Tag: शरद पवार राष्ट्रवादी कांग्रेस

  • Ncp sp : चंद्रपुरात राष्ट्रवादी कांग्रेसचे काळे फुगे दाखवीत निषेध आंदोलन

    Ncp sp : चंद्रपुरात राष्ट्रवादी कांग्रेसचे काळे फुगे दाखवीत निषेध आंदोलन

    ncp sp छत्रपती शिवाजी महाराज यांचा निकृष्ट दर्जाचा पुतळा बनविनाऱ्यांवर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करा: चंद्रपूर जिल्हा व राष्ट्रवादी
    काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार मागणी

    रमाई घरकुल योजना : चंद्रपूर जिल्ह्यात 864 घरकुल मंजूर

    Ncp sp चंद्रपूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग राजकोट येथे आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडला या घटनेच्या निषेधार्थ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गिरणार चौकात जिल्हा कार्याध्यक्ष बेबीताई उईके शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्या नेतृत्वात महायुती भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आले.

       छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे.छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा,अस्मितेचा आणि सन्मानाचा विषय आहे.शिवरायांच्या नावावर या महाराष्ट्रात नेहमीच सत्ता स्थापन झालेली आहे.असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट मालवण येथे  आठ महिन्यापूर्वी उभारलेला शिवछत्रपतींचा पुतळा एकाएकी कोसळून पडतो ही अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी बाब  या घटनेचा निषेध व्यक्त केला.

    Ncp sp महायुती सरकारचे काळे कारणामेच्या निषेधार्थ काळे फुगे दाखवीत महायुतीचे कारणामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मूलभूत प्रश्नांना नाकारून केवळ सत्ताकारनात रमलेल्या भ्रष्टाचारी सरकारला जागे करण्यासाठीं राज्यात बळीराजाला दिल्या जाणाऱ्या यातना वाढत्या महागाई मुळे प्रत्येक कुटुंबाचं कोलमडलेलं आर्थिक नियोजन महाराष्ट्र अस्मितेवर घाव, वाढते गुंडगिरी-गुन्हेगारी, वाढते महिला वरील अत्याचार ,वाढता भ्रष्टाचार ,पेपर फुटी मुळे ढासळलेल्या शैक्षणिक अवस्थेत विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान, महायुतीच्या या महाराष्ट्र द्वेषी धोरणाला कायमचा लगाम लावण्यासाठी महायुतीचे काळे कारणाने सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी निषेध आंदोलन करण्यात आले
    या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र 8 महिन्यापूर्वी उभा केलेला पुतळा पडतोच कसा? या पुतळ्याचे बांधकाम करताना आवश्यक ती काळजी घेतली गेली नाही त्यामुळे गांभीर्याने या घटनेची दखल घेऊन शिल्पकार आपटे, कंत्राटदार चेतन पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,त्यांचे सहकारी आणि या घटनेसाठी दोषी असलेल्या सर्वांवर ताबडतोब कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करुण त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. या मागणीचे आंदोलन करण्यात आले.

    राष्ट्रवादी कांग्रेसचे आंदोलन

    यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे, सेवादल जिल्हाध्यक्ष माणिक लोणकर, शहर जिल्हाध्यक्ष कलाकार मल्हारप, शहर उपाध्यक्ष राहूल देवतळे, परब गिरडकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पूजाताई शेरकी, माजी जिल्हा परिषद सदस्य वंदना आवडे, जिल्हा सचिव शोभाताई घरडे, नीलिमा आत्राम, नीलिमा नरवडे ,प्रमोद देशमुख, माजी नगरसेवक विनोद लाभाने, मारुती झाडे, सिहल नगराळे,, सतीश मांडवकर, नीलकंठ येणे, सुवास पिंगे ,सुजल आंबटकर, लता जांभुळकर, हर्षा कैरकर इत्यादी प्रमुख पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

  • तुम्ही दोघांनी मनपा निवडणूक लढावी, जनता डिपॉझिट जप्त करेल – अनिल देशमुख

    तुम्ही दोघांनी मनपा निवडणूक लढावी, जनता डिपॉझिट जप्त करेल – अनिल देशमुख

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर व राजीव कक्कड यांना जोरदार टोला लगावत चंद्रपूर मनपा निवडणूक लढावी अशी विनंती केली, निवडणुकीत उभे झाल्यास जनता तुमचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही असे ही आव्हान यावेळी देशमुख यांनी केले.

     

    शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या मेळाव्यात उपस्थित झालेले माजी गृहमंत्री व आमदार अनिल देशमुख यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्ला केला, मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत चंद्रपुरातील 2 पदाधिकारी हे अजित पवार गटात गेले असून त्याचा आपल्या पक्षावर परिणाम पडला का या प्रश्नावर अनिल देशमुख यांनी दोन्ही पदाधिकारी नितीन भटारकर व राजीव कक्कड यांच्यावर मिश्किल टोला लगावत दोघांनी स्वतः मनपा निवडणुकीच्या मैदानात उभे रहावं, जनता तुमचं डिपॉझिट जमा केल्याशिवाय राहणार नाही, असे न झाल्यास मी जे बोललो ते खोटं असं समजावे.

     

    राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातून अजित पवारांनी काढता पाय घेत वेगळा गट स्थापन करून ते शिंदे-भाजप सरकारमध्ये गेले, त्यानंतर चंद्रपुरातील युवक कांग्रेसचे अध्यक्ष नितीन भटारकर व शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी अजित पवार गटाला पाठिंबा देत त्यामध्ये सामील झाले होते.

     

    अनिल देशमुख यांच्या आव्हानाला उत्तर देत अजित पवार गटाचे राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी उत्तर देत म्हटलं आहे की, अनिल देशमुख हे जेष्ठ नेते आहे त्यांचा आम्ही आदर करतो, आम्ही जर निष्क्रिय असतो तर पक्षातील 90 टक्के कार्यकर्त्यांचा आम्हाला पाठिंबा नसता, आपण राज्याचे जरी नेते असले तर स्वतःच्या विधानसभा मतदार संघातील नगर परिषदेवर राष्ट्रवादी कांग्रेसचा झेंडा फडकविण्यास अयशस्वी का ठरले? त्याचं कधी चिंतन केलं का? विशेष म्हणजे मंत्री असताना सुद्धा कधी नागपूर जिल्हा परिषद व नगर परिषदेवर ते अयशस्वी का ठरले याबाबत त्यांनी आधी विचार करावा.

     

    आम्ही मनपा निवडणूक लढावी असा त्यांचा आग्रह आहे, याआधी त्यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात लक्ष द्यावे चंद्रपुरातील राजकारण सांभाळायला आम्ही सक्षम आहो.

  • मराठा समाज आरक्षणावर आमदार बोर्डीकर यांची सुप्रिया सुळेवर जोरदार टीका

    News34 chandrapur

    मुंबई – राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असून सध्या काही आमदार व खासदार राजीनामे देण्याच्या तयारीत आहे, मात्र या गंभीर प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी 40 दिवसापासून सरकारने मराठा आरक्षण बाबत काय केले असा प्रश्न उपस्थित केला आहे.

    यावर भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळे यांचा जोरदार समाचार घेत, अनेक वर्षे शरद पवार साहेब सत्तेत होते जर त्या काळात आपल्या वडिलांनी मराठा समाजबाबत काही चांगले निर्णय घेतले असते तर आज मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती.

     

    सरकार आरक्षण प्रश्नावर गंभीर आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समजाला न्याय देतील, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं होत मात्र मविआ सरकार आलं आणि आरक्षण गेलं, त्यावेळी आपण गप्प होता सुप्रियाताई, उगाच उलटसुलट प्रतिक्रिया देत आमच्या मराठा बांधवांच्या भावना भडकवू नका ही आपल्याला विनंती आहे.

  • शरद पवार गटातील राष्ट्रवादी युवक कॉग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी अजीत दादा गटात

    News34 chandrapur

    चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक ०८ ऑक्टोंबर ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा सभेच्या निमित्ताने राष्ट्रीय सचिव राजेंद्रजी जैन यांनी जिल्ह्यातील पक्ष बांधणी व कार्याचा आढावा घेण्यासाठी श्रमिक पत्रकार भवन येथे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

     

    यामध्ये तालुका व विधानसभा निहायपदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्र देऊन पक्षाच्या कार्याला गती देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्याला हातभार लावीत पक्ष बांधणीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा हे मार्गदर्शन केले.

     

    या जिल्हा आढावा बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राकेश सोमानी यांनी उपस्थिती दर्शवीत खासदार प्रफुल पटेल व अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांचेंशी समन्वय साधत पक्षाच्या कार्यक्रमाला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली.

     

    राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत असताना जिल्ह्यातील सर्व तालुक्या मध्ये जाऊन युवक संघटना बांधणी केली. आता त्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आजपासुन अजित दादा यांच्या नेतृत्वात काम करण्याचे जाहीर केले. यामुळे सर्वच पदाधिकारी आम्हच्या सोबत आहे हे ओरड करणाऱ्यां शरद पवार गटातील नेत्यांची थोडक्यात पंचाईत झाली.

     

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झालेल्या सभेला प्रदेश सहसचिव आबीद अली, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, चंद्रपूर शहर अध्यक्ष राजीव कक्कड, युवक अध्यक्ष राकेश सोमानी, विद्यार्थी अध्यक्ष सुजित उपरे, सुनील काळे, विलास नेरकर, महेंद्र चंडेल, शरद जोगी, अविनाश राऊत, अरविंद रेवतकर यांचेसह मोठ्या संख्येंने जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

  • चंद्रपुरातील हा जुगार कायमस्वरूपी बंद करा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यात जोमात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर बाबत News34 ने बातमी प्रसारित केल्यावर प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला मात्र ठोस कारवाई अजूनही झाली नाही.

     

    विशेष बाब म्हणजे वर्ष 2022 पासून व्हिडीओ गेम पार्लर चे परवाने नूतनीकरण करण्यात आले नसल्याने आजही हे पार्लर सुरू आहे.

     

    आता या नियमबाह्य जुगाराची तक्रार थेट राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे, राष्ट्रवादी कांग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे यांनी व्हिडीओ गेम पार्लर च्या नावाखाली सुरू असलेला जुगार कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे, इंगळे यांनी तक्रारीची प्रत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयाला पाठवली आहे.

     

    इंगळे यांनी निवेदनात म्हटले आहे की पूर्णतः सेट केलेल्या मशिनद्वारे पैसे लावण्यात येतात मात्र खेळणारा पैसे कधी जिंकत नाही, उलट तो पैसे हरतो, यामुळे अनेकांचे घरे उध्वस्त झाली आहे, काही युवकांनी या व्हिडीओ गेम पार्लर मुळे आत्महत्या केल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहे.

     

    प्रत्येक वेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी मार्फत पार्लर च्या परवाना नुसार काही नियमांचा भंग तर होत नाही याबाबत तपासणी करण्याचा अधिकार आहे मात्र आजपर्यंत अशी तपासणी मोहीम राबविण्यात आली नाही.

     

    पोलीस प्रशासनाने कारवाई केल्यावर जिल्हाधिकारी यांनी तपासणी मोहीम राबवा असे आदेश दिले, त्यानंतर पार्लर धारकांची बैठक घेत नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लरवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले, मात्र ज्यांनी नियमांचा भंग केला ते सुद्धा त्या बैठकीत उपस्थित होते तर मग जिल्हाधिकारी कारवाईचा इशारा कुणाला देत होते? यामध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

     

    प्रियदर्शन इंगळे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना चंद्रपुरातील व्हिडीओ गेम पार्लर कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी केल्याने पार्लर संचालकांचे धाबे दणाणले आहे.

     

    हरणाऱ्या व्यक्ती कडून पार्लर चालकांनी अनेकांचे दागिने व मालमत्ता गहाण ठेवल्याची सुद्धा माहिती इंगळे यांनी निवेदनामार्फत दिली आहे.

    अश्या जुगारावर कायमस्वरूपी बंदी घालावी अन्यथा भविष्यात अनेकांचे घरे उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी मागणी इंगळे यांनी केली आहे.

  • शरद पवार व अजित पवार यांच्या वादात चंद्रपुरातील या नेत्याने घेतला हा निर्णय

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे उपाध्यक्ष त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वादाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला.

     

    आम आदमी पार्टीचे राज्य संगठन सचिव भूषणजी ढाकुलकर, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या उपस्थितीत सरदार यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. यावेळी ढाकुलकर यांनी सरदार यांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत केले.

     

    सरदार यांनी पक्ष प्रवेशानंतर सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून त्यांना आता पुढे जाणे शक्य नव्हते. आम आदमी पार्टीची विचारसरणी त्यांना आवडते आणि त्यांना पक्षाच्या माध्यमातून लोकांसाठी काम करण्याची संधी मिळेल अशी त्यांना आशा आहे.त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांचे पक्ष प्रवेशामुळे जिल्हातील राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे.

     

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे उपाध्यक्ष त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांनी आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव भूषणजी ढाकूलकर तथा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या उपस्थितीत सरदार यांनी आम आदमी पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले.

     

    सरदार यांनी आपल्या प्रवेशाच्या भाषणात सांगितले की, ते शरद पवार-अजित पवार यांच्यातील वादाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत आहेत. त्यांनी सांगितले की, आम आदमी पार्टी एक नवीन आणि आशादायी पर्याय आहे.

    सरदार यांच्या प्रवेशाने आम आदमी पार्टीला मोठा दिलासा मिळाला आहे.

     

    सरदार हे जिल्ह्यातील एक प्रभावी नेते आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे आम आदमी पार्टीला जिल्ह्यात यश मिळण्याची शक्यता आहे. त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांच्या पक्षप्रवेशा वेळेस महानगर अध्यक्ष योगेश गोखरे जिल्हा सचिव संतोष दोरखंडे जिल्हा शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक बेरशेट्टीवार, महानगर सचिव राजू कुडे, महानगर उपाध्यक्ष सुनील सदभैय्या, महानगर सह संघटन मंत्री सिकंद सागोरे, महानगर युवा अध्यक्ष संतोष बोपचे, महानगर सहसचिव सुधीर पाटील, तब्बसूम शेख, पवन कुमार, जितेंद्र कुमार भाटिया व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • यंग चांदा ब्रिगेडचा कलाकार राष्ट्रवादी कांग्रेसच्या गोटात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वर्ष 2019 ला यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी प्रचंड मताधिक्य मिळवीत चंद्रपूर विधानसभेच्या आमदार पदी विराजमान झाले होते.

     

    मात्र त्यांच्या काटेरी वाट्यात संघर्ष करणारे शिलेदार आमदार जोरगेवार यांची साथ सोडून जात आहे, आधी विशाल निंबाळकर व आता यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप यांनी आमदार जोरगेवार यांची साथ सोडत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेसची घड्याळ हातात बांधली.

     

    कलाकार हा मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी कांग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य व शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्या संपर्कात होता. 13 सप्टेंबर ला नागपुरात पार पडलेल्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या विदर्भ पदाधिकारी मेळाव्यात कलाकार मल्लारप यांनी आमदार रोहित पवार व सलील देशमुख यांच्या उपस्थिती मध्ये असंख्य युवकांसहित राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये प्रवेश केला.

     

    यावेळी सुधाकर कातकर, बेबीताई उईके, राकेश सोमाणी, मुनाज शेख, हरिनाथ यादव, अरुण निमजे, राजेंद्र आखरे, जयंत टेम्भूर्डे उपस्थित होते.