Tag: Breaking news

  • रामाला तलावात युवकाने मारली उडी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील ऐतिहासिक रामाला तलाव येथे आज मंगळवार 26 सप्टेंबरला 35 वर्षीय युवकाने तलावात उडी घेत आत्महत्या केली.

     

    धीरज श्रीकांत देवांग असे मृत युवकाचे नाव आहे, युवक दुर्गापुरातील सेंट मायकल शाळेच्या मागे राहत असल्याची माहिती आहे, सकाळच्या सुमारास युवकाने रामाला तलावात उडी घेतली, यामध्ये त्या युवकाचा मृत्यू झाला.

     

    पोलिसांना याबाबत माहिती मिळताच धीरज चा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे, त्याने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

  • धक्कादायक चंद्रपुरात 2 वाघांच्या बछड्याचा मृत्यू

    News34

    चंद्रपूर – जिल्ह्यातील बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कळमना उपक्षेत्रात वन कर्मचारी गस्तीवर असताना 2 वाघांचे बछडे त्यांना मृतावस्थेत आढळले व एका बछड्याला वनविभागाने रेस्क्यू केले.

     

    7 सप्टेंबरला वन कर्मचारी कळमना उपक्षेत्रातील वनखंड क्रमांक 572 मध्ये एक वाघाचा अशक्त बछडा आढळला, त्यानंतर परिसरात शोध मोहीम राबविली असता 2 वाघांचे बछडे मृतावस्थेत आढळले.

     

    अशक्त वाघाला वनविभागाने रेस्क्यू करीत त्याला वन्यजीव उपचार केंद्र ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात आणले आहे, सदर बछडा हा मादी असून त्याचे वय अंदाजे 5 महिने आहे.

     

    मृत वाघांचे बछडे ताब्यात घेत शवं विच्छेदन करीता पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यावर त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत नेमकी माहिती मिळेल.

     

    वन विभागानुसार सदर बछडे हे वाघिणीसोबत असल्याची माहिती आहे, मात्र वाघीण शिकार करण्यासाठी गेली असल्याने हे बछडे भरकटले असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, सध्या वनविभाग वाघिणीचा शोध घेत आहे.

     

    सदर प्रकरणाचा तपास श्वेता बोड्डू उपवनसंरक्षक मध्य चांदा, शेख तौसिफ शेख हैदर सहायक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारपूर करीत आहे.

  • चंद्रपुर शहरात पुन्हा अपघात 1 मृत्यू 1 गंभीर

    News34 accident chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहर आज भीषण अपघाताने हादरुन गेले, सकाळी शाळेत निघालेल्या शिक्षिकेच्या दुचाकीला भरधाव वेगात असलेल्या ट्रक ने धडक दिली, यामध्ये शिक्षिकेचा मृत्यू झाला तर सायंकाळी 7 साडेसात वाजता चंद्रपूर मूल मार्गावरील आदर्श पेट्रोल पंप जवळ दुचाकी स्लिप झाल्याने एक युवक जागीच ठार झाला.

    सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद शाळा लखमापूर येथे निघालेल्या शिक्षिका अनिता ठाकरे यांच्या दुचाकी वाहनाला ट्रक ने जोरदार धडक देत त्यांना फरफटत नेले, या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू झाला.

    सायंकाळी साडे सात वाजता शहरातील आदर्श पेट्रोल पंप जवळ 2 युवक दुचाकी क्रमांक MH34BA9595 ने चंद्रपूर शहराच्या दिशेने भरधाव वेगात येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने स्लिप झाली, यामधील एक युवक रस्त्यावर घासत गेला, त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर 1 युवक गंभीर जखमी झाला.

    चंद्रपूर शहरात आज अपघाताच्या रुपात मृत्यूचे तांडव घडले, मात्र यामध्ये दोष कुणाचा? हा प्रश्न सर्वाना पडला असेलचं, कारण शहरात अनियंत्रित झालेल्या वाहतुकीवर नियंत्रण कुणाचे राहिले नाही.

