Tag: रद्द करा

  • नवीन चालक कायद्या रद्द करा, घुग्घुस येथे वाहनचालकांचे निदर्शने

    नवीन चालक कायद्या रद्द करा, घुग्घुस येथे वाहनचालकांचे निदर्शने

    News34 chandrapur

    घुग्घूस : केंद्र शासनाच्या नवीन चालक कायदा विरोधात आज घुग्घुस शहरातील सर्व चालकांनी आपले वाहन सोबत घेत सदर कायद्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली.

    कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली चालकांनी घुग्घुस पोलीस स्टेशनला ठाणेदार आसिफ राजा यांना निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी 12 : 30 वाजेपासून जोरदार निदर्शने केली.

    यावेळी चालकांनी नारेबाजी करीत रद्द करा रद्द करा जुलमी कायदा रद्द करा, मोदी शासन मुर्दाबादच्या घोषणा देत चालकांनी आपला संताप व्यक्त केला.

     

    केंद्र शासनाने नवीन चालक कायदा पारित करवून घेतला यानुसार चालकांच्या वाहनाने अपघात झाल्यास चालकाला अपघातग्रस्त व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाणे आवश्यक आहे.

     

    चालक पळून गेला असता व दोषी आठळल्यास त्याला सात वर्षाची शिक्षा व सात लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
    चालकांच्या मते वाहनाने अपघात झाल्यानंतर चालक जर घटनास्थळी थांबला तर त्याला जमावाकडून जीवे मारण्याची शक्यता असते.

     

    तसेच चालक हा आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याने तो सात लाख दंड देऊ शकत नाही.
    व सात वर्षाची शिक्षा झाल्यास त्याचा कुटुंब उध्वस्त होण्याची शक्यता आहे.

     

    सदर आंदोलनात काँग्रेस नेते अनिरुद्ध आवळे, अलीम शेख,विशाल मादर,रफिक शेख,व चालक अनंता बिराडे, श्याम तिरगुटला,राजू आसपवार,संतोष भारती,शंहशह शेख,बालाजी पतंगे,विजय बेहेवार,जावेद शेख,नेतूराग,आरिफ खान,अकबर अली,राजेश श्रीवास,मुस्तुफा साहू,शहनवाज खान,हिफाज खान, सयाराम सर्वां,शाम कोंडागुर्ला,मोहरम अली,बुधराज कश्यप व मोठ्या संख्येने चालक उपस्थित होते.

  • हिट अँड रन कायदा रद्द करा, चंद्रपुरात वाहन चालकांचा निषेध मोर्चा

    हिट अँड रन कायदा रद्द करा, चंद्रपुरात वाहन चालकांचा निषेध मोर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : पूर्वीच्या हिट ॲण्ड रन कायद्यात सुधारणा करून नवीन हिट ॲण्ड रन कायदा २०२३ गृहमंत्री अमित शहा यांनी आणला आहे. हा कायदा देशभरातील वाहनचालकांसाठी अन्यायकारक असून, लहानमोठ्या अपघातात वाहनचालक भरडले जाणार आहे.

     

    अनेकदा वाहनचालकांनी चुकी नसतानाही अपघात होतात. मात्र, अशावेळी मोठ्या वाहनचालकांना दोषी ठरविले जाते. नवीन कायद्यामध्ये मोठ्या शिक्षेची आणि दंडाची तरतूद करण्यात आल्याने हा कायदा रद्द यावा या मागणीसाठी अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने शनिवार ३० डिसेंबर रोजी गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढली, या रॅलीत असंख्य वाहन चालक सहभागी झाले होते.

     

    यापूर्वी अपघातातील दोषींना शिक्षा देण्यासाठी विविध कलमे अस्तित्वात आहे. शिवाय मोटार वाहन कायदा अस्तित्वात आहे. असे असतानाही सुधारित हिट ॲण्ड रन कायद्यात नव्याने कलम ३०२ म्हणजे हत्येचे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. नव्या कायद्यानुसार १० वर्ष कारावासाची शिक्षा, २ लाख ते १० लाख रुपयेपर्यंत दंड अशी तरतूद करून हा कायदा २० डिसेंबर २०२३ रोजी संसदेत पारीत करण्यात आला आहे.

     

    अनेक अपघात अचानक झालेले असतात. अशोवळी मोठ्या वाहनाचे वाहनचालक नाहक भरडले जातात. त्यामुळे हा कायदा रद्द करण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे उपरे यांनी सांगितले. देशाच्या अर्थव्यवस्थेत वाहनचालकांचा मोठा वाटा असताना त्यांच्यावर अन्यायकरणारे कायदे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. या निषेध रॅलीत वाहनचालकांनी मोठ्या संख्येत सहभाग दर्शविला.

    New year 2024 ad
    अशोक जीवतोडे यांच्याकडून देशवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..