Tag: सुरजागड इसपात

  • Surjagad Iron Ore : सुरजागड लोहखनिज प्रकल्प विरोधात आंदोलन

    Surjagad Iron Ore : सुरजागड लोहखनिज प्रकल्प विरोधात आंदोलन

    News34 chandrapur

    मूल – मुल तालुक्यातील सुशी दाबगावं गावातून मोठ्या प्रमाणात दिवसरात्र सुरजागड येथील लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीतर्फे जड वाहतूक सुरू असून त्या वाहतुकीमुळे व होणाऱ्या प्रदूषणामुळे सुशी दाबगावं वाशिय नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. यावर प्रशासनाने तत्काळ उपाय योजना करावी यास्तव उलगुलान संघटनाचे संस्थापक अध्यक्ष राजु झोडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांच्या बहुसंख्य युवकाच्या उपस्थितीत काही दिवसापूर्वी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला होता. Surjagad Iron Ore

     

    त्यानुसार आज सुशी बसस्थानक परिसरात अनेक युवकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आला असून तसे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी मलिकार्जून इंगळे, ठाणेदार सुमित परतेकी, ना. तहसीलदार कुमरे याना देण्यात आले.

     

     

    गडचिरोली सुर्जागड येथील लोह खनिज उत्पादन करण्याऱ्या कंपनीतर्फे मोठ्या प्रमाणात मुल तालुक्यातील सुशी गावातून लोहखनिज याची जड वाहतूक गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात रस्त्याची वाट लागली असून प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे.

     

     

    गावातील छोटी मुले गर्भवती माता स्थनदा माता नागरिकांना स्वसणाचे डोळ्याचे असे विविध आजाराला सामोरे जावे लागत असून आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाल्या आहे. परिणामी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जिल्हा परिषद शाळा, व आश्रम शाळा यांनाही मोठा धोका झालेला असून रस्त्यालगत असल्याने ब्रेकर अभावी अपघात होऊन जीव जाण्याचं धोका नाकारता येत नाही. तसेच गावातील अनेक सुशिक्षित युवक बेरोजगार असून गावातील युवकांना रोजगार मिळावा असे विविध समस्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले होते. याची शासनस्तरावरून तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी सुशी वाशियाना घेऊन उलगुलान संघटनाचे वतीने करण्यात आला आहे. याची योग्य दखल न घेतल्यास समोर मोठे आंदोलन करू असा इशारा देण्यात आलेला आहे.

     

     

    त्यावेळी उलगुलान संघटनाचे संस्थापक अध्यक्ष राजुभाऊ झोडे, सामाजिक कार्यकर्ते विनोद शेंडे , श्यामभाऊ झिलपे, पत्रकार दुर्वास घोंगडे ,रुपेश कोठारे, मगेश कपाट, रुपेश निमसारक,कविश्र्वर कपाट, अमोल बोरसरे,मोहन बुरांडे, पंचशील तामगाडगे, सिताराम भांडेकर, नंदाजी भांडेकर,बंडू सोमनकर, पंकज तावाडे. महेश सातपुते, सुनील भांडेकर, अंकित बुरांडे, आदि गावकरी आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • सुरजागड इस्पात करणार 10 हजार कोटींची गुंतवणूक

    सुरजागड इस्पात करणार 10 हजार कोटींची गुंतवणूक

    Marathi news

    मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने पाठपुराव्याला यश आले असून, सुरजागड इस्पात प्रा. लि. ने गडचिरोलीत ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ते 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. विदर्भ विशेषत: गडचिरोलीसाठी ही मोठी उपलब्धी आहे.

     

     

    सुरजागड इस्पात प्रा. लि.चे अध्यक्ष सुनील जोशी यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आणि यावेळी याबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. या प्रकल्पाच्या माध्यमातून 8000 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. या प्रकल्पात जागतिक दर्जाचे उत्पादनविषयक तंत्रज्ञान राहणार असून, पर्यावरण रक्षण हा त्याचा मुख्य गाभा असेल. त्यामुळे हा संपूर्णत: पर्यावरणपूरक स्टील प्रकल्प राहणार आहे, अशीही माहिती यावेळी सुनील जोशी यांनी दिली.

     

    गडचिरोलीच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून, या भागात रोजगार निर्मितीसाठी सुद्धा सातत्याने प्रयत्न होत आहेत. गडचिरोली हे देशाचे पोलाद हब होण्याची क्षमता आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, अशी हमी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सुनील जोशी हे दावोस परिषदेत सुद्धा सहभागी होणार असून, तेथे ते राज्य सरकारसोबत सामंजस्य करार सुद्धा करणार आहेत.

     

    गडचिरोलीत विविध पायाभूत सुविधा प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी, यासाठी नेहमीच देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार राहिला आहे. कोनसरी येथे एका प्रकल्पाचे उदघाटन आणि दुसर्‍या टप्प्याचे भूमिपूजन सुद्धा लवकरच होणार आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना या कोनसरी प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. आता या नव्या गुंतवणुकीतून गडचिरोली आणि पर्यायाने विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.