    शहरात आज अल्पवयीन मुलांचं टोळकं भरधाव वेगात वाहन चालविताना सहज आढळतो, महामार्गावरील ट्रक चा सुसाट वेग अपघाताचा अंदाज आपल्या दर्शवितो मग हे वाहतूक विभागाला का दिसत नाही?

    वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरात वाहतूक व्यवस्था पूर्णपणे अनियंत्रित झाल्याचे चित्र आज सर्वत्र दिसत आहे, आजचे 2 अपघात अनियंत्रित वाहतुकीचे उदाहरण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.

  • ताडोबा अभयारण्याच्या Online Booking बाबत न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

    News 34

    Tadoba jungle safari

     सर्व पर्यटक व निसर्गप्रेमींसाठी चांगली बातमी!

    चंद्रपूर येथील प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाइन बुकिंगला चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली आहे. हा केवळ ताडोबा व्यवस्थापनासाठीच नाही तर रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालक, मार्गदर्शक आणि स्थानिक व्यावसायिकांसाठीही मोठा दिलासा आहे.

    ऑनलाइन बुकिंगला मंजुरी मिळाल्याने ताडोबा व्यवस्थापन आता आगामी सणासुदीच्या हंगामासाठी सज्ज होऊ शकेल. दिवाळी, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या बुकिंगचा मार्ग मोकळा झाला आहे, ज्यामुळे तुम्हाला या भव्य व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीचे नियोजन आणि सुरक्षितता आधीच करता येईल.

    कायदेशीर लढाईचा खडतर प्रवास

    ताडोबा व्यवस्थापनासाठी हा प्रवास सोपा नव्हता. आर्थिक गैरव्यवहारामुळे त्यांना वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन्स या बुकिंग एजन्सीसोबतचा त्यांचा करार रद्द करावा लागला. एजन्सीवर वनविभागाने 12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता, त्यामुळे कायदेशीर लढाई सुरू झाली होती.

    ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या करारातील अटी आणि त्यामध्ये बुकिंग करण्याचे अधिकार यावरून सुरू असलेला वाद अखेर चंद्रपूर न्यायालयात पोहोचला. 2026 पर्यंत करार वैध असूनही ताडोबा व्यवस्थापनाने त्यांचा करार अचानक संपुष्टात आणल्याचा दावा एजन्सीने केला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत ताडोबाच्या बुकिंग प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता.

    ऑनलाइन बुकिंग चा मार्ग मोकळा झाला

    मात्र, काही दिवसांच्या अनिश्चिततेनंतर चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने गुरुवारी (३१ ऑगस्ट) स्थगिती उठवली आणि ताडोबाला पुन्हा एकदा सफारी बुकिंगसाठी परवानगी दिली. या बातमीने चिंतेत असलेले ताडोबा व्यवस्थापन, रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालक, मार्गदर्शक आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेवटी, पर्यटक आनंदित होऊ शकतात कारण ते लवकरच त्यांची सफारी ऑनलाइन बुक करू शकतील.

    येत्या 4 ते 5 दिवसांत ताडोबाची अधिकृत बुकिंग साइट सुरू होईल हे जाहीर करताना ताडोबा प्रशासनाला आनंद होत आहे. आता पर्यटकांना एका बटणाच्या क्लिकवर सफारी बुक करण्याची सुविधा मिळेल.

    तयार व्हा वाघाच्या जंगल सफारीसाठी

    तर, तुमची कॅलेंडर चिन्हांकित करा आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात अविस्मरणीय वन्यजीव साहस सुरू करण्यासाठी सज्ज व्हा. बुकिंग साइटच्या अधिकृत लाँचसाठी संपर्कात रहा आणि या मंत्रमुग्ध करणाऱ्या अभयारण्यात तुमचे स्थान सुरक्षित करणार्‍यांपैकी प्रथम व्हा!

  • हार्डवेअर च्या दुकानाला भीषण आग चौघांचा मृत्यू

    News34

    Pimpri chinchwad fire

    पुणे/चंद्रपूर – पिंपरी-चिंचवड भागातील चिखली येथील हार्डवेअर दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागल्याने अख्ख कुटुंब संपल्याची धक्कादायक घटना बुधवार 30 ऑगस्टला घडली.

