतीही कसर सोडणार नाही. आमदार सुधाकर अडबाले म्हणाले की, काँग्रेस पक्ष जनतेचा पक्ष आहे. पक्षाच्या धोरणांमुळे देशात विकास झाला आहे. सध्याच्या मोदी सरकारच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी ही पदयात्रा आहे.

    या यात्रेच्या माध्यमातून जनतेशी कांग्रेसचा थेट संपर्क – रामू तिवारी

    चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामु) तिवारी यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या यात्रेमुळे चंद्रपूरच्या जनतेशी पक्षाचा जवळचा संपर्क निर्माण होईल. आपण सर्वांनी एकत्रित येऊन चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन करायचे आहे. यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करायला हवे, असे आवाहन केले.

    या जनसंवाद यात्रेत महिला काँग्रेस, युथ काँग्रेस, एनएसयुआय, ओबीसी विभाग, अनुसूचित विभाग, अल्पसंख्यांक विभाग, इंटक, प्रोफेशनल काँग्रेस, पर्यावरण विभाग व इतर सर्व विभागाचे पदाधिकारी, चंद्रपूर शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

    ५ सप्टेंबरला गांधी चौकात जाहीर सभा

    आजपासून सुरू झालेली ही यात्रा १२ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. ५ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता तुकुम प्रभागातील मातोश्री विद्यालय येथून सुरू होणाऱ्या यात्रेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी होणार आहेत. यावेळी ते चंद्रपुरातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता गांधी चौकात जाहीर सभा होणार आहे. यावेळी काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.