Tag: सुधारित हिट अँड रन

  • चंद्रपुरात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन

    चंद्रपुरात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सुधारित हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक झाले असून हा कायदा तात्काळ मागे घ्यावा यासाठी आता वाहन चालकांनी स्टेअरिंग छोडो आंदोलनाला सुरुवात केली आहे.

    10 जानेवारीला शहरातील वरोरा नाका चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वाहन चालकांनी निषेध रॅली काढत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला, या रॅलीत जिल्हाभरातून वाहन चालक सामील झाले होते.

     

    हिट अँड रन हा कायदा सर्वांसाठी लागू आहे, ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांच्या हातून अपघात घडला तर 7 लाख दंड तर 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे, जर हा कायदा परत घेतला नाही तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा वाहन चालकांनी दिला आहे.

     

    या आंदोलनात जय संघर्ष चालक मालक संघटना, लाल बावटा वाहन चालक मालक व इतर संघटना सामील झाल्या होत्या.

  • घुग्घुस येथे हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांचे आंदोलन

    घुग्घुस येथे हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांचे आंदोलन

    News34 chandrapur

    घुग्घुस – केंद्र सरकारने आणलेल्या सुधारित हिट अँड रन कायद्याविरोधात पुन्हा घुग्घुस येथे HRG कंपणीमधील ट्रक चालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

    सदर ट्रक चालक वेकोली कोळसा खाणीत माती व कोळश्याची वाहतूक करणारे ट्रक चालवितात.

     

    2 दिवसापासून देशात पुन्हा आंदोलन होणार अशी कुजबुज सुरू झाली होती, नागरिकांनी पुन्हा पेट्रोल पंपावर गर्दी सुद्धा केली मात्र ती अफवा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते, सध्या समाज माध्यन्मावर अशा अफवा पसरत असून त्यावर विश्वास करू नये असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

     

    त्यानंतर सुद्धा आज घुग्घुस येथील ट्रक चालकांनी संप पुकारला यावेळी बैरम बाबा मंदिर परिसरात घुग्घुस पोलिसांनी अनुचित घटना घडणार नाही याकरिता बंदोबस्त लावण्यात आला आहे.

  • चिमूर शहरात वाहन चालकांचे चक्काजाम आंदोलन

    चिमूर शहरात वाहन चालकांचे चक्काजाम आंदोलन

    News34 chandrapur

    चिमूर – गुणवंत चटपकार

    जड वाहनचालकांसाठी तसेच मोठ्या वाहन चालकासाठी अन्यायकारक ठरणारा सुधारित हिट अँड रन कायद्या तत्काळ मागे घेण्यात यावा. या मागणीसाठी चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय समोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

     

    नुकताच संसदेत जुन्या हिट अँड रन कायद्यात बदल करून सुधारित कायदा पारित करण्यात आला. या कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या असून वाहन चालकांसाठी अन्यायकारक आहे. यात करावसाचा कालावधी आणि दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या कायद्यामुळे वाहनचालकांचे कुटुंब उद्ववस्त होणार आहे. अनेकदा अपघात हे आकस्मिक होतात. मात्र या अपघातात वाहन चालकांनाच जबाबदार धरले जातात. अनेकदा अपघाता नंतर वाहन चालकांना गंभीर मारहाण केली जाते. त्यामुळे अपघातानंतर वाहनचालक जख्मीला मदत करण्यापेक्षा पळ काढून पोलिस ठाण्यात आश्रय घेतात. परंतु नवीन कायदा हा वाहनचालकांसाठी अन्यायकारक ठरणार आहे.

     

    त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी दोन जानेवारीला चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटनेच्या वतीने चिमूर शहरातून मोर्चा काढून तहसील कार्यालय समोर चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे