Tag: लोकसभा निवडणूक

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चंद्रपूर येथे जिल्हा आढावा बैठक संपन्न

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चंद्रपूर येथे जिल्हा आढावा बैठक संपन्न

    News34 chandrapur

    चंद्रपूर :- 7 जानेवारीला चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारिणी व बूथ आढावा बैठक महेश भवन, चंद्रपूर येथे राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी आगामी काळात चंद्रपूर जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करणे व पक्षाचा विस्तार करुन बूथनिहाय बांधणी करणे यासंदर्भात चर्चा करून जिल्हयातील आढावा घेण्यात आला.

     

     

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेच्या व विकासाच्या मुद्द्यावर कार्य करीत आहे. राज्याचे उमुख्यमंत्री मंत्री ना.श्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.श्री प्रफुल पटेल व प्रदेशाध्यक्ष खा. श्री. सुनील तटकरे हे आपण सर्व कार्यकर्त्यांच्या व पदाधिकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जिल्ह्यात पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात क्रियाशील व सक्षम कार्यकर्त्यांना जबाबदारी देऊन लवकरात लवकर प्रत्येक बूथ वर कमिट्या तयार कराव्यात. यात सर्व घटकाचा समावेश करून प्रामुख्याने युवक, युवती व महिलांना स्थान देऊन प्रोत्साहन द्यावे. पक्ष संघटन मजबूत असेल तर येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा पक्ष लढवेल याची ग्वाही माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली. पक्षाची वाढ व विस्तार करण्यासाठी माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते जिल्हयातील युवक, विद्यार्थी, महिला, ओबीसी सेल, सामाजिक न्याय विभागाच्या काही तालुकानिहाय नियुक्ती पत्र देण्यात आले.

     

    सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केले असुन आबिद अली, रंजना पारशिवे, राकेश सोमानी, विलास नेरकर, महेंद्रसिंग चंदेल, अविनाश राऊत, मंगेश पोटवार, विनोद नवघडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

     

    यावेळी राष्ट्रीय सचिव व माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, गोंदिया रायुकाँ जिल्हाध्यक्ष केतन तुरकर, प्रदेश सचिव आबिद अली, नगरसेवक महेंद्रसिंग चंदेल, महिला जिल्हाध्यक्ष रंजना पारशिवे, युवक अध्यक्ष राकेश सोमानी, जेष्ठ नेते मनोहर काच्छेला, महिला जिल्हा कार्याध्यक्ष अर्चना बुटले, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश राऊत, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष प्रशांत झांबरे, वैद्यकीय मदत जिल्हाध्यक्ष पंकज ढेंगारे, महिला शहर अध्यक्षा चारुशीला बारसागडे, हेमांगीनी विश्वास, राजुरा विधानसभा अध्यक्ष शरद जोगी, वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, राज्य संघटक अमोल बावणे, युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, माजी उपसभापती हर्षवर्धन पिपरे, अल्पसंख्याक सेल शहर अध्यक्ष नौशाद शेख, चंद्रपूर तालुकाध्यक्ष श्रीनिवास गोस्कुल्ला, मुल तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, बल्लारपूर तालुकाध्यक्ष महादेव देवतळे, राजुरा तालुकाध्यक्ष संतोष दरेकर, गोंडपिपरी तालुका अध्यक्ष मनोज धानोरकर, पोंभूर्णा तालुका अध्यक्ष विजय ढोंगे, सावली तालुकाध्यक्ष घनश्याम राऊत, सिंदेवाही तालुकाध्यक्ष दामोदर ननावार, ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष नोगेश बगमारे, नागभीड तालुका अध्यक्ष विनोद नवघडे, चिमूर तालुकाध्यक्ष योगेश ठूने, वरोरा तालुका अध्यक्ष रवी भोयर, भद्रावती तालुका अध्यक्ष राजू बोरकर, कोरपणा तालुका अध्यक्ष धनराज जिवणे, कार्याध्यक्ष तनवीर शेख, कुतुब सिटी, आकाश येसनकर, गीतेश सातपुते, चंद्रकांत कुंभरे, रवी डीकोंडा, सलीम पठाण, जहीर खान, नासिर शेख, प्रशांत घुमे, ओमकार गेडाम, अश्विन उपासे, ऍड मंगेश काळे उपस्थित होते.

  • कांग्रेसने केली लोकसभा समनव्यक पदांची यादी जाहीर

    कांग्रेसने केली लोकसभा समनव्यक पदांची यादी जाहीर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – लोकसभा निवडणूक अवघ्या 2 ते 3 महिन्यात लागू शकते, त्यामुळे राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

     

    राज्यातील एकमेव कांग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या अवकाळी निधनाने आता कोण? याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले मात्र शेवटच्या क्षणी आमदार प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उभे राहू शकतात.

     

    कांग्रेस महासचिव केसी वेणूगोपाल यांनी राज्यातील लोकसभा समनव्यक यांची नियुक्ती जाहिर केली असून चंद्रपूर लोकसभा समनव्यक पदी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची वर्णी लागली आहे.

     

    कांग्रेस पक्षाने अनेक वर्षांनी चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला होता, मात्र आता कांग्रेस पुन्हा निवडून येणार का? चंद्रपूर जिल्ह्याला पहिली महिला खासदार म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर मिळणार काय? हे चित्र लोकसभा निवडणूक नंतर स्पष्ट होणार.

    सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेस पक्षात गटबाजीचा सूर आहे, त्या विविध सुराला सतीश चतुर्वेदी कसे जुळवून घेतात याकडे कांग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

  • चंद्रपुरातील मतदारांपर्यंत पोहचणार ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृतीचा चित्ररथ

    चंद्रपुरातील मतदारांपर्यंत पोहचणार ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृतीचा चित्ररथ

    News34 chandrapur

    चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आगामी लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक निवडणुका – 2024 च्या अनुषंगाने, इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन (ईव्हीएम) व व्हीव्हीपॅट वापराबाबत एलईडी चित्ररथाद्वारे जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदर मोहीम चंद्रपूर जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत राबविण्यात येणार असून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते नियोजन भवन येथे चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

     

    यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, आगामी लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने ईव्हीएम / व्हीव्हीपॅटबाबात प्रचार प्रसिध्दी आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 10 डिसेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 2032 मतदान केंद्र, प्रत्येक शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, गाव / शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ, नाका, शासकीय कार्यालये, सभेची ठिकाणे इत्यादी मौक्याच्या ठिकाणी फिरत्या वाहनांद्वारे सदर मोहीम राबविण्यात येईल. या जनजागृती मोहिमेमध्ये प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येणार आहे.

     

    पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेमध्ये मतदान प्रक्रियेसंबंधी माहिती जाणून घेणे, मतदान यंत्राबाबत आवश्यक माहिती घेणे, प्रत्यक्ष मतदान करणे, आपण केलेल्या मतदानाप्रमाणेच निकाल येतो का, ते तपासणे, याबाबत नागरिकांच्या मनात काही शंका असल्यास त्याचे निरसन करणे, तसेच व्हीव्हीपॅटबाबत माहिती जाणून घ्यावी.

     

    जिल्ह्यातील प्रत्येक मतदारांपर्यंत ही जनजागृती मोहीम पोहचेल, असे नियोजन जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील सर्व मतदारांनी घ्यावा. तसेच येणा-या निवडणुकीत आपल्या मतदानाचा अधिकार बजावून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.
    यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी दगडू कुंभार यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.