Tag: Bharat jodo

  • मूल कांग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    News34 गुरू गुरनुले

    मुल – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानव्ये जनसंवाद पदयात्रेचा शुभारंभ मुल येथील गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चारखासंघ पुण्यभूमीतून काँग्रेस नेते सी.डी.सी.डी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला.

    मुल येथून निघालेल्या पदयात्रेत काँग्रेसचे महिला,पुरुष पदाधिकारी,कार्यकर्ते, काँग्रेस प्रेमी बहुसंख्येने सहभागी झाले होते.

    लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ह्या जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या हुकूमशाहीने सुरु असलेल्या महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी दुष्काळ, वन्यप्राण्यांचे हल्ले, भ्रष्टाचार, लोकशाहीची हत्या संबंधित मुद्दे आणि स्थानिक पातळीवरील विविध मुद्यांबाबत मुल ,कोसंबी, मारोडा, आदर्श खेडा, उष्रळा, भादुर्णी लोकांशी संवाद साधला.भादूर्णी येथे पदयात्रेचे विक्रम गुरनुले यांचे नेतृत्वात ग्रामस्थांनी धूम धडाक्यात स्वागत करुन चौकात सभा घेण्यात आली. सभेला बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले ,ओबीसी राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी,यांनी नागरिकांशी संवादात्मक मार्गदर्शन केले.

     

    मंगेश बत्तुलवार यांनी आभार मानले. पदयात्रेत काँग्रेस नेते संतोष सिंह रावत, कृ. ऊ.बा.स.सभापती राकेश रत्नावार, संचालक व माजी तालुका अध्यक्ष घनश्याम येनूरकर, सेवादलाचे ज्येष्ठ नामदेवराव गावतूरे, शशिकला गावतूरे, संचालक संदीप कारमवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अखिल गांगरेड्डीवार, ग्रामीण काँग्रेसचे राजू पाटील मारकवार, माजी सभापती दशरथ वाकुडकर , युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, दीपक पा. वाढई, सरपंच चांगदेव केमेकर, संचालक हसन वाढई, शहर अध्यक्ष सुनील शेरकी,संचालक किशोर घडसे, लहू कडस्कर, विनोद कांमडे, औद्योगिक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय समर्थ, राजेंद्र वाढई, गुलाब पठाण, शहरउपाध्यक्ष संदीप मोहबे, सुरेश फुलझेले, शहर महासचिव कैलास चलाख, गंगाधर घुगरे, महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार,शहर अध्यक्ष नलिनी आडपवार, माजी नगर सेविका लीना फुलझेले, सचिव शामला बेलसरे, कोषाध्यक्ष राधिका बुक्कावार, सदस्या फर्जणा शेख, नाजुका लाटकर,समता बनसोड, व इतर महिला,युवक शहर अध्यक्ष व्यंकटेश पल्लकवार व दहा युवकांची टीम,चीचाळा येथील मंकीवार व त्याची टीम, चंदू चटारे, रामदास गुरनुले,भाऊजी लेनगुरे,संदीप वाढई, छोटू रावत, राजेश गावतुरे, गुज्जनवार, विनोद कामडे, सरपंच रवी कामडे, उपसरपंच साहिल येनगनटीवार, शेख, संचालक जवादे, यांचेसह तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते, बहुसंख्येने उपस्थित होते. पदयात्रेची सांगता कोसंबी सरपंच रवींद्र कामडे यांनी दिलेल्या भोजनाने झाली.

  • चंद्रपूर कांग्रेसच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    Chandrapur congress news

    चंद्रपूर – केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या धोरणांचा पदार्फाश करण्यासाठी चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने रविवारी, ३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ६ वाजता महाकाली माता मंदिर, चंद्रपूर येथून जनसंवाद यात्रा निघाली. News34

    या यात्रेत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामु) तिवारी, माजी अध्यक्ष विनायक बांगडे, माजी अध्यक्ष सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रेय, के. के. सिंग, दिनेश चोखारे, माजी नगरसेवक संतोष लहामगे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, चंद्रपूर ग्रामीण महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे, माजी महापौर संगीता अमृतकर, प्राचार्य नरेंद्र बोबडे, युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश अडूर, काँग्रेस नेते महेश मेंढे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र दानव, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष राहुल चौधरी, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष ताजुद्दीन शेख, विजय नळे, प्रशांत भारती यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. Jan samvad yatra