    आज पहाटे चिखली येथील सचिन हार्डवेअर ला भीषण आग लागली, ही आग इतकी भीषण होती की हार्डवेअर मध्ये वास्तव्यास असलेले कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाला.

    मृत्यू झालेल्या मध्ये 48 वर्षीय चिमणाराम बेणाराम चौधरी, 40 वर्षीय नम्रता चिमणराम चौधरी, 15 वर्षीय भावेश चिमणाराम चौधरी व 13 वर्षीय सचिन चिमणाराम चौधरी असे नाव आहे.

    पहाटे 5 वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली, दुकानाच्या माळावर चौधरी कुटुंब राहत होते, हार्डवेअर दुकानात ऑइल पेंट मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. पेंटच्या आगीने दुकानात मोठ्या प्रमाणात धूर निघायला लागल्याने चौघांचा गुदमरून मृत्यू झाला, सदर चौधरी कुटुंब हे राजस्थान राज्यातील होते, पुण्यात सचिन हार्डवेअर चे दुकान हे कुटुंब चालवीत होते.

  • मदुराई एक्सप्रेस ला भीषण आग, 8 प्रवाश्यांचा मृत्यू

    Burning train

    तामिळनाडू – राज्यातील मदुराई रेल्वे स्थानकावर आज पहाटेच्या सुमारास पूनालूर मदुराई एक्सप्रेस मध्ये भीषण आग लागल्याने रेल्वे मधील 8 प्रवाश्यांचा मृत्यू झाला तर 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.

    लखनौ वरून रामेश्वरम ला जाणाऱ्या मदुराई एक्सप्रेस मधील मृतक प्रवासी हे उत्तर प्रदेश राज्यातील असल्याची माहिती आहे, आज पहाटे 5.15 ला सदर आगीची माहिती मिळाली असता रेल्वे मदुराई स्टेशनवर थांबविण्यात आली.

    दक्षिण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खाजगी पार्टीच्यती डब्यातील काही प्रवासी गॅस सिलेंडर ची तस्करी करीत होते, त्यामुळे ही भीषण आग लागली.

    सध्या प्रशासनाचे बचाव कार्य सुरू आहे.

  • अज्ञात वाहनाची धडक आणि बिबट्या ठार

    News34

    Leopard die

    नागभीड – वन्यप्राणी पाण्याच्या व शिकारी साठी इकडे तिकडे भरकटत असतात मात्र त्यांची ही भ्रमंती जीवावर बेतते, अशीच एक घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली, रस्त्यावरून जात असताना बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक देत ठार केले, धडक देताच त्या चालकाने वाहनसाहित पळ काढला.

    रविवारी सायंकाळी नागपूर-नागभीड मार्गावर सायंकाळच्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली, धडक इतकी जोरदार होती की बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. हा बिबट 2 वर्षाचा होता अशी माहिती RFO हजारे यांनी दिली

    नागभीड वन परिक्षेत्र अधिकारी एस बी हजारे, वनरक्षक सी एस कुठे व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला.

  • जंगल सफारीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोब्याची 12 कोटींने फसवणूक

    News34

    चंद्रपूर :- वाघाच्या जंगल सफारीसाठी जगप्रसिध्द असलेल्या ताडोबा अभयारण्याला 2 भावंडांनी 12 कोटींचा चुना लावल्याची माहिती उघड झाली आहे, याप्रकरणी विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांनी रामनगर पोलिसात 2 भावंडाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

    देश व जगातील लाखो पर्यटकांना ताडोबा अभयारण्याची भुरळ पडली आहे, जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक ऑनलाइन बुकिंग करीत जंगल सफारी करतात मात्र आता ह्या ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून ताडोबा प्रशासनाला तब्बल 12 कोटी 15 लाख 50 हजार 831 रुपयांचा 2 भावंडांनी चुना लावल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

    चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन चे प्रमुख अभिषेक ठाकूर व रोहित ठाकूर या दोन भावंडावर फसवणुकीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

    चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन व कार्यकारी संचालक ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प यामध्ये करार झाला होता, ऑनलाइन जंगल सफारी बुकिंग चे काम सदर कंपणीद्वारे केल्या जात होते.
    काही दिवसांपूर्वी ठाकूर भावंडांच्या my tadoba वेबसाईटवर बंदी आणत शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जंगल सफारी होणार असे ताडोबा प्रशासनाने जाहीर केले होते, मात्र ठाकूर भावंडांनी न्यायालयात दाद मागत प्रशासनाच्या निर्णयावर स्टे आणला हे विशेष, सदर प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे.

