Tag: शिवसेना चंद्रपूर

  • chandrapur news today : पूरग्रस्त भागात शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांची मदत

    chandrapur news today : पूरग्रस्त भागात शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांची मदत

    chandrapur news today : चंद्रपूर :- मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहेत. अश्यातच अतिवृष्टीमुळे चिचपल्ली गावानजीक असलेले तलाव फुटल्याने चिचपल्ली व पिंपळखुट गावातील घराघरात पाणी शिरल्याने घरातील सामानाचे फार मोठे नुकसान झाले.तीन दिवस घरात पाणी घुसून असल्याने जनजीवन विस्कळित झाले होते.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात घडली थरारक घटना

    Chandrapur news today अनाज,पाणी, कपडे इतकेच नव्हे अनेकांचे शैक्षणिक दस्तऐवज सुद्धा पुरात वाहून गेले.संकटाच्या घडीत पुरग्रस्तांच्या दुखात साथ देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२७ जुलै शनिवारला पुरग्रस्त गाव चिचपल्ली व पिंपळखुट येथील नागरिकांना जीवन उपयोगी वस्तूंची किट व कुटुंबातील महिलेसाठी एक साडी भेट म्हणून देत त्यांच्या दुखात सहभागी झाले.

    अवश्य वाचा : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व सीईओ उतरले चिखलात

    अतिवृष्टीमुळे चिचपल्ली गावानजीकचा तलाव फुटला यात चिचपल्ली येथील ३०० तर पिंपळखुट येथील ११० घरात पाणी शिरले.यात घरातील संसार उपयोगी सामानाचे तसेच धान्य,शैक्षणिक दस्तऐवज पुरात वाहून गेले.काहींचे बकऱ्या व शेती उपयोगी वस्तूही वाहून गेले.यात फार मोठे नुकसान झाले.या संकटाच्या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी चिचपल्ली आणि पिंपळखुट येथील पूरपीडित कुटुंबीयांसोबत मोठ्या आस्थेने विचारपूस केली व दुःखात मी सोबत आहे असा विश्वास दिला.

    चिचपल्ली व पिंपळखुट येथील पूरपीडित कुटुंबीयांना जीवन उपयोगी वस्तूंची किट व महिलांसाठी साडी भेट म्हणून दिले.पुरग्रस्तांच्या मदतीला धावून येत आपल्यातला माणूस असल्याचा त्यांनी परिचय करून दिला.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरला नाही

    यावेळी उपजिल्हाप्रमुख सिकी यादव,शालिक फाले, विधानसभा प्रमुख प्रमोद पाटील,मधू मेश्राम,युवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे,महिला आघाडीचे जिल्हा संघटीका कल्पना गारगोटे,विनय धोबे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आशिष कावटवार,राहुल विरुटकर, मा.नगरसेवक सरफराज शेख, नागाळाचे उपसरपंच विनोद पिलरवार, पिंपळखुटचे सरपंच विनोद मेश्राम, बल्लरपूरचे माजी नगरसेवक अमित पाझारे,सागर राऊत,बब्बू पाठक,बाबा साहू,राहुल भोयर,राजू ठाकरे,सूरज घोगे, हेमराज बावने,प्रणित अहीरकर, सिकंदर शेख,गिरीश कटारे,वसीम भाई,सिकंदर शेख.शाबाज शेख, इलाजभाई, व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

  • अवजड वाहतुकीविरोधात शिवसेनेचे रस्ता रोको आंदोलन

    अवजड वाहतुकीविरोधात शिवसेनेचे रस्ता रोको आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर तालुक्यातील वांढरी गावातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांतभाऊ साहारे यांच्या नेतृत्वात शिवसेना तालुकाप्रमुख विकास विरुटकर, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख उज्वला नलगे,युवासेना उप जिल्हाप्रमुख हेमराज बावणे, युवासेना उपतालुका प्रमुख सुश्मित गौरकार, युवासेना तालुका समन्वयक ज्ञानेश्वर लोनगाडगे,चेतन कामडी शाखा प्रमुख चींचाला यांच्या नेतृत्वात व प्रमुख उपस्थितत वांढरी गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

     

    वांढरी गावातून अनेक कंपन्यांची अवजड वाहतूक सुरू आहे.या जड वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या वाहतुकीमुळे वाहन धुळीचे प्रमाण वाढत आहे स्थानिक नागरिकांना वाहक त्रास सहन करावा लागत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संबधित वारंवार निवेदन दिले परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष केले या करिता शिवसेना युवासेना तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आणि या नंतर सुध्दा ही जडवाहतुक बंद झाली नाही तर समोर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू असेही यावेळी सांगण्यात आले.

     

    यावेळी सज्जन सातपुते नागाळा उपसरपंच, रिझवान पठाण,शबाझ शेक,शिवा वाझरकर,अमित पिंपलकर, आकाश पावडे,केतन शरकी, तुषार शेडामे,कपिल शेरकी, चेतन पावडे,शुभम घागर्गुंडे,वर्षा पाल, पुनम तुरांकर ,माधुरी पावडे ,वेणू पोलोज्वार, साधना बहादे, तनेबाई बरडे, अशा पिपरे,सुमन पीपरे,जिजाबाई रेचंकर, माया केडझर,बायाबई शेदमे, सुरेखा पिंपलकर, भारती तूरकर, कलावती काळे,माया ढाकणे, छाया तोडासे, पापिता ढाकणे,सुनीता देशकर, तानी पलधर, भावना देशकर, सुवरणा आसूटकर,अर्चना खंदरकर, राजांना देशकर, सुनीता इंगळे,कल्याणी घुगुल,ताई कांबळे,कल्पना येलमुले, शकुन समस्त गावकरी मोठया संख्येने सहभागी झाले.