Tag: लॉयड्स मेंटल स्पेन आर्यन अँड पॉवर कंपनी

  • लॉयडस मेटल स्पंज आर्यन अँड पॉवर कंपनीचा मुद्दा पोहचला उद्योगमंत्र्यांच्या दालनात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस, उसगाव आणि वडा या गावांमध्ये असलेल्या लॉयडस मेटल स्पंज आर्यन अँड पॉवर कंपनीने CSR फंडातून खर्च केलेल्या सन 2013 पासून आजपर्यंतच्या केलेल्या कार्याची चौकशी होणार आहे. याबाबत चंद्रपूरचे काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांनी निवेदन दिल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिले आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या प्रदूषणामुळे परिसरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. कंपनीने वर्षातून चार वेळा कंपनीच्या माध्यमातून प्रदूषणग्रस्त लोकाकरीता आरोग्य शिबिर लावायला पाहिजे होते. परंतु तशी कुठलीही प्रक्रिया किंवा योजना कंपनीमार्फत राबविली जात नाही. तसेच कंपनीद्वारे अनेक प्रकारचे नियम धाब्यावर बसून कामगारांचे शोषण केले जात आहे.

     

    याबाबत चंद्रपूर जिल्ह्यातील दिनेश चोखारे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्र दिले. या पत्रात त्यांनी कंपनीच्या CSR फंडच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

     

    मंत्री सामंत यांनी ही मागणी मान्य केली आहे. त्यांनी सांगितले की, कंपनीच्या CSR फंडच्या खर्चाची सखोल चौकशी केली जाईल. या चौकशीमध्ये प्रदूषण, कामगार शोषण यासह इतरही बाबींचा समावेश असेल.

    या चौकशीनंतर कंपनीवर कोणती कारवाई होते हे पाहावे लागेल.

  • लॉयड्स मेटल स्पेन आर्यन अँड पॉवर कंपनीच्या वसाहतीचे अवैद्य बांधकाम तात्काळ थाबवा – दिनेश चोखारे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – म्हातारदेवी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या परिसरात लॉयड्स मेटल स्पेन आर्यन अँड पॉवर कंपनीचे वसाहतीचे अवैद्य बांधकाम थांबवणे सदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

     

    या परिसरात वसाहतीचे अवैध बांधकाम सुरू असल्याची आम्हाला माहिती झाली आहे. हे बांधकाम पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून सुरू आहे. या बांधकाममुळे येथील पर्यावरण धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच संबंधित कामाची परवानगी सुद्धा ग्रामपंचायत कडून घेण्यात आली नाही आहे.

     

    या संदर्भात योग्य ती चौकशी करून पुढील कारवाई होईपर्यंत सदर बांधकाम थांबवण्यात यावे अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातुन केली आहे.

    निवेदन सादर करतांना काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिनेश दादा पाटील चोखारे, सचिन राजूरकर, म्हातारदेवीचे सरपंच संध्याताई पाटील, माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य संजय पाटील यांची उपस्थिती होती.

  • कवडीमोल भाव देऊन चंद्रपुरातील शेतकऱ्यांचा अपमान

    News34 chandrapur

    चंद्रपूर – लॉयड्स मेंटल स्पेन आर्यन अँड पॉवर कंपनीचे विस्तारीकरण करण्यात आले. परंतु परंतु नवीन किती कामगार कंपनीने घेतले यासंदर्भात खुलासा झालेला नाही आणि विस्तारीकरण दरम्यान ज्या जमिनी कंपनीने अधिग्रहित केल्या. त्या संबंधित शेतकऱ्यांना कवडीमोल भाव देऊन त्यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप दिनेश चोखारे यांनी केला आहे.

    दिनेश चोखारे यांच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने लॉयड्स मेंटल स्पेन आर्यन अँड पॉवर कंपनीच्या CSR कार्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. दिनेश दादाजी चोखारे यांनी 18 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात एक तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी कंपनीने CSR फंडातून केलेल्या खर्चाबद्दल चौकशीची मागणी केली होती.

     

    या तक्रारीची दखल घेत, जिल्हाधिकारी कार्यालयाने कंपनीला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीने 2013 पासून आजपर्यंत CSR फंडातून केलेल्या खर्चाची माहिती आणि त्या खर्चातून केलेल्या कार्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावी, असे आदेशात काढले.

     

    चोखारे यांनी कंपनीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कंपनीने आपल्या विस्तारीकरणासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत. या जमिनींचे मोबदला शेतकऱ्यांना कवडीमोल भाव देऊन देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

     

    चोखारे यांनी कंपनीला नवीन कामगारांची संख्या आणि शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मोबदल्याची माहिती देण्याची मागणी केली.