    3 वर्षात कंपणीद्वारे तब्बल 22 कोटी 80 लाख 67 हजार 749 रुपये ताडोबा प्रशासनाला देणे होते, त्यामधून ठाकूर भावंडांनी ताडोबा प्रशासनाला 10 कोटी 65 लाख 16 हजार 918 रुपये दिले मात्र उर्वरित 12 कोटी रुपये दिले नाही.

    सर्व्हिस लेवल एग्रीमेंट अंतर्गत ताडोबा व ठाकूर भावंडांमध्ये करार झाला होता मात्र त्यांनी करारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन केले होते, ताडोबा प्रशासनाने वर्ष वर्ष 20-2021, 21-2022, 22-2023 व 23-2024 या वर्षाचे ऑडिट केले त्यामध्ये तब्बल 12 कोटी रुपयांची तफावत आढळली, याबाबत दोन्ही भावंडाना उर्वरित रकमेची विचारणा करण्यात आली मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने, सचिन शिंदे यांनी शासकीय रकमेची अपहार केल्या प्रकरणी कलम 420 अंतर्गत दोन्ही भावंडावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

    याबाबत ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचे कार्यकारी संचालक जितेंद्र रामगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मागील 3 वर्षात याबाबत ऑडिट केल्यावर सदर तफावत पुढे आली, त्या रकमेबाबत विचारणा केली असता आम्हाला उडवाउडवीची उत्तरे मिळाली, दोन्ही भावंडांनी मिळून शासनाच्या रकमेचा अपहार केला हे निष्पन्न झाल्याने आम्ही गुन्हा दाखल केला आहे, आता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वळते होण्याची शक्यता आहे, शासनाचे पैसे परत न मिळाल्यास त्यांची मालमत्ता कायद्यानुसार जप्त करण्यात येईल.

    मागील 3 वर्षात कोट्यवधी रकमेचा अपहार हा ताडोबा प्रशासनातील एकाही अधिकाऱ्यांच्या लक्षात का आला नाही? ताडोबा प्रशासनाची इतकी मोठी यंत्रणा असताना सुद्धा हा अपहार झाला कसा? हे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.
    विशेष बाब म्हणजे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गृह जिल्ह्यात इतका मोठा घोळ बाहेर आल्याने ते या प्रकरणावर काय करणार याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात तांदूळ तस्करीच्या परराज्यीय टोळीचा पर्दाफाश

    News34

    चंद्रपूर/शेगाव – चंद्रपूर जिल्ह्याची सीमा अनेक राज्यांना जोडण्याचे काम करते, त्यामुळे विविध वस्तूंची तस्करी सुद्धा दुसऱ्या राज्याची सीमा जवळ असल्याने तस्कराना सोपे जाते.
    मागील काही महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय तांदळाची तस्करी केल्या जात आहे, पोलिसांच्या सतर्कतेमुळे 17 ऑगस्टला रात्री तांदूळ तस्करी करणाऱ्या वाहनाला पकडण्यात आले.

    जिल्ह्यातील शेगाव बु. पोलिसांना तांदळाची तस्करी करणारे वाहन चिमूर मार्गे छत्तीसगड राज्यात जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती, पोलिसांनी रात्री च्या वेळी बंदोबस्त लावला असता त्यावेळी ट्रक क्रमांक CG 08 AC 4500 संशयास्पद वाटले असता पोलिसांनी वाहन थांबविले

    ट्रक ची तपासणी केली असता त्यामध्ये 31 टन तांदूळचे आढळून आले, पोलिसांनी वाहन चालक माणिकराव रामाजी कोचे वय 63 ला विचारणा केली असता त्याने स्वतःला कासारवाडी जिल्हा दुर्ग छत्तीसगढ येथील निवासी असल्याची माहिती दिली.
    हा तांदूळ कुठला व कुठं जात आहे याबाबत माहिती विचारली असता वाहनचालक कोचे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

    पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम यांना संशय आला असता त्यांनी मालकाला बोलवा असे वाहनचालकला सांगितले मात्र मालक आला नाही, सदर तांदूळ हा शासकीय गोदाम किंवा कंट्रोल चा असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली, त्यांनी अन्न व पुरवठा निरीक्षक वरोरा यांना पाचारण करीत अहवाल मागितला, अहवाल आल्यावर सदर तांदूळ हा शासकीय असल्याची बाब उघडकीस आली.

    पोलिसांनी वाहन चालक व मालक यांच्यावर इसि ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला, सदर माल वरोरा तालुक्यातील माढेली येथील गोदामातील असल्याची माहिती मिळाली असून त्या गोदामाला सील करण्यात आले आहे, याआधी सुद्धा शासकीय तांदळाची तस्करी करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

    चंद्रपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे 31 टन तांदूळ किंमत अंदाजे 6 लाख वाहनांची किंमत 25 असा एकूण 31 लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
    याआधी किती वेळा तांदूळ तस्करी करण्यात आली, हा तांदूळ नेमका कुठून आला याबाबत पोलीस तपास करीत आहे. आरोपी हा राजकीय पार्श्वभूमी असल्याची माहिती आहे.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक जनबंधू मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव चिमूर यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन शेगाव बू चे ठाणेदार अविनाश मेश्राम, पीएसआय सुरजुसे, एसआय पडोळे, हेड कॉन्स्टेबल मेश्राम, मदन येरने, पोलीस अंमलमदार निषाद राकेश , प्रफुल कांबळे यांनी केली.

  • GMC मधील परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यू

    News34

     

    चंद्रपूर – चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात परिचारिकेच्या मृत्यूनंतर परिचारिका संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सीमा मेश्राम नावाची ही परिचारिका प्रसूती कक्षात सेवा देत होती. मात्र कामाच्या अतिताणामुळे या परिचारिकेला 16 ऑगस्ट रोजी भोवळ आली. तिला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र आपल्याच सहकारी परिचारिकेवर योग्य उपचार करण्यात इथले स्थानिक डॉक्टर अपयशी ठरले.

    परिणामी उपचारातील हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाला. ही वार्ता परिचारिका वर्गात पसरताच त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. दरम्यान राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेने देखील या आंदोलनात त्यांना सहभाग देत पाठिंबा दिला. सीमा मेश्राम या परिचारिकेच्या मृत्यूसंबंधी जबाबदार डॉक्टर व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिचारिका संघटनेने केली आहे.

    16 ऑगस्टला परिचारिका कामाच्या तणावात असताना तिला भोवळ आली, रात्री पासून ते सकाळ पर्यंत तिच्यावर कसलाही उपचार करण्यात आला नाही, त्यामुळे मेश्राम यांचा मृत्यू झाला.

    याबाबत सविस्तर माहिती घेतली असता अधिष्ठाता यांनी दोषी डॉक्टर वर कारवाई करणेकरिता चौकशी समिती नेमली आहे, चौकशी पूर्ण झाल्यावर कारवाई करण्यात येईल, सध्या परिचारिका यांनी काम बंद आंदोलन पुकारले असून त्यांच्या जागी शिकाऊ परिचारिका यांना पाचारण करण्यात आले आहे.

    चंद्रपुरात वाजागाजा करीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती, मात्र उपचाराच्या नावावर रुग्णांची हेळसांड ही रोजची बाब झाली आहे, अनेक रुग्ण विविध आजाराने ग्रस्त होऊन चांगला उपचार मिळावा यासाठी वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल होतात मात्र शासकीय काम ज्या पध्दतीने केल्या जाते त्याच पद्धतीने याठिकाणी उपचार होतो, चंद्रपुर जिल्ह्यात अनेक नेते, मंत्री होऊन गेले मात्र आरोग्याच्या दृष्टीने सर्वांच काम हे शून्य आहे.