    या यात्रेत उपस्थित मान्यवरांनी चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली देवीचे पुजन केले. त्यानंतर माता महाकाली मंदिर येथून पदयात्रा निघाली. गांधी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले. गांधी चौक येथे सेवादल काँग्रेस चंद्रपूरद्वारा ध्वजारोहण कार्यक्रम झाला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे शहराच्या प्रमुख मार्गाने ही जनसंवाद यात्रा निघाली. आझाद बगीचा येथे जनसंवाद साधण्यात आला. त्यानंतर पदयात्रा पुन्हा मार्गस्थ झाली. कामगार चौक, नेहरू स्कुल घुटकाला येथे सभेनंतर समारोप झाला. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाषजी धोटे यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाने जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेतून पक्षाच्या धोरणांविषयी जनतेला माहिती देण्यात येईल. तसेच, जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेच्या सोबत आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पक्षाने कोणतीही कसर सोडणार नाही. आमदार सुधाकर अडबाले म्हणाले की, काँग्रेस पक्ष जनतेचा पक्ष आहे. पक्षाच्या धोरणांमुळे देशात विकास झाला आहे. सध्याच्या मोदी सरकारच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी ही पदयात्रा आहे.

    या यात्रेच्या माध्यमातून जनतेशी कांग्रेसचा थेट संपर्क – रामू तिवारी

    चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामु) तिवारी यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या यात्रेमुळे चंद्रपूरच्या जनतेशी पक्षाचा जवळचा संपर्क निर्माण होईल. आपण सर्वांनी एकत्रित येऊन चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन करायचे आहे. यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करायला हवे, असे आवाहन केले.

    या जनसंवाद यात्रेत महिला काँग्रेस, युथ काँग्रेस, एनएसयुआय, ओबीसी विभाग, अनुसूचित विभाग, अल्पसंख्यांक विभाग, इंटक, प्रोफेशनल काँग्रेस, पर्यावरण विभाग व इतर सर्व विभागाचे पदाधिकारी, चंद्रपूर शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

    ५ सप्टेंबरला गांधी चौकात जाहीर सभा

    आजपासून सुरू झालेली ही यात्रा १२ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. ५ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता तुकुम प्रभागातील मातोश्री विद्यालय येथून सुरू होणाऱ्या यात्रेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी होणार आहेत. यावेळी ते चंद्रपुरातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता गांधी चौकात जाहीर सभा होणार आहे. यावेळी काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.

  • गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चरखासंघ मुल येथून निघणार जनसंवाद पदयात्रा

    News34 गुरू गुरनुले

    मुल – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात ३ ते १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत देशाचे जन नायक खासदार राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या धर्तीवर जनसंवाद यात्रा काढण्याच्या सूचना केल्या आहेत. Congress news

     

    त्या अनुषंगाने विधान सभेचे विरोधी पक्षनेते व माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी दिलेल्या आदेशानुसार मुल तालुका काँग्रेस कमिटीतर्फे पदयात्रेचा शुभारंभ काँग्रेस नेते सी. डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात व शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाग विदर्भ चरखासंघ मुल येथून ३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ६-०० वाजता निघणार आहे. Bharat jodo

    पदयात्रेच्या माध्यमातून मुल तालुक्यातील जनतेमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या अन्यायाविरुद्ध जनजागृती करण्याचा काँग्रेसचा संकल्प असून महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिलांवरील अन्याय, अत्याचार व शेतकऱ्यांचा दुष्काळ, लोकशाहीची हत्या अशा अन्य समस्यांवर प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधून जनभावना जाणून घेणे या पदयात्रेचा उद्देश आहे.

    ही पदयात्रा तालुक्यातील सर्व गावांना यात्रेच्या माध्यमातून भेटी देऊन संवाद साधणार आहे.करीता तालुक्यातील काँग्रेसच्या युवक काँग्रेस, शहर युवक काँग्रेस, शहर काँग्रेस,महिला काँग्रेस,महिला शहर कांग्रेस, ओबीसी सेल काँग्रेस, किसान सेल काँग्रेस, एन. टी .काँग्रेस सेल, सेवादल काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहावे.

     

    तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व समस्त संचालक, सहकारी सोसायटीचे अध्यक्ष,संचालक, आदर्श खरेदी विक्री सह.सोसायटीचे पदाधिकारी व संचालक, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व संचालक आणि काँग्रेस समर्पित ग्राम पंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य यांनीही बहु संख्येनी यात्रेत आवर्जून सहभागी व्हावे. अशी विनंती तालुका कांग्रेस कमिटी मधील सर्व फ्रंटल सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.