Tag: यंग चांदा ब्रिगेड

  • Young chanda brigade : चंद्रपुरात परंपरागत गुरूंचा सत्कार

    Young chanda brigade : चंद्रपुरात परंपरागत गुरूंचा सत्कार

    Young chanda brigade गुरु हे आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कृपेमुळे, मार्गदर्शनाने आणि शिकवणीने आपली समाजव्यवस्था अधिक सशक्त झाली आहे. विविध क्षेत्रात गुरुंचे मार्गदर्शन आपल्याला लाभते, जे अज्ञानाच्या अंधारातून आपल्याला प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातात. आजचा हा परंपरागत गुरुंचा सन्मान समारंभ त्यांनी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा जिंकणार, भाजप अधिवेशनात निर्धार

       गुरु पोर्णिमे निमित्त आज रविवारी  जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात यंग चांदा ब्रिगेड च्या वतीने परंपरागत गुरुंच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले, सरदार हरविंदर सिंग धुन्ना, डॉ. दाभारे, डॉ. रजनिकांत भलमे, गोपाल मुंदडा, माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, श्याम धोपटे, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, राशिद हुसेन, सायली येरणे, भाग्यश्री हांडे, नकुल वासमवार, दयानंद नागरकर, जय मिश्रा, कार्तिक बोरेवार, कल्पना शिंदे, नंदा पंधरे, रूपा परसराम, विमल कातकर, दर्शना चापले, निलिमा वनकर, वंदना हजारे, अल्का मेश्राम, शांता धांडे, कौसर खान, अनिता झाडे, आशु फुलझेले, आशा देशमुख, मंजुषा दरवरे, सरोज चांदेकर, अस्मिता दोनाडकर, माधुरी निवलकर, दुर्गा वैरागडे, कविता निखारे, प्रियंका हजारे आदींची उपस्थिती होती.

     young chanda brigade आजच्या युगात स्वयंरोजगाराकडे वळण्याची गरज आहे. अशात योग्य गुरुंचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. व्यवसायात प्राविण्य प्राप्त अनेकजन आपले कलागुण दुसऱ्यांना देत स्वावलंबी बनवत आहेत. अशा ज्ञानाचे भांडार असलेल्या गुरुंची समाजालाही गरज आहे. आज अशाच परंपरागत गुरुंचा आपण सन्मान करत आहोत. हे गुरु स्वतःजवळील ज्ञान दुसऱ्यांना देण्याचे काम करत आहेत. यामुळे पारंपारिक व्यवसाय आणि हस्तकला जपली जात असल्याचे आ. जोरगेवार म्हणाले.

      गुरु-शिष्य परंपरेचा एक सुंदर प्रवास आपण पाहिला आहे. यामध्ये ज्ञानाचा, संस्काराचा आणि मूल्यांचा वारसा एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजतेने हस्तांतरित होत असतो. गुरुंचे आशीर्वाद म्हणजेच आपल्या जीवनाचा दीपस्तंभ आहे. आजच्या या सन्मान समारंभात, आपण या गुरूंचे योगदान, त्यांचा परिश्रम आणि त्यागाचा गौरव करत असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले म्हणाले की, गुरुंच्या आशीर्वादामुळे आपले जीवन अधिक सशक्त आणि सुसंस्कारित बनले आहे. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने, आपण जीवनातील अडचणींवर मात करून यशाची शिखरे गाठू शकतो, असे ते म्हणाले.

      यावेळी पेंटर, सुतार, वेल्डर, चालक, मेकॅनिक, ऑटो चालक, जिम ट्रेनर, मूर्तिकार, मूर्ती पेंटर, मच्छीपालन, गाय पालन, पार्लर प्रशिक्षण, मोबाईल रिपेअरिंग, शास्त्रीय संगीत, फेटे बांधणेवाला, मंडपवाला, संगीत प्रशिक्षण, क्रीडा, नाटक दिग्दर्शक, बँड प्रशिक्षक, मटका कुंभार, शिवणकला, बुटीक, झुंबा, केक, योग शिक्षक, भजन आरती प्रशिक्षिका, योग नृत्य, सलून, सुवर्णकार, चित्रकार, भजन प्रशिक्षक, फोटोग्राफर, पुजारी, ऑर्केस्ट्रा अशा विविध क्षेत्रातील परंपरागत गुरुंना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

  • बहिन म्हणजे आईचं दुसरे प्रतिबिंब – आमदार किशोर जोरगेवार

    बहिन म्हणजे आईचं दुसरे प्रतिबिंब – आमदार किशोर जोरगेवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – यंग चांदा ब्रिगेड संघटना नसुन हा परिवार आहे. या संघटनेचा प्रमुख म्हणून आपल्या बहिणींच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी मी कटिबध्द आहे. दरवर्षी आपण हा कार्यक्रम आयोजित करुन औक्षवंत करता. हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस असतो. बहिन म्हणजे आईचे दुसरे प्रतिबिंब असुन आपला स्नेहरुपी आर्शिवाद आपण माझ्यावर कायम राहिला आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

     

    यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमात निवासस्थानी भाऊबिज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला कल्याणी किशोर जोरगेवार, यंग चांदा बिग्रेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सायली येरणे, अल्पसंख्यांक विभाग महिला शहर प्रमुख कौसर खान, आशा देशमूख, विमल कातकर, कविता निखारे, निलिमा वनकर, शमा काजी, प्रमीला बावणे, अनिता झाडे, वैशाली मेश्राम, अस्मिता डोणारकर, शाहिन शेख, वैशाली रामटेके, माला पेंदाम, कल्पना शिंदे, वैशाली मद्दीवार, सोनाली आंबेकर, अल्का मेश्राम, चंदा ईटनकर, नंदा पंधरे, माधूरी निवलकर, वंदना हजारे आदींची उपस्थिती होती.

     

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, राखी आणि भाऊबीज या कार्यक्रमासाठी आपण दरवर्षी मोठ्या संख्येने येतात. दरवर्षी वाढत असलेली बहिणींची संख्या आनंददायी असली तरी बहिणींप्रती जबाबदारीची जाण करुन देणारी आहे. भाऊ म्हणून कुठे कमी पडणार नाही यासाठी माझे सदैव प्रयत्न राहीले आहे. आमदार म्हणून विकासकामे करत असतांना मला बहिनींचा कधीच विसर पडला नाही. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आपण विविध ठिकाणी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित केलेत. त्यांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न आपण करणार आहोत.

     

    माझ्या अनेक बहिनी या सर्वसाधारण कुंटुबातील आहे. याची मला जाण आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक राहणीमान उंचवावे, त्यांनी स्वत:चा रोजगार उभा करुन स्वाभिमानाने जगावे यासाठी माझे प्रयत्न सुरु आहे. स्वयंरोजगारा संबंधित अनेक महागडे प्रशिक्षण आपण आपल्या भगीनींना निशुल्क उपलब्ध करुन देत आहोत. विविध भागात आपण ब्युटी पार्लर, मेकअप, शिवणकाम, फॅशन डिझायनींग या सारखे प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत आहोत. जवळपास आपण दोन हजार महिलांना या शिबिराच्या माध्यमातुन प्रशिक्षित केले आहे. यातील अनेक महिलांनी प्रशिक्षीत होउन स्वत:चा रोजगार सुरु आहे. सुरवातीला त्यांना कमी मिळकत मिळत असली तरी त्या आत्मसन्माने जगू लागल्या आहे. परिवाराच्या उदरर्निवाहा मध्ये आर्थिक मदत करुन लागल्या आहे. याचा आनंद असल्याचे यावेळी ते म्हणाले.

     

    पूढे ही आपण गरज तिथे शिबिरे या उपक्रमा अंतर्गत सदर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
    या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या महिलांसह मतदार संघातील भगीनींनी आमदार किशोर जोरगेवार यांना औक्षवंत करुन ओवाळनी केली. सर्व भगीनींना आमदार किशोर जोरगेवार यांनीही ओवाळणी स्वरुन भेट वस्तु देत त्यांना भाऊबिज या पवित्र सणाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांसह शेकडो महिलांची उपस्थिती होती.

  • यंग चांदा ब्रिगेडचा कलाकार राष्ट्रवादी कांग्रेसच्या गोटात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वर्ष 2019 ला यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी प्रचंड मताधिक्य मिळवीत चंद्रपूर विधानसभेच्या आमदार पदी विराजमान झाले होते.

     

    मात्र त्यांच्या काटेरी वाट्यात संघर्ष करणारे शिलेदार आमदार जोरगेवार यांची साथ सोडून जात आहे, आधी विशाल निंबाळकर व आता यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप यांनी आमदार जोरगेवार यांची साथ सोडत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेसची घड्याळ हातात बांधली.

     

    कलाकार हा मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी कांग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य व शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्या संपर्कात होता. 13 सप्टेंबर ला नागपुरात पार पडलेल्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या विदर्भ पदाधिकारी मेळाव्यात कलाकार मल्लारप यांनी आमदार रोहित पवार व सलील देशमुख यांच्या उपस्थिती मध्ये असंख्य युवकांसहित राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये प्रवेश केला.

     

    यावेळी सुधाकर कातकर, बेबीताई उईके, राकेश सोमाणी, मुनाज शेख, हरिनाथ यादव, अरुण निमजे, राजेंद्र आखरे, जयंत टेम्भूर्डे उपस्थित होते.