Tag: शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी

  • Mla Sudhakar Adbale : आदिवासी विकास विभागात कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय

    Mla Sudhakar Adbale : आदिवासी विकास विभागात कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय

    News34 chandrapur

    चंद्रपूर : आदिवासी विकास विभागात कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा ८ जून २०१६ चा ‘काम नाही, वेतन नाही’ शासन निर्णय तात्काळ रद्द करा अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष उल्लेखाद्वारे केली.  No work no pay policy

     

    आदिवासी विकास विभागाद्वारा संचालित खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील कार्यरत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदभनि आश्रमशाळा मान्यता रद्द झाल्यास किंवा अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंतच्या कालावधीत ८ जून २०१६ च्या शासन निर्णयानुसार ‘काम नाही, वेतन नाही’ हे धोरण लागू करण्यात आले आहे. Teaching staff

    ‘काम नाही, वेतन नाही’ हे धोरण लागू करणे म्हणजे एक प्रकारे कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे होय. या शासन निर्णयामुळे राज्यातील आदिवासी विभागामार्फत संचालित शाळांतील कर्मचाऱ्यांवर फार मोठा अन्याय झाला आहे. Non-teaching staff

     

    या धोरणामुळे शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरल्यास अश्या कर्मचाऱ्यांवर समायोजन होईपर्यंत वेतन न मिळाल्याने आर्थिक संकट ओढावत आहे. यामुळे आदिवासी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही दुटप्पी भूमिका शासनाने मागे घ्यावी, यासाठी आमदार सुधाकर अडबाले हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. Tribal development department

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा लावून धरत आदिवासी विकास विभागातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा जाचक असा ८ जून २०१६ चा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी विशेष उल्लेखाद्वारे आदिवासी विभागाकडे केली. Mla sudhakar adbale

  • राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करा – आमदार सुधाकर अडबाले

    राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करा – आमदार सुधाकर अडबाले

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करा, अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेंतर्गत १०, २०, ३० वर्षांच्या सेवेनंतर तीन लाभ मिळावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटनांमार्फत मागणी होत आहे. मागणीच्या पूर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व इतर अनेक संघटनांनी आंदोलनाद्वारे वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा सुद्धा केलेला आहे. मात्र, अद्यापही सरकारकडून शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाजूने सकारात्मक पाऊल उचलण्यात आलेले नाही. यामुळे शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण झालेली आहे.

    केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्‍यातील इतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळतो आहे. त्‍याच धर्तीवर शालेय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय, खासगी अनुदानित, आश्रम शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थामधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करावी, यासाठी गेल्‍या दोन अधिवेशनात आमदार सुधाकर अडबाले यांचा प्रश्‍नांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. राज्‍य सरकारने राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रास्‍त मागणी असलेली